पपईच्या नियमित सेवनाचे हे सात फायदे माहित आहेत का?

पपईच्या नियमित सेवनाचे फायदे

क्रिस्तोफर कोलम्बसने पपईला ‘फ्रुट ऑफ एन्जल्स’ म्हणून संबोधलं होतं.

आता त्याला पपईचे गुणधर्म किती माहित होते, हे काही सांगता येत नाही. पण आपल्याला सगळ्यांनाच आवडते तशीच पपई त्याला पण प्रचंड आवडत असण्याची दाट शक्यता आहे.

हे सगळं असलं तरी पपई मध्ये असणारं व्हिटॅमिन ‘सी’, फॉलिक ऍसिड, मिनरल हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. याशिवाय किडनी आणि लिव्हरला डिटॉक्सीफाय करून पचनसंस्थेला मजबूत करण्यासाठी पपई खूप महत्त्वपूर्ण आहे. आता या लेखात पपईच्या नियमित सेवनाचे सात फायदे मी तुम्हाला सांगणार आहे.

पपईच्या नियमित सेवनाचे सात फायदे

१) कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते: पपईमध्ये व्हिटॅमिन ‘सी’, फायबर आणि अँटिऑक्सिडन्ट असल्याने त्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. आणि हृदयाचे आजार दूर ठेवण्यासाठी पपईचे नियमित सेवन हे खूप फायदेशीर ठरते.

२) वजन कमी करायचे असल्यास फायदेशीर: ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी नियमित पपईचे सेवन आपल्या आहारात केल्यास त्यांना कमी कॅलरी आणि तरीही संतुलित आहार हे गणित जुळवून आणायला सोपे जाते.

३) रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर: वेगवेगळ्या विषाणूंच्या संसर्गापासून वाचण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणं हे किती महत्त्वाचं आहे हे आताच्या या परिस्थितीत आपण पहिलेच आहे. पपई मधले व्हिटॅमिन ‘सी’ हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

४) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त: पपईमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असल्याने डोळयांच्या आरोग्यासाठी सुद्धा पपई खूप चांगली ठरते.

५) पचनशक्ती वाढवते: पपईमध्ये असलेले डायजेस्टिव्ह एंझाइम आणि फायबर पचनशक्ती वाढवायला मदत करते. कोरोना व्हायरसच्या भीतीने सध्या आपण घरात शांत दडी मारून बसलोय नाहीतर जंक फूड, तेलकट- मसालेदार पदार्थ खाऊन बिघडवलेली पाचनसंस्था पुन्हा सुधारण्यासाठी पपईचे नियमित सेवन खूप गरजेचे आहे.

६) मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी करण्यात मदत करते: पपई मध्ये असलेल्या ‘Papain’ या एन्झाइममुळे मासिक पाळीच्या वेदना कालांतराने कमी होऊ शकतात असे काही शास्त्रिय अभ्यासात निदर्शनास आले आहे.

७) त्वचा तरुण-तजेलदार ठेवते: आपल्याला सर्वांनाच तरुण आणि सुंदर दिसायला आवडतं. पण मोबाईलचा फिल्टर वापरून फोटो काढण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो.

तर बघा पर्याय आहे. पपईचे नियमित सेवन केल्याने व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘इ’, अँटी ऑक्सिडन्ट यांच्या मुबलक प्रमाणाने त्वचेवर अवेळी सुरकुत्या पडणे थांबवता येते.

नुसती पपईचा नाही पपईच्या बिया सुद्धा गुणकारी असतात माहित आहे का?

पपईच्या बिया या शरीरातले जंत पडून जाण्यासाठी फायदेशीर असतात. याशिवाय तणाव कमी करणे, अर्थ्रायटिस या सारख्या आजारात सुद्धा पपईचे सेवन खूप फायदेशीर असते.

एकूणच काय हे सगळं करण्यासाठी जास्त काही नाही करायचं!! फक्त आपल्या आहारात पपईचे नियमित सेवन करायचे.

आता मला माहित आहे आज संध्याकाळी पपई आणायला तुम्ही नक्की बाहेर पडाल. पण जर जाल तर काळजी घ्या. मास्क लावा.

सॅनिटायझर चा योग्य तो वापर करा. बाजारात सोशल डिस्टंसिंग ठेवायला विसरू नका.

आणि हो खाली 👇 कमेंट्स मध्ये तुम्ही वाचताय याची तुमची हजेरी लावायला विसरू नका. म्हणजे तुमच्यासाठी पुन्हा काहीतरी चांगला विषय शोधून आणायला आम्हाला पण हुरूप येतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

2 COMMENTS

  1. नियमित म्हणजे आठवड्यातून किती वेळा व किती प्रमाणात?
    देशी व संकरीत ( सिंगापुरी ) पपईचे गुणधर्म सारख्या प्रमाणात असतात का?
    असे विचारण्याचे कारण म्हणजे पपई उष्ण गुणधर्माची मानली जाते.
    बियांचा वापर कसा करावा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.