हेल्थी लाइफस्टाइलसाठी कोणत्या गोष्टींचं प्रमाण वाढवावं?

हेल्दी लाईफस्टाईलसाठी काय काय कमी करायचे ते ठाऊक असेल पण काय काय वाढवायचे ते जाणून घ्या ह्या लेखातून..

तुम्हाला जर फिट अँड फाईन व्हायचे असेल तर त्याचे सगळे मंत्र तुम्हाला पाठ असतील..!!

कित्येक वेबसाईट, आर्टिकल आणि व्हीडीओ तुम्ही पाहिले असतील.. ह्या प्रत्येक सदरातून आपल्याला खूप माहिती मिळते फिटनेसबद्दल..

पदार्थांपासून ते वागण्यापर्यंत काय काय कमी करायचे ते सगळेच आपल्यापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने पोहचवले जाते..

जंक फूड, तेलकट पदार्थ, अति स्निग्ध पदार्थ हे सगळेच आयुष्यातून कमी होतात..

साखर, मैदा, मीठ ह्याचे प्रमाण एकदम कमी करायचे.. सहसा पार्ट्या, हॉटेलिंग पासून लांब राहायचे..

जरी गेलात तरी तिकडे जाऊन सूप, सॅलड खाऊन निमित्त साजरे करायचे.. अहो, एवढेच काय तर, तुमच्या फोन मधून झोमॅटो, स्वीग्गी हे जेवण ऑर्डर करणाऱ्या ऍप्सची तर हकालपट्टीच करायची..

हे सगळे आयुष्यातून ‘कमी’ करायचे आपल्याला कळते.. पण काय काय वाढवायचे ते मात्र कोणीच सांगत नाही..

हो..! वजन कमी करायला, शरीराचा फिटनेस ठेवायला काही गोष्टी वाढवायच्याही असतात.. त्याचाच लेखाजोखा आज तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलो आहोत..

कोणत्या गोष्टींचे प्रमाण फिटनेस साठी वाढवावे लागेल ते पाहू..

१. झोपेचे प्रमाण वाढवले पाहिजे: (अर्थातच गरजेइतके)

हे तर आवडीचे काम आहे.. नाही का..?? झोप ही सगळ्यांना अत्यंत प्रिय असते.. किमान आठ तासांची झोप आपल्याला हवीच आहे हे वेगळे सांगायची गरजच नाही.. मात्र तेवढे तास देखील झोप मिळाली नाही तर शरीराची न भरून येणारी हानी होते..

खूप रोग आपल्याला येऊन चिकटतात.. ऍसिडिटी, पचन विकार, आळस, स्मरणशक्ती..

ह्या आणि इतरही बऱ्याच गोष्टी झोपेशी निगडित असतात.. जर तुम्हाला ह्या सगळ्यांपासून सुटकारा हवा असेल तर व्यवस्थित झोप फार फार महत्वाची..

फक्त झोपच नाही तर ‘शांत झोप’ म्हणजेच ‘sound sleep’ महत्वाची.. झोपताना मोबाईल वापरणे, खूप रात्रीपर्यंत जागणे, आठ तासांपेक्षा कमी झोपणे हे सगळे तुम्हाला शरीरस्वास्थ्यापासून लांब ठेवतात..

त्यामुळे कमी झोप हा आपला शत्रू आहे.. सात ते आठ तास झोपणे उत्तम.. आणि शांत झोपेसाठी चिंता दूर ठेवा, मोबाईल दूर ठेवा आणि आपले बेडरूम झोपेसाठी सज्ज ठेवा..

२. होल फूड वाढवा:

डायट मध्ये काय काय कमी करायचे ते केलेच पाहिजे पण असे करताना होल फूड म्हणजेच पूर्णान्न वाढवले पाहिजे.. फळे रस न काढता अशीच चावून चावून खाल्ली पाहिजेत. भाज्या शिजवून गरगट न करता त्यातले न्यूट्रिएन्ट्स राहतील इतजक्याच शिजवून खा..

हे सगळे करताना जंक फूड खायची इच्छा होते असेही खूप जण सांगतात.. त्याचे कारण असे आहे की, आपण आपल्या शरीराला कित्येक वर्षे फक्त असलेच अन्न दिलेले आहे.. शरीराला त्याचीच सवय झाली आहे.. किंबहुना शरीराने सकस आहार पहिलाच नाही.. आपली लाईफ स्टाईल ह्याला जबाबदार असते..

जर आपण सकस आहाराची एकदा सवय केली तर जंक फूड ची क्रेविंग होणारही नाही.. हे पूर्णान्न खाल्ले तर मेंदू आपल्याआपणच शरीराला चुकीचे अन्न खाण्यापासून अलिप्त राहण्यास मदत करेल.. तुम्ही काही महिने ही सवय लावून पहा.. तुमचा ह्या बाबतीतला अनुभव जरूर कळवा..

३. शुद्ध हवा हि शरीराची गरज आहे:

जसे झोप आणि सकस आहार वाढवला पाहिजे तसेच शुद्ध हवा खाणे वाढवले पाहिजे..

एरव्ही आपण दिवस रात्र घरात, ऑफिसात, जिम मध्ये, मॉल मध्ये ए. सी. ची हवा खातो.. बाहेर गेल्यावर प्रदूषित हवा खातो..

रात्री शतपावली करताना बागेत कार्बन डाय ऑक्साईड मिश्रित हवा खातो कारण झाडे रात्री ऑक्सिजन नव्हे तर कर्बन डायॉक्साईड वातावरणात सोडतात..

म्हणून शरीराला फ्रेश एयर आणि भरपूर ऑक्सिजन कसा मिळेल ह्याची खबरदारी घ्या.. सकाळी लवकर बाहेर अंगणात, बागेत फिरायला जाणे रोज शक्य असल्यास क्या कहने..

नसल्यास आठवड्यातून एकदोनदा तरी चुकवू नका.. आपल्यालाच काय तर घरातील वृद्ध, लहानगे आणि पाळीव प्राणी ह्यांनाही जरूर घेऊन जा थोडी मोकळी आणि शुद्ध हवा खायला..

४. शक्तिवर्धक, मसल बिल्डिंगचा व्यायाम वाढवा..

कार्डिओ व्यायाम प्रकार झटपट कॅलरी कमी करण्यासाठी खूपच छान आहे.. पण त्याचसोबत शरीराला शक्ती देणारे व्यायाम प्रकार, स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम प्रकार, योग आणि ध्यानसाधना सुरू केली पाहिजे..

डंबेल्स, पिलाटीस, जिम मधली मशिन्स, हे सगळे व्यायाम केलेच पाहिजेत..

५. पाणी भरपूर प्या:

प्रत्येक वीस किलो मागे एक लिटर पाणी प्याल तर तुम्हाला तुमचा फिटनेस वाढवायला खूप मदत होईल.. म्हणजे किमान ३ लिटर तरी रोज प्यायला हवे..

ज्यांचे वजन ८०-९० च्या पार आहे त्यांना वजन कमी करताना ५ लिटर तरी पाणी पिण्याची सल्ला डायटीशियन देतात..

जितके पाणी जास्त पिऊ तितके टॉक्सिक फ्लशिंग जास्ती होते.. शरीराला डीटॉक्स करणे हे पाण्याचे मुख्य काम..

आणि शरीरातील हानिकारक द्रव्यांचा निचरा झाला की आपल्याला हवे तसे शरीर मिळवायला करत असलेल्या इतर मेहनतीचा लवकर फायदा होतो.. पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे तुम्ही आमच्या इतर लेखातून वाचलेच असतील..

६. भरपूर हसा आणि आनंदी राहा:

‘हसा आणि लठ्ठ व्हा’ ही म्हण आपण नेहमी वापरतो.. एखादा बारीकसा माणूस हसण्याने खरच लठ्ठ होऊ शकेल कारण हसण्यामध्ये इतकी ताकद आहे की तुम्हाला आतून आनंदी ठेवायला यशस्वी ठरते.. आणि आनंदी माणूस शरीराने स्वस्थ राहतो..

हसण्याने चढलेले मूठभर मास काही वाईट नाही.. हसण्यामध्ये हिलींग पॉवर आहे..

कॉमेडी शो, सीरिअल, जोक्स, कार्टून पाहून आपल्याला निखळ आनंद मिळतो आणि आपण खळखळून हसतो..

सुदृढ शरीरासाठी हसायलाच पाहिजे. तेही अगदी लहान मुलांप्रमाणे.. मन आनंदी राहिले तर शरीर आनंदी आणि फिट राहणारच..!!

थोडक्यात काय तर फिटनेस म्हणजे हे कमी करणे ते कमी करणे आणि आवडत्या गोष्टी त्यागणे इतकेच नसते..

हे सगळे करताना चहूबाजूने शरीराला मजबूत ठेवणे, मनाला आनंदी ठेवणे हे ओघाने आलेच.. हे कटाक्षाने पळाले पाहीजे..

नाहीतर नुसतेच क्रॅश डायट आणि व्यायाम करून सडपातळ झालेली माणसे बघा काशी निस्तेज वाटतात, अकाली वृद्ध वाटतात.. हे होता कामा नये.. ह्याला नक्कीच सुदृढ शरीर म्हणता येणार नाही..

याशिवाय तुम्हीही सांगा तुम्ही काय करता शरीर सुदृढ ठेवण्यासाठी?

आपण आनंदी राहिलो पाहिजे आणि दिसलोही पाहिजे.. शरीर स्वास्थ्य आतून आणि बाहेरून मेंटेन करणे गरजेचे आहे..!! म्हणून म्हणतो..

आयुष्यात काही गोष्टी कमी करा तर काही वाढवा..
स्वास्थ्यपूर्ण शरीर आणि आनंदी मन घडवा..!!

विषयाशी संबंधित इतर लेख:

चांगल्या आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व आणि पाणी पिण्याचे प्रमाण, पद्धत
वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “हेल्थी लाइफस्टाइलसाठी कोणत्या गोष्टींचं प्रमाण वाढवावं?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय