महिला दिन विशेष: समस्त ‘हबी’ मंडळींसाठी महिला वर्गाकडून लाडिक रिक्वेस्ट

महिला दिन विशेष

अहो नवरोजी… जरा समजून घ्या ना..!! समस्त ‘हबी’ मंडळींसाठी, प्रत्येक स्त्रीला झालेली अडचण, महिला दिनाच्या निमित्ताने समजून घेण्याची लाडिक रिक्वेस्ट वाचा आज ह्या लेखात..

या महिला दिना निमित्त, द्या आपल्या बायकोला सरप्राईझ आणि म्हणा दोघे मिळून, ‘युही कट जायेगा सफर साथ चलने से.. के मंजिल आयेगी नजर साथ चलने से..!!’

लग्नाला १५ वर्ष, २५ वर्ष झाली म्हणून लोकांना मोठी पार्टी देणारी जोडपी आपल्याला काय नवीन नाहीत..

खूप मोठी पार्टी, दोघांबद्दल सगळ्यांकडून बोलले जाणारे कौतुकाचे शब्द, लज्जतदार जेवण..

ह्या सगळ्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अबोल झालेले नवरा-बायको असतील तर ह्याहून कोणती हार नसेल..

लग्नाआधी दोघांनीही भरपूर स्वप्न बघितलेली असतात. मात्र लग्नानंतर त्यातली काही पुरी होता होत नाहीत..

राजा राणीच्या संसाराला कुठे तरी गालबोट लागते.. मनं खट्टू होतात.. आणि नाईलाजाने दिवसही ढकलले जातात.. पण खरंच का असा संसार असावा..??

तर उत्तर आहे अजिबात नाही.. इतक्या वर्षांनंतर तर नाहीच नाही.. मग कुठेतरी चुकतंय ह्याची जाणीव नाको का व्हायला..??

ती होतही असते खरे तर.. पण त्या चुकांचे खापर मात्र एकमेकांवर फोडण्यात आयुष्य निघून जाते.. आणि नात्यातला गोडवा कमी होऊन फक्त कर्तव्य म्हणून जगणे एवढेच उरते..

अजूनही पुरुषाने पैसा कामवावा इतकीच अपेक्षा कर्त्या पुरषाकडून असते.. तेवढे केले की जबाबदारीच जणू संपली..

बाकी संसारात काही चुकले तर सगळ्या घराला वाटते चूक ही स्त्रीचीच.. कारण संसार नेटाने करायची जबाबदारी तिची..

तिने लग्नानंतर नोकरी जरूर करावी पण पैसा सासरी द्यावा, माहेर सोडावे आणि सासरच तेव्हडे जपावे.. कोणी काय बोललं तर सतत नमतं घ्यावं..

नवऱ्याकडे कागाळ्या तर अजिबात करू नये.. कारण नवरा पैसे कमावण्याच्या कटकटींमुळे आधीच वैतागलेला असतो..

मग घरची उणीदुणी त्याच्या समोर कशाला..?? बायकोनेच सहन करावे..

तिने नोकरी करताना, घर कसे एक्स्पर्ट सारखे चालवावे. मुलांना जन्म तिनेच दिल्याने, त्यांच्यावर संस्कार करणे, हवं नको बघणे, रात्रभर जागणे, अभ्यास घेणे हे सगळं बायकोचे काम..

बाळंतपणे झाली, त्यात त्रास झाले तरी जगावेगळे असे ते काय हो..? सगळ्यांचीच होतात नाही का..? सहनशक्ती हेच स्त्रीचे रूप..

मग लग्नाला २५ वर्षे झाली तरी लग्न मोडताना दिसतात.. अहो किती सहन करायचे..?? स्वतःचा पैसे कमावला तरी स्त्रीला बंधनं असतातच ना..!!

तिला कुठे मोकळीक आहे..? अहो! स्वातंत्र्य भारताला मिळाले, काही ठिकाणी अजून स्त्रिया ह्या परतंत्र्यातच..!!

चित्र बदलले आहे खूप ठिकाणी.. नवरा अगदी मित्र बनून राहतो.. सासरचे पण मुलगीच मानतात.. पण सगळ्या स्त्रियांच्या वाट्याला कुठे हो हे सुख..?

खरंच का सगळे स्त्रीचेच चुकते..?? जरा समजून तर घ्या हो तिला..

हे समजून घ्या की तुमची बायको तुमच्याशी लग्न करून घरात आली आहे.. तिचा विश्वास आणि प्रेम फक्त तुमच्यावर आहे..

अचानक सासुरवास का द्यावा..? सून उशिरा उठते, नातेवाईकांकडे जात नाही, सतत माहेरी पळते. सतत काय तिला नवऱ्याबरोबर क्वालिटी टाईम हवा असतो? ती तिच्या पद्धती आपल्या घरात का आणते? ती आमच्या घरी आली की आम्ही तिच्या घरी हे कळत नाही हो अश्या चुगल्या शेजाऱ्यांपुढे का कराव्या?

तिनेच बदलायला हवं. तिने सगळ्यांशी जुळवून घ्याल हवं.. आणि नाही जमले तिला की आहेच भांडण.. पण का तिचा इतका राग करावा? अपमान का करावा..?? ती सगळ्यांचे स्वाभिमान, इगो सांभाळायला आलीये की स्वतःचा संसार करायला..??

तुमच्या बाजूने तुम्ही थोडा समजूतदारपणा दाखवा.. तिची सपोर्ट सिस्टीम बना.. मग बघाच ती कधी तुमचे घर कसे सुंदर करेल.. कारण तिच्या घरचे असो किंवा तुमच्या घरचे.. तिला महत्वाचा असतो तो तिचा संसार, तिचा नवरा आणि तिची मुले…!! तिला काय अपेक्षित असते त्याचा थोडासा विचार केलाच पाहिजे.. कारण

१. लग्न हे दोन्ही जीवांचे मिलन आहे.. कोणी कोणावर केलेला उपकार नाही: तिला तिची स्वप्ने आहेत, तिची तत्व आहेत, तिच्या स्वतःच्या गरजा आहेत. स्वतःच्या संसारासाठी त्याचा त्याग कारायचाही ती जाणते..

मग तिच्याकडून जबरदस्तीने सगळ्यांचे मान करवून का घ्यावेत? तिलाच सगळ्यांनी घालून पडून का बोलावे? कोणीही तिला घरात ठेवून उपकार करत नाही.. लग्न हे समानतेचा संस्कार आहे.. तिला आपल्याच कुटुंबातले समजा.. तिलाही मनस्वी जगू द्या..

२. घरात तिच्या म्हणण्यालाही महत्व असावे: कोणत्याही निर्णयात घरच्यांचे मत असते. सगळ्यांना सगळे माहीत असते. कधी कधी तर शेजाऱ्यांनाही..!!

मात्र घरच्या लक्ष्मीला का नाही सगळ्यांमध्ये बोलायची संधी? का नाही तिच्या मतांचा आदर?? तिच्या पासून लपवून संसार कसा पूर्ण होईल?

लग्नात तिच्या मतांचा आदर झालाच पाहिजे. तेव्हाच तिला माणसे आपलीशी वाटतील, घर आपलेसे वाटेल..

३. तिला काही करायचे असल्यास त्याला पाठिंबा दिला पाहिजे: बायकोला काही करण्यात आनंद होत असेल तर ते करण्याची तिला कायम मनाई का होते?

तिने काही म्हणायचा अवकाश, नकारघंटा लगेच सगळ्यांकडून का वाजवली जाते..? तिला तिच्या नवऱ्याचा वेळ हवा असल्यास त्यात वावगं असं काय आहे?

तिला कोणता क्लास लावायचा असेल काही नवीन शिकायचे असेल तर मनाई का असते? समजून घ्या तिच्याही भावनांना आणि तिलाही जाणवू द्या की लग्न झाले असले तरी तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा अधिकार तिलाच आहे.. बाकी कोणाला नाही..

ती खूप काही अनुभवत असते. तिला खूप काही सांगायचे असते. पण सगळ्यांनी आपापले इगो तिलाच चिकटवल्याने तिची पंचाईत होते..

तिच्या प्रत्येक वागण्या बोलण्याने बाकीच्यांना खूप त्रास होतो. मग तिचे हसू थांबते, बोलणे अडकते.. अशा असंख्य स्त्रिया आजही भारतात आहेत.

ज्यांना मानसिक तणाव सहन होत नाही.. त्या दाखवत नाहीत पण डिप्रेशन, स्मृतिभ्रंश, मानसिक तणावाच्या शिकार होतात..

त्यांना मेडिकल ट्रीटमेंट घ्याची गरज पडते. फक्त आणि फक्त एका कारणामुळे कारण त्यांचा जोडीदार त्यांना कधीच समजून घेत नाही..

आपल्यावर अशी वेळच येऊ देऊ नका. वेळीच आपला संसार सांभाळून घ्या.. आपल्या बायकोच्या बाजूने उभे राहा..

तिला सपोर्ट द्या.. हा महिला दिन एकच दिवस का साजरा करायला लागावा?? तो तर रोज असला पाहिजे.. नाही का..?

मग देताय ना आपल्या बायकोला महिला दिनानिमित्त एक सुंदर सरप्राईज..?? पैशांचे नाही, महागडे नाही फक्त थोडे प्रेम आणि थोडा समजूतदारपणा, मग तुमच्या संसाराची गाडी कशी स्मूथ धावेल..!!

आणि तुम्ही आपसूकच गुणगुणाल.. ‘युही कट जायेगा सफर साथ चलने से.. के मंजिल आयेगी नजर साथ चलने से..!!’

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!