प्रॉब्लेम समोर ‘गिव्हअप’ करायचं, का ‘गेट अप’ करायचं, निवड तुमची आहे.

marathi prernadayi

तुम्हाला जिम केरी माहितीये? तोच तो, हॉलीवुडचा फेमस हिरो, ‘द मास्क’ वाला…

त्याची स्ट्रगलींग पिरेड मधली एक घटना खुप इंट्रेस्टींग आणि शिकण्यासारखी आहे.

जिम केरी एका सफाई कर्मचार्‍याचा मुलगा होता, तो एका अतिशय गरीब घरात जन्मला होता, भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, म्हणुन किराया देऊन एका खटारा कार मध्ये राहायचा. पोटभर खायची भ्रांत असायची, पण अशा बिकट परिस्थीतीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहीले, हॉलीवुड एक्टर बनण्याचे स्वप्न….

पुर्ण मन लावुन त्याने प्रयत्न चालु केले आणि त्याच्या करीअरचा श्रीगणेशा झाला.

बारा-तेरा चित्रपटात त्याला छोटे-मोठे रोल मिळाले पण त्याचे समाधान होत नव्हते.

मग एकदा, वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी, त्याने एक करोड डॉलर रकमेचा चेक लिहला, आणि स्वतःच्या पाकीटात ठेवला.

रोज उठुन तो त्या चेककडे पाहायचा, खुष व्हायचा, त्याकडे पाहुन त्याला आगळीवेगळी शक्ति मिळायची, मग तो संपुर्ण उर्जेने काम करायचा आणि फक्त पाच वर्षांनी त्याला “डंब आणि डंबर” नावाच्या मुव्हीसाठी साईन केले गेले, आणि त्याबद्द्ल त्याला एक चेक मिळाला, रक्कम – फक्त एक कोटी डॉलर्स..

आयुष्य म्हणजे निवड करणे. जिम केरीने, परिस्थीतीने खचुन जाण्यापेक्षा, भव्य-दिव्य, मोठे, स्वप्न पाहण्याची निवड केली आणि ते प्रत्यक्षात जगुनही दाखवले.

पंछी ने जब-जब किया, पंखो पे विश्वास,
दुर दुर तक हो गया, उसका ही आकाश!…

हेच ब्रुस-लीने केलं, हेच जॅक कॅनफिल्डन केलं, अगदी शाहरुख खाननेही,…

They believed their dreams, when they were nothing…

त्यांनी चांगल्या विचारांची निवड केली..

स्वप्न साध्य करण्यासाठी एक गोष्ट करणं, अत्यंत आवश्यक आहे,..

आभारपत्रिका – रोज रात्री झोपण्याआधी, दिवसभरात घडलेल्या चांगल्या घटनांची उजळणी करायची आणि त्याबद्दल मनपासुन देवाला ‘थॅंक यु’ म्हणायचे.

आयुष्य म्हणजे निवड करणे…

एकतर तुमचं मन ओझ्यानं दबलेलं ‘भारी’ असेल, किंवा आनंदाने उडणारं, हलक्या पिसासारखं ‘आभारी’ असेल!..

एक तर तुम्ही ‘ग्रेटफुल’ असता नाहीतर ग्रेट ‘फुल’ असता. निवड तुमची आहे…

मान्य आहे रोजच आपल्यासमोर ताणतणावाचे प्रसंग येतात पण प्रॉब्लेम समोर ‘गिव्हअप’ करायचं, का ‘गेट अप’ करायचं,

निवड तुमची आहे……

चिंता करायची की चिंतन करायचं, निवड तुमची आहे.

पढे लिखे होनेसे अच्छा है,
पढते लिखते रहना,
अनपढ वो नही है, जो पढ नही पाते है,
बल्की अनपढ वो है, जो आगे बढ नही पाते है,

परिस्थितीला दोष देऊन रडत बसायचं? का मनस्थिती प्रसन्न ठेवुन हसतं खेळतं राहायचं, निवड तुमची आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.