परफेक्शनिस्ट म्हणजे पूर्णतावादी लोकांच्या आठ सवयी!!

काही लोक असे असतात ज्यांना सर्व काही अगदी नीटनेटकं आणि परफेक्ट असंच हवं असतं.

त्यांच्या तशा असण्याचे काही फायदे आणि काही तोटे पण होत असतात. पण त्यांना त्याची परवा नसते. या लोकांच्या काही विशेष सवयी असतात. या सवयी कोणत्या ते वाचा या लेखात.

आत्ताचा कोरोनाचा शांत काळ असो किंवा एरवीचे धकाधकीचे जीवन.. घराघरातून उपदेशाचे डोस कायमच ऐकू येतात.. ‘कपडे वाळत घालताना नीट झटकून, सरळ रेषेत घालावे.. हँगर ला अडकवले की शर्टाच्या बाह्या समसमान असाव्यात..’ अशी आईची शिकवण सगळ्यांच्या सिलॅबस चा भाग असते..

बायको म्हणते, ‘दुधाच्या पातेल्यात दुसरे अन्न काढायचे नाही किंवा टीव्हीचा रिमोट सोफ्यावर टाकून जायचे नाही..’

आज्जी देखील उपदेश देते, ‘अगं शाळेतून आल्यावर दप्तर इकडे तिकडे टाकू नकोस, देवापुढे श्लोक म्हणताना नीट मांडी घालून बस.’

बाबा तर सतत मागे लागतात, ‘ अरे तो इ. एम. आय. भरला का? वेळ उलटून जाऊ देऊ नकोस..’

कधी कधी आपल्या स्वतःला ही जाणवतं की ऑफिस मधल्या आपल्या क्यूबिकल मधले पिन केलेले कागद अगदीच पसरलेत तर ते तारखे प्रमाणे नीट लावावेत..

असा हा नीटनेटके पणा सगळ्यांमध्ये असतो.. आणि गमतीचा भाग असा की ज्या व्यक्ती मध्ये हा नीटनेटकेपणा नसतो, त्याचे गाबाळेपण आख्या जगाला ठाऊक असते.. 🤗😁

अर्थात गाबाळेपणा सगळ्यांनाच मारक ठरतो.. पण आपल्यामध्ये अति नीटनेटकेपणा किंवा अगदी पूर्णतावादी स्वभाव असेल तर ..??

ह्यालाच तर परफेक्शन म्हणतात हो.. म्हणजे जे काहीही कराल त्यात इतके परफेक्शन असते की जरा म्हणून वैगुण्य, चूक काढता येत नाही.. अशी व्यक्ती सगळ्यांच्या कौतुकास पात्र असते..

मात्र त्यांच्या अतिशयोक्ती करण्याच्या स्वभावामुळे ते लोकांच्या निशाण्यावरही येतात..

मात्र काहीही म्हणा ही माणसे आयुष्यात कायम यशस्वी देखील असतातच..!!!

जसे की खेळाडू सेरेना विल्यम्स, सगळ्यात श्रीमंत उद्योगपती स्टीव्ह जॉब्स असो किंवा भारतातला अभिनेता आमिर खान असो.. हे सगळे आपापल्या क्षेत्रात अत्यंत निपुण नव्हे नव्हे अगदी परफेक्शनिस्टच..!!

पण तुम्हाला माहीत आहे का..?? परफेक्शनिस्ट होण्यासाठी ह्या मंडळींना खूप मोठी किंमतही चुकवावी लागते..

म्हणजे त्यांना मानसिक तणाव तर असतोच पण चिडचिड, झोप न लागणे, सतत डोक्याचा भुगा होणे, स्वतः शरीराने एकीकडे तर मनाने दुसरीकडे असणे, खूप हेकट असणे, दुसऱ्यांवर सतत वचक ठेऊन असणे आशा बऱ्याच फेजेस मधून जावे लागते..

आणि त्यातून त्यांना आपण स्वतः एक ‘पूर्णतावादी’ व्यक्ती आहोत हे देखील लक्षात येत नाही..

तुमच्या बाबतीतही असे काही होते का..??

तुम्हाला कधी जाणवते का की तुम्ही देखील एक परफेक्शनिस्ट असू शकता..??

कसे ओळखायचे म्हणता..??!!

ठीक आहे काही ठळक मुद्दे आज आम्ही तुमच्यापुढे मांडतो..

बघा बरं हे तुमच्या स्वभावाशी मिळतेजुळते आहेत का..

१. तुम्ही नेहमीच सुंदर दिसता

म्हणजे चेहरा सुंदर असेलच असे नाही.. पण देवाने जसेही रूप दिले असेल त्यात तुम्ही नीटनेटके आणि शिस्तबद्ध वाटता..

म्हणजे तुमचे कपडे चुरगळलेले नसतात किंवा नखांचे नेलंपॉलिश उडालेले नसते…

किंवा ज्यांना नखं वाढलेली चालत नाहीत, त्यांना आपली नखे व्यवस्थित कापलेली आणि स्वच्छ असल्याशिवाय चैन पडत नाही.

म्हणजे सतत काहीतरी महागडे किंवा ब्रँडेडच असेलच असे नाही..

पण जे काही आहे ते अगदी चकाचक असते.. भले जुने बूट असतील पण ऑफिस ला जाताना रोज त्याला पॉलिश करता, घरातली ट्रॅक पॅन्ट सुद्धा इस्त्री केल्याप्रमाणे वाटते.. सगळं कसं नीटनेटकं..

पण मंडळी स्वतःच्या लुक आऊट वर काम करणारे दुसऱ्या कशात तरी गाबाळे असू शकतात हं..

म्हणजे स्वतःच्या कपडे, वस्तू ह्यांना व्यवस्थित ठेवणारे जेवणाच्या बाबतीत अव्यवस्थित असू शकतात..

त्यांचे किचन अस्वच्छ असू शकते.. जेवणाची ते हयगय करत असू शकतात..

त्यामुळे एखादी गोष्ट सुंदर ठेवत असताना मनावर येणार ताण असा भलती कडे मोकळा होत असावा..

२. तुम्ही तुमचे प्लॅन कोणालाही सांगत नाही

म्हणजे तुम्ही काही करायचे ठरवले असल्यास ते तडीस नेल्याशिवाय तुम्ही त्याचा बोभाटा करत नाही.

एखादा प्रोजेक्ट हाती घेतला असेल तर तो पूर्ण करून, त्यातले बग्स काढून, तो रन करून व्यवस्थित असेल तरच क्लाइन्ट ला प्रेझेन्ट करता..

उगीच आधीच त्या बाबतीत गाजावाजा करून नंतर स्वतःचे हसे अजिबात करून घेत नाही..

कदाचित तुमच्या अशा कामामुळे भले तुमच्या कडे काम जास्ती नसेल सुद्धा..

पण कँपनीच्या क्लाएन्टस मध्ये तुमचे नावही आदराने घेतले जात असेल.. काही जण तर तुमचेच नाव इनसिस्ट करत असतील.

कारण तुमच्या उत्तम कामामुळे आणि त्यातल्या परफेक्शन मुळे तुम्ही एक विश्वास कमावलेला असतो..

३. नोंदी आणि यादी शिवाय तुम्ही पुढे जात नाही

घरसामानाची खरेदी असो किंवा कोणाच्या लग्नाला लांब गावी जायचे प्लॅनिंग..

टूर वर जायचे असेल किंवा कॉलेज चे फ़ंक्शन.. काही माणसे सगळ्या कामाच्या अप टू डेट नोंदी ठेवतात..

इत्यंभूत याद्या बनवतात.. ‘क’ ते ‘ज्ञ’ पर्यंतची सगळी प्रोसेस/ घटना लिहून काढतात..

अन त्या क्रमानेच सगळे कार्य पूर्ण करतात..

कुठलेही न ठरवलेले काम करणे त्यांच्या स्वभावात बसतच नाही जणू..

सगळ्यात कसे परफेक्शन लागते..!! 👌

४. तुम्हाला क्षणाचीही फुरसत नसते

आपण लहान मुलांना कसे म्हणतो नुसती भिंगरी आहे, तुडतुड्या आहे.. सतत काहीना काही करण्यात मग्न आहे..

तसेच हे परफेक्शनिस्ट सतत कामात गुंतलेले दिसतात..

शांत बसले असतील तरी डोक्यात कोणत्यातरी विषयाचे प्लॅंनिंग चालू असते..

सुट्टीच्या दिवशी कामाचे डोंगर उपसताना दिसतात..

कधी उगीच बसून रिकामटेकडा वेळ घालवणे म्हणजे अक्षम्य गुन्हा..!!

अगदी वेकेशन वर गेले तरी हाताबरोबर एखादे काम त्या वेळात पूर्ण होईल असे ते करतीलच.. 😅

ह्यांना मेडिटेशन सुद्धा करायला अवघड वाटते..

कारण ते परफेक्ट होतेय की नाही ते कळणार कसे..?? त्याचे काही लिखित नियमही नाहीत..

मग ह्यांना सतत वाटत राहते की मेडिटेशन होतच नाहीये आणि वेळ तर नुसताच वाया जातोय..

म्हणजे बघा असं काही होतं का तुमच्याबरोबर, की मेडीटेशन मोबाईल ला हेडफोन लावून चालू तर केलं पण कॉन्संट्रेशन काही होत नाही मग उगाचच वाटायकला लागतं ‘अरे! वाया गेले हे २० मिनिटं🤦🏻‍♂️’

म्हणजे परफेक्शन चे साईड इफेक्ट्स म्हणतात ते हे..

५. सगळे सुव्यवस्थित असेल तरच ह्यांना बरे वाटते

सगळ्या गोष्टी जागच्या जागी असणे, सगळी कामे वेळच्या वेळी करणे, प्रत्येक गोष्टीत एक लय, नीटनेटकेपणा असणे ही त्यांची खासियत..!!

असे नसेल तर ते सतत रेस्टलेस असतात.. त्यांना काहीही दुसरं सुचत नाही..

घरातली साफसफाई अगदी व्यवस्थित, वस्तू ठेवायचा अँगल न बदलणे, चुरगळलेली चादर नीट करणे सगळे सगळे कसे अगदी परफेक्ट हवे..

हे दुसरे कोणी केल्यास त्यांना पटतही नाही.. सगळी कडे स्वतःचा एक्स्पर्ट हात फिरला की सगळे उत्तम असते..

परफेक्शनिस्ट गृहिणी त्यांच्या घरकामात सुद्धा अगदी तरबेज असतात..

कोणीच त्यांचा हात नाही धरू शकत.. घरात वेळे आधीच सगळे काम पूर्ण असते..

आता कोरोनाच्या काळात तर ह्या ६ महिन्याचे सामान भरून ठेवतील आणि स्वतःच्या कुटुंबाला घरात कशाची कमी जाणवू देणार नाहीत..

मगच ह्यांच्या जीवाला बरे वाटेल..

६. निर्णय घेणे हे एक तर खूप अवघड असते नाहीतर खूप सोप्पे

म्हणजे काही परफेक्शनिस्टना कोणताही निर्णय घ्याचा तर फार वेळ लागतो..

ते खूप विचार करतात. रिसर्च करतात..

१० मतं जाणून घेतात. आणि एकच योग्य निर्णय घेतात..

मात्र हे काहींना अगदीच सोप्पे वाटते कारण कित्येक वर्षांचा अनुभव तोही अगदी पूर्णतावादी व्यक्ती असल्याने अगदी शंभर टक्के योग्यच निर्णय घेतला जातो.. तेही ‘इन वन गो’..!!!

७. आपले कोणतेच काम तुम्ही दुसऱ्यावर सोपवत नाही

हो ह्याला दुर्दैव म्हणायचे की सुदैव ते माहीत नाही पण परफेक्शनिस्टना स्वतःचे कोणतेच काम दुसऱ्याला द्यायला आवडत नाही..

त्यांना ठाम विश्वास असतो की माझ्या सारखे उत्तम, काटेकोर कोणीच करू शकत नाही..

‘जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ ह्या उक्तीला ते आयुष्याची शिकवण म्हणून मानतात..

स्वतः कोणतेही कार्य करणे म्हणजे ते शत प्रतिशत शुद्ध आणि चूक विरहित असणार ह्याचा त्यांना आत्मविश्वास असतो..

८. काहीही ‘वाया घालवणे’ हे शब्द परफेक्शनिस्टच्या शब्दकोशात नसतात

काय सांगावं ह्या बाबतीत..?? काहीही वाया घालवणे म्हणजे आपल्या पेरफेक्शनचा अपमान मानतात ही मंडळी..

दहा बारा पाहुणे जेवायला येणार असतील तर सुगरणीचा स्वयंपाक कसा मोजून मापून..

म्हणजे मध्येच संपणारही नाही आणि जास्ती उरणारही नाही..

एखादा प्रोजेक्ट घेतला की वेळेची डेड लाईन द्यावी तर परफेक्शनिस्ट लोकांनी..

अगदी योग्य वेळ मोजून मापून सांगणार.. आणि त्या दिवशी देणार म्हणजे देणार..

कोणाला लग्नाला मागणी घालायला जाताना केक नेला आणि मागणी मान्य झाली नाही तरी केक संपवायची जबाबदारी मात्र त्या समोरच्या व्यक्तीवर सोपवून येतील..

जातीने लक्ष घालून तो केक वाया जात नाही ना ह्यावर लक्ष देतील..

वाढदिवसाला तोंडाला केक लावणार असाल तर सावधान.. तुमची पोलिसात तक्रार होऊ शकेल….

असा हा गमतीचा भाग सोडला तर परफेक्शन ठेऊन काम करणारे हातात आलेल्या संधीचा पूर्ण वापर करतात..

तसे करताना वित्तहानी, वस्तू हानी होणार नाही ह्याची पूर्ण खबरदारी घेतात.. आणि हा त्यांच्यातील गुण वाखाणण्यासारखाच म्हणता येईल..!!

तर अशा गुणांची तुमच्या कडे रेलचेल असेल तर तुम्ही देखील स्वतःला ‘परफेक्शनिस्ट’ ही पदवी देऊ शकता..

मात्र ह्या गुणांचा धोका ही लक्षात घ्या.. सतत पूर्णतावादी राहण्यासाठी, स्वतः प्रेशरखाली/ दडपणाखाली राहणे, स्वतः चे स्वास्थ्य बिघडवणे हे योग्य नाहीच..

थोडा मोकळा श्वास ही घ्या.. कधीतरी चुका ही करा.. म्हणजे पुढच्या वेळी परफेक्ट होण्यासाठी अजून वाव उरेल..

असो सगळ्यांना हे जमत नाही.. काही जण इमपरफेक्टही असतातच की आजूबाजूला..

आणि त्यांचेही फारसे काही अडत नाही आयुष्यात.. थोडा वेळ लागत असेल इतकेच..

शेवटी परफेक्ट असो किंवा इम्परफेक्ट आयुष्याचा आनंद घेणे महत्वाचे..!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “परफेक्शनिस्ट म्हणजे पूर्णतावादी लोकांच्या आठ सवयी!!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय