३६ गुण जुळलेले असून ३६ चा आकडा? आणि तसे असेल तर काय करायचे?

एका मैत्रिणीची दर्द भरी दास्तान ऐकून घेतली आणि मला कळून चुकले की हे जे आपण म्हणतो ना आमची केमिस्ट्री भारी आहे, ते तसं काही नसतं…

म्हणजे एकमेकांच्यातली समरसता किंवा केमिस्ट्री सुरेख असू शकते..

मात्र तरीही २ जीवांचे नाते टिकवण्याला खूप काही लागते. मैत्रिणीचेही असेच झाले.

तब्बल 3 वर्ष ते दोघे एकत्र होते मात्र त्या नात्यात असूनही ती दुःखी होती. तो सतत तिच्यावर कुरघोड्या करायच.

तिला काय वाटते, तिला काय हवे, तिच्या इच्छा आकांक्षा काय आहेत ह्याच्याशी त्याला काहीच घेणे देणे नव्हते. बरं असे असूनही तो हि तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो असेही काहीसे तिला वाटायचे.

या सगळ्या घोळत ते एकत्र मात्र होते. सरते शेवटी त्याने तिचे हृदय तोडलेच. आणि ते वेगळे झाले. आणि हो असे ६ वेळा घडले तेही ३ वर्षात..

म्हणजे बघा ना तिला सुद्धा कळले नाही की ती तीच तीच चूक पुन्हा का करत होती..

त्यांच्यातली मजबूत केमिस्ट्री त्यांचे नाते टिकवू नाही शकली.. त्यांच्यामध्ये समजूतदारपणा, आदर उरलाच नाही आणि उरले फक्त भांडण..!! ज्यामुळे दोघे वेगळे झाले.

आता असे किस्से आपण तर वारंवार ऐकतो नाही का..?? एकतर बरीचशी जोडपी पूर्णतः विभक्त होतात नाहीतर बरीचशी एकाच छताखाली राहून पूर्णतः दुरावलेली असतात…

पण बऱ्याचदा ही जोडपी तीच असतात ज्यांचे एकमेकांशी अगदी ३६ गुण जुळतील असे वागणे असते. मग अचानक ह्या समरसतेचा भंग का बरे होत असेल..?

तर आपण पहिल्यांदा जोडप्यांमध्ये असणारी ही केमिस्ट्री काय असते ते जाणून घेऊयात.

खरे तर हा वैज्ञानिक शब्द आहे. बरे हे लॅब मधल्या ऍसिड, द्रव ह्याबद्दल नसले तरी माणसांमधल्या हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटर बद्दल म्हटले जाते.

ह्या आधारावर माणसांच्या स्वभावाचे ४ पैलू असतात..

१) काही जण खूप चिकित्सक असतात. साहसी खेळ करणे, भन्नाट ऍक्टिव्हिटी करणे हे त्यांच्या आवडीचे. हे क्रिएटिव्ह देखील असतात..

याला कारणीभूत असते त्यांच्या शरीरातील डोपामाईन हार्मोन्स चे प्रमाण.

२) काही जण कृती करणारे असतात. जे काळजी घेऊन वागणारे, चार चौघांसारखे वागणारे, म्हणजे सगळं काही करू शकणारे असे.. सेरोटॉनिन हार्मोन्सचा प्रभाव याला कारणीभूत असतो.

३) काही जण पुढारी असतात जे सगळ्यांना लीड करतात. खूप अग्रेसिव्ह असतात. चिकित्सा करणारे, एक दिशेने विचार करणारे असतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या प्राबल्यामुळे त्यांची वागणूक अशी असते.

४) काही जण वाटाघाटी करणारे असतात, हे समजूतदार, अगदी हवे तसे, किंवा वस्तुस्थिती कडे लक्ष देऊन काम करणारे असतात. म्हणजे अगदी मॅरेज मटिरियल म्हणावे असे. हा प्रभाव असतो इस्ट्रीजन हार्मोन्सचा.

ही शारीरिक हार्मोनल विशेषणे असतातच सोबत मानसिक विशेषणे विसरून चालत नाही. ह्या दोन्हीच्या मिश्रणातून माणसाचे वागणे ठरते. अर्थात हार्मोन्स च्या बदलामुळे ते बदलतही असतं.. आणि इथेच सगळ्या अडचणींचा केंद्रबिंदू असतो.

आपल्यावर आणि समोरच्यावर हे हार्मोन्स प्रभाव टाकत असतात.. जेव्हा दोघांचे हार्मोन्स परस्पर पूरक असतात तेव्हा त्यांच्यातली केमिस्ट्री भन्नाट असते..

काही जोडपी कित्येक वर्षे एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने संसार करत असताना आपण पाहतो.

काही बहीण भावंडे अजिबात भांडखोर नसतात.. अशी शांतीपूर्ण आयुष्य व्यतीत करणारी नाती आणि नातलग पाहून आपल्याला सतत आश्चर्य वाटत राहते.

मात्र ह्याच्या मागे कारण हेच आहे की ह्यांच्यातला मानसिक, शारीरिक हार्मोनल बॅलन्स त्यांच्यात एक संतुलन राखतो.

पण जी ३६ चा आकडा असलेली माणसे भवताली दिसतात त्यांचा, ‘बोले तो अजब केमिकल लोचा’ झालेला असतो.

मात्र हे सुद्धा टाळता येऊ शकते कारण केमिकल इंबॅलेन्स जरी झाला असेल तरी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण नाती टिकवू ही शकतो..

काही स्वभावातील वैशिष्ट्ये जपली तरी आयुष्य रंगतदार नक्कीच होऊ शकते.

1) एकमेकांवर लक्ष केंद्रित करणे

2) एकमेकांच्यातील रस वाढवणे

3) एकमेकांवर प्रेम करणे

4) एकमेकांची काळजी घेणे

5) एकमेकांशी संवाद साधणे

6) एकमेकांना मानसिक आधार देणे

7) नात्यात खिलाडू वृत्ती बाळगणे

8) विनोदी स्वभावाचे पैलू उघडणे

9) एकमेकांना मदत करणे

ह्यातील गुण अंगी बाणवल्यास आपण हार्मोनल इंबॅलेन्स वर कुरघोडी करू शकतो. इतके करून सुद्धा भांडण होणार नाही असे नाहीच.

कारण रोजचा येणार दिवस एक नवीन आनंद, नवीन दुःख, नवीन अडचणी, नवीन चॅलेंज, नवीन सोल्युशन आणत असतो..

आणि त्या सगळ्यांशी डील करताना आपले मन काबूत ठेवणे, शांत ठेवणे हे अवघड असू शकते. त्यामुळे थोडे वादविवाद होतीलच.

टोकाची भांडणे, नात्यात दुरावा येणे अशा अनंत दुर्दैवी गोष्टी आपण टाळू शकतो.

शरीरातील केमिस्ट्री बदलत राहते आपलीही आणि आपल्या भवतालच्या माणसांचीही. तिला हँडल करणे किंवा रोखणे आपल्या हातात नसते.

ते नैसर्गिक आहे मात्र आपले हितसंबंध आपण जोपासू शकतो. ते योग्य रीतीने जपण्याकरता आपल्यात योग्य ते बदल आपण करू शकतो आणि आपल्या जोडीदाराला, नातेवाईकाला, मित्र मैत्रिणीला देखील सांगू शकतो.

असे असताना सगळे बदल आपणच करायचे आणि समोरच्याने नाही हे मात्र अयोग्य.

सतत पडती बाजू घेणे, स्वतःला समोरच्याचा मानसिक गुलाम बनवणे, प्रेमाखातर वाटेल ते सहन करणे हे अमानवी असते हे लक्षात घ्या.

स्वभावातील वैगुण जरूर बदला पण काही गोष्टी युनिव्हर्सली कोणत्याच मनुष्य प्राण्याने बदलू नयेत.. त्या म्हणजे

1) सच्चेपणा

2) दुसऱ्यांबरोबर स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणे

3) मेहनतीपणा

4) उदारता

5) विनोदबुद्धी

6) संभाषण कला

7) जोडीदाराचा आदर देणे

8) स्वतःचे म्हणणे स्पष्टतेने मांडणे आणि दुसऱ्यांचे ऐकूनही घेणे

9) स्वतःचे मूडस्विंग समजून घेणे आणि जोडीदाराचेही..

ह्या सगळ्या अगदी योग्य गोष्टी आहेत आणि त्या बदलता कामा नये. किंबहुना तुमच्यात नसतील तर अंगी बाणवून घ्या.

केमिस्ट्री कितीही चांगली असली तरी इतर कित्येक गोष्टींचा आपल्या नात्यावर परिणाम होऊ शकतो हे विसरता कामा नये आणि हे विसरलो तर हाती घोर निराशा येईल हे नक्की.

नाते कोणतेही असो आपण त्यात रूप आणि पैसा बघत नाही.. बघतो तो स्वभाव..!!

हा स्वभाव जरी शरीरात होणाऱ्या हार्मोनल इंबॅलेन्स मुळे वर वर बदलत राहिला तरी मूळ स्वभाव कधीच बदलला जात नाही.

त्यामुळे आपल्याच माणसाला दुरावू नका. आणि समोरच्याला सांभाळण्याच्या या प्रक्रियेत स्वतःलाही दुबळं बनवू नका.. ‘राईट वागणं आणि राईट चॉईस’ हे महत्त्वाचं..!!

त्यामुळे तुमच्यात केमिस्ट्रीचा अभाव असला तरी तुम्ही जगातले ‘बेस्ट कपल’ चा किताब मिळवू शकता..!! तर मग वाट कोणाची पाहता..??!! योग्य दिशेने वाटचाल सुरू करा..

तुमच्या आयुष्यात ह्यामुळे काही सकारात्मक बदल झाले तर आम्हाला जरूर जरूर कळवा.. शुभेच्छा..!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय