सासूला आपली मैत्रीण बनवण्याच्या काही खास टिप्स..

बदलत्या काळाची ही गरज आहे की सासू सुनेचे नातेही बदलावे. दोघींकडे समजूतदारपणा असावा, दोघींनी एकमेकींना आपले मानावे, दोघींनी एकमेकींशी मैत्री करावी ह्यातच सुखी संसाराचे रहस्य दडलेले आहे.

या लेखात वाचा ‘अहो आई’ पासून ‘अगं आई’ चा पल्ला कसा गाठायचा.

काय त्या मुलीचे नखरे आहेत हो.. लग्नानंतर नवरा बायको एकटे राहातील, हे मान्य असलेले स्थळच शोधा अशी अट आहे तिची.. असे कुठे असते का..?

हे अगदी सीरिअल मध्ये फिट्ट बसतील असे डायलॉग हल्लीच्या लग्नाळू मुलींसाठी घरोघरी बोलले जातात.

मुली स्वतः मोठ्या परिवारातून येणाऱ्या असल्या तरी लग्नानंतर त्यांना नवऱ्याबरोबर स्वतंत्र संसारच हवा असतो..

वर वर हा आगाऊपणा वाटत असला तरी त्यामागे एक सायकॉलॉजीकल कारणही आहे.

लग्नानंतर नवीन घरात प्रवेश करती झाल्यावर नवविवाहितेला न सहन होणारी गोष्ट म्हणजे ‘सासूबाई’…

खाष्ट सासूबाई.. म्हणजे वर्षानुवर्षे सासू ही खाष्टच असते ह्याचा अनुभव कित्येक महिलांनी घेतला आहे.. नकळतेपणे त्याही पुढे जाऊन खाष्ट सासू झाल्या आहेत..

मात्र ‘अब समय बदल गया है’..

ह्या खाष्ट सासवा धमाल मैत्रिणीच्या स्वरूपात सुने समोर येऊ पहात आहेत.

पण गम्मत अशी होते की ‘सासू’ ह्या नावामागचा इतिहास इतक्या सहजासहजी पुसला जात नाहीये.

अजूनही लग्नाला उभ्या असलेल्या मुलींना सासू नकोच किंवा विभक्त राहणे असेच पर्याय निवडावेसे वाटतात..

पण मुलींनो ती शेवटी तुमच्या नवऱ्याची आईच आहे. तिला कुठे वाऱ्यावर सोडणार..?? त्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या होऊ घातलेल्या ‘अहो आईंना’ ‘अगं आई’ करू शकलात तर किती मजा येईल नाही..??!!

हो..!! अगं म्हणण्यामध्ये ती जवळीक साधली जाते ती अहो मध्ये नाही..

स्वतःच्या आईला अगं संबोधल्यामुळेच तिच्याशी घनिष्ठ नाते तयार झालेले असते. मग तसेच काहीसे नाते आपण सासुबरोबरही निर्माण करूयात.

ह्या मागे काही रॉकेट सायन्स नाहीये बरं.. सोप्या, सहज करण्यासारख्या टिप्स आहेत..

अशा टिप्स ज्यामुळे तुमची सासू तुमची सखी बनेल.. सासरी तुमचा आधार बनेल..

आणि ह्या अनोख्या बॉण्डमुळे नातेवाईकांमध्ये तुम्ही वाहवा मिळवाल तो तर बोनसच..!!

चला तर मग पाहुयात सासूबाईंना कसे जिंकता येईल..

१. त्यांना निर्णयांमध्ये सामावून घ्या: लग्न झाल्यावर नवऱ्याबरोबर हवी हवी आसणारी प्रायव्हसी हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते आणि ते योग्यही आहे.

मात्र त्याच्या पल्याड जाऊन, घरातली इतर दोन चार माणसे दुर्लक्षली जाणार नाहीत ह्याची काळजी घ्या.

तुमच्या सासू बाईंना काय हवे असते..? विचारपूस आणि आदर.. बस इतके सोप्पे आहे..

अर्थात सासूला संसाराचा अनुभवही दांडगा असतो. त्यामुळे तुमच्या संसाराला तिच्या अनुभवाचा फायदाच होणार असतो.

काही निर्णय घेताना सासूला नक्की विचारा. त्यांना काय वाटते ह्याला देखील महत्व द्या.

एक दोन हॉलिडे जोडप्याने जाऊन आल्यावर पुढचा हॉलिडे फॅमिली सोबत असुद्या. तुमच्या नवऱ्याचे आई बरोबर खूप छान नाते असेल तर ते अबाधित राहण्यास मदत करा.

त्या दोघांना थोडा वेळ एकत्र द्या. जसा पूर्वीही ते एकत्र घालवायचे. अशा वेळी तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांना तुमचा वेळ द्या..

आणि हो सासूबाईंना घेऊन शॉपिंगला नक्की जा.. भाजीची असो वा किराणामालाची सासू कडून खूप काही शिकायला मिळेल आणि काही ट्रेंडी शॉपिंग ती तुमच्याकडूनही शिकेल..

तुमच्यात खूप चांगली मैत्री होण्यास ह्याचा नक्की फायदा होईल.

२. त्यांच्याशी आदरानेच बोला: कितीही राग आला असो, भांडण झाले असो पण सासू ही एक आपल्याहून मोठी व्यक्ती आहे हे समजून घ्या..

आपल्या आईशी आपण कसे आदरणेच वागतो तसेच वर्तन सासुसोबतही असू द्या. सासू ही घरातली व्यक्ती आहे आणि तिचा आदर जपणे हे आपले कर्तव्य आहे.

३. तिला जाणून घ्यायचं प्रयत्न करा: फावल्या वेळात सासूशी गप्पा मारा.. जुन्या आठवणी काढा.

नवऱ्याच्या बालपणाबद्दल मजेदार किस्से जाणून घ्या. सासूला काय आवडते, काय आवडत नाही, कोणती हॉबी आहे ह्याबद्दल चर्चा करत जा..

तुमच्यातला एखादा सामायिक धागा मिळेलच. म्हणजे एखादा छंद सारखा असू शकेल किंवा एखादी रेसिपी आवडीची आऊ शकेल.. अशाने तुमच्या मध्ये छान मैत्री होऊ शकते हे लक्षात घ्या.

४. सासुलाही वेळ द्या: सासू बरोबर काही निवांत वेळ घालवा.. गप्पा, गॉसिप आणि कॉफी हा मैत्रीचा भन्नाट त्रिकोण आहे..

जसे आपण आपल्या मित्रमैत्रिणींना वेळ देतो तसा वेळ महिन्यातून एकदा तरी सासूच्या नावे असू द्या.

सिनेमा, छंद वर्ग, किटी पार्टी अशा कार्यक्रमांची मजा एकत्र लुटा..

अजून काही नवीन मार्ग शोधून एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवा. बघा तुमच्यात कशी गट्टी जमेल हळू हळू..!!

५. त्यांच्याशी स्पर्धा करू नका: सासू आणि तुम्ही हे प्रतिस्पर्धी नसून एकाच टीमचे सदस्य असतात ह्याची खूणगाठ बांधा.

तुमच्या दोघींमध्ये काही भन्नाट तर काही कमजोर क्वालिटीज असतील त्याचा एकमेकांना फायदा करवून द्या.

जे पदार्थ सासूला छान जमतात त्यांना दाद द्या मग तुम्ही केलेल्या पदार्थांचे सुद्धा सासुकडून होणारे कौतुक पहा. ‘गिव्ह अँड टेक’ असे नाते हवे. त्यात असूया आणि स्पर्धेला जागा नसावी.

६. सासुशी मोकळेपणाने बोला आणि ऐकूनही घ्या: काही गोष्टींमुळे तुमची घुसमट होत असल्यास सासुशी मनमोकळेपणाने बोला.

स्वतःचे म्हणणे योग्य शब्दात मांडून संवाद साधा. सासूबाईंचे म्हणणे देखील ऐकून घेत जा. पूर्ण ऐकल्याशिवाय मत देण्याची घाई करू नका.

एकमेकींमध्ये सतत संवाद राहू द्या. रुसवे फुगवे, मागून केलेल्या चहाड्या ह्यांना थारा देऊ नका.. बोलून प्रकरण मार्गी लावा आणि सोडूनही द्या..

७. समजूतदारपणा दाखवा: तुम्ही तुमच्या नवऱ्याला जिंकायच्या प्रयत्नात नकळत त्याला त्याच्या आईपासून तोडत तर नाही ना ह्याचा विचार करा.

जसे तुम्हाला तुमचे नाते वाढवायचे असते तसेच आईला तिचे लेकरू गमवायचे नसते.

कोणत्याही आईला आपले लेकरू दुरावतेय असे वाटल्यास ती आक्रमक बनते. त्यामुळे तुमचा नवरा तिचा मुलगाही आहे ह्याची जाणीव ठेवा.

त्या दोघांच्या नात्यात तुमच्यामुळे दुरावा येणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमचा समजूतदारपणा इथेच कामी येणार आहे.

ह्यात तिच्या मुलाची आणि तुमच्या नवऱ्याची रस्सीखेच होणार नाही ह्याकडे लक्ष असू द्या..

दर वेळी चूक सासूचीच असते असे नाही. आपल्यातही काही दुर्गुण असू शकतात आणि त्यांना बाजूला करून सासूला आपलेसे करणे आपल्या आयुष्यभराच्या आणि हेल्दी संसाराच्या दृष्टीने हे उत्तम ठरते..

‘अहो सासूबाई’ म्हणता म्हणता ती कधी आपली ‘अगं आई’ होते हे आपल्यालाच कळत नाही.

आता बदलत्या काळाची ही गरज आहे की सासू सुनेचे नातेही बदलावे. दोघींकडे समजूतदारपणा असावा, दोघींनी एकमेकींना आपले मानावे, दोघींनी एकमेकींशी मैत्री करावी ह्यातच सुखी संसाराचे रहस्य दडलेले आहे.

मात्र मुलानेही हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या बायकोने जर आपल्या आईवडिलांना जपले पाहिजे तर त्यानेही बायकोच्या आईवडिलांना तितक्याच प्रेमाने आणि आदराने जपले पाहिजे.

शेवटी लग्न हे दोन कुटुंबांचे मिलन आहे. आणि एकमेकांच्या साथसंगतीने त्यात सुंदर रंग भरले जातात. एका सुखी कुटुंबाच्या पाठीशी दोन्हीकडचे आई वडील खंबीरपणे उभे असल्यास अजून आयुष्यात काय पाहिजे..??!!

‘सून’ ही मैत्रीणही बनू शकते. नाही पटत..? मग वाचा ह्या लेखात

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय