महिन्याभरात फ्रेश होऊन उत्साह वाढवण्यासाठी आजमावून बघा हे ३० डेज चॅलेंज

३०_डेज_चॅलेंज

आपण लहानाचं मोठं होताना वयाचा एकेक टप्पा पार करत जातो.

नुकतंच जन्मलेलं बाळ हळू हळू पालथं पडायला लागतं, रंगायला लागतं, उभं राहायला लागतं. तेव्हा त्याला उभं राहिलेलं पाहून घरातल्या सगळ्यांचा आनंद गगनात मावत नाही.

दिवस, महिने, वर्ष करत करत ते बाळ मोठं होऊ लागतं. शाळेत जाऊ लागतं.

हे असं मोठं होता होता, ज्या गोष्टी आपोआपच केल्या गेलेल्या असतात, करवून घेतल्या गेलेल्या असतात त्या आपोआपच सवयी होऊन जातात.

काही सवयी असतात चांगल्या ज्या माणसाला यशाच्या शिखराकडे घेऊन जातात. भरभरुन आयुष्य जगायला शिकवतात. आणि साहजिकच काही सवयी आपल्या जगण्याचा डोलारा बिघडवणाऱ्या असतात.

या सवयीच माणसाचं आयुष्य घडवत किंवा बिघडवत सुद्धा असतात. चांगलं आयुष्य जगण्यासाठी चांगल्या सवयी अंगी असणं महत्त्वाचं असतं.

आणि या चुकीच्या सवयी म्हणजे जास्त काही बाऊ करण्याची गोष्ट नाही. कारण या सवयी बदलणं खूप काही अशक्य अशी गोष्ट नाही.

आज या लेखात यशस्वी आयुष्य जगण्यासाठी, महिन्याभरात फ्रेश होऊन उत्साह वाढावा अशा तीस ऍक्टिव्हिटीजचे ३० डेज चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे.

कारण तुम्हाला जर चांगलं आणि यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर स्वतःमध्ये चांगल्या सवयी विकसित करण्याची युक्ती आधी तुम्हाला माहित असली पाहिजे. आणि ती युक्ती म्हणजेच हे ३०_डेज_चॅलेंज.

मनाचेTalks च्या पेजवर आपण महिनाभर हि ऍक्टिव्हिटी घेतली तेव्हा सर्व फॉलोअर्सने यातून आपल्या सवयींमध्ये बदल घडून आणत हे चॅलेंज छान एन्जॉय केले.

बरेच जणांनी यात भाग घेता नाही आला म्हणून पुन्हा हे चॅलेंज देण्याबद्दल विंनतीही केली. म्हणूनच आजचा हा लेख.

आता आपण जगण्यात उत्साह आणणारे हे #३०_डेज_चॅलेंज काय आहे ते बघू

१) पूर्ण होऊ शकणारं साधं सोप्प ध्येय निश्चित करा

३०_डेज_चॅलेंज

२) तुम्हाला कशाबद्दल कृतद्न्यता वाटते त्याची यादी करा (इथे लेख वाचून चॅलेंजमध्ये तुमचा सहभाग नोंदवण्यासाठी कमेंट्स मध्ये चर्चेत नक्की सामील व्हा)

३०_डेज_चॅलेंज

४) तुम्हाला पूर्ण होण्याची अपेक्षा असलेल्या कामांची To Do List बनवा

३०_डेज_चॅलेंज

५) सकारात्मक तेच जवळ बाळगा

३०_डेज_चॅलेंज

६) जास्त हसा

३०_डेज_चॅलेंज

७) रोज १५ मिनिटं बाहेर फेर-फटका मारून या

३०_डेज_चॅलेंज

८) घर स्वतः स्वच्छ आणि नीट नेटकं करायला घ्या.

३०_डेज_चॅलेंज

९) एका नवीन गोष्टीची किंवा कामाची सुरुवात करा.

३०_डेज_चॅलेंज
१०) झोपण्यापूर्वी मेडिटेशन करा.

३०_डेज_चॅलेंज
११) एक पुस्तक वाचायला घ्या.

३०_डेज_चॅलेंज
१२) स्वतः स्वयंपाक करण्याची मजा आजमावून बघा.

३०_डेज_चॅलेंज
१३) गेल्या १२ दिवसांत आपल्यात काय बदल झाले ते एनलाईझ करा.

३०_डेज_चॅलेंज
१४) रात्री ७ ते ८ तास झोप झालीच पाहिजे, अशी सुरुवात करा.

३०_डेज_चॅलेंज
१५) कधीही करत नसलात तरी आज डान्स करा

३०_डेज_चॅलेंज
१६) ३० मिनिटांसाठी मोबाईल पासून दूर राहा.

३०_डेज_चॅलेंज
१७) कोणाला तरी मदत करून बघा.

३०_डेज_चॅलेंज
१८) आजपर्यंतचे चॅलेंज पूर्ण केले ना! मग स्वतःला रिवॉर्ड द्या

३०_डेज_चॅलेंज
१९) कुटुंबाबरोबर वेळ घालवा

३०_डेज_चॅलेंज
२०) दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या

३०_डेज_चॅलेंज
२१) स्वतःचे तीन चांगले गुण सांगा.

३०_डेज_चॅलेंज
२२) काम पुढे ढकलण्यासाठी स्वतःच स्वतःला एक्स्क्यूज देऊ नका.

३०_डेज_चॅलेंज
२३) रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा.

३०_डेज_चॅलेंज
२४) सिरीयस न राहत हसा, कॉमिडी फिल्म बघा.

३०_डेज_चॅलेंज
२५) उद्याचा सूर्योदय बघण्यासाठी उठायचंय म्हणून रात्री लवकर झोपा.

३०_डेज_चॅलेंज
२६) किमान दहा मिनिटं सायकलिंग करा

३०_डेज_चॅलेंज
२७) रात्री आठच्या आधी जेवण्याचा प्रयत्न करा.

३०_डेज_चॅलेंज
२८) किमान ३०० शब्द स्वतःबद्दल लिहा

३०_डेज_चॅलेंज
२९) दिवसातून ५ वेळा एकांतात जोराने बोला ‘मो खूप आनंदी व्यक्ती आहे’

३०_डेज_चॅलेंज
३०) आपल्यातलं चांगलं व्हर्जन विकसित करण्याची प्रतिज्ञा करून विशेष ‘डिनर’ घ्या

३०_डेज_चॅलेंज

फ्रेश आणि उत्साही राहून आयुष्य जोमात जगण्यासाठी हे ३० डेज चॅलेंज घेऊन पहा. यातल्या काही गोष्टी तुम्ही आधीपासूनच करत असाल तर ते कमेंट्स मध्ये सांगा. म्हणजे ती गोष्ट, ते चॅलेंज आणखी वेगळ्या पद्धतीने घेता येईल का याबद्दल कमेंट्स मध्ये चर्चा होऊ शकेल.

आता सध्या मनाचेTalks च्या पेजवर ३०_डेज_चॅलेंज_फॉर_फायनान्शिअल_हेल्थ चालू आहे. त्यामध्ये चांगल्या आर्थिक, व्यावहारिक सवयी समाविष्ट केलेल्या आहेत. त्यात तुम्हाला रस असेल तर तुमचे आमच्या टीमकडून मनःपूर्वक स्वागत…

धन्यवाद.

https://www.manachetalks.com/10600/financial-planning-30-days-chellange-for-financial-health-marathi/

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

3 Responses

 1. Kapil says:

  Whatup no not added,because already fulled.

  • मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇खाली दिलेल्या ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

   https://chat.whatsapp.com/CBUDNF6JjgGDpPfuuv1nSM

 2. Rishi says:

  खुप छान चॅलेंज दिले आहेत तुम्ही
  यातील सर्व चॅलेंज पुर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन…..
  यातील
  ११) एक पुस्तक वाचायला सुरवात करा हे मी आधी पासूनच चॅलेंज सुरू केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!