जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा आवडत्या कामात करियर करण्याची अष्टसूत्री!

जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा जे आवडते तेच काम केले तर..?? आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा लेख वाचायलाच हवा..

शिवाय आता हे ‘आफ्टर कोरोना’ जग जगताना स्वतःला ओळखून, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला जे वेगवेगळे पर्याय सुचवतो त्यातलाच हाहि एक..

करिअर म्हणजे काय हो..??

तो पाच आकडी पगार मिळवण्याकरता आयुष्यभर केलेली मेहनत..

हवे तसे घर हवी तशी गाडी, भविष्यातील प्लॅन्स सगळे खरे करण्यासाठी कायम केलेली धडपड.. आणि सगळे सध्या केले की आपण म्हणतो एखाद्याचे करिअर उत्तम झाले..

पण हल्ली ह्या करिअरच्या नादात आपण आपली आवड बाजूला सारतो आणि ज्यात जास्ती पैसे मिळेल असेच नोकरी धंदे शोधतो..

कुथून कुथून त्यात मेहनत घेतो.. हवं ते सगळं ऐहिक सुख मिळवतो.. मात्र मनःशांती तेवढी गमावून बसतो.. म्हातारपण आल्यावर वाटतं, ‘अरेरे आपण तर जगणंच विसरलो..’

कमी पैसे मिळाले असते कदाचित पण आवडीच्या क्षेत्रात करिअर केले असते तर..?? हे राहून वाटून जाते..

असे वाटायच्या आधीच आपण पावले उचलूया.. अजूनही वेळ गेली नाहीये.. मनात नसताना इंजिनिअरिंग केले आणि पडलोय ह्या कोडिंग मध्ये असे वाटत असल्यास नक्कीच तुमचे करिअर चुकले आहे.. ह्याची खूणगाठ मनाशी बांधा..

आपल्याला आता तरी आवडत्या गोष्टीत मन रमवायचे आहे हे ठरवा. छोट्या मोठ्या अडचणी तर सहज पार होतील.. पण जे पदरी पडलंय आणि पवित्र झालंय.. असे किती वर्षे चालवायचे..??

त्यापेक्षा जे आवडतंय तेच करायला घेऊया.. मग जे आवडतंय त्यापासून चरितार्थ चालेले का? आणि चालेल तर मग ते कसे जमवून आणता येईल, हाही प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल!!

याची सुरुवात कशी करायची ते आम्ही बघा..

१. तुम्हाला काय आवडते त्याचा अभ्यास करा:

झटक्यात नोकरी सोडून घरी बसून हव्या त्या क्षेत्रात कामाला सुरुवात करणे अवघड असते.. मुळात हवे ते क्षेत्र कोणते हे देखील आपण एव्हाना विसरून गेलेलो असतो..

मग असे करूयात का..?? की नोकरी चालू ठेवा.. एकीकडे तुम्हाला काय आवडतंय ह्याचा शोध सुरू करा..

असे कोणते क्षेत्र आहे ज्यात तुम्हाला उपजतच खूप काही समजते.. कदाचित तुम्हाला स्वयंपाक उत्तम जमत असेल..

विकेंड ला तुम्ही तुमच्या कुटुंबाला ट्रीट देता पण तुम्ही एक चांगले शेफ होऊ शकता हा विचार मनात नसेल आला.. किंवा एखादा फोटोग्राफर किंवा आर्टिस्ट असे काही गुण तुमच्यात आहेत का..??

लेखक असाल तर ब्लॉग सुरू करा, पुस्तके लिहा.. आर्टिस्ट असाल तर त्याचे प्रशिक्षण वर्ग चालू करा.. तुमच्याकडे सेलिंग आणि मार्केटिंग स्किल असेल तर कोणाच्या बिझनेस मध्ये पार्टनरशिप घ्या..

तुम्हाला ह्यापैकी किंवा कोणते दुसरे काम केल्यावर खूप आनंद मिळतोय आणि त्यातच तुम्हाला करिअर करण्याची, चार पैसे कमावण्याची संधी मिळतेय का त्याचा अभ्यास करा..

ही पहिली आणि मुख्य पायरी आहे.. ही पार केल्याशिवाय पुढे पाऊल टाकणे अशक्य..

२. त्या आवडत्या कामतल्या संधी शोधा.. त्यावर शक्य तितके काम चालू करा:

म्हणजेच लहान मुलांची पावले जितकी पडतात तितके काम सध्या सुरू करा.. तुम्हाला संगीत शिकवता येत असेल किंवा खाद्यपदार्थाची एखादी ऑर्डर मिळत असेल तर घेऊन टाका.. सुरुवातीला कमी पैशात किंवा फुकटही करावे लागेल..

९ ते ६ चा जॉब आहे ना सध्या हातात..?? मग जोपासा तुमची आवड.. जर तुम्ही सुरू केलेले काम तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोचले आणि त्यांना ते आवडले तर.. करिअरच्या संधी तुमच्याकडे आपल्या-आपण चालून येतील.. करण जे काम करून तुम्हाला आनंद होतोय.. ते करून दुसऱ्यांनाही आवडले, आनंद वाटला तर का नाही होणार तुमचे नाव..??

३. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुमच्या सगळ्या स्किल्स पणाला लावा:

स्वयंपाक येतो.. मस्त काम झाले.. त्याच बरोबर जर तुम्हाला नवनवीन रेसिपी येत असतील तर तुमच्या नावे यु ट्यूब चॅनेल काढा..

किंवा

चित्रकला येत असेल आणि त्यातून नक्षीकाम तर ड्रेस डिसाईन करता येतात का पहा.. एखादा टेलर पकडा, सोशल मीडियाला कामाला लावा आणि करा तुमची जाहिरात..

लक्षात घ्या करायचं ठरवलं, आपली कल्पनाशक्ती कामाला लावली तर कुठलीही गोष्ट तुमच्याकडून अशक्य नाही.

एकात एक स्किल्स वापरून पहा.. जमाना फास्ट ग्रोथ चा आहे.. आपण कशाला मागे राहायचं..??

४. आपले मार्केट वाढवा:

कुंटुब, नातेवाईक, मित्रमंडळींना हाताशी धरून आपले मार्केटिंगचे वर्तुळ मोठे करा.. कनेक्शन्स वाढवा.. माऊथ टू माऊथ पब्लिसिटी वाढवा..

टार्गेटेड क्लाइन्ट्स कसे आपल्या वर्तुळात आणता येतील त्याचा अभ्यास करा.. सोशल मीडिया तर आपला खरा दोस्त आहे.. त्यावर ब्लॉग लिहिणे, इन्स्टाग्राम, ऑनलाइन सेलिंग किंवा ब्रँडिंग करता येते.. त्याचा पुरेपूर फायदा उठाना ही पडेगा…!!

एकदा का तुमचा गिऱ्हाइक वर्ग तयार झाला की स्वतःचे नवनवीन प्रयोग करायला तुम्ही मोकळे.. तुमच्या ह्या सर्कल ला उत्तम सर्व्हिस देऊन तुमच्याच ब्रॅण्डशी बांधून टाका..

एकदा सवय झाली एखाद्या वस्तूची, सर्विसची, पदार्थाची तर एक कम्फर्ट झोन तयार होतो आणि मग गिऱ्हाईक दुसरीकडे जात नसतो..

५. आपला स्पर्धक ओळखा:

आपल्या क्षेत्रात आणखी कित्येक जण काम करत असतात.. त्यांचाही चाहता गिऱ्हाईक वर्ग असतो.. तो समोरचा व्यक्ती आपला स्पर्धकच असतो..

भले दोघेही एकाच क्षेत्रात असाल पण त्या स्पर्धकांपेक्षा तुमच्या कडे काय वेगळे आहे ते द्यायचा प्रयत्न करा.. कोणती नवीन टेक्नॉलॉजी किंवा एखादे सिक्रेट इन्ग्रेडीएन्ट तुम्हाला सगळ्यांपासून वेगळे करेल..

तुम्हाला तुमच्या स्पर्धकांच्या आवाका समजणे गरजेचे आहे.. तुम्ही केलेल्या अनेक क्लृप्त्यांपैकी काय मार्केट मध्ये चालते किंवा कशाला फारसा भाव मिळत नाही ह्याचा सतत अभ्यास ठेवा..

मार्केटचे, तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स मध्ये नवीन काय चलन चालू आहे त्याच्याशी अपडेटेड राहा.. तुमच्यातला हे वेगळेपण तुम्हाला कधीच थांबू देणार नाही..

६. तुमच्या आवडत्या कामात तडजोडी नकोत:

तडजोड करावी लागली तर तुमचे काम बिघडलेच म्हणून समजा.. तुमची रेसिपी (म्हणजेच कुठलीही कल्पना) ही तुमचीच खासियत असायला हवी.. त्यात कोणाचे काही उपाय, सूचना वापरून तडजोड नको..

किंवा वेळी अवेळी येणाऱ्या कामाच्या ऑर्डर घेऊन तुमच्या कामात त्रुटी राहणार असतील तर जरा स्लो डाऊन.. आपण आपले करिअर आनंद मिळवण्यासाठी निवडले आहे हे विसरू नका..

७. चुका सुधारण्याकडे कल ठेवा:

तुमच्या कामातील जेन्यूईन चुका कोणी हितचिंतकाने सांगितल्या तर त्यावर काम करा.. चूक सुधारणे किंवा कोणाचे उत्तम मार्गदर्शन घेणे ह्यात काहीच गैर नाही..

त्या सूचना, मार्गदर्शन आपल्या कामाच्या भल्यासाठी आहे ते जरूर स्वीकारावे.. कोणाचे अनुभवाचे काही बोल आपल्याला खूप उंचीवर नेण्यास समर्थ असतात..

कधी कधी खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढण्यासही ते उपयुक्त ठरतात.. त्यामुळे त्यांना दुर्लक्षू नका..

८. ध्येय मोठे असले तरी चाल संयमित ठेवा:

आपण आज काम सुरू केले म्हणजे उद्यापासून नफा मिळणार अशा परिकथांवर विसंबून राहू नका..

आपल्याच क्षेत्रातल्या एखाद्या दिग्गजांचे चरित्र आभ्यासा.. ती व्यक्ती कुठून कुठे पोहोचली.. मार्गात कोणती विघ्न आली, त्यावर मात कशी केली..?? हा सगळा अभ्यास एक केस स्टडी म्हणून जरूर करा..

तुमच्या करिअर मध्ये तशीच आव्हानं येतील असे नाही.. किंवा आव्हानं, अडचणी येणारच नाहीत असेही नाही.. पण दिग्गज्यांच्या पाऊलखुणा अभ्यासून आपला रस्ता निवडला तर मार्गक्रमण सोपे जाऊ शकते..

त्यामुळे ध्येय मोठे ठेवा.. परिपूर्ण अभ्यास करा.. आणि एकेक पायरी चढत वर जा… जेव्हा संपूर्ण यश दिसू लागेल तेव्हाच हातातली नावडत्या नोकरीला तिलांजली द्या.. 🤗

मंडळी आपली आवड जोपासणे आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करणे ह्यासारखे समाधानकारक काम कोणतेही नाही..

हा प्रवास खडतर असू शकतो, ह्यात खाचखळगे असू शकतात, ह्यात गुळगुळीत रस्ता ही असू शकतो.. पण हे आपण आपल्या आवडीसाठी करतोय म्हटल्यावर आपण त्या परीक्षांचा बाऊ करत बसत नाही..

आपल्या स्वप्नांसाठी झुंजणे खूप अनमोल आहे.. आपले उत्तम कार्य करत राहायचे आणि त्याची रसाळ फळे चाखायला मिळाली तर क्या केहने..!! तुमच्या मेहनतीचे, कष्टाचे फळ गोडच लागणार नाही का..?!!

मित्रांनो आणि मैत्रिणींनो कमेंट्स मधून तुमची हजेरी लावायला विसरू नका. नाहीतर आम्हाला कसं कळेल तुम्ही वाचताय आणि म्हणूनच आम्ही जास्तीत जास्त लिहावं!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

11 thoughts on “जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा आवडत्या कामात करियर करण्याची अष्टसूत्री!”

  1. तुमचे लेख खूप छान आहेत आणि वेगवेगळे विषय योग्य त्या पद्धतीने मुद्देसूद मांडणी तसेच मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे केले आहे धन्यवाद 🙏

    Reply
    • आपले प्रत्येक लेख प्रेरणादायी असतात. जीवन सुखकारक, आनंदी कसे जगता येईल यासाठीचा दृष्टीकोन त्यातून सतत मिळत असतो. रोज सकाळी बुद्धीला खाद्य पुरविण्याचे काम आपल्या लेखातून होते.
      मनाचे talks टीम चे मनापासून आभार व आपल्या या अनोख्या उपक्रमाला खुप साऱ्या शुभेच्छा.

      Reply
  2. खरंच छान विचार मांडले आहेत मनःपूर्वक आभार

    Reply
  3. खरंच छान विचार मांडले आहेत मनःपूर्वक आभार.

    Reply
  4. खुपचं छान वाटलं वाचून…… अगदी मनात ल बोल ले….. नक्कीचं आवडीच्या क्षेत्रात काम सुरू करू…..नेहमी नेहमी लेख पाठून आम्हाला सतत प्रेरणा दे त रहा…

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय