भांडण झाले तर जोडीदाराला कन्व्हिन्स करण्याचे ४ भन्नाट उपाय

लग्नाची नवलाई असते तोपर्यंत सुरुवातीला एकमेकांच्या तक्रारी मन लावून ऐकून घेतल्या जातात. त्यावर उत्साहाने कामही केले जाते. काही वर्षांनी तक्रारी ऐकून घेतल्या जातात आणि त्यावर नाईलाजाने काम केले जाते..

नंतर तक्रारी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात. अजून काही वर्षांनी त्याच-त्याच तक्रारी ऐकून घेणे देखील जीवावर येते.. तर आता या लेखात वाचा जोडीदारासमोर तक्रारी कशा मांडायच्या… आपल्या मुद्द्यांवर जोडीदाराला कन्व्हिन्स कसं करायचं..

संसार आणि भांडण हे दोघे हातात हात घालून चालणारे जिगरी दोस्त आहेत.

कोणाचाही संसार वाद, भांडणं, तंटे आणि तक्रारींशिवाय झाला नाही, होत नाही आणि होणारही नाही..

दोन भिन्न घरातील व्यक्ती स्वभावातील काही गुणांमुळे आकर्षित होतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडून विवाहबंधनात अडकतात..

मात्र एकमेकांचा खरा स्वभाव हा कालांतराने कळायला लागतो. भरपूर गोष्टी खटकायला लागतात. कित्येक गोष्टी पटेनाश्या होतात. आणि त्यांचे पर्यवसान एकमेकांना तक्रारी करण्यात होते..

बायकोने पैसे उडवले, ती किती खर्चिक आहे, तिला संसार जमत नाही हे सतत बायकोला सांगितल्या शिवाय नवऱ्याला अन्नपाणी गोड लागत नाही.

तर नवऱ्याने आपल्याला कधीच वेळ दिला नाही, सासरच्यांसमोर रिस्पेक्ट दिला नाही, आपले म्हणणे कधीच ऐकले नाही ह्या काही तक्रारींचा पाढा सतत वाचला जातो.

हे रोजचे रुटीन होऊन जाते.. मग एकमेकांच्या ह्या म्हणण्याकडे कोणीच लक्ष देईनासे होते. मात्र ही अगदीच शेवटची पायरी असते..

सुरुवातीला तक्रारी मन लावून ऐकून घेतल्या जातात. त्यावर उत्साहाने कामही केले जाते.

काही वर्षांनी तक्रारी ऐकून घेतल्या जातात आणि त्यावर नाईलाजाने काम केले जाते..

नंतर तक्रारी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात.

अजून काही वर्षांनी त्याच-त्याच तक्रारी ऐकून घेणे देखील जीवावर येते.. त्यावर काम करणे तर सोडाच पण त्या ह्यापुढे ऐकूनही घेतल्या जाणार नाहीत असेही ठणकावले जाते..

म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला कोण विचारतो अशी स्वतःची समजूत करून काही जोडपी आयुष्य ढकलत असतात.

अशी लग्न भले यशस्वी होत असली तरी त्यांच्यातला आनंद कधीच मावळलेला असतो. एक तडजोड म्हणून ते आयुष्य एकत्र काढतात.

छोट्या छोट्या तक्रारी जर सोडवल्या गेल्या नाहीत तर लग्न तुटण्यापर्यंत मजल जाऊ शकते.

म्हणून एकमेकांबद्दल काय वाटते किंवा काय अपेक्षा आहेत त्या लग्ना आधीच मांडल्या तर उत्तम असते.

लग्नानंतरही अशा अपेक्षा तक्रारी स्मार्टली एकमेकांपुढे मांडून भन्नाट मॅरीड लाईफ जगणारे आनंदी, प्रेमात आकंठ बुडालेले कपल्स आपण पाहतो.

त्यांच्या दुनियेचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.. मग असे काय करत असतील बुवा हे कपल्स..??

एकमेकांची उणीदुणी काढूनही कसे बुवा मजेत रहात असतील हे..?? उत्तर खूपच भारी आहे.. तुम्हीही प्रयत्न करून बघा..

१. मला काय वाटते इतकेच म्हणणे मांडा: सहसा जोडीदाराला तक्रार करणे म्हणजे नवीन भांडणाला तोंड फोडण्यासारखे असते. आपल्या मनात काही दिवसांचा राग धगधगत असतो.

पुरुष तो राग आरडाओरडा करून तर स्त्रिया तो राग चिडून आणि रडून व्यक्त करतात.

ह्या मध्ये एकमेकांशी बोलणे हा हेतू नसतो तर एकमेकांवर आरोप करून भांडणे इतकेच सध्या करायचे असते.

त्यामुळे तक्रारी राहतात एका बाजूला आणि हे दोघे मात्र एकमेकांशी अबोला धरून आयुष्यातले ४-५ दिवस धुसफुसत वाया घालवतात.. शेवटी प्रॉब्लेम ‘जैसे थे’ असाच राहतो.

त्यापेक्षा एखाद्या योग्य वेळी तुमच्या मनात काय चलबिचल आहे. तुम्हाला काय फील होत आहे. इतकेच म्हणणे जोडीदारापुढे मांडा..

तुम्ही स्वतः प्रोब्लेमची पाळे मुळे खणू नका. म्हणणे असे मांडा की समोरची व्यक्ती स्वतःहूनच मुळ शोधण्यास उद्युक्त होईल.

तुमच्यात एक संवाद घडेल आणि त्याची कारणमीमांसा होईल. कदाचित लगेच त्याचा सोक्षमोक्ष देखील लागू शकेल..

त्यामुळे राग, अश्रू हे सगळे बाजूला ठेऊन तटस्थपणे मुद्दा समोर ठेवा. त्यात कोणताच ड्रामा करायची गरज नाही..

एकमेकांवर वार करायची देखील गरज नाही हे लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला कसे वाटते इतकेच बोलून दाखवा.

२. महत्वाचा मुद्दा लांबण न लावता स्पष्टपणे बोला: आपल्याला सवय असते एखाद्याच्या त्रुटींना त्याच्या आवडत्या लोकांना चिकटवून मोकळे व्हायची..

म्हणजे जर बायकोने चूक केली तर तिच्या आई वडिलांचा उद्धार केल्याशिवाय बरे वाटत नाही.. मग अशा तऱ्हेने बोलले गेले तर बायको किती दिवस ऐकून घेईल..??

एक दिवस ती सुद्धा तुमच्या चुका तुमच्या आईवडिलांची कृपा आहे असाच निष्कर्ष काढेल.

जे तुम्हाला रुचणार नाही. ह्यात स्वतःच्या चूक बघण्यापेक्षा फक्त एक स्पर्धा लागेल की कोणाच्या आईवडिलांची चूक जास्त मोठी..??

हे असे नात्यात होणे म्हणजे एकमेकांना दुरावणे होय. अशाने नात्यातले प्रेम आणि आदर कमी होतो आणि संशय आणि निरादर वाढतो..

त्यापेक्षा फक्त चुकीबद्दल बोला. बायकोला सांगा जी खरेदी तिने केली ती गरजेची नव्हती.

ते पैसे वाचले असते तर काय काय करता आले असते. किंवा नवऱ्याची एखादी वाईट सवयी जसे की ओला टॉवेल वाळत न घालणे, किंवा वेळेत पैसे न देणे ह्या बद्दलच तेवढे काय ते बोला आणि विषय संपवा..

ह्या चुकीच्यामुळे काय प्रॉब्लेम होतात आणि त्यात बदल कसा करता येईल तेवढेच समजवा. म्हणजे तुमचे काम झाले. त्यात टोचून बोलणे, तिरकस बोलणे, टॉंंट मारणे टाळा..

३. तुमची जोडीदाराकडून काय अपेक्षा ते नेमके सांगा: जे अशक्य आहे अशी अपेक्षा ठेवणे पाहिले सोडा. स्वभावासंदर्भात एखादा बदल असेल तर तो लगेच होणार नाही हे गृहीत धरा.

जे शक्य वाटतायत अशाच अपेक्षांबद्दल चर्चा करा. एखादी सहज करण्यासारखी गोष्ट बोलून दाखवा.

जसे की सुट्टीच्या दिवशी आराम करून झाल्यावर २ – ३ तास कुटुंबाला द्यावेत, त्यात कुठे बाहेर फिरायला न्यावे अशी रिक्वेस्ट करून पहा.

किंवा बायकोने महिन्यातून एकदा दोनदा तरी स्पेशल खाद्यपदार्थ करावा अशी लाडिक मागणी करून पहा. एकमेकांच्या स्वभावातील चिडचिडे पणा कमी करण्या बद्दल बोलून दाखवा.

४. स्वतःमध्ये काही बदल करणे अपेक्षित असेल तर ते जोडीदाराला विचारा: सतत समोरच्याकडून अपेक्षा करणे आणि स्वतः कणभरही सकारात्मक कृती न करणे हे वादाचे मुख्य कारण असते.

त्यामुळे तुमच्यातल्या कोणत्या गोष्टी बदलाव्या असे तुमच्या जोडीदाराला वाटते ते विचारून पहा.. खेळीमेळीने गप्पा मारून ते बदल कसे करावेत हे जाणून घ्या.

तसे व्हायचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल असे आश्वासन द्या. त्या दृष्टीने पावले टाका. हे खरे तर सगळ्यात अवघड काम पण हेच महत्वाचे असते.

नवऱ्याला विचारा पैसे वचवायचे काय काय सोअर्स असू शकतात जेणे करून तुम्ही पैसे वाचवाल किंवा तुमच्या स्वभावातला कोणता दुर्गुण त्याला बदललेला हाव आहे..?? बायकोला नक्की सांगा की तुम्ही तिला सगळ्यात जास्ती वेळ द्याल आणि तुमच्या लोकांमध्ये तिच्या बाजूने नक्की उभे राहाल..

हे छोटे छोटे बदल केल्याने तुमच्या नात्यात परिपक्वता येणार आहे.

हे करताना थोडा समजूतदारपणा ही अंगी बाणवला की काही काळानंतर एकेमकांच्या तक्रारी करणे, कुरबुर करणे देखील आपोआप कमी होऊन जाईल.

मात्र एकमेकांशी संवाद साधताना एक गोष्ट अगदी लक्षात ठेवायला हवी की तुम्ही प्रॉब्लेम सोडवायलला बोलत आहात, वाढवायला नाही.. संयम ढासळू देऊ नका, रडणे, चिडणे आणि एकमेकांवर आवाज वाढवणे हे खचितच योग्य नाही.

त्यामुळे एकमेकांचा आदर ठेवून प्रेमाने, गोडी गुलाबीने आपल्यातले अंतर कमी करा.. शेवटी नवरा बायको हेच एकमेकांचे आयुष्यभराच्या सोबती असतात.. बाकी कोणीच आपल्यासाठी उभे रहात नाही. म्हणूनच बडे बुजुर्ग म्हणतात ‘नांदा सौख्यभरे..!!’

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय