‘अफिलीएट मार्केटिंग’ म्हणजे काय? ती कशी करावी? (व्यवसाय मार्गदर्शन)

आर्थिक स्वातंत्र्य अफिलीएट मार्केटिंग व्यवसाय मार्गदर्शन

आता सध्या आपण मनाचे Talks च्या पेजवर जे ३० डेज चॅलेंज फॉर फायनान्शिअल हेल्थ घेतोय. त्यात एक चॅलेंज असेही होते कि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय कराल?… आणि त्याचसाठी आजचा हा लेख.

पूर्वी नोकरी, व्यवसाय यात करण्यासारख्या गोष्टी या काही ठराविक होत्या. तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, वकिली असं काही ठराविक शिक्षण घ्यायचे आणि शिक्षण संपवून त्याशी संबंधित कामाला सुरुवात करायचे. आणि दिवस, महिने, वर्षं असं होत होत रिटायरमेंट यायची.

पण जसजसे दिवस बदलले कामाचं स्वरूप बदललं, शिक्षणाचे सुद्धा असंख्य प्रकार आले.

या झपाट्याने होणाऱ्या बदलामागे सर्वात महत्त्वाचा हात आहे तो तंत्रज्ञानाचा. आणि इथेच खूपशा संधी दडलेल्या आहेत आर्थिक स्वातंत्र्याच्या म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ‘फायनान्शिअल इंडिपेन्डन्स’

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय?

आपण आपलं शिक्षण संपवून रिटायर होईपर्यंत काय करतो? तर सोमवार ते शनिवार किंवा काही ठिकाणी सोमवार ते शुक्रवार रोज आठ तास आपलं ठराविक काम करतो!!

थोडाफार प्रत्येकाच्या कामाच्या पॅटर्ननुसार फरक तेवढा असतो. या कामाच्या धबडग्यात तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याचा कधी विचार केलाय का? तर उत्तर हे बरेच जणांचे नाही… असेच असते.

मग काय असू शकते आर्थिक स्वातंत्र्य, financial independence?

कि हि नुसतीच एक कल्पना आहे?

तर नाही.. आर्थिक स्वातंत्र्य हि कल्पना नाही.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अशी स्थिती जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या खर्चांची जुळवाजुळव करण्या पलीकडेही गुंतवणूक करणं, स्वतःसाठी खर्च करणं, फॉरेन टूर सारखी हौस मौज करणं असे खर्च बिनदिक्कत करू शकाल. थोडक्यात काय तर एक ‘फायनान्शिअल रीझर्वोयर’ तुमच्याकडे तयार असणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य!!

आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्यासाठी असलेला एक मार्ग, आणि तो म्हणजे ‘अफिलीएट मार्केटिंग’

तुम्हाला माहीतच आहे सध्याचा जमाना आहे इंटरनेटचा!! ऑनलाईन शॉपिंगचा!!

खूपशा इ-कॉमर्स वेबसाईट सुरु आहेत आणि नवीनही सुरु होतच आहेत. आणि बरेच जणांना ऑनलाईन शॉपिंग जशी नित्त्याची झाली तशीच बरेच जणांना ‘अफिलीएट मार्केटिंग’ सुद्धा माहित आहेच.

पण आपला मराठी माणूस या सगळ्या गोष्टींना किचकट आणि आपल्या आवाक्याबाहेरचं म्हणून दुर्लक्षित करतो. म्हणूनच हा लेख शेवट्पर्यंत वाचा. आणि मग सांगा आहे कि नाही हे शक्य?

‘अफिलीएट मार्केटिंग’ चा वापर फक्त जे स्वतःचा ब्लॉग चालवतात तेच करू शकतात का? असा एक प्रश्न असतो.

तर नाही अफिलिएट मार्केटिंग कोणीही करू शकते पण ऑनलाईन पद्धतीने असलेला जनसंपर्क हा त्यासाठी प्लस पॉईंट असू शकतो.

अफिलीएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कम्पनीचे (इ-कॉमर्स कम्पनीचे/ डिजिटल प्रॉडक्ट) प्रॉडक्ट विक्री करून कमिशन मिळवणे.

हे कमिशन प्रत्येक प्रॉडक्ट नुसार बदलणारे असते. यात इलेक्टॉनिक्स वस्तूंसाठी वेगळे कमिशन असते, होम अप्लायन्सेस साठी वेगळे तसेच प्रत्येक कॅटेगरी साठी वेगवेगळे कमिशन ठरवलेले असते.

उदाहरणार्थ, अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या इ- कॉमर्स कम्पनीचे प्रॉडक्ट ‘अफिलीएट मार्केटिंग’ ने प्रमोट केले जाऊ शकतात. त्या शिवाय आता प्रत्येक ऑनलाईन विक्री करणारी कम्पनी ‘अफिलीएट मार्केटिंग’ ने आपले प्रॉडक्ट प्रमोट करते.

मनाचेTalks चे इ-पुस्तक ‘रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे’ यासाठी हि आम्ही तुम्हाला अफिलीएट पद्धतीने रिसेल करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. (यामागील उद्देश विक्री हा नसून मराठी वाचकांना विषय समजावणे हा आहे)

http://bit.ly/रहस्य-जगण्याचे या लिंकवर क्लिक करून किंवा ती ब्राउझर मध्ये कॉपी पेस्ट केल्यास जी इ-पुस्तक खरेदी करण्याची विंडो ओपन होईल त्यात ‘BECOME AN AFFILIATE‘ (👈क्लिक केल्यास अफिलीएट मार्केटिंग चे पेज ओपन होईल) हा पर्याय दिसेल.

‘BECOME AN AFFILIATE’ यावर क्लिक करून अफिलीएट मार्केटिंग चे पेज ओपन झाल्यानंतर पुढे तेथे सविस्तर दिलेल्या स्टेप्स नुसार आपले रिसेलर अकाउंट ओपन करून इ-पुस्तक प्रमोट केल्यास आणि तुमच्या तर्फे ती विक्री झाल्यास त्याचे कमिशन तुमच्या अकाउंट मध्ये जमा होत जाईल.

हे मनाचे Talks च्या इ-पुस्तकाचे उदाहरण पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी नसून हि सोय आमच्याच कडून असल्याने ते वापरून ‘अफिलीएट मार्केटिंग’ समजणे वाचकांना सोपे जाईल हाच एक उद्देश.

अशाच प्रकारे अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इतरही वेबसाईटवर तुम्ही अफिलीएट मार्केटर बनून कमिशन मिळवू शकता. या लेखात ‘अफिलीएट मार्केटिंग’ नक्की काय आहे आणि ती तुम्ही कशा प्रकारे सुरु करू शकता हे थोडक्यात लिहिलेले आहे.

अशाच प्रकारे आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी साचेबद्ध नोकरी व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते आम्ही पुढेही लेखांद्वारे तुम्हाला सांगत राहू. या बद्दल काही शंका असल्यास कमेंट मध्ये त्या विचारा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

You may also like...

1 Response

  1. Monika Deshmukh says:

    Khup Chan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!