अपमानाला बनवूया “हार के आगे जीत”….. मराठी प्रेरणादायी विचार

वर्ष – १९९८ नुकतचं टाटा मोटर्स तेव्हा पॅसेंजर कार बनवण्याच्या व्यवसायात उतरली होती, नव्या कारचं नाव खुप विचार करुन ठेवलं होतं, इंडीयाची कार, इंडीका.

पॅसेंजर मोटर्सच्या व्यवसायात उडी मारण्याची कल्पना त्यावेळचे टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची होती, पण दुर्भाग्य आडवे आले!, काही कारणांमुळे हा व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालु शकला नाही. उलट एक वर्षाच्या आत उद्योग तोट्यात गेला.

Ratan Tataटाटा ग्रुपच्या एक्स्पर्ट लोकांनी मते मांडली, “हा उद्योग विकला तर बरे होईल, नसता तोटा वाढतच जाईल.” रतन टाटांनी नाईलाजाने मान्यता दिली, आणि इच्छुक ग्राहकाचा शोध सुरु झाला, अमेरीकेतल्या फोर्ड उद्योगसमुहाने टाटांचा पॅसेंजर कारचा व्यवसाय खरेदी करण्यात रस दाखविला. वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या, आणि डिलवर शिक्कामोर्तब करण्यासाठी रतन टाटा आपल्या टिमसोबत डेट्रॉईड शहराकडे रवाना झाले.

तीन तास मिटींग चालली, फोर्ड कंपनीचा मालक, बिल फोर्ड, सुरुवातीपासुनच, जेत्याच्या थाटात वावरत होता, आणि शेवटी त्यांनी तुच्छपणे, रतन टाटांना म्हण्टलं, तुम्हाला जर पॅसेंजर्स कार बनवता येत नव्हत्या, तर ह्या व्यवसायात उतरलातच का? हा व्यवसाय खरेदी करुन आम्ही तुमच्यावर एक प्रकारे, उपकारच करत आहोत.

मिटींग संपवुन, रतन टाटा हॉटेलात परत आले, पण हे वाक्य काही केल्या त्यांच्या मनातुन जाईना!…हा अपमान त्यांना खुप झोंबला होता, इतका की, त्या रात्री त्यांना झोपच आली नाही, दुसऱ्या दिवशी, तडकाफडकी, डिल कॅन्सल करुन, तडक त्यांनी भारताकडे प्रयाण केले. झाल्या प्रकारचा, त्यांना प्रचंड संताप आला होता.

टाटा पॅंसेजर्स कारचा व्यवसाय विकण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला आणि त्यावर प्रचंड परीश्रम घेण्यास सुरुवात केली. थोड्याच कालावधीत कंपनी नफ्यात आणली. बघता बघता दहा वर्षे निघुन गेली, आणि इतिहासाचे चाक उलटे फिरले.

यावेळी २००८ मध्ये, वाहन उद्योगात, मातब्बर असलेल्या फोर्ड कंपनीच्या, “लॅंड रोव्हर-जॅग्वार” कार व्यवसायाचा धंदा रिसेशनमुळे तोट्यात आला. नाईलाजाने त्यांनी ती कंपनी विकायला काढली, रतन टाटांना ही गोष्ट कळाली, व त्यांनी कंपनी खरेदी करण्यास होकार दर्शवला.

यावेळी अमेरीकेतुन बिल फोर्ड आपल्या बिजनेस टिमसोबत टाटांच्या मुख्यालयात “बॉम्बे हाऊस” मध्ये आला. २.३ बिलीयन डॉलर्स म्हणजे फक्त नऊ हजार तीनशे करोड रुपयांमध्ये टाटा मोटर्सने, लॅंड रोव्हर-जॅग्वार कंपनी खरेदी केली.

ह्यावेळी वापस जाताना बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाला, ही कंपनी खरेदी करुन तुम्ही आमच्यावर खुप मोठे उपकार करत आहात, आणि रतन टाटांनी यावर फक्त स्मितहास्य केले. गोष्ट संपली,….

आपल्याही आयुष्यात असे अपमान सहन करण्याचे प्रसंग खुपदा येतात, एखाद्या व्यक्तीने कळत नकळत केलेला पाणउतारा एकदम जिव्हारी लागतो. काही केल्या ती गोष्ट विसरल्या जात नाही…..हातावर हात ठेवुन, चरफडत शांत बसुन आपण आतुन जळतो, नुसतचं धुमसत बसतो…..का परिस्थितीला आव्हान देत तिच्यावर मात करतो, ह्यावर जग आपली किंमत ठरवतं..

गांधीजींना गोर्‍यांनी रेल्वेतुन बाहेर ढकललं, आणि त्यांनी चिडुन इंग्रजांनाच देशाबाहेर ढकललं… त्यांनी अपमानाचा असा काही बदला घेतला, की देशच स्वतंत्र झाला..

abdul kalam१९७९ मध्ये, एपीजे अब्दुल कलाम, अंतराळ संशोधन केंद्राचे प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखाली लॉन्च केलेलं, करोडो रुपयांचं, DSLV सॅटेलाईट, तीनशे सेकंदात समुद्रार्पण झालं, भारताची खुप नाचक्की झाली, मिडीयाने पत्रकार परिषदेत प्रश्न विचारुन कलाम साहेबांना भंडावुन सोडलं, शेवटी सतीश धवन यांनी मोर्चा सांभाळला आणि उत्तरे दिली, कित्येक महिने अब्दुल कलाम डिस्टर्ब होते, पण त्यांनी अपमान निमुटपणे गिळला नाही, आतमध्ये पेटता ठेवला..कित्येक वर्ष कठोर परिश्रम केले, अग्नि मिसाईल बनवुन, जगामध्ये भारताचा वचक निर्माण केला.. भारताला अण्वस्त्रसज्ज बनवले, खाली गेलेली मान, कित्येक पटीने उंचावेल, असा आगळावेगळा बदला घेतला..

सोन्याच्या साखळी हिसकवताना काही गुंडानी, एका बावीस वर्षाच्या मुलीला चालत्या रेल्वेतुन ढकलुन दिलं, तेव्हा एक पाय निकामी झालेल्या, अरुणिमा सिन्हावर जग हळहळ करत होतं, पण जगाने आपली कीव करावी हे तिला सहन झालं नाही, ती एक फुटबॉल, व्हॉलीबॉल प्लेअर होती, तिचं करीअर संपलं होतं, पण काही करुन दाखवायचा निर्धार संपला नव्हता…

तिच्याजवळ पाय नव्हते पण तिचा आत्मसन्मान जिवंत होता,

arunima sinha
अरुणिमा सिन्हा

मग धडधाकट माणसाला जे आतापर्यंत जमलं नव्हतं, ती असाध्य गोष्ट तिने करुन दाखवली…,
कृत्रिम पाय लावुन, तिने माऊंट एव्हरेस्ट आणि त्यानंतर प्रत्येक खंडातली सर्वात उंच, अशी सहा शिखरे, एकामागुन एक अशी जिद्दीने सर केली…गिनीज बुक मध्ये तिचं नाव नोंदलं गेलं, पद्मश्री बनुन तिने, झालेल्या अपमानाचा असा बदला घेतला..

एबीसीएल कंपनी बुडाल्यावर अमिताभ कर्जबाजारी झाला होता, राहत्या घरावर जप्तीची तलवार लटकत होती, बॉलीवुडचा शहेनशहा काम मागण्यासाठी लोकांकडे खेटे मारत होता, लोक म्हणाले, अमिताभ संपला, पण तो पुरुन उरला. त्या भयानक संकटानंतर त्याची कला आधिक उजळुन निघाली, त्या दिवाळखोरीनंतर त्याने तब्बल सत्तर चित्रपट केले.

महान लोक केल्या गेलेल्या अपमानाचं, आणि आलेल्या रागाचं रुपांतर, परीश्रमांमध्ये, कष्टांमध्ये करतात. चुका सुधारतात आणि इतिहास घडवतात. जेव्हा केव्हा कळत-नकळत आपल्याला डिवचतं, तेव्हा आपल्यालाही ह्या गोष्टी आठवायला हव्या.

अपमान होणं वाईट नसतंच, मुळी…

ती तर असते, ‘आता माझी सटकली’ मोमेंट… ती जपुन ठेवायची असते, सतत आठवायची असते,
आणि मग स्वतःमधला आळस दुर करुन, झपाटुन काम करण्यासाठी, कामावर तुटुन पडण्याची, एक आगळीवेगळी उर्जा आपोआपच अंगात संचारते….

तेव्हा आयुष्यात झालेले छोटेमोठे अपमान अजिबात विसरु नका!….ही आग तेवत ठेवा!…

तुमच्या गोष्टीतला ‘बिल फोर्ड’ ही लाजीरवाणा होवुन एके दिवशी, असाच आपल्या गुडघ्यांवर येईल.

अमेझॉनवर असलेली अशीच काही प्रेरणादायी पुस्तके येथे खरेदी करता येतील

वाचण्यासारखे आणखी काही…..

प्रेमप्रकरणं, प्रेमभंग आणि नैराश्य याचा सामना कसा करावा?
किशोरवयीन मुलांचा फेसबुकवरील वावर …..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय