‘मला कोणीच समजून घेत नाही’ असे वाटत असल्यास हे उपाय करून पहा

या लेखात ‘मला कोणीच समजून घेत नाही!!’ असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची कारणे काय असू शकतात हे पहिल्या टप्प्यात दिलेले आहे.

आणि दुसऱ्या टप्प्यात हे मुद्दे (म्हणजे दिलेली कारणे) जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर असे काय बदल तुम्हाला करावे लागतील ज्यामुळे ‘कोणीच मला समजून घेत नाही!’ हि तुमची सल कमी करायला तुम्हाला मदत होईल….

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा लेख शेवट्पर्यंत लक्ष देऊन वाचा आणि काही मत मतांतर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका.

स्त्री असो वा पुरुष, आपल्याला कोणीतरी समजून घेतोय हे फिलिंग अतिशय सुखावह असते..

अगदी लहान मुले, वयस्क माणसे सगळ्यांनाच अटेन्शन हवे असते. कोणीतरी माझ्या साठी काही करतोय, मला आयुष्याच्या केंद्र स्थानी ठेवून मला महत्व देतोय हे वाटणे खूपच सकारात्मक ऊर्जा देते.

असे अव्याहत प्रेम मिळणारी माणसे आयुष्यात खूप यशस्वी होताना आपण पाहतो..

ह्या उलट चित्र सुद्धा आपल्या सभोवताली असतेच. कोणी व्यक्ती अगदी उदास असते. अगदी डिप्रेशनची शिकार असते. कारणं भरपूर असतात.

पण त्यातल्यात्यात अगदी कॉमन कारण म्हणजे, ‘मला कोणी समजूनच घेत नाही’ हाऊसवाईव्हज म्हणजेच गृहिणी ह्या कारणाने बऱ्याचदा त्रस्त असतात..

घरातली मंडळी, नवरा, मुले आपले कोणीच ऐकत नाही. कोणी समजूनही घेत नाही असे वाटत राहिल्याने त्या एकलकोंड्या होतात.

कधी कधी इतक्या त्रस्त होतात की मानसोपचार करावे लागतात. आपण कोणाला आवडत नाही, आपले कोणी नाही, आपल्याला कोणीही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही.

हे वाटणे त्यांचे आयुष्य बेजार करून टाकते. आणि मग त्या स्वतःला कोशात बंदिस्त करतात. कोणाला भेटत नाहीत.. एकट्या पडतात..

हे असे फिलिंग कोणालाही येऊ शकते. पण ह्यातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत.

आधी खालचे काही मुद्दे वाचून पहा. जर तुम्हाला एकटे, दुर्लक्षित वायण्याची कारणे हीच असतील तर त्यावर काही उपायही आज ह्या लेखात आम्ही मांडणार आहोत..

१. तुम्हाला कोणाशीही मैत्री करण्याची भीती वाटते: जर तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकत नसाल तर ह्याचा एकच अर्थ होतो की तुम्हाला माणसांशी मैत्री जोडायला आवडत नाही.

तुम्ही कोणाला जवळ केले तर ती व्यक्ती तुम्हाला दुखवेल, दगा देईल असे तुम्हाला सतत जाणवत असेल तर तुम्ही कधीच कोणाशी घट्ट मैत्री करू शकणार नाही.

आणि जरी वर वर मैत्री दाखवत असाल तरीही तुम्ही फार कोणाला तुमच्या आयुष्याच्या परिघात येऊ देणार नाही.. मग जर कोणाला तुम्ही तुमच्या आयुष्याचा, मनाचा थांगपत्ता लागून देणार नसाल तर तुम्हाला कोणी कसे समजून घेईल..? ह्याचा विचार केला पाहिजे..

२. कोणी तुमची तुलना करेल ह्याची सतत तुम्हाला भीती असते: कधी कधी एखाद्या व्यक्तीचे अख्खे बालपण कोणा कोणाशी केलल्या तुलनेत गेलेले असते.

आई वडील किंवा शिक्षक तुम्हाला कायम घालून पाडून बोललेले असतात. सतत आपल्यापेक्षा उत्तम किंवा पुढे असणाऱ्यांशी आपली बरोबरी केलेली असेल तर ह्या गोष्टीचा राग आपल्या मनात कायम राहतो..

पुढे नोकरीवर बॉस किंवा लग्नानंतर आपला जोडीदार आशा प्रकारची तुलना करत असेल तर आयुष्य नक्कीच बेकार वाटायला लागतं.

ही अशी तुलना होऊच नये म्हणून तुम्ही कधी खोटे बोलता किंवा बऱ्याच गोष्टी कोणाला न सांगता स्वतःकडे ठेवता.. त्यामुळे समोरच्याला तुमचे खरे रूप माहीतच नसल्याने ती व्यक्ती तुम्हाला समजून घेण्यास कमी पडते.

हे ही एक कारण असू शकते तुमच्या उदास आयुष्याचे.

३. कोणावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला जमत नसेल तर: तुमची कोणी काळजी घेऊ पाहत असेल आणि तुम्ही त्यांचे काहीच ऐकत नाही.

कोणी काही सांगितले तरी तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. मग असेच अनुभव समोरच्या व्यक्तीला येत राहिले तर ती व्यक्ती तुमचा नाद सोडून देईल..

आणि तुमच्या बाबतीत गैरसमज देखील करून घेईल.. मग तुम्हाला कोणी समजून घेत नाही असे जर तुम्हाला वाटले तर काय उपयोग..??

४. तुम्हाला दुसऱ्यावर विसंबून राहण्याची सवय असेल तर: कोणी आपल्याला समजून घ्यावे म्हणून जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी नुसार स्वतःमध्ये इतके बदल करता की तुम्ही स्वतः कोण आहात हे देखील ओळखू शकणार नाही..

हे एक प्रकारचे ऍडिक्शन आहे असेही तुम्ही म्हणू शकता.. म्हणजे दुसऱ्याची सहमती मिळवायला, दुसऱ्याचे अपृव्हल मिळवायला तुम्ही स्वतःला बदलल्यामुळे शेवटी लोकांना तुमची ओळखच पटत नाही..

तुम्ही आत्ताचे खरे? की पूर्वी होतात ते खरे? असे प्रश्न तुमच्या भवतालच्या लोकांना नक्की पडत असणार.. मग तुम्हाला कोणी समजून तरी कसे घेईल..?

५. तुम्हाला बोलण्याचा पाचपोच नसेल तर: होय काही माणसांना बोलण्याचा अजिबात पाचपोच नसतो. डोक्यात एक आणि तोंडावर एक..

किंवा बोलायचे असते योग्य पण शब्दांची जुळवाजुळव भलताच अर्थ काढतात.. म्हणजे घरी पाहुणे आलेत आणि तुम्ही आनंदात विचारता, ‘तुम्ही कधी जाणार..??’

तुम्हाला विचारायचे असते खूप दिवस राहा, लगेच जाऊ नका.. मात्र तुमचे शब्द दुसराच अर्थ समोरच्याला पोहचवतात. मग असे असल्यावर त्यांच्या मनात झालेले मोठ्ठे गैरसमज तुम्हाला समजून घेण्यास अडथळा निर्माण करतात..

हे वरचे मुद्दे तुमच्या बाबतीत घडत असतील तर तुम्हाला समजून घेणे थोडे अवघडच असेल. कारण ह्या सवयी ज्या लहान पणापासून आहेत त्या एका रात्रीत अचानक बदलतील कश्या? तुमचं म्हणणं रास्त आहे.. पण त्याच्यावरही उपाय आहे.. लगेच नाही पण हळू हळू तुम्हाला समजून घेणे इतरांना कसे सोप्पे होईल ते पाहू:

१. सगळ्यात आधी स्वतःचे मुद्दे व्यवस्थित मांडायला शिका:

विचार न करता बोलणे हे उथळपणाचे लक्षण आहे. कोणतीही गोष्ट बोलण्याआधी जरा विचार करावा..

चर्चा मनाविरुद्ध चाललेली असताना फक्त लोकांच्या नजरेत वाईट ठरू नये म्हणून हाजी हाजी करणे किंवा विनाकारण एखाद्या मुद्द्याला विरोध करणे हे मूर्खपणाचे लक्षण..

त्या पेक्षा समोरच्याच्या विधानावर लक्ष ठेवणे, त्याचा सखोल विचार करणे, पुढे मुद्देसूद म्हणणे मांडणे हे आपल्याबद्दल समोरच्याचे मत नक्की बदलू शकतात.

बुद्धीचातुर्य दाखवून संभाषण करणाऱ्याला नीट समजून घेणे समोरच्यासाठी सोपे ठरते. आणि समोरच्याला तुमचे म्हणणे कळत आहे की नाही ह्याची शहानिशा सुद्धा तुम्ही योग्य शब्दात करून घेणे उत्तम.. अशामुळे संवादात गरमागर्मी न होता तो सहज होतो..

या लेखाच्या शेवटी संभाषण कौशल्याबद्दलच्या लेखाची लिंक दिलेली आहे.

२. स्वतःची शारिरीक हालचाल म्हणजेच बॉडी लँग्वेज बदला:

खरं तर बॉडी लँग्वेज हे खूप मोठं शास्त्र आहे. तुम्ही कसे बोलता, तुमच्या चेहऱ्यावर काय हावभाव आहेत, तुमचे हातवारे कसे आहेत, तुम्ही कसे बसून किंवा उभे राहून बोलत आहात ह्या सगळ्यांवरून तुम्ही काय म्हणताय ते समोरच्यापर्यंत पोचते.

जसे की हाताची घट्ट घडी घालून काही बोलत असाल तर ह्यातून समोरच्यावरचा अविश्वास दिसतो, किंवा समोरच्याचे म्हणणे एकूणच घ्यायच्या मनस्थितीत तुम्ही नाहीत हे दर्शवते.

पण जर हात मोकळे, उघडे असतील तर ते acceptance म्हणजेच समोरच्याचे मुद्दे देखील तुम्ही ऐकण्यास तयार आहात हे दर्शवते.

बॉडी लँग्वेज बद्दल खूप माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते, लेखाच्या शेवटी बॉडी लँग्वेज बद्दलच्या लेखाची लिंक दिलेली आहे. त्याबद्दल ची माहिती घ्यायची असेल तर तोही लेख वाचा.

३. स्वतःला तुम्ही देखील समजून घ्या: आपल्याला वाटते कोणीच आपल्याला समजून घेत नाही.. पण आपण स्वतः तरी स्वतःला कुठे समजून घेतो..??

खरे तर आपण स्वतःला जाणून घेतले तर स्वतः मधील गुणांमुळे स्वतःचा आदर करायला लागू.. दुर्गुण सगळ्यांमध्ये असतात पण स्वतःतले गुण जरी दुसऱ्यांना दिसत नसतील तरी आपल्या स्वतःला नक्कीच माहीत असतात.

त्या कला गुणांना वाव द्या.. स्वतःला वेळ द्या.. तुम्हाला कोणाबद्दल, कोणत्या कामाबद्दल, कोणत्या व्यक्ती बद्दल काय वाटते हे जाणून घ्या.. स्वतःशी बोला..

मनाचेTalks वरील सेल्फ डेव्हलपमेंट बद्दलचे लेख तुम्हाला स्वतःची ओळख करून घ्यायला नक्कीच मदत करतील.

जर माणूस स्वतःवर प्रेम करू लागला तर त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहायची गरज वाटत नाही. स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी जरूर करा..

४. स्वतःचा आनंद स्वतःच्या कह्यात ठेवा:

तुम्हाला जर भवतालच्या लोकांच्या वागणुकीवरून स्वतःचा आनंद किंवा दुःख अवलंबून ठेवायचा असल्यास तुम्हाला कधीच कोणी समजून घेऊ शकणार नाही..

अगदी सरळ साधं गणित आहे.. कोणी आनंद दिला म्हणून तुम्ही आनंदी झाला..

कोणी तुम्हाला स्पेशल नसल्याची जाणीव करून दिली तर मात्र तुंम्ही खिन्न होता.. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की तुम्हाला चालवायची किल्ली तुम्ही दुसऱ्यांच्या हातात दिलेली आहे. जे अतिशय धोक्याचे असते..

त्यामुळे सतत कोणीही मला समजून घेत नाही ह्याचीच जाणीव तुम्हाला होत राहील.. मग कोणाला दया येऊन तुमच्याशी बरी वागणूक करत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही.. हो ना..? त्यामुळे आपला आनंद आपल्या हातात ठेवा..

५. डोळ्यांवरचा गैरसमजांचा पडदा किलकीला करा:

कधी कधी असे होते की लोक आपल्याला समजून घेत असतात पण आपल्यालाच दिसत नाही.. ह्यात चूक कोणाची..?? अर्थातच आपली..

कारण आपण फक्त निगेटिव्ह विचारांखाली दबले गेले असतो.. आणि समोर काही सकारात्मक घडणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतच नाहीत..

त्यामुळे जरा उघडा डोळे आणि बघा नीट.. जर समोरची व्यक्ती तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत असेल त्यावर कोणतीच रिऍक्शन न देता आपल्याला काय म्हणायचे आहे त्यावर विचार करत असेल तर ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र हे तुम्हाला कळणे महत्वाचे. अशा व्यक्तीला जर तुम्ही सतत ‘समजून न घेणारा’ ठरवत राहालत तर पस्तावाल..

६. स्वतःची समजूत घाला नाहीतर सरळ समोरच्या व्यक्तीला अवोईड करा:

जर समोरची व्यक्ती महत्वाची असेल, जवळची असेल, खास असेल तर कधी कधी त्यांच्या काही व्यापापायी आपल्याला ती समजून घेण्यास कमी पडत असेल. ह्याची पडताळणी करून पाहा..

किंवा स्वतःची समजूत घाला की ती व्यक्ती आपले म्हणणे ऐकून गेलीये तर नक्कीच काही तरी सकारात्मक घडेल.. इतकी लिबर्टी दाखवण्यासारखी व्यक्ती नसेल तर सरळ त्या व्यक्तीला इग्नोर करा..

जर कोणी आपल्या मनःशांतीला घातक ठरत असेल तर अशा लोकांपासून दूर राहणे उत्तम असते. करण अशा व्यक्ती आपल्याला समजून घेणे तर दूरच, आपल्याला त्रास देणाऱ्या असू शकतात..

त्यामुळे तुम्ही समजून घेण्याची अपेक्षा कोणाकडून ठेवता आहात हे पडताळून पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे!!

७. दुसऱ्यांनाही समजून घ्या:

सतत मलाच कोणी समजून घेत नाहीये ह्याच अमलाखाली राहिलात तर कदाचित दुसऱ्यावर तुम्ही अन्याय करत आहात..

तुमच्या आजूबाजूला देखील कोणी डिप्रेस्ड तर नाही ना? हे बघा.. कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला मानसिक आधार दिलात, ती व्यक्ती मनाने खंबीर उभी राहू शकली तर त्याचा आनंद तुम्हाला मिळेल.

तुम्ही ही नव्याने कात टाकून उभे राहाल.. कदाचित तुमच्या मनातली दुःखद भावनाही निघून जाईल..!!

सगळेच जण अद्भुत असतात.. प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असते.. कोणी समजूतदार तर कोणी arrogant ही असू शकते.. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदला..

तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर स्वतःमध्ये काही दोष नाहीत ना ह्याची खातर जमा करा.. स्वतःमध्ये बदल करा..

एवढे करूनही कोणी समजून गजेत नाहीये असे वाटल्यास स्वतःच स्वतःला सकारात्मकता द्या..

‘सेल्फ मोटिवेशन’ इतकी प्रभावी थेरपी कोणतीच नसते.. खरे तर जगात तुम्हाला पूर्णपणे समजून घेईल अशी व्यक्ती फक्त एकच असते… ओळखा पाहू कोण..??

अर्थातच ‘तुम्ही स्वतः’

चला तर मग ‘कोणीच मला समजून घेत नाही’ असे म्हणण्यापेक्षा असे म्हणूया की,

एक असामान्य व्यक्ती आहे जी मला उत्तम समजून घेते.. ती म्हणजे मी..!!

लेखातील मुद्यांशी संबंधित इतर लेख:

भाषणासाठी किंवा एखाद्या सेल्स कॉलसाठी संभाषणचतुर कसं व्हायचं?

संवाद चांगला साधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासाठी तीन महत्त्वाचे तंत्र

बॉडी लँग्वेज आकर्षक होण्यासाठी या १४ गोष्टींकडे लक्ष द्या

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

5 thoughts on “‘मला कोणीच समजून घेत नाही’ असे वाटत असल्यास हे उपाय करून पहा”

    • मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇खाली दिलेल्या ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा. या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

      तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप ‘लिव्ह’ करून द्यावा.

      https://chat.whatsapp.com/EiEcLSMgV3f49x42ci1h3J

      Reply
  1. खूपच छान
    माझ्यातला मी वोळखण्यासाठी प्रेरणा देणारा लेख आहे

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय