समोरच्या सर्व अडचणी छूमंतर करण्यासाठी पाच सोपे उपाय

या लेखात सांगितल्याप्रमाणे सेल्फ हीलिंगची सवय लावून घ्या. एकदा का हि सवय लागली कि तुमच्या समोरच्या सगळ्या अडचणी छू-मंतर होऊन जातील.

जन्म घ्यायचा, कर्तव्य करायची आणि मृत्यूला सामोरे जायचे असा काहीसा माणसाचा जीवनक्रम असतो.

जन्म मृत्यूच्या मध्ये जे घडते ते ‘आयुष्य’, आणि जो – तो आपले हेच आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न करत असतो.

आणि मग हे आयुष्य संपल्यावर आपल्या आत्म्यास शांती मिळावी, आत्म्याचे क्लेश संपावे म्हणून इतर मंडळी आपल्यासाठी प्रार्थना करतात..

मात्र ही ‘शांती’ खरंच मिळते की नाही हे मात्र कुणी अनुभवले किंवा बघितले आहे..??

नक्कीच कोणी नाही.. कारण सरळ आहे. आत्म्याला शांती मिळायला आपल्याला देह त्याग करून पहावा लागेल आणि पुन्हा माघारी येणे आणि अनुभव सांगणे कोणालाच शक्य नाही, बरोबर ना…!!?

हा गमतीचा भाग सोडला तर, आपण मेल्यावर जरी आपल्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून इतर लोक प्रार्थना करत असले तरी आयुष्यभर समाधानासाठी, शांती साठी, पैसा मिळवण्यासाठी माणूस स्वतः सतत झटत असतो.

आणि या आयुष्यभर झटण्यातच माणूस बरेचदा जेरीस येऊन जातो.

आयुष्य एका पठडीत जगताना स्वतःच्या जीवाला काहीच शांती देत नाही. सतत जीवाची तगमग..!!

म्हणून इथे गरज आहे ती सेल्फ हीलिंग ची….

शिक्षणात अडचण आली, नात्यांचं गणित विस्कटलं, आर्थिक उलाढाली ठप्प झाल्या, मुलं बिघडली एक नाही, दोन नाही शंभर कारणं असतात मनाला जखमी करून घायाळ करणारी.

आणि मग यासाठी आपण काय करायला जातो…

नारायण नागबळी, ग्रहशांती वगैरे वगैरे….

पण मित्रांनो या जखमा भरून निघण्यासाठी गरज आहे ती सेल्फ हीलिंगची… आलेल्या अडचणी, झालेला गुंता चुटकीसरशी सोडवण्यासाठी काय करायचं तर स्वतःच स्वतःला सांभाळायचं.

यासाठी अगदी सध्या सवयी लावून घ्यायच्या. काय ते मी आता तुम्हाला या लेखात सांगणार आहे. आता पुन्हा या सगळ्या त्याच गोष्टी आहेत कि ज्या कळतात पण वळत नाहीत.

पण जर आपण सतत याकडे नीट लक्ष द्यायला सुरुवात केली तर त्या वळायला पण कठीण राहत नाहीत.

तर आता सेल्फ हीलिंग करण्यासाठी आपण स्वतःला काय सवयी लावून घ्यायच्या ते बघा.

१. स्वतःला स्वतःच सांभाळून घ्या:

जेवढे आवडीच्या लोकांवर, वस्तूंवर प्रेम जडते तेवढेच किंबहुना त्याहून जास्त प्रेम स्वतःवर जडले पाहिजे.

आपल्या चुकांचे प्रायश्चित्त घेताना स्वतःवर खूप जास्त कठोर होऊ नका. कोणत्या दुःखात, कोणी दिलेल्या धोक्यामुळे स्वतःला अतोनात त्रास करून घेऊ नका.

कोणाच्या अपयशाचे खापर स्वतःवर फोडताना स्वतःही एक माणूस आहात ह्याचे भान ठेवा. स्वतःला स्वतःच संभाळून घ्या. चुका मग त्या लहान असो किंवा गहन.. स्वतःला माफ करायला शिका..

स्वतःचाच राग करणे, स्वतःला सतत दोषी ठरवत रहाणे ह्या सगळ्यामुळे आपण सतत नकारात्मक माईंड सेट मध्ये वावरतो.

त्यापेक्षा स्वतःला चांगली वागणूक द्या. स्वतःच स्वतःचे लाड करायला शिका.

२. वेळेच्या शक्तीला समजून घ्या:

‘वेळ’ हा खूप ताकदवान शब्द आहे. वेळ भल्याभल्यांना रडवते. मात्र वेळच पुन्हा संधी देते.

एखादा माणूस, रावाचा रंक आणि गरिबीतून धनी होताना ‘वेळ’ त्याचा पिच्छा पुरवते. वाईट दिवस चांगल्या दिवसात परिवर्तित होताना वेळच कारणीभूत ठरते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळ माणसाला अनुभवाने श्रीमंत आणि संयमाने परिपूर्ण बनवते.

वेळच तुटलेले हृदय जोडण्यास आणि ओहोटी लागलेला पैशाचा ओघ पुन्हा सुरु करण्यास मदतीला धावून येते.

त्यामुळे वेळेचा आदर करा. वाईट वेळेनंतर चांगली वेळ सगळ्यांवर येते आणि हे एक निरंतर चक्र आहे..

त्यामुळे संयम, सबुरीने वागल्यास आपण स्वतःला एक सुंदर अनुभव देत असतो.. स्वतःवर होणारे आघात कमी करत असतो हे लक्षात ठेवा.

थोडक्यात काय तर समुद्रा सारखं राहायचं भरतीचा माज नाही करायचा आणि ओहोटीची लाज नाही ठेवायची…

३. जगाच्या कर्त्याच्या शक्तीपूढे झुकून नमन करा:

तुमचा धर्म कोणताही असो मात्र आपल्या निर्माण कर्त्याच्या ऋणातून आपण कधीही मोकळे होत नसतो हे मान्य करा. भले तुम्ही नास्तिक असाल… देव-देव करा, पूजा अर्चा करा असं मला अजिबात नाही म्हणायचं.

पण सेल्फ हीलिंग करण्यासाठी थोडक्यात म्हणजे अडचणींवर, त्रासांवर फुंकर घालण्यासाठी कुठेतरी विश्वास असणं महत्त्वाचं असतं. युनिव्हर्सल पॉवर वर विश्वास ठेवा.

‘देव’ ही संकल्पना मान्य असेल तर विश्वास ठेवा की तो सतत आपल्यासोबत आहे, तो आपली काळजी घेत आहे.

ह्या आत्मविश्वासामुळे तुम्ही स्वतःशीच एक नाते, एक कनेक्ट, निर्माण करू शकता. जसे आयुष्य मिळाले आहे त्याला सामोरे जा.

स्वतःच्या अंतरात्म्याला ह्या नैसर्गिक प्रक्रियेत मिसळून जाण्यास मदत करा. आजचा दिवस काही कारणाने तुमच्या साठी वाईट ठरला तर तो तुमच्या भविष्यात होणाऱ्या काही घडामोडींसाठी कसा महत्वाचा ठरतो हे तुम्हाला नक्की समजेल..

मात्र तुमच्या प्रयत्नांना तो ‘उप्परवाला’ यश नक्कीच देणार आहे.. असे नेत्रदीपक यश, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल..!!

४. काहीतरी वेगळे कार्य हाती घ्या:

रोजच्या पठडीतून, आयुष्याच्या ठरलेल्या चौकटीतून थोडे बाहेर डोकावून पहा.

असंख्य गोष्टी, ज्यांना तुम्ही कधी हात घातला नसेल अशा संधी उपलब्ध आहेत त्याचा शोध घ्या.

कधी न खेळलेले साहसी खेळ असो किंवा, कधीही विचारात न घेतलेले घरगुती काम असो, अशक्य ठिकाणी, पर्वतावर, टेकडीवर चढाई करून जाण्याची संधी असो किंवा स्वतःच्या जोडीदाराबरोबरचे कधीही न अनुभवलेले सिक्रेट उत्कट क्षण असो..

असे वेगळे अनुभव घ्यायला मागेपुढे पाहू नका.. ह्या क्षणानंतर तुमच्यातील भावभावनांना व्यक्त होण्यास वाट मिळेल.

हृदयावरचे ओझे कमी झाल्याचे अनुभवास येईल. राहून गेलेले घडल्यामुळे आत्म्याला समाधान मिळेल, अत्यानंद नक्कीच होईल.

कोणाकडे आपल्या चुकांची माफी मागितली किंवा कोणाला खुल्या दिलाने माफ केले तर मनावरचे काही जुने ओरखडे लवकर हील होतील.

५. इतरांना जमेल तितकी मदत करा:

आपली आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी कोणा गरजूला मदत करण्यापासून स्वतःला रोखू नका..

गरिबाला कधी जमल्यास अन्न, वस्त्र द्या. कोण्या दृष्टीहीनाला परीक्षेत त्याचे डोळे बनून मदत करा, कोणा वृद्ध व्यक्तीचे सगळे दुःखद अनुभव ऐकून घेऊन त्यावर धीराची मलमपट्टी लावून द्या.

इतकेच काय तर कधी एखाद्या मुक्या जनावरावर माया दाखवा, त्याला खाऊ पिऊ घाला.

एखाद्या आपत्कालीन मदत केंद्राद्वारे लोकांच्या मदतीचे सद्कार्य आपल्या हातून घडू द्या.

ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतरांना सुखवतातच पण स्वतःच्या आत्म्याला एक वेगळीच अनुभूती देतात. एक वेगळीच तृप्ती देतात.

मित्रांनो स्वतःला हील करणे, दुःखाच्या-क्लेशच्या गर्तेतून बाहेर काढणे हे सुद्धा खूपच चांगले कर्म आहे.

कारण आपण आनंदी राहिलो तर आपल्या भावतालचे आनंदी राहतात.. आनंद हा साथीच्या रोगाप्रमाणे पसरणारा असतो.

आनंद जितका पसरेल तितके आपण सुखावतो. आनंद, सुख, हर्ष एवढंच काय यश, समृद्धी हे सगळंच संसर्गजन्य आहे.

त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर, वेळेच्या बंधनात जगताना आपल्यातल्या स्वच्छंदी व्हर्जनला कुलुपात घालून बंद करून ठेऊ नका.

सेल्फ हीलिंगची सवय लावून घ्या. एकदा का हि सवय लागली कि तुमच्या समोरच्या सगळ्या अडचणी छू-मंतर होऊन जातील. आणि मग तुमच्यात झालेला बदल कमेंट्स मध्ये लिहून सांगायला विसरू नका.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “समोरच्या सर्व अडचणी छूमंतर करण्यासाठी पाच सोपे उपाय”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय