तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा चेहेरा वाचता येतो का?

तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा चेहेरा वाचता येतो का? समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरून त्या व्यक्तीबद्दल तुम्ही काही गोष्टी सहज जाणून घेऊ शकता. Face Reading म्हणजेच,एखाद्याचा चेहरा कसा वाचायचा ते समजून घ्या ह्या लेखात.

तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर त्याचा चेहेरा वाचता यायला पाहिजे.

तुम्हाला लग्न करायचंय, आयुष्याचा जोडीदार निवडायचाय असेल तर, तर निदान त्याच्याबद्दल काही गोष्टी तरी निश्चित जाणून घेतल्या पाहिजेत ना?

एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीबरोबर व्यवसाय करायचा असेल तर ती व्यक्ती कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यायलाच पाहिजे.

Face Reading Marathi

कोणत्याही व्यक्तीचा चेहेरा बोलत असतो, तो आपल्याला त्याची काही ठळक वैशिष्ट्ये सांगतो. म्हणून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा चेहेरा वाचता यायला पाहिजे.

मग चेहेरा कसा काय वाचायचा हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला आहे ना? तर मित्रांनो, आपल्या डोळ्यांची रचना, कपाळाची ठेवण, ओठांच्या हालचाली, त्यांचा आकार, कान, कानांचा आकार, लांबी, कानांची ठेवण, ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला जाणून घेता येईल की समोरची व्यक्ती कशी आहे.

आधी आपण डोळे, डोळ्यांची ठेवण, आकार आणि ते काय सांगतात ते बघू.

आपण कोणत्याही माणसाशी जेंव्हा बोलायला जातो त्यावेळी सगळ्यात आधी आपलं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे जातं. त्याच्या डोळ्यांकडे बघितल्या शिवाय आपल्याला कळत नाही समोरची व्यक्ती आपल्याकडे बघतीये, का तीचं लक्ष दुसरीकडे कुठे आहे.

डोळ्याकडे लक्ष गेलं की कळतं, ‘हाँ! ती व्यक्ती आपल्याकडे बघते आहे!!’ आणि नंतर मग आपण बोलायला सुरुवात करतो.

पण डोळ्यांकडे बघताना आपण काय जाणून घ्यायचं ते लक्षात घ्या.

१) समोरच्या व्यक्तीचे दोन्ही डोळे कसे आहेत? म्हणजे त्याच्या दोन्ही डोळ्याच्या आतल्या दोन्ही टोकांमध्ये किती अंतर आहे.

दोन्ही डोळ्यांच्या मध्ये नाक तर असतंच. पण जर पसरट नाक असेल तर दोन्ही डोळ्यातलं अंतर जास्त असतं. आणि नाक शार्प असेल तर दोन्ही डोळे जवळ जवळ असतात. म्हणजेच अंतर कमी असतं.

Face Reading Marathi

आता ह्या दोन्ही डोळ्यांच्या कमी आणि जास्त अंतरावरून त्या व्यक्तीबद्दल आपल्याला नक्की काय ज्ञान होतं ते बघा..

ज्या लोकांच्या दोन्ही डोळ्यातलं अंतर जास्त असतं ते लोक कोणतं ही काम करत असतील ते काम अगदी सहज जाणून घेतात. त्यांना फार खोलात शिरून ते काम जाणून घ्यायची आवश्यकता नसते.

त्यांच्या हाताखालचा माणूस जर चांगले रिझल्ट्स देत असेल तर ते खुश असतात. त्याने ते काम कसं केलं? किती वेळात केलं ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं.

ह्याच्या उलट ज्या लोकांच्या दोन्ही डोळ्यांमधलं अंतर कमी असतं म्हणजे त्यांचे डोळे नाकाच्या अगदी जवळ असतात ते लोक कोणतंही काम करताना डिटेल्स जाणून घेऊन नंतरच सुरू करतात.

कोणी चांगले काम केले तर त्याने ते चांगलं कसं केलं ते सुद्धा जाणून घेतात. ते काम दुसऱ्या पद्धतीने केलं असतं तर काय फरक पडला असता?

थोडक्यात हे लोक जास्त चिकित्सक असतात. प्रत्येक विषयाचा अगदी खोलवर विचार करतात किंवा अभ्यास करतात.

२) ज्या लोकांच्या डोळ्यांची बाहेरची टोकं ही वरच्या बाजूला वळलेली असतात किंवा काहींची खालच्या बाजूला वळलेली असतात किंवा काही लोकांची अगदी सरळ असतात त्यांबद्दल जाणून घेऊ.

ज्यांचे डोळे थोडे वरच्या बाजूला वळलेले असतात ते लोक नेहमीच पॉझीटीव्ह विचार करतात. निगेटिव्हीटी मध्ये सुद्धा पॉझिटिव्हीटी शोधतात.

ज्यांचे डोळे सरळ असतात ते लोक निगेटीव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्हीचा बॅलन्स साधणारे असतात. आणि ज्या लोकांचे डोळे खालच्या बाजूला झुकलेले असतात ते जरा आत्मविश्वास कमी असलेले, निगेटिव्ह विचार करणारे असे असतात.

ज्या लोकांचे डोळे नॉर्मल असतात म्हणजे आतल्या बाजूला व्यवस्थित असतात ते लोक नॉर्मल असतात. पण ज्या लोकांचे डोळे बाहेर आलेले असतात ते लोक तुम्हाला फाडून खाणारे असतात. म्हणजेच ऍग्रेसिव्ह असतात. छोट्या मोठ्या कारणाने अंगावर धावून येणारे असतात. चिडखोर असतात. संतापी असतात. आपलंच खरं करणारे असतात.

हे झालं डोळ्यांवरून चेहेरा कसा वाचायचा?

आता कान बघू. म्हणजे तुमच्या कानांची ठेवण कशी आहे त्यावरून तुमची काय ओळख ठरते?

तुम्ही कोणाच्याही चेहेऱ्याकडे बघितलं की कानांवरून समोरच्या व्यक्तीचा चेहेरा काय काय सांगतो ते बघा.

Face Reading Marathi

१) तुमचे कान आकाराने जरा मोठेच असतील तर तुम्ही बहुश्रुत म्हणून ओळखले जाता. म्हणजे बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांचं ऐकून घेणं पसंत करता.

कोणीही तुमच्याशी काही बोलायला आलं की तुम्ही आधी त्यांचं नीट ऐकून घेता आणि नंतर आपली बाजू मांडता. खूप ऐकण्या मुळे अशा लोकांकडे ज्ञानाचा साठा पण जास्त असतो.

काही स्त्रियांना आपला पती आपलं सगळं ऐकणारा असावा असं वाटत असेल तर ज्या व्यक्तीचे कान मोठे आहेत अशा व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करायला हरकत नाही.

२) पण लांब कान असून ते वरच्या बाजूने जास्त बाहेर आलेले असतील तर अशी व्यक्ती ऐकून घेते पण आपला हेका कधी सोडत नाही. उदाहरण म्हणून, असे कान अमीर खान चे आहेत ते तुम्हाला सहज कोणत्या जाहिरातीत दिसून येतील.

आणि कदाचित याचमुळे हे लोक जर हुशार असतील तर परफेक्शनिस्ट तरी होतात नाहीतर हेकेखोर होतात.

परफेक्शनिस्ट लोकांबद्दलच्या पूर्वी लिहिलेल्या एका लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे.

३) ज्यांचे कान लहान आणि बरोबर पाहिजे तसे आहेत ते लोक दुसऱ्याचं ऐकून घेतील आणि स्वतः बद्दल पण सांगतील. पण ज्यांचे कान खूप लहान असतात ते लोक फक्त आपलंच घोडं पुढं दामटतात. दुसऱ्याचं ऐकून घेत नाहीत.

आपल्या नाकाच्या नाकपुडीच्या खालच्या टोकापासून आपल्या कानापर्यंत सरळ रेषा मारली तर त्या रेषेच्या वर ज्यांचे कान असतात ते लोक सगळ्या गोष्टी पटकन आकलन करून घेतात. पण झटकन, पटकन जाणून घेण्याच्या नादात कधी कधी चूक करतात.

आणि त्या रेषेच्या बरोबर ज्यांचे कान असतात त्यांना नीट बघून समजून घेण्याची सवय असते. त्यात थोडा वेळ जातो पण चुका कमी होतात.

आता जाणून घेऊ ओठ. ओठांची ठेवण, जाड ओठ, पातळ ओठ काय सांगतात तुमच्याबद्दल?

Face Reading Marathi

१) जे लोक तोंड भरून हसतात, म्हणजे अगदी मोकळं हसतात त्यावेळी तोंड जास्तीत जास्त उघडलं जातं आणि मनसोक्त हास्य चेहेऱ्यावर दिसतं.

असं मुक्त हास्य करणारे लोक सोशल असतात. म्हणजे त्यांना भरपूर मित्र असतात, जीवनाचा आनंद ते लोक अगदी मनापासून घेतात. खळखळून हसतात, आणि दुसऱ्याला सुद्धा खळखळून दाद देतात.

ज्या लोकांचं तोंड हसताना फक्त स्माईल, किंवा थोडंच उघडून हसून लगेच बंद होतं. त्यांचा तोंडाचा आकार सुद्धा लहान असतो. असे लोक जरा रिझर्व्ह माइंडेड असतात. मराठीत त्यांना आपण आतल्या गाठीचे म्हणतो.

२) आपले ओठ सुद्धा आपली वैशिष्ट्य लोकांना सांगतात. वरचा ओठ ज्यांचा जाड असतो ते लोक समोरच्या व्यक्तीच्या तोंडावर अगदी स्पष्ट बोलतात.

आणि ज्यांचा खालचा ओठ जाड असतो असे लोक एखाद्या कडून काही जाणून घ्यायचं असेल त्याच्या पाठमागेच लागून ती गोष्ट जाणून घेतात. पिच्छा पुरवतात.

ज्यांचा वरचा ओठ पातळ असतो ते लोक सुद्धा रिझर्व्ह असतात. कोणाच्या समोर कधी घड घड बोलत नाहीत. असे लोक तुम्ही व्यवसायासाठी पार्टनर म्हणून घेतले तर. तुमच्यात आणि त्यांच्या विचारात खूप मोठा फरक पडतो.

आता बघुयात कपाळ. ह्याला माथा पण म्हणायला हरकत नाही.

माणसाचा माथा म्हणजे पॉवर हाऊस असतं. सगळी पॉवर तिथे असते. कपाळाच्या मागे माणसाचा मेंदू असतो ना, मेंदू तुमच्या संपूर्ण शरीराला कंट्रोल करत असतो.

Face Reading Marathi forehead

१) तुमचा मेंदू कसा आहे हे तुमच्या कपाळावरून समजतं. तुमच्या कपाळाचा आकार कसा आहे त्यावरून तुमच्या पॉवर हाऊस ची कल्पना येते.

भव्य कपाळ असं आपण एखाद्या व्यक्तीच्या चेहेऱ्याचं वर्णन करताना करतो. भव्य म्हणजे कपाळाचे उंची जास्त असते.

ह्या भव्य कपाळ असलेल्या लोकांच्या मेंदूत पण भरपूर डाटा साठवायला जागा असते. ते लोक एखादं काम करत असतील तरी त्या कामाची पूर्ण डिटेल्स घेतात. पूर्ण ज्ञान मिळवतात आणि त्याचा भरपूर साठा सुद्धा त्यांच्या मेंदूत करून ठेवतात.

ज्याचं कपाळ रुंद असतं म्हणजे समोरून दिसणारं कपाळ. आडवी रुंदी (चेहेऱ्याची रुंदी) जास्त असलेले लोक हे सुद्धा खूप डाटा साठवू शकतात.

म्हणजे एक काम तर ते परफेक्ट करतातच, पण अनेक कामात ते पारंगत असतात, म्हणजे अभ्यासात हुशार असले तरी, स्पोर्ट्स मध्ये पण तेवढेच हुशार असतात, त्यांच्याकडे कला सुद्धा अनेक असतात. ते सायन्स मध्ये पण आपलं वर्चस्व सिद्ध करतात, तसं खाण्याचे पदार्थ सुद्धा अगदी टेस्टी बनावू शकतात.

२) काही लोकांचं कपाळ मागच्या बाजूला जास्त झुकलेलं असतं, तर काही लोकांचं कपाळ अगदी सरळ असतं, तर काही लोकांचं पुढच्या बाजूला जास्त बाहेर आलेलं असतं, तर काही लोकांचं कपाळ अर्ध गोलाकार बाहेर असतं.

जास्त मागे झुकलेलं कपाळ असलेली माणसं जरा उतावळी असतात. त्यांच्यात संयम नसतो. सरळ कपाळ असलेली माणसं बॅलन्स साधून असतात. त्यांच्यात संयम सुद्धा असतो.

कपाळ पुढे जास्त असलेली माणसं हुशार असतात, संयमी असतात. आणि अर्ध गोलाकार कपाळ असलेली माणसं खूप ऍडजस्टेबल असतात. संयमी असतात.

आयुष्यात आपला जोडीदार किंवा बिझिनेस पार्टनर निवडण्यासाठी ह्या फेस रीडिंगचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो. साधारण पणे हे ठोकताळे लक्षात ठेवून तुम्ही रोजच्या जीवनात तुमच्या सहवासात येणाऱ्या लोकांचे चेहेरे वाचून हळू हळू अनुमान लावून अभ्यास करू शकता.

आणि नंतर तुमच्या स्वतःच्या आयुष्यात योग्य लोकांची निवड करून यशस्वी होऊ शकता. हे फेस रीडिंग निश्चित मार्गदर्शक ठरू शकेल.

ह्यात आणखी बरेच छोटे छोटे पैलू आहेत जे अभ्यास करून तुम्हाला शिकता येतील. पण सहज नजर टाकल्यावर चेहेरा वाचून तुम्ही माणसं ओळखून बराच काही तुमचा फायदा करून घेऊ शकता.

परफेक्शनिस्ट म्हणजे पूर्णतावादी लोकांच्या आठ सवयी!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

9 thoughts on “तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा चेहेरा वाचता येतो का?”

  1. खूप छान लेखन, नवीन लेखन पोस्ट केल्यावर नोटिफिकेशन मिळाले तर बरे होईल, तुमचे अभ्यासपूर्ण लेखन वाचायला आवडेल. सस्नेह शुभेच्छा

    Reply
    • मनाचेTalks चे हे पेज लाईक करा.

      आणि

      *मनाचेTalks* च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇खाली दिलेल्या *ग्रुप लिंक क्लिक करून त्यामध्ये जॉईन व्हा.* या ग्रुपमध्ये फक्त ऍडमिन पोस्ट करू शकणार असल्याने ग्रुपमध्ये अपडेट्स शिवाय काही इतर असणार नाही.

      https://chat.whatsapp.com/BIt01C3I2CGGovJeyj4qDQ

      Reply
    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      मनाचेTalks फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalks/

      मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

      https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय