कढीपत्त्याचे हे फायदे माहित आहेत का तुम्हाला?

कढीपत्त्याचे फायदे Benefits of curry leaves

कढी, वरण, आमटी यांना फोडणी देताना सर्वात पहिल्यांदा आपण खमंग तडका मारतो तो कढीपत्त्याचा…

जेवणात स्वाद आणि एक विशेष वास आणण्यासाठी म्हणून आपण कढीपत्त्याचा वापर करतो. सहसा हा कढीपत्ता भाजीवाल्याकडून कोथंबीरीबरोबर कॉम्प्लिमेंटरी म्हणून घेण्याची बरेच ठिकाणी सवय असते.

शिवाय बरेच जणांना तर कढीपत्ता जेवताना घासात आला तर तो काढून टाकण्याची सुद्धा सवय असते.

पण तसे जर तुम्ही करत असाल तर या नुसत्याच कॉम्प्लिमेंटरी वाटणाऱ्या कढीपत्त्याचे फायदे या लेखात समजून घ्या.

कढीपत्त्यामध्ये लोह, कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘इ’ असते. हे सर्व घटक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.

कढीपत्ता आरोग्यासाठी जसा गुणकारी असतो तसेच सौंदर्य, केसांचे आरोग्य जपण्यासाठी सुद्धा याचे कित्येक फायदे आहेत.

कढीपत्त्याचे आरोग्यासाठी फायदे

ऍनिमिया मध्ये गुणकारी: आयर्न डिफिशिअन्सीमुळे ऍनिमिया होतो. आणि कढीपत्त्यात आयर्न म्हणजेच लोहाचे प्रमाण चांगले असल्याने ऍनिमिया पासून दूर राहण्यासाठी कढीपत्त्याचा वापर रोजच्या जेवणात न चुकता करणे कधीही फायद्याचे.

पचनशक्ती, रोगप्रतिकाक शक्ती वाढवण्यासाठी कढीपत्ता गुणकारी आहे.

डायबिटीस च्या रुग्णांसाठी गुणकारी: एका अभ्यासानुसार डायबिटीस च्या रुग्णांसाठी कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने फायदा होऊ शकतो. रक्तातील साखर कमी करण्यासाठी कढीपत्त्याचा वापर जेवणात केला पाहिजे. कढीपत्त्यात असलेल्या फायबर इंश्युलीन मूळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.

ओबेसिटी म्हणजे अति प्रमाणात वजन वाढण्याच्या त्रासात सुद्धा कढीपत्ता उपयुक्त ठरतो. कढीपत्ता पचन क्रिया सुधारण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.

केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्त्याचे फायदे

चुकीचा आहार, वयोमान, ताणतणाव यांचे तुमच्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होत असतात. केस गळणे, लवकर केस पांढरे होणे या समस्या आजकाल सर्वसामान्य झाल्या आहेत.

केसगळती, केसांचा कोरडेपणा या समस्यांवर कढीपत्त्याचा वापर गुणकारी ठरतो. तसेच कढीपत्त्यामध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्यांवर सुद्धा कढीपत्ता गुणकारी ठरतो.

कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून याची पेस्ट चेहऱ्याला १० मिनिट लावून चेहरा कोमट पाण्याने धुतल्यास चेहऱ्याला तजेला येतो.

 

कढीपत्ता, मुलतानी माती आणि गुलाबजल याचा मास्क सुद्धा चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

या सर्व फायद्यांशिवाय कढीपत्ता जास्त प्रमाणात घेतला गेल्यास त्याचे काही दुष्परिणाम होण्याचा संभव सुद्धा नसतो.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.