हे नऊ आहार विहारातील बदल तुम्हाला कोरोनाव्हायरस पासून दूर ठेवतील

कोरोनाव्हायरस महामारी आहे, पूर्ण जगावर आलेलं संकट आहे याला आपण एकटे गरीब बिचारे काय करणार? असे समजून व्हाट्स ऍप, इतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि घबराट यामुळे गलितगात्र होऊन जाऊ नका. जसे इतर आजार स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टी आपण करतो अगदी तस्सच यासाठीही केलं तर काहीही अवघड नाही. असेच आपल्या हातात असलेले नऊ उपाय वाचा या लेखात.

चीनच्या वुहान प्रांतापासून सुरू झालेला कोरोनाव्हायरस (Coronavirus desease- COVID-19) पाहता पाहता १२३ देशांमध्ये वणव्यासारखा पसरला.

कोरोनाच्या संक्रमणाने मरणाऱ्यांची संख्या जगभरात ५००० चा आकडा पार करून गेली.

भारतात आतापर्यंत १०८ रुग्ण कोरोना संक्रमित असून पूर्ण महाराष्ट्रात संक्रमित रुग्णांचा आकडा ३२ पर्यंत पोहोचला.

पुणे, मुंबई, पिंपरीचिंचवड पाठोपाठ अहमदनगर, गडचिरोली जिल्हयांतही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

यातली आणखी एक मेख अशीही आहे की जोपर्यंत हा आकडा देशातल्या उच्च उत्पन्न गटात असेल तोपर्यंत त्याला आटोक्यात आणणे काहीसे सोपे होऊ शकेल.

पण तळागाळात हा पोहोचला तर माहितीचा अभाव आणि भारताची अफाट लोकसंख्या यामुळे त्याला रोखणं कठीण होऊन बसेल. पण म्हणून घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. याचा उपाय आपल्याकडेच आहे. अगदी इतर आजारांचा असतो तस्साच.

काय आहे हा कोरोना व्हायरस?

कोरोना व्हायरस हा व्हायरसचा असा परिवार आहे ज्याच्या संक्रमणाने सर्दी पासून श्वास घेण्यासाठी त्रास होणं अशा तक्रारी उद्भवतात.

या आजाराची लक्षणं काय?

या आजाराची लक्षणे फ्लू शी मिळते जुळते आहेत. ताप येणे, शिंका येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता योग्य ते डॉक्टरी इलाज घेणं आणि लेखात पुढे दिल्याप्रमाणे काळजी घेणं सहज शक्य आहे.

स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला या विषाणूपासून वाचवण्यासाठी काही खबरदारी घेणं, आहार-विहारातले नियम पाळणं, व्यायाम करणं यांमुळे स्वतःला या आपत्तीतून वाचवणं फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे.

हि महामारी आहे, पूर्ण जगावर आलेलं संकट आहे याला आपण एकटे गरीब बिचारे काय करणार? असे समजून व्हाट्स ऍप, इतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि घबराट यामुळे गलितगात्र होऊन जाऊ नका.

जसे इतर आजार स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टी आपण करतो अगदी तस्सच यासाठीही केलं तर काहीही अवघड नाही.

दुषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न, दूषित प्रदेश यांमुळे साथीचे रोग उदभवतात आणि मग झपाट्याने पसरतात.

अशा आजारांना जनपध्वंस साथीचे आजार असं म्हणतात. ज्याला इंग्रजी मध्ये Pandemic असं म्हंटल जातं.

या आजारांचा संसर्ग लवकर तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमी असते.

त्यामुळे आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे आहार विहार यातला समतोल ठेवणं, योग- व्यायाम करणं यातुन स्वतःची रोग प्रतिकारशक्ती वाढवून या आजाराला आपल्यापासून दूर ठेवणं हाच एक उपाय.

खबरदारी चे उपाय म्हणून काय करायला हवे?

१) पुरेशी झोप घ्या- पुरेशी झोप न घेतल्याने सायकोटीन्स कमी होऊन रोग प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून कमीत कमी आठ तासांची झोप ही घेतली गेलीच पाहिजे.

२) सकाळी लवकर उठा – सकाळी लवकर उठण्यावरच पुढची दिनचर्या अवलंबून असल्याने. पुरेशी झोप घेऊन सकाळी लवकर उठणे हे उत्तम आरोग्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते.

३) व्यायाम किंवा योग करा – शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज बारा सूर्यनमस्कार करण्याची सवय कोरोना व्हायरसला तुमच्यापासून नक्कीच चार हात दूर ठेवले.

४) जेवणात तूप, सकस आहार यांचा समावेश करा – हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध याचा आपल्या आहारात समावेश करा.

५) गरम पाणी प्या – श्वसन मार्गात काही इन्फेक्शन असल्यास त्यावर वेळीच खबरदारीचे उपाय म्हणून गरम पाणी पिण्याची सवय ठेवा.

६) रोज एक चमचा पंचामृत घ्या – आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे पंचामृतात वापरले जाणारे पाचही घटक हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे असल्याने रोज एक चमचा पंचामृत घ्या.

७) रोज दिवसातून दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्या – गरम पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्गातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल.

८) स्वच्छता ठेवा – स्वच्छता ठेवणे हे विषाणूंशी लढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरते. त्यासाठी रोज अंघोळीच्या पाण्यात चार थेम्ब डेटॉल टाकून अंग स्वच्छ करणे, हात सारखे स्वच्छ धुणे याची खबरदारी घ्यावी. गर्दीची ठिकाणं, लग्न कार्यांना हजेरी लावणं हे या दिवसात टाळलेलेच बरं.

९) कपालभाती प्राणायाम – कपालभाती केल्याने सर्व योगासनांचा एकत्रित फायदा होतो. कपालभाती प्राणायाम केल्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते.

कपालभाती ने श्वसनमार्गाची शुद्धी होऊन श्वसना संबंधित रोग दूर होतात.

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आहे की नाही सोपं या आजाराला आपल्यापासून दूर ठेवणं!!

चला तर मग आपण सगळे मिळून म्हणूया गो करोना! गो करोना!! गो करोना!!! गो😜

कोरोना पासून लढण्यासाठी आमच्याकडून सर्वांना शुभेच्छा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय