कोरोना आणि डोळ्यांचे आरोग्य

कोरोनाच्या संदर्भात आवाहन जेव्हा जेव्हा आपण वाचतो, पाहतो किंवा ऐकतो – यात मुख्यत्वे पुढील गोष्टी असतात, जसे की –
१. हात वारंवार स्वछ धुवा
२. व्यक्तींमध्ये आंतर राखा
३. खोकताना किंवा शिंकताना रुमाल/tissu जवळ बाळगा ई.
४. चेहऱ्याला व डोळ्यांना गरज नसताना स्पर्श करू नका –
या सर्वांत आपण आपल्या हातांची व श्वसन संस्थेची काळजी घेत असतांना – डोळ्यावाटे कोरोना पसरू शकतो काय? अशा संदर्भातली पोस्ट वाचनात आली…
त्यावर Modern Science व संशोधन काय म्हणतंय हे समजून घेण्यासाठी खालील माहिती
डोळ्याची रचना आणि त्यातील द्राव यासंदर्भात माहिती खालीलप्रमाणे
आपला डोळा हा पुढील लेयर्स चे मुख्यतः combination असते –
Sclera – डोळ्यांचा पांढरा भाग
The Cornea – डोळ्याच्या भिंगासमोर असणारा फुगीर पारदर्शक भाग
Anterior & Posterior Chambers – डोळ्यांच्या आतील पोकळी
Iris/Pupil – डोळ्यात असणारा काळा भाग
Lens – डोळ्यांचे भिंग
Vitreous Humor – डोळे ज्या खोबणीत असतात त्या भागातील स्नायू
Retina – डोळ्याची बाहुली
तसेच आपल्या डोळ्यात Lacrimal नावाच्या बदामाच्या आकाराच्या ग्रंथी दोन्ही डोळ्यांच्या बाजूला असतात, या मुख्यत्वे डोळा ओला ठेवणे, ताण-तणावात (भावनांना मोकळी वाट करून देणे), डोळ्याच्या भोवती एक संरक्षक द्राव सतत वाहता ठेवणे ई. च्या कामी महत्वाचे योगदान देत असतात.
या द्रावात – Antibodies, Lytic Enzymes आणि काही रासायनिक संयुगे असतात – जी मुख्यत्वे आपण सामोरे जात असणाऱ्या रोजच्या Infection ला (उदा. धूळ, धुराचे कण, परागकण ई.) लांब ठेवू शकतात.
Perkin University च्या reports नुसार 1099 रुग्णामागे 9 (प्रमाण शेकडा 0.8%) जणांना त्याची लागण डोळ्याच्या infection वाटे झालेली आहे. (हे संशोधन चीन मधील आहे)
तसेच एका संशोधन पत्रिकेच्या मते (The Journal of Medical Virology) 30 कोरोना पेशंटच्या मागे डोळ्यावाटे कोरोना झालेला व्यक्ती केवळ १ आहे, सदर रुग्णाला Meningitis (डोळ्यांचा दाह) होता.
वरील शास्त्रीय माहिती पहाता
कोरोना कितपत डोळ्यांवाटे प्रवेश करू शकेल – याबाबत डोक्टर्स देखील साशंक आहेत, कारण या virus च्या जनुकीय माहितीच्या प्राथमिक अवस्थेत आपण आहोत, अधिक अभ्यास यावर झाल्यानंतर ठोसपणे व्यक्त व्हायला वाव आहे..
तरी देखील आपण सर्वांनी डोळ्यांच्या देखील सुरक्षिततेच्या बाबतीत सतर्क असले पाहिजे, कारण नसताना डोळ्यांना हात लावणे टाळणे हेच उत्तम !
अधिक माहिती करता स्रोत
1. https://www.anatomynext.com/lacrimal-gland/
2. https://www.allaboutvision.com/en-in/conditions/coronavirus-and-your-eyes/
3. https://onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1002/jmv.25725
सदर लेख केवळ माहितीसाठी आहे, डोळ्यांसादर्भात आपणाला काही त्रास जाणवत असल्यास त्वरित त्या क्षेत्रातील डोक्टर्सशी संपर्क करावा.
धन्यवाद.
लेखन: वरद मुठाळ
औषधनिर्माण शास्त्र स्नातक
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी तसेच स्वविकास करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा