कोरोनाच काय कुठल्याही विषाणूपासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा

कोरोनाच काय कुठल्याही विषाणूपासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी

कोरोनाच काय भविष्यात अशा कुठल्याही विषाणूचा हल्ला झाला तर त्यापासून लढण्याची शारीरिक आणि मानसिक शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा.

‘कोरोना’ बस नाम ही काफी है..! अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे..

बिचारे नेहमीच सर्दी खोकला असलेले लोक सुद्धा तिरक्या, संशयास्पद नजरेचे शिकार होतायत..

जरा कोणी शिंकले की आसपासची लोकं लांब पळून जातायत.. हजारो मेसेज, व्हाट्सएप फॉरवर्ड, न्यूज वरची माहिती सगळ्यानी उच्छाद मांडलाय.. त्यामुळे सगळीकडे कोरोना ह्या नावाची सुद्धा दहशत आहे..

पण मध्येच एखादी सुखद बातमी येतेय की भारतातील, इटलीतील कोरोना बाधित मस्त बरे होऊन घरी गेलेत..

एवढेच काय तर चक्क चायनातील वूहान शहर जे कोरोनाचे जन्मस्थान म्हणता येईल तिथले कोरोना बाधित सुद्धा स्वस्थ झालेत..

एका बातमीमध्ये कोरोना झालेल्या, १०३ वर्षांच्या वृद्ध आज्जी सुद्धा बऱ्या झाल्याचे कळते आहे.. ही सुखाची किनार सगळ्यांनाच हवीहवीशी वाटत आहे..

कोरोनाबद्दल भीती आणि नकारात्मकता एका कारणाने जास्ती वाढली कारण ह्या नवीन विषाणू वर एकही औषध कोणत्याही देशामध्ये नाहीये..

किंबहुना त्यावर लस किंवा औषधी गोळ्या बनलेल्याच नाहीत.. हेच घबराटीचे मुख्य कारण..

सगळ्यांना वाटते आता कोरोना झालाय आणि औषधच नाहीये तर आपल्या जगण्याची शाश्वती संपली.. आयुष्य संपले..

आणि मग कोरोना बाधित बरे झाल्याच्या बातम्या ऐकून फारच आश्चर्य वाटते.. अरेच्चा.!! औषधाविना बरे होणे म्हणजे केवळ अशक्य.. नाही का..??

तर मंडळी असे अजिबात नाहीये.. कोरोना बद्दल तुम्ही रोज खूप काही ऐकले आहे..

तो होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची तेही तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहेच.. सगळ्या देशात त्यांचे सरकार देखील योग्य त्या खबरदाऱ्या घेत आहेत..

जे कोरोना बाधित आहेत त्यांना वेगळ्या परिस्थितीत ठेवले जाते.. आणि खरे सांगायचे तर कोरोना मुळे बाधा व्हायची टक्केवारी जरी झपाट्याने वाढत असली तरी मृत्यू चा दर फक्त ३% आहे..

म्हणजे गणिती भाषेत सांगायचं झालं तर १०० जणांना बाधा झाली तर त्यातले ३ जणच मारतात.. अर्थात तेही वाचू शकतात.. आणि हो बिना लस किंवा औषधांचे..!! कसे??

जाणून घेऊयात..

व्हायरल इन्फेक्शन होणे हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे.. हे व्हायरल इन्फेक्शन देणारे विषाणू कधी खूप शक्तीवान तर कधी खूप अशक्त असतात..

आपल्याला सर्दी होते, ताप येतो आणि मग आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच युद्धाला सुरुवात करतात.. ह्या पांढऱ्या पेशी आपले संरक्षक सैनिक असतात जणू..

त्यांना जर कुणकुण लागली की आपल्या शरीरात बाहेरचे, हानिकारक विषाणू घुसले आहेत तर ह्या पांढऱ्या पेशी सज्ज असतात…

जेव्हा आपल्याला ताप येतो.. आजारी असल्यासारखे वाटते.. कधी काही साधी औषधे घेतली की लगेच बरे वाटते तर कधी औषधाशिवाय देखील आपण बरेही होतो..

कोरोना ह्या व्हायरस मुळे आपल्याला जो आजार होतोय त्याचे नाव आहे COVID 19 आणि ह्या विषाणूला टक्कर देईल असे औषध अजून तरी बनवले गेले नाहीये..

ह्याला झुनॉटिक व्हायरस असेही म्हणतात.. सोप्या भाषेत सांगायचे तर हा विषाणू प्राण्यांकडून माणसांकडे आलेला आहे.. आणि एकदम ब्रॅण्ड न्यू आहे..

म्हणूनच माणसांना होणाऱ्या इतर व्हायरल विष्णूंसारखा नसल्याने कदाचित आपल्या पांढऱ्या सैनिक पेशींनाही ह्यांच्याशी युद्ध कसे करावे समजत नसावे..

त्या पेशी ह्या व्हायरस समोर कमजोर पडत आहेत.. म्हणूनच हा कोरोना कोणत्याही माणसाला पटकन पकडतो आणि पार आजारी पाडतो..

कोणत्याही आजाराशी लढायला आपल्या शरीराला लागते रोग प्रतिकारक शक्ती.. ज्याला इंग्रजीमध्ये ‘इम्युनिटी’ असेही म्हणतात..

इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपल्या सगळ्यांकडे असते.. रोजच्या होण्याच्या वेगवेगळ्या विषाणूंच्या हल्ल्यांशी लढणे हे तिचे काम..

आणि वर वाचल्याप्रमाणे पांढऱ्या पेशी हे तिचे खंदे सैनिक..!! ही रोग प्रतिकारक शक्ती ज्यांची भन्नाट आहे तेच, कोरोनाची लागण होऊन सुद्धा ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत..

थोडक्यात काय तर कोरोनावर स्पेशल कोणते औषध असे नसतानाही इतर औषधांच्या मदतीने, चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीने आणि मनात असलेल्या सकारात्मकतेचा, इच्छाशक्तीच्या साहाय्याने हे रोगी, मोठ्या रोगाशी सामना करून, जिंकून, पुन्हा आपल्या स्वस्थ निरोगी जीवनशैलीत परतले आहेत..

म्हणजे बघा या आपत्तीला इष्टापत्ती समजून आपल्या सवयी बदलून निरोगी जीवन शैली जर आपण आत्मसात केली तर हा कोरोनाच काय यापुढे आणखी कुठलाही महाभयंकर विषाणू आपल्यावर चाल करून आला तरी आपले काहीही वाकडे करू शकणार नाही.

म्हणून सगळ्या प्रकारची काळजी घेत, शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्याकडेही आपण लक्ष देऊ..

कारण अशक्त व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती, मधुमेही, इतर आजार असणारे, वयोवृद्ध ज्यांची शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वयामुळे कमी होत जाते ह्या सगळ्यांना कोरोनाची लागण होण्याचे जास्त चान्सेस आहेत..

तसेच सगळ्यात भेसळ आणि प्रदूषण हे रोजचेच शत्रू.. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच इम्युनिटी वाढवणे हे सुदृढ आयुष्य जगण्यासाठी कायमच महत्वाचे आहे..

जर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढली तर आपल्या पांढऱ्या पेशींना देखील बळ मिळेल.. आणि कोणत्याही रोगाचा सामना करायला त्या सज्ज होतील..

इम्युनिटी कशी वाढवाची ते खाली दिलेल्या काही मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल:

१. फळे रोज खा.
२. सगळ्या प्रकारच्या भाज्या खाणे उत्तम.. हिरव्या भाज्या अगदी मस्ट..!!
३. संतुलित आहार घ्या
४. मांसाहार वर्ज्य करणे शक्य नसल्यास ते पूर्णतः शिजवूनच खाणे योग्य
५. व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.. योग करणे त्यातल्यात्यात अनुलोम विलोम, प्राणायाम, कपालभाती हे अतिशय उपयोगी आसनं आहेत. फिरायला जाणे आणि जिम करून फिट राहणे हे इम्युनिटी बूस्टर आहेतच..
६. पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची. झोप पूर्ण न झाल्याने शरीर थकते आणि त्यावर विषाणूंना हल्ला करणे अतिशय सोप्पे जाते..
७. ताण तणावांपासून दूर राहा. (आणि त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला माहीतच आहे, मनाचेTalks रोज सकाळ, दुपार, संध्याकाळची गोळी घ्यायला लावतात तसं वाचायचं🤷‍♀️)

हे सध्याच्या फास्ट युगात सांगणे अगदीच बेसिक झाले आहे.. कारण झपाट्याने प्रगतीकडे जाताना मानसिक आणि शारीरिक आरोग्य दुर्लक्षिले जात आहे..

ताण असलेली माणसे बऱ्याच रोगांना बळी पडताना आपण पहात आहोत.. म्हणून ताण बाजूला ठेवणे हे कोरोना पासून लांब राहण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे..

वरच्या टिप्स ह्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाच्या आहेत.. नैसर्गिक रित्या आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर ह्याला पर्याय नाही.. हे सगळेच मुद्दे आचरणात आणावे लागतील..

मुलांनाही त्याचे महत्व सांगा म्हणजे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आत्तापासूनच नवनवीन विषाणूंना तोंड द्यायला सज्ज होईल.. घरातल्या वृद्धांना जपा.. त्यांना खास आहार द्या..

स्वतःची देखील काळजी घ्या.. नुसते कोरोनाचे टेन्शन घेऊन काहीही साध्य होणार नाही.. सगळे मिळून त्याला हरवून टाकूयात..

स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सगळ्याच विषाणूंना मात देऊयात.. मग औषध असो व नसो..!!

स्वस्थ खा, स्वस्थ जगा..!!

वाचण्यासारखे आणखी काही:

हे नऊ आहार विहारातील बदल तुम्हाला कोरोनाव्हायरस पासून दूर ठेवतील

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

2 COMMENTS

  1. खुपच छान साहेब जी भगवान श्रीकृष्ण त्रिवार जयजयकार प्रकट श्री शंकर पार्वती गीता पारायण मंदिर-पांढरे शिवाजी संभाजी पा लोहगावकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.