खरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का?

एकीकडे पैसा, श्रीमंती, समृद्धी आणि दुसरीकडे आनंद याचा काही संबंध आहे का? आणि तो आहे असे जर, हा लेख वाचून तुम्हाला पटले तर पैसा कमावण्याचे आजच्या टेक्नॉलॉजी च्या युगात कोणकोणते मार्ग तुमची वाट पाहत उभे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू..

मित्रांनो, आज जरा वेगळा विषय घेऊन तुमचा आनंद किंवा तुमची खुशी नक्की तुम्हाला कशाने मिळेल हे पटवून द्यायचा प्रयत्न ह्या लेखातून मी करतोय.

जर हा विषय तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की खुश व्हाल. आणि त्या दृष्टीने तुमचं विचार चक्र जोरात फिरायला लागेल.

ह्या मागचा हेतू हाच आहे की “धन” आपला सर्वांचा प्राणप्रिय असा ‘पैसा’ ह्याच्या माध्यमातून आनंद आणि खुशीचा अनुभव घेणं, आणि धनाचा संबंध आनंदाशी कसा आहे ते समजून घेणं. शिवाय पैसा कमावणं, व्यवसाय संधी शोधणं हा फक्त गुजराती, मारवाडी माणसाचाच प्रांत आहे असा गैरसमज आपल्या मराठी माणसाच्या मनातून उखडून फेकणं हा या लेखाचा हेतू.

“आनंद” हा प्रत्येक माणसाचा आवडता विषय आहे. आयुष्यात असंख्य अशा गोष्टी आहेत की त्या फक्त आपल्याला आनंद देतात. आपल्याला बरं वाटतं, आपण खुश होतो.

आपल्याकडे जर भरपूर पैसा आला तर आपल्याला किती आनंद होईल? खूपंच ना?… नाही म्हणू नका!

मग आता आपल्यापैकी काहीजण म्हणतील काहीतरी काय राव सांगताय, पैसे काय झाडाला लागतात का? इतका पैसा आमच्या नशिबात नाही तर उगाच कशाला त्याच्यावर चर्चा?

काहीजण म्हणतील जास्त पैसा ज्या लोकांकडे आहे ते काय आनंदी असतात काय? त्या पेक्षा आम्ही बरे, रात्री सुखाची झोप तरी घेता येते.

जास्त पैसा आला की माणूस वाकड्या रस्त्याला जातो. करायचा काय जास्त पैसा, असंही काही लोक म्हणतील.

जास्त पैसा आला की आजार पण जास्त, सगळा पैसा आजारपणातच खर्च होतो. पैशांनी थोडंच आनंद खरेदी करता येतो? पैशाचा आणि आनंदाचा काही संबंध नाही. असं काही जण म्हणतील.

असं ऐकल्यावर तुमच्या मनात काय विचार येईल? अरे? ही सगळी माणसं पैसा कमवायचा नाही म्हणून असं म्हणतायत!!? का हे लोक आळशी आहेत?

तर तसं नाही, फार पूर्वीपासून आपण असंच ऐकत आलोय की पैसा पैसेवाल्यांकडेच जातो… गरिबांकडे नाही येत…

पण मित्रांनो, जे विचार आपण लहानपणापासून ऐकत आलोत. हे सगळे विचार निगेटिव्ह झालेत.

आपण जर ह्याची दुसरी बाजू, म्हणजे पॉझिटीव्ह बाजूचा विचार केला ना तर कळेल की खुशी किंवा आनंद आणि पैसा यांचा खूप जवळचा संबंध आहे. निदान ह्या बदलत्या जगात तरी हा विचार समजून घ्यायला पाहिजे.

कारण श्रीमंत तेच लोक होतात, जे पैशाबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात.

पण जर का तुम्ही म्हणायला सुरुवात केली कि, ‘नको रे बाबा! जास्त पैसा कमावण्यापेक्षा काटकसरीत का असेना, मला सुखाची झोप हवी!!’ तर अशा मानसिकतेमुळे पैसा नाही आणि म्हणून शेवटी कमजोर आर्थिक परिस्थितीमुळे सुखाची झोप नाही अशा दुष्टचक्रात तुम्ही अडकून जाल.

जास्त पैसा मिळवणं हे काही वाईट नाही. सगळ्यांनाच पैसा हवा असतो. कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्या गरजा भागवणारी गोष्ट म्हणजे पैसा.

आवश्यक गरजा म्हणजे ‘रोटी’, ‘कपडा’, ‘मकान’. निदान ह्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला पैसा मिळवणं आवश्यक असतं. पण हे झालं एकट्या माणसा पुरता पैसा मिळवणं.

तरुण असताना, एकटे असताना आपल्याला एवढं पुरेसं असतं, पण दोनाचे चार हात झाले की सगळे खर्च हळू हळू वाढायला लागतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर वेगळा खर्च करावा लागतो.

मुलांचा शिक्षणाचा खर्च, कपडे, चपला-बूट, क्लासेस, शाळा कॉलेज चा जाण्या येण्या चा खर्च, फी, असे सगळे खर्च वाढायला लागतात.

याशिवाय आजारपण, औषधं, ह्याचा ऐनवेळी करावा लागणारा खर्च असे सगळे खर्च मिळून खूप मोठी रक्कम दरमहा खर्चासाठी लागते. आणि ही वाढत जाणारी असते. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे.

ह्या सगळ्या आवश्यक गरजाच असतात की!! मग मला तुम्ही सांगा, की जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शाळेची फी वेळेत भरता येत नसेल तर तुम्ही खुश असाल का?

तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल आणि त्या हॉस्पिटलचं बिल भरायला तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर तुम्ही आनंदी असाल का? तुमच्याच क्रेडिट कार्डचं बिल वेळेत देऊ शकला नाहीत तर तुम्ही आनंदी राहू शकाल का?

ज्यावेळी आपल्या हातात ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी म्हणजे दर महिन्याला पुरेल इतके पैसे येत असतील त्यावेळी आपण खुश असतो.

आपला परिवार सुद्धा तसा आनंदी असतो, खरं की नाही???? पण आपल्याला पैसा पुरत नसेल तर आपण आनंदी असतो का? शक्यच नाही.

कधी कधी अचानक, खूप मोठा आजार, किंवा ऍक्सिडेंट, एखादी अप्रिय घटना घडते त्यावेळी मोठया आर्थिक खर्चाचा बोजा आपल्यावर पडतो आणि आपण त्याच्याखाली दबले जातो.

अशावेळी आपण आनंदी राहूच शकणार नाही. पैसे असतील तर आपल्या प्रिय जनांसाठी आपण चांगली ट्रीटमेंट देऊन त्यांना हमखास बरं करू शकतो, म्हणून पैसा आणि आनंद ह्याचा जवळचा संबंध आहे.

जास्त पैसा हातात असेल तर आपण आपल्या नात्यातल्या एखाद्या व्यक्तीच्या आजारपणासाठी मदत करू शकतो. तो जो आनंद मिळेल तो वेगळाच असतो.

एखाद्या गरीब, पण हुशार विद्यार्थ्याला आपण शिक्षणासाठी मदत करू शकतो. आपलं सगळं व्यवस्थित होत असेल तर आपण एखाद्या अनाथ मुलाच्या शिक्षणासाठी काही पैसे देऊ शकतो. गरीब लोकांना अन्नदान करू शकतो. अंध अपंग व्यतींसाठी काही हातभार लावू शकतो. ह्यापेक्षा मोठा आनंद तो काय असू शकतो?

मिळालेला जास्तीचा पैसा असा खर्च केला तर तो जास्तच आनंद देतो. म्हणून आयुष्यात भरपूर पैसा मिळवणं वाईट तर नाहीच पण सगळ्यात जास्त खुशी, किंवा आनंदच मिळवून देतो.

पण जास्त मिळवलेला हा पैसा हा आपल्याकडे सन्मार्गाने आलेला असला पाहिजे, आपल्या स्वतःच्या मेहेनातीचा असायला पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात असू द्या.

चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा चुकीच्याच गोष्टीसाठी खर्च होईल. तो पैसा आनंद मिळून देऊ शकणार नाही. म्हणून घरात येणारा प्रत्येक रुपया हा सन्मार्गाने, कष्टाने, स्वतःच्या मेहेनतीने मिळवलेला असला पाहिजे.

पूर्वी लोक म्हणायचे की जास्त पैसा मिळवला की माणूस वाईट मार्गाला लागतो. पण तो पैसा जर चुकीच्या मार्गाने मिळवला असेल तर तो वाईट मार्ग दाखवेल.

पण स्वतःच्या मेहेनातीचा पैसा माणूस कधीच उधळत नाही. त्याचा नेहमी योग्य वापर करून माणूस आनंद मिळवतो, आपल्या कुटुंबाला आनंद देतो.

म्हणून चांगल्या मार्गाने, कष्टाने मिळवलेलं “धन” तुम्हाला आनंद, आणि मानसिक शांती देईल. तुमचं सगळं कुटुंब आनंदी ठेवेल. म्हणून जीवतोड मेहेनत करा, भरपूर “धन” कमवा, आणि आयुष्यात भरपूर आनंद आणि खुशी खरेदी करा. धनाचा आणि आनंदाचा असा अगदी जवळचा संबंध आहे.

तुमचं विचार चक्र जोरात फिरायला लागू द्या. आणि संधी शोधा. ह्या बदलत्या जगात तुम्हाला भरपूर धन कमवायच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी आहेत, फक्त मेहेनत करायची तयारी ठेवा. आनंद आणि खुशी तुमच्या पैशाने खरेदी कराल.

योग्य पद्धतीने पैसा कमावण्यासाठी अशा वेगवेगळ्या संधी काय आहेत, या बद्दलचे वेगवेगळे लेख आम्ही तुमच्यासाठी पुढेही घेऊन येऊ. कारण पूर्वी जसं नोकरी करणं, काही ठराविक व्यवसाय करणं हे उद्योगाचे मार्ग होते तसं आता राहिलेलं नाही.

तुमची बुद्धिमत्ता, कल्पकता वापरून करू शकाल असे खूपसे व्यवसाय आजच्या या टेक्नॉलॉजि च्या युगात तुमची वाट पाहत उभे आहेत. फक्त गरज आहे, तुम्ही योग्य संधीला हेरण्याची.

त्या संधी काय असू शकतात ते आम्ही तुम्हाला मनाचेTalks वर नेहमी सांगत राहू.

Image Credit: medium.com

अशीच एक व्यवसायसंधी :

ऍमेझॉन सेलर बनण्यासाठी काय करावे लागते? (व्यवसाय मार्गदर्शन)

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय