सुदृढ राहण्याच्या मोटिवेशनल टिप्स खास तुमच्या साठी.. वाचा ह्या लेखात..

सुदृढ राहण्याच्या मोटिवेशनल टिप्स

जाड असणे बारीक असणे ह्यापेक्षा आपण फिट असणे खूप महत्वाचे आहे.. ‘सुदृढ राहणे’ पुढे येणाऱ्या काळाचे ब्रीदवाक्य होणार आहे.. सुदृढ राहण्याच्या मोटिवेशनल टिप्स खास तुमच्या साठी.. वाचा ह्या लेखात..

‘सुदृढ राहणे’ सध्याच्या युगाचे ब्रीदवाक्य होणार आहे.. नोकरी, पैसा, कुटुंब, घरदार ह्या सगळ्यांपेक्षा स्वतःचा फिटनेस महत्वाचा ठरत आहे..

तुम्हीच बघाना.. जगावर कोरोना व्हायरसचे साम्राज्य पसरले आहे.. आणि ह्यातून टिकाव धरून राहतो कोण..??

जो ‘Fit and Fine’ आहे तोच.. नाहीतर जर कोणाला कोरोना झाला तर ना नोकरी कामाला येते ना पैसा..

ना नातेवाईक कामाला येतात ना घर आणि ना गाडी.. फक्त आपली शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती महत्वाची ठरतीये..

ते म्हणतात ना ‘शीर सलामत तो पगडी पचास’..!! म्हणजे जर तुम्ही सुदृढ असाल तर तुम्ही मोठंमोठ्या रोगांचा आणि मानसिक आघातांचाही सामना करण्यास सक्षम ठरता.. नाहीतर आहेतच.. नशिबात हॉस्पिटलच्या वाऱ्या.. ही टेस्ट करा नाहीतर ती ट्रीटमेंट घ्या.. पण मित्रांनो सुदृढ राहण्याचे मार्ग आपण शोधले तर..??

काय म्हणता..?? फार अवघड आहेत..??

आलं लक्षात.. तुम्हाला ते अवघड व्यायाम, बोरिंग डायट फूड डोळ्यासमोर आले ना..??

आणि हो तुम्ही हे कित्येकदा केलेही असेल.. त्यातून दर वेळी काही साध्य होते असेही नाही.. तुमचा ही असा अनुभव असूच शकतो नाही का..??

पण आम्ही जर म्हणालो की काही छोट्या छोट्या स्टेप्स घ्या आणि स्वतःला ट्रान्सफॉर्म होताना पहा..

या लेखात दिलेल्या टिप्स फॉलो करत जर तुम्ही मार्ग क्रमण करायला सुरुवात केली तर व्यायाम, डाएट प्लॅन हे सगळं तुम्हाला सोप्प वाटायला लागेल.

होय अगदी लहान सहान गोष्टी आहेत.. फार पैसा लागेल का मग ह्याला..??

नाही हो.. पैसा नाहीच मात्र थोडा पेशन्स हवा…

आम्ही तुमच्यासाठी सर्वांगाने उपयुक्त असे काही उपाय शोधून आणलेत.. फिट राहायचे आणि स्मूथ आयुष्य जगायचे..!! आम्हाला खात्री आहे तुम्हाला हे नक्कीच रुचतील.. 🤗

१. स्वतःबद्दल सकारात्मक भावना ठेवा:

स्वतःला हीन समजणे किंवा लोकांनी तुम्हाला हीन वागणूक देणे ह्या दोन्ही गोष्टींपासून लांब राहा..

का म्हणून स्वतःला कमी लेखायचे किंवा लोकांना लेखू द्यायचे..?? काही गोष्टींची कमतरता असेल तर ती शिका, प्रयत्न करा, आत्मसात करा.. पण त्यासाठी स्वतःला दोष देत बसू नका.. आणि हो लोकांच्या तुम्हाला उद्देशून नकारात्मक टीका टिपण्या मनाला लावून घेऊ नका..

तुम्ही खूप जाड असाल किंवा अगदी बारीक असाल. लोक तर चिडवतच राहणार.. त्याची खंत मनात बाळगून स्वतः दुःखी होऊ नका..

तुम्ही जसे आहात तसे खास आहात.. तुमच्यात असंख्य गुण असतात.. प्रत्येकात असतात.. त्यांच्याकडे लक्ष द्या.. कोणाचे वैगुण काढण्यापेक्षा चांगले गुण पाहणे कधीची उत्तम..

तुम्ही कोणत्याही आकाराचे असलात तरी त्यामुळे तुमच्यातला हुनर लपणार नाहीत ह्याची काळजी घ्या.. आणि लक्षात ठेवा की फिट राहण्याने तुमचा आकार तुम्ही कधीही बदलू शकताच..

२. बारीक होण्यासाठी तुम्ही ठेवलेले ध्येय बरोबर आहे का ते पहा:

हे फार गरजेचे आहे.. जर तुम्हाला बार्बी डॉल सारखे व्हायचे असेल तर ते अशक्य नाही.. पण गरजेचेही नाही.. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही घ्यायला तयारही असाल तरी बार्बी डॉल सारखे बनून काय करणार आहात..?? तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रात उतरणार आहात का..?? तसे असल्यास Go ahead.. 👍

पण तुम्ही ९ ते ६ ची नोकरी करणारे, घर सांभाळणारे असाल तर पुन्हा विचार करा.. सुंदर दिसणे चांगले पण त्यासाठी स्वतःच्या शरीरावर अघोरी उपाय करणे कितपत योग्य आहे..?? लिपोसक्शन, प्लास्टिक सर्जरी करून स्वतःला सुंदरतेची नावाखाली कुरूप करणारे पाहिलेच असतील तुम्ही..??!

असे काहीही करण्यापेक्षा टार्गेट छोटे ठेवा.. ५ किलो वाढवायचे किंवा कमी करायचे.. ते झाल्यावर पुढचे ५ किलो.. असे टप्पे घ्या.. बार्बी सारखे रोल मॉडेल नको.. फँटसी टार्गेट नको… शक्य तितक्या रियल आयडिया ठेवा.. सत्य ध्येय ठेवा..

३. ज्या कारणांमुळे तुम्ही खूप जेवता, चरत राहता ती कारणं शोधा:

ओव्हरइटिंग हे वजन वाढण्याचे मुख्य कारण.. काहींना जंक फूडची पण सवय असते.. वेळी अवेळी खात राहणे ही सवय का लागते हे शोधून काढा..

वेळ जात नाही म्हणून खाणे, टेन्शन मध्ये खाणे, दुःखात खाणे, खूप आनंद झाला म्हणून खाणे, बोर झाले म्हणून खाणे, समोर दिसतंय म्हणून खाणे असे बरेच खादाडीचे प्रकार असतात.. तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता..?

ह्यालाच मूड स्विंग मुळे केले जाणारे ‘Hogging’ म्हणतात. ह्या कॅलरीज चा तुमच्या शरीराला जरासाही फायदा नसतो.. फिटनेस सोडाच ह्यामुळे तुम्ही नकळत ‘ओबीस’ होण्याच्या मार्गाला लागता..

ही उगीच चरत राहायची कारणे शोधून त्यांना आपल्या रुटीन मधून काढून टाकायचा प्रयत्न सुरू करा.. भूक लागलीच तर न्यूट्रिशस फूड चा पर्याय घ्या.. जसे की दही, ताक, भाजलेले चणे, कोशिंबिरी, नारळ पाणी, जवसाचे/अळशीचे पाणी घ्या..

ओव्हरइटिंग रोखण्यासाठी, खातानाच छोट्या भांड्यात खाणे हे जपानी लोकांनी त्यांच्या संस्कृतीचाच भाग बनवला आहे.

४. एकाच वेळी खूप बदल करू नका:

अचानक रोजच्या सगळ्या रुटीनला बदलून नवीन सुरू करू नका.. सुरुवातीला एखादीच गोष्ट बदला. जसे की सकाळी चहा ऐवजी फळे सुरू करा.. किंवा रोजच्या जेवणा आधी बाउलभर कोशिंबीर खा.. किंवा संध्याकाळच्या स्नॅकिंगला कुकीज, भजी, वडे ह्याच्या ऐवजी फ्रुटस किंवा एखादे उकडलेले अंडे खा..

व्यायाम करायचा झाल्यास सुरुवातीला २० मिनिटे चालणे ठेवा.. किंवा २० मिनिटे प्राणायाम.. २० चे ३० आणि मग ४० मिनिटे व्यायामाचे रुटीन ठेवा..

हा स्वतः मधील सोप्पा बदल खूप दिवसांसाठी असावा.. म्हणजे महिनाभर एकच बदल.. नंतर अजून एक असे करून हळू हळू संपूर्ण खानपानाच्या सवयी बदला..

व्यायामाची सवय लावा.. सगळं एकाच दिवशी सुरू कराल तर आठवड्यापेक्षा जास्ती तुमच्याकडून हे होणारच नाही आणि सगळेच सोडून द्याल.. म्हणून slow change is good..!!

५. स्वतःची मानसिक सपोर्ट सिस्टम तयार करा:

कोणतेही काम करण्यासाठी आपल्या मनाची उभारी असणे खूप गरजेचे आहे.. तुम्ही सेल्फ मोटीवेटेड असाल तर उत्तम.. पण वाढते वजन किंवा खंगता फिटनेस आपल्या मनाला देखील उदास करतो..

डिप्रेशन, डीमोटीवेशन मुळे आपण काहीच करण्यासाठी उत्सुक नसतो..

म्हणून आपला जोडीदार, मित्र किंवा कोणी नातेवाईक जो आपल्याला सतत बढावा देत राहील अश्या व्यक्तीच्या संपर्कात रहा.. असे कोणी नसल्यास एखाद्या मनोसोपचार तज्ज्ञाकडून मदत घ्या. स्वतःला मानसिक सपोर्ट देत राहा..

६. स्वतःला माफ करा:

चुका सगळ्यांकडून होतात.. कधी खूप खाल्ले म्हणून आता ही अवस्था आहे म्हणून स्वतःला दोष देत बसू नका.. कधी एखाद्या कार्यक्रमात आवडीचे पदार्थ जास्ती खाऊन घेतले म्हणून उदास होऊ नका.. स्वतःला कोसत बसू नका.. माफ करा स्वतःला..

आणि त्या कॅलरीज बर्न कशा होतील त्यावर लक्ष द्या.. गिल्ट फ्री पदार्थ खाण्यावर भर द्या.. काल खाल्ले भरपूर म्हणून आज स्वतःला भुकेले ठेवू नका..

त्यानेही फिटनेसवर वाईट परिणाम होतो.. आठवड्यातला एक दिवस आवडीचे पदार्थ खाण्यासाठी ठरवा.. बाकी ६ दिवस हेल्दी आहार ठेवा.. व्यायामाची काही मिनिटे वाढवा..

१०० कॅलरीज जास्ती खाल्ल्या असतील तर २०० कॅलरीज जाळण्यासाठी जास्तीचा व्यायाम करा.. बसल्या बसल्या, काम करता करता हाता पायाचे सोपे व्यायाम करा..

फिट राहण्यासाठी कोणती खास वेळ नाही.. जमेल तेव्हा व्यायाम करा आणि जिभेवर नियंत्रण ठेवा.. बस्स..!! आणि गिल्ट फ्री आयुष्य जगा..

७. ह्या सगळ्याला लागणारा वेळ गृहीत असू द्या:

तुम्ही आज ठरवल्यावर लगेच उद्या फिट होणार नाही.. ही हळुवार प्रोसेस आहे.. आणि खूप पेशन्स ची सुद्धा.. फिटनेस घालवायला एक क्षण पुरतो पण तो परत मिळवायला वर्षानुवर्षे जातात.. हे लक्षात असू द्या..

सुरुवात केली आहे तर ती कायम ठेवा. वजनकाटा जादूने फिरत नसतो. आपल्या मेहनतीचे फळ त्यावर दिसते.. क्रॅश डायट, घनघोर व्यायाम, स्लीमिंग पिल्स ह्याच्या मागे लागू नका.. शास्त्रशुद्ध पद्धतीने शरीराचा फिटनेस मिळवा.. तो खूप टिकेल..

जाड असणे बारीक असणे ह्यापेक्षा आपण फिट असणे खूप महत्वाचे आहे.. त्यासाठी तुम्ही जे काही करत असाल त्यासाठी स्वतःला शाबासकी नक्की द्या.. तुमचे टार्गेट अचिव्ह झाले तर ते साजरे करा.. छोटे ध्येय ठेवा आणि त्यांना आत्मसात करा.. स्वतःचे ध्येय पूर्ण करण्याचा आनंद निराळाच..!! हो ना..?

तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा.. तुमच्या कडे काही सोप्प्या टिप्स असतील तर इतर वाचकांसाठी जरूर शेअर करा..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.