जिंदगी ‘लॉकडाऊन’

freefincal

वाचक जितेंद्र बोराडे यांचा लॉकडाऊन रिपोर्ट

जिंदगी ‘लॉकडाऊन’

काय? कसं काय? मजेत चाललय ना?

एव्हाना लॉकडाऊन ची सवय झाली असेल…

आपण एक प्रकारे घरामध्येच लॉकच आहोत…

पण ‘हम-तुम आपण एक कमरेमे बंद’ असलो तरी आपल्या जिंदगी की चाबी आपल्याच हातात आहे बरं का…

कशी? मग वाचा पुढे…

खरं सांगू का… एरव्ही आपल्याला असं वाटतं की लाइफ खूपच बोअर चाललय…

रोज रोज तेच ते रुटीन स्वतःसाठी जगायला वेळच मिळत नाही…

आपल्या जीवनात बदल घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने कराव्यात अशा काही गोष्टी …

पुढील गोष्टी करा… तुमचा लॉकडाऊन आणि जगणं नक्कीच सुसह्य होईल…

१)आरोग्यवर्धक सवयी लावा: आरोग्याला प्राधान्य द्या. उदा. सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपी जा, थोडासा व्यायाम, मेडिटेशन. जमलं तर मोबाईल पासून प्रयत्न पूर्वक लांब रहा, असं बरंच काही करता येईल… विचार करा…खूप वेळ आहे सध्या…

२) कुटुंबाला वेळ द्या: खऱ्या प्रेमाची, मायेची, आपुलकीची ऊब येथूनच मिळते. कुटुंबासोबत हसरे क्षण घालवा. घरातील लहान मुलांसोबत लहान व्हा. यातून फॅमिली बोन्डींग स्ट्रॉंग होईल. कठीण काळात आपली ताकत हे आपले कुटुंबच असते.

३) आर्थिक साक्षर बना: आपली मिळकत, बँकेची कर्जे व भविष्यातील खर्च यांचा विचार करा. शक्‍य असल्यास थोडे का होईना भविष्यासाठी आजपासूनच बचत करण्याचा निर्णय घ्या. उदा. mutual funds, SIP, PPF, आरोग्य आणि जीवन विमा इ. अनेक राष्ट्रीयीकृत बँकाकडे अगदी कमी गुंतवणुकीत उपलब्ध अशा योजनांचा लाभ जरूर घ्या.

४) नवीन स्किल्स शिका: आपल्या आसपास नजर टाकली तर असे खूप काही आहे जे आपण शिकून घेऊ शकतो. मग ते शिवणकाम, रेसिपीज पासून ते कॉम्प्युटरचा प्रभावी वापर असे काहीही असू शकते… करून पहा नक्की जमेल…

५) वाचन: पुस्तके हि आपली बेस्ट लॉकडाऊन पार्टनर आहेत. आपल्या आवडीची पुस्तके वाचण्यासारखा दुसरा आनंदच असू शकत नाही. वाचनाची सवय आयुष्य घडवू शकते. अनेक पुस्तके आज पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत.

६) आपले छंद जोपासा: गायन, लेखन, वाचन, चित्रकला… छंद माणसाला तरुण ठेवतात… आणि असे बरेच काही करता येईल…

Image Credit: freefincal

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!