या कोड्याचे उत्तर सांगा?

लॉक_डाउन_चॅलेंज

अजय, मदन, समीर, राहुल, रोहित, अवि, माधव, सलील हे आठ कामगार एकाच कम्पनित कामाला असतात.

तेथे पर्सनल, ऍडमिनिस्ट्रेशन आणि मार्केटिंग या तीन डिपार्टमेंट मध्ये तिघे काम करतं असतात. (म्हणजे या तीन डिपार्टमेंट मध्ये ते काम करत असतात) एका डिपार्टमेंट मध्ये त्यातील तीन पेक्षा जास्त जण नसतात.

त्यांची प्रत्येकाची वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असते. त्या खेळांची नवे अशी..

फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, लॉन टेनिस, बास्केट बॉल, हॉकी, टेबल टेनिस

(हे आवडणारे खेळ नावे लिहिली आहेत त्याच क्रमाने असतील असे नाही )

1) माधव ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करतो आणि फुटबॉल किंवा क्रिकेट त्याला आवडत नाही.

2) रोहित टेबल टेनिस आवडणाऱ्या (फक्त) अजय बरोबर पर्सनल डिपार्टमेंट मध्ये काम करत असतो.

3) राहुल आणि सलील एका डिपार्टमेंट मध्ये कामाला नसतात. (पण माधव त्यांच्याबरोबर असण्याची शक्यता नाकारता येत नाही)

4) समीरला हॉकी आवडतं आणि तो मार्केटिंगमध्ये काम करत नाही…

5) अवि ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करत नाही आणि त्याला क्रिकेट किंवा बॅडमिंटन आवडत नाही (दोन्हींपैकी एक आवड त्याची असू शकते)

6) ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एकाला फुटबॉल आवडतो.

7) व्हॉलीबॉल आवडणारा एक जण पर्सनल डिपार्टमेंट मध्ये काम करतो.

8) ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कोणालाच बॅडमिंटन किंवा लॉन टेनिस आवडत नाही.

9) सलील ला क्रिकेट आवडत नाही…

हुश्शह्य…. तर असा आहे हा जांगडबुत्ता…

आता सांगा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मध्ये कोण काम करतं?

आणि

राहुल कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.