स्वतःवर प्रेम करून स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी हे करा

स्वतःवर प्रेम करणे ही तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन, आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते.. ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन अंगी भिनवण्यासाठी या गोष्टी करता का तुम्ही? हा लेख खास तुमच्यासाठी..

‘प्रेम’ ह्या शब्दात खूप शक्ती आहे.. प्रेम हे देण्यासाठी असते.. प्रेम घेण्यासाठीही असते.. प्रेमावर जग चालू आहे..

आपल्याकडे महान प्रेमगाथा ऐकवल्या जातात.. सत्यवान-सावित्री असो किंवा जिजाऊ-शिवबा असो..

प्रेमाने कर्तव्याचे खूप मोठे मोठे पर्वत पार केले गेले आहेत..

असेच प्रेम आपण स्वतःवरही केले पाहिजे.. हा स्वार्थी विचार कदापि नाही..

खरे तर स्वतःवर प्रेम करता आले तर आपण दुसऱ्यांवरही प्रेम करू शकतो.. म्हणून स्वतःवर प्रेम करणे ह्यात काहीच वावगे नाही..

‘सेल्फ लव्ह’ हा आपल्या चढत्या अलेखाचा मंत्र ठरतो.. तुमच्या कामात सतत यश मिळवण्यासाठी स्व-प्रेम एक बूस्टर डोस ठरतो..

काय काय बरे होऊ शकते स्वतःवर निस्वार्थ प्रेम केल्याने.??

1) स्वतःवर प्रेम केले तर आपण आपल्यातले सगळ्यात उत्तम रूप जगासमोर आणू शकतो. फक्त प्रेम योग्य दिशेने असावे.. स्वार्थापोटी स्वतःवर केलेले प्रेम आपलाच सत्यानाश करायला कारणीभूत ठरते.. त्यामुळे ही स्वार्थी आणि निस्वार्थी प्रेमामधली बारीकशी रेषा ओलांडता कामा नये..

2) स्वतःची काळजी घेतली नाहीत तर तुम्ही असे कितीसे पुढे जाणार..?? आयुष्य एकाच ठिकाणी घुटमळत राहणार.. स्वतःची काळजी घ्या.. काय हवे नको ते पुरवा. तरच तुम्ही यशाची एकेक पायरी आत्मविश्वासाने चढू शकाल..

3) स्वतःवरच्या प्रेमामुळे तुम्ही स्वतःला समजून घेऊ शकाल.. आणि ह्या समजूतदार पणाचा महत्वाचा फायदा असा आहे की, तुम्ही समोरच्या व्यक्तीलाही उत्तमरीत्या कनेक्ट व्हाल.. आपल्या भवतालच्या लोकांना समजून घेणे त्यांच्यावर माया करणे तुम्हाला अगदीच सोपे वाटेल..

4) आपण आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झटत असतो. स्वतःसाठी जगले पाहिजे हे आपल्या लक्षातच येत नाही.. मग म्हातारपणी आपण चिंतेत पडतो.. स्वतःसाठी काही करायची सवय नसल्याने, स्वतःशी संवाद साधण्याची सवय नसल्याने आपल्याला लोकांवर अवलंबून राहावे लागते..

तसेही स्वतःवर प्रेम कसे करायचे, का करायचे हे कोणीच आपल्याला शिकवत नाही.. म्हणून आम्ही सांगतोय.. वेळेतच स्वतःला सुद्धा महत्व द्या.. आयुष्य किती सुंदर बनेल.. आणि मग बघा तुमच्या कडून खूप लोक प्रेरणा घेतील आणि त्यांचेही आयुष्य सुंदर करतील..

5) मात्र स्वतःला दुसऱ्या कोणासारखे बनवायच्या मागे लागू नका.. तुम्ही जसे आहात तसेच छान आहात.. स्वतःला ऍक्सेप्ट करा तरच तुम्हाला स्वतःला आनंदात ठेवता येईल.. तुम्ही जसे दिसता, तुमचा रंग, तुमचा ढंग सगळे वेगळे असले तरी वाईट नाही ह्याची स्वतःला खात्री द्या.. वागणे, बोलणे, ज्ञान मिळवा, स्वतःमधील चुका सुधारा मात्र स्वतःला कमी लेखत आयुष्य काढू नका..

दुसऱ्यांसारखे जगणे किंवा स्वतःचे आयुष्य दुसऱ्यांच्या तत्वाने जगणे म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अपमान आहे.. सगळे युनिक असतात.. आणि प्रत्येकाचे हे वेगळेपणच त्या व्यक्तीला ओळख देते.. तुम्ही स्वतःची ओळख पुसू नका, विसरू नका..

6) स्वतःशी स्पर्धा करा.. दुसऱ्याशी स्पर्धा करायची झाल्यास ती सौहार्दपूर्ण असुद्या.. असूयेला दूरच ठेवा.. हरलात तरी स्वतःला दोष लावू नका.. त्या प्रसंगातून शिका आणि पुढे चला.. पुन्हा स्वतःला उभारी द्या..

सतत चिंतेत राहून आपल्या मनावर ओझे लादू नका..

7) जसे आहात तसेच वागा.. उगीच लोकांना आनंदी करायला खोटे वर्तन करू नका.. त्याने तुमच्यावरच खूप दडपण येते.. नकळत तुम्ही नाटकी बनता, स्वतःची ओरिजिनलिटी घालवून बसता.. असे होऊ देऊ नका..

यश मिळवताना स्वतःवर कठोर होऊ नका.

8) प्रेमळ, मनस्वी लोकांबरोबर राहा.. स्वतःवर भरभरून प्रेम करणारी मंडळी खूप आनंदी असतात.. अशांच्या संगतीत तुम्हाला खूप रिफ्रेश झाल्यासारखे वाटेल. खूप काही शिकायलाही मिळेल..

9) अर्थातच तुम्ही स्वतःशी कसे वागता ह्यावर तुमचे यश अवलंबून असते. ही टर्मिनोलॉजी समजून घ्या. जर तुम्ही सतत स्वतःला दोष देत राहिलात तर तुमच्या समोर जे काम आहे ते कधीच पूर्ण होणार नाही.. यशापासून तुम्ही लांबच राहाल..

त्यापेक्षा तुम्ही जे काही कराल ते तडीस नेल्यावर स्वतःचे कौतुक करा.. कोणी तुमच्यापेक्षा चांगले करू शकले तर शिकून घ्या.. आपल्याला येणारच नाही, आपण काही कामाचे नाही अशी भावना मनामध्ये येऊ देऊ नका..

10) कधीतरी स्वतःला ट्रीट सुद्धा द्या.. स्वतःला वेळ द्या.. मित्रमंडळींबरोबर आणि कुटुंबाबरोबर खूप मज्जा करता.. कधीतरी सोलो ट्रिप सुद्धा करा.. त्यात तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला खूप निवांत वेळ मिळेल.. निसर्गाच्या सानिध्यात हरवून जा..

स्वतःच्या वाढदिवशी एखाद्या स्पा मध्ये जा. शॉपिंग करा.. स्वतःला आनंदी ठेवताना, गिल्ट हा आपला खूप मोठा शातरी असतो.

कधी कधी आपण एकटेच मजा मारतोय म्हणून आपल्याला आपले मन खात राहते.. पण स्वतःला हेही समजावता आले पाहिजे की एरवी स्वतःच्या कुटुंबासाठी जगात असताना एखादा दिवस स्वतःला देणे म्हणजे चूक नव्हे. खरे तर तेही आपले आपल्यासाठी पार पाडलेले कर्तव्यच असते..

11) स्वतःकडे लक्ष देणे, स्वतःला फिट ठेवणे, स्वतःच्या शरीराकडे खास लक्ष देणे हे देखील स्वतःला सतत सकारात्मकता देणारे काम आहे.

तुमचे मन शांत असेल, शरीर फिट असेल तरच तुम्ही इतर सगळ्या कामांकडे, कर्तव्यांकडे लक्ष देऊ शकता.. ह्यातच तुमचे यशही दडलेले असते..

त्यामुळे मंडळी स्वतःबद्दल तक्रारीचा सूर लावू नका.. तक्रार असेलच तर तिचे निवारण करण्याकडे लक्ष द्या.. जगात कोणीच परफेक्ट नाही.. मग आपण अपवाद कसे असू..??

मात्र परफेक्ट नसलो तरी सगळ्यांपेक्षा वेगळे नक्कीच असू.. आपले हे वेगळेपण आपणच जोपासले पाहिजे..

त्या ‘जब वुई मेट’ सिनेमातल्या करीनाचे पात्र म्हणजे अगदी उत्तम उदाहरण आहे.. सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करणे, स्वतःवरचा आत्मविश्वास आणि स्वतःवरचे प्रेम.. आणि त्याही वर म्हणजे तिचा तो डायलॉग… “मै अपनी फेव्हरेट हूं..!” आठवतोय का..??

तर सांगायचा मुद्दा असा की अगदी असेच आपण स्वतःच स्वतःचे लाड करूया.. दुसऱ्याने आपल्यासाठी काही केले किंवा काहीच नाही केले तरी कित्येक वेळा आपणच स्वतःसाठी पुरेसे असतो..

ही आपली आंतरिक शक्ती असते.. जी आपल्याला कधीच निराश करत नाही.. सेल्फ लव्ह, सेल्फ मोटिवेशन आपल्याला ह्या फास्ट पळणाऱ्या जगात तग धरून ठेवायला शिकवते..

म्हणूनच हया जन्मावर आणि ह्या जगण्यावर शतदा प्रेम करताना, ह्या देहावर.. म्हणजेच स्वतःवर सुद्धा प्रेम करायला शिका आणि ह्याच प्रेमाची शक्ती आजमावून पहा..!!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

6 thoughts on “स्वतःवर प्रेम करून स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी हे करा”

  1. वा वा खुप छान माहिती दिली आहे.
    मनःपूर्वक धन्यवाद 🙏.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय