सुप्त मनाला प्रभावित करून बघितली जाणारी Lucid Dreams म्हणजे काय?

तुम्हाला स्वप्न पडतात का? तुमची स्वप्नं जर तुमच्या कंट्रोल मधे असतील, आणि हवी ती स्वप्न तुम्हाला बघता आली, तर तुम्हाला आवडेल का ??????

हो सुप्त मनाला प्रभावित करून जी स्वप्नं बघितली जातात त्यांना ल्युसिड ड्रीम्स म्हणतात. या Lucid Dreams बद्दल काही माहिती या लेखात वाचा.

‘स्वप्न’ हा एक गूढ विषय आहे असं आपल्याला वाटतं, कारण आपल्याला रोज रात्री झोपल्यावर जी काही स्वप्नं पडतात त्यातल्या बऱ्याच स्वप्नांचा आपल्याशी, आपल्या जीवनाशी, रोजच्या घडामोडिंशी प्रत्यक्ष संबंध नसतो.

कधी तशा घटना सुद्धा आपल्या आयुष्यात घडलेल्या नसतात. अशी स्वप्नं आपण झोपल्यावर आपल्याला पडतात. काही स्वप्नं निरर्थक असतात, तर काही भीती वाटेल अशी असतात, तर काही खूप आनंद देणारीही असतात.

मग अशा निरर्थक स्वप्नांचा काहीही संबंध नसताना झोपेत आपल्याला ती पहावी लागतात. त्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो.

त्यामुळे अशा स्वप्नांनी आपण कधी कधी दचकून जागे होतो, घाम फुटतो, हृदयाची धडधड वाढते. आपली झोपमोड होते.

जागे झाल्यावर कळतं की हे स्वप्न होतं. नंतर आपल्याला बराचवेळ झोप येत नाही. घाबरून नकारात्मक विचार एकामागून एक यायला लागतात. आपण टेन्शनमधे असतो.

काही स्वप्न खूप आनंद देणारी असतात. तो आनंद आपण घेतो. आणि नंतर कळतं अरे हे स्वप्न होतं, म्हणजे खोटं होतं सगळं.

काही स्वप्नांना काहीच अर्थ नसतो, ते नक्की काय होतं हे सुद्धा आपल्याला कळत नसतं, आणि नंतर सुद्धा काहीच आठवत नाही.

अशी स्वप्न आपल्यालाच का पडतात असं कधी कधी आपल्याला वाटतं. मुळात ही स्वप्नं का पडतात हेच आपल्याला कळत नाही.

रोज रात्री आपण सात ते आठ तास झोपतो. म्हणजे इतकी झोप आपल्या शरीराला आवश्यक असते.

तेवढी झोप आपण घेतली पाहिजे. जे लोक गप्पा, पत्ते, टी व्ही बघणे ह्यात जास्त वेळ खर्च करून कमी झोप घेतात त्यांच्या तब्येतीला ते घातक ठरतं, पण हे त्यांना त्यावेळी कळत नाही.

नंतर त्रास होतो. पण सात ते आठ तास रोज रात्री सलग झोप घेतली पाहिजे. माणसाचं ऍवरेज आयुष्य जर ८० वर्षाचं धरलं, तर रोजची सात ते आठ तास झोप घेतली तर आयुष्यातली एक त्रीत्यांश वर्ष आपण झोप घेतो म्हणजे २६ वर्ष आपण झोपतो.

२६ वर्ष आपण झोपतो. आणि त्यात काही काळ असली ही अर्थ नसलेली, भयानक, विचित्र स्वप्न बघतो आणि जास्तच उदास होतो, दुःखी होतो, मानसिक दृष्टिने कमकुवत होतो.

वास्तविक ह्याचा आपल्या जीवनाशी काहीच संबंध नसतो. मग ही असली स्वप्न आपल्याला का पडतात????? त्याची सुद्धा काही करणं असतील ना? ती समजावून घेऊ.

आपण रोज रात्री झोपतो त्यावेळी दिवसभराच्या कामाच्या धावपळीने आपलं शरीर थकून जातं, शरीराला विश्रांती दिली की आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी फ्रेश होतो आणि नव्या जोमाने कामाला लागतो.

आपण ज्यावेळी रात्री झोपतो त्यावेळी आपलं दिवसभर जागृत असलेलं मन सुद्धा थकून शांत झोपी जातं. पण आपलं जे सुप्त मन असतं ना ते कधीच झोपत नाही, सतत २४ तास आणि ३६५ दिवस ते सतत काम करत असतं, कधीच थकत नाही, आपण झोपलो तरी ते काम करत असतं.

दिवसभर आपण जागृत अवस्थेत जे काही काम करतो, लोकांना भेटतो, लोकांशी बोलतो, फिरतो, खातो, पितो, हे सगळं आपल्या जागृत मनाच्या सहकार्याने करत असतो.

पण आपलं सुप्त मन सुद्धा आपले दिवसभरात घडलेल्या सगळ्या घडामोडी न्याहाळत असतं, आणि ते ह्या सगळ्या घडामोडी, प्रसंग कॉम्प्युटर प्रमाणे साठवून ठेवत असतं.

कधी कधी ह्यातल्या आवश्यक गोष्टींची माहिती हे सुप्त मन तुम्हाला वेळेला पुरवून तुम्हाला मदत करतं. तर कधी कधी काहीतरी विचित्र घटना तुमच्या समोर उभ्या करतं.

कारण सुप्त मनाने साठवलेल्या गोष्टीत निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, अनावश्यक, आवश्यक अशा सगळ्याच गोष्टी असतात.

त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं चित्र आपल्या समोर उभं राहतं, आणि त्यालाच आपण स्वप्न म्हणतो. ह्या स्वप्नांना आपल्याला कंट्रोल करता येत नाही.

रात्री जेंव्हा आपण झोपतो त्यावेळी सुरवातीला आपल्याला झोप पूर्ण लागलेली नसते, आपण अर्धवट जागेच असतो.

कोणी जर कसला आवाज केला तरी आपण डोळे उघडून इकडे तिकडे बघतो. त्यानंतर आपल्याला झोप लागते, ती झोप गाढ झोप असते पण काही वेळाने आपण जागे होतो, कूस बदलतो, किंवा डोळे उघडून परत बंद करून झोपी जातो.

त्यानंतरची जी झोप लागते ती गाढ झोप असते. ती सुद्धा काही वेळा नंतर आपली हालचाल होऊन आपण जागे होतो.

आणि त्यानंतर जी पुन्हा झोप लागते त्या झोपेत आपल्याला स्वप्न पडतात. ही तीन प्रकारची झोप आणि एकदा स्वप्न अवस्था…

अशी ही साधारण ९० मिनिटांची एक सायकल असते. म्हणजे एकदा आपण रात्री झोपलो की आपल्याला साधारणपणे चार ते पाच वेळा ही ९०/९०मिनिटांची सायकल अनुभवायला मिळते.

त्यात एकूण चार वेळा तरी आपल्याला स्वप्न पडतात. ती वेगळी वेगळी असतात. कशाचा कशाशी संबंध नसतो. आणि ती स्वप्न काय होती हे आपल्याला सकाळी उठल्यावर काही वेळाने आठवत सुद्धा नाहीत.

मग एका रात्रीत चार चार वेळा आपल्याला ही स्वप्नं पडतात त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. आणि आपल्या ८० वर्षांच्या आयुष्यातली २६ वर्षे झोपेतच निघून जातात.

जर ही स्वप्नं आपल्याला हवी ती, हवी तशी पडली तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल ना? आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे त्या वेळी अनुभवता येतील, आपली स्मरण शक्ती अगदी जबरदस्त होईल. आणि आपल्याला आपला स्वतःचा उत्कर्ष निश्चित साधता येईल ना????

त्याचं एक टेक्निक आहे, आपल्या सुप्त मनामध्ये साठलेल्या निगेटिव्ह गोष्टींचा साठा कमी कमी करत जायचं. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी सतत, बोलायच्या, बघायच्या, विचार करायचे, आणि निगेटीव्ह गोष्टींच्या कडे दुर्लक्ष करत जायचं.

निगेटिव्ह गोष्टीतून पॉझिटिव्ह काय घेता येईल, पाहता येईल, ऐकता येईल ते ऐकायचं. म्हणजे तुमच्या सब काँशिअस माईंड मधल्या नकरात्मक गोष्टी हळू हळू कमी होत जातील ह्याला थोडा वेळ लागेलच पण सतत प्रॅक्टिस केली की ही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता.

नंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय मिळवायचंय ह्या गोष्टी तुम्ही पक्क्या ठरवून रोज रात्री झोपताना त्या तुम्हाला एक एक मिळत चालली आहे हे तुमच्या सुप्त मनाला रोज सांगून झोपी जायचं, रोज रोज रोज रोज सांगायचं.

जसं मेडिटेशनचा अनुभव तुम्हाला मिळतो तसाच अनुभव ह्या गोष्टीचा मिळेल, आणि सतत हॅमर केल्यामुळे तुम्हाला स्वप्न सुद्धा तशीच पडायला लागतील. तुम्हाला तुमच्या उत्कर्षा साठी जशी हवीत तशी.

हळू हळू तुम्ही स्वप्न पहात असताना सुद्धा तुमच्या जागृत मनाला कळायला लागेल की हे स्वप्न आहे. जागृत मन सुद्धा जागेपणी तोच अनुभव घेईल.

आणि तुम्ही तुमची सगळी नकारात्मकता घालवून सकारात्मक मनाने, उत्साहाने, तुमची सगळी ध्येयं एकामागून एक पूर्ण करू शकाल.

तुम्हाला पडणारी स्वप्न सुद्धा तुम्हाला सकारात्मक वाट दाखवतील आणि तुम्ही तुमची वाटचाल जोमानं करू शकाल.

ह्याला Lucid Dreams/ ल्युसिड ड्रीम्स (सुबोध स्वप्न) म्हटलं जातं. जे तुम्ही काही काळ सतत प्रॅक्टिस करून तुमच्या सुप्त मनाला प्रभावित करून तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर कंट्रोल मिळवता येतो.

ज्यांना मेडिटेशन करता येतं त्यांना हे थोडं लवकर जमेल. प्रयत्न केला तर परमेश्वर सुद्धा तुमच्या डोक्यावर हात ठेवेल. मग बघा सुरू करून, फायदा झाला तर तुमचाच. आम्हाला फक्त तुमच्याकडून अभिप्राय पाहिजे असतात.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “सुप्त मनाला प्रभावित करून बघितली जाणारी Lucid Dreams म्हणजे काय?”

  1. सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. तुमच्या प्रत्येक लेखाचा विषय खूप माहितीपूर्ण आणि सकारात्मकता देणारा असतो पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

    Reply
  2. नेहमी प्रमाणे अतिशय उत्तम पण, लहानापासून मोठ्या पर्यंत अत्यंत महत्त्वाची, आवश्यक व उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

    Reply
  3. स्वप्न खूप काही संकेत देत असतात, पण त्यामागील विज्ञान समजणे आवश्यक आहे. तुम्ही सांगितलेली पद्धत उत्तम आहे.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय