इमोशनल असल्याचा त्रास होतो का तुम्हाला? त्याची कारणं पण समजून घ्या!!

‘इमोशन्स बॅलन्स’ म्हणजे आपल्याला अगदीच साधू-संतांसारखं स्थितप्रज्ञ असण्याची सुद्धा गरज नाही.

फक्त इतकेच कि संतुलित मनस्थितीत तुम्ही निर्णय चांगले घेऊ शकता. इमोशनल असणं तोपर्यंत काहीच चूकीचं नाही जोपर्यंत भावनिक होऊन, पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येईल अशा गोष्टी तुमच्याकडून नकळतपणे घडणार नाहीत..

भावना संतुलित ठेवण्यासाठी गरजेचं आहे ते ‘अति भावनाप्रधान’ असण्यामागची कारणं समजुन घेणं. त्याबद्दलचा आजचा हा लेख..

जेव्हा काही चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा माणूस आनंदी होतो, त्याला हवं तसं घडलं नाही तर तो चिडतो, त्रागा करतो, दुःख झालं तर रडतो…

भावनांच्या हिंदोळ्यावर झुलतच माणसाचं आयुष्य पुढे-पुढे जात असतं….

कधी कधी चिडणारा, त्रागा करणारा, दुःखात बुडून जाणारा माणूस एखादवेळी इतका उत्साही होऊन जातो, जणू आभाळ त्याच्या मुठीत आलंय!!

मित्रांनो आणि मैत्रिणींनो या वेगवेगळ्या भावनाच तर तुम्हा आम्हाला माणूस बनवतात…. सगळ्यांनाच असतात अशा या भावना..

पण मग फरक कुठे पडतो माहित आहे का?….

प्रत्येकाची संवेदनशीलतेची पातळी आणि त्या भावना व्यक्त करण्याची पद्धत हे मात्र सारखं नसतं…

आणि याचमुळे आपण म्हणतो, तो किंवा ती खूपच इमोशनल आहे, भावुक आहे!!

मग हा फरक का पडतो… कधी विचार केलाय??

तुम्ही जर इमोशनल असाल तर तुम्ही कधी ऍनलाईझ केलंय का? की हे असं का होतंय?

या अति संवेदनशील असण्याने तुमच्याकडून कडून त्या विशिष्ठ वेळी काही चुकीचे निर्णय घेतले गेले असतील तर नक्कीच पुढे जाऊन त्याचा पश्चात्ताप केला गेला असेल…

किंवा तुम्ही अगदी बॅलन्स असाल पण तुमचा एखादा जिवलग मित्र किंवा मैत्रीण फक्त एका अति इमोशनल असल्याच्या कारणाने तुम्हाला त्याचा त्रासहि होत असेल..

Being sensitive is the worst weakness in today’s world.

हाही अनुभव तुम्ही घेतला असेल.

मग चला तर… बोलू आज या विषयावर…

या लेखात समजून घेऊ जास्त इमोशनल असण्यामागची वेगवेगळी कारणं काय असू शकतात…

१) इमोशनल लोक हे सहसा स्वतःच्या कोशात राहणारे असतात.

सहसा इतरांमध्ये न मिसळणं हे एखाद्याचं जास्त भावनिक असल्या मागचं कारण असू शकतं.

नक्कीच एकांतात रमणं किंवा रमता येणं हे फिलिंग भन्नाट असतं एकांतात रमणारी माणसं बरेचदा क्रिएटिव्ह पण असतात…

पण जर हे एकटं राहणं लादलं गेलं असेल तर त्यातून नैराश्य आणि मग भावनांचं असंतुलन हे ओघानेच येतं.

याउलट जेव्हा तुम्ही जास्त लोकांमध्ये मिसळता तेव्हा तुमचा उत्साह काही वेळ का होईन तुमच्या चिंता, तुमचे तणाव विसरायला तुम्हाला मदत करतो.

शिवाय वेगवेगळ्या लोकांचा स्वभाव बघून त्यांच्याबरोबर, वेगवेगळ्या भावनांबरोबर डील करणं हे तुम्हाला जमायला लागतं.

जमायला लागतं म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला आवडायला लागतं.

वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये राहिल्याने एखाद्याच्या दयाळू स्वभावाचा अनुभव येतो, एखादा शीघ्रकोपी पाहायला मिळतो, एखादा अगदी सभ्य असतो तर एखादा आडेलतट्टूही सापडतो.

हे स्वभावाचे वेगवेगळे प्रकार नेहमी बघून माणसं वाचायला आणि त्यांना समजून घेऊन इग्नोर करायचं आणि एन्जॉय करायचं तुम्हाला जमायला लागतं…

तेच एकटं राहील तर तुमच्याच चिंतांच्या चक्रव्यूहात तुम्ही स्वतःला बांधून घेता.

आणि मग कुठल्याही भावना टोकाचं रूप घेतात.

हा अनुभव आता या लॉकडाउनच्या दिवसात तुम्ही घेतलाच असेल.

२) शरीराला तितकासा आराम न मिळणं यामुळेही तुम्ही जास्त भावनिक होऊ शकता

तुम्हाला माहित असेल कधी जर पुरेशी झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी सारखी चिडचिड होते.

असंच बरेच दिवस सतत नीट आराम नाही झाला तर हि चिडचिड तुमचा शारीरिक आणि मानसिक समतोल बिघडवायला कारणीभूत ठरते.

ज्याला आपण म्हणतो, आज माझा मूड काही ठीक नाही….

योग्य तसा आराम माणसाच्या भावना समतोल ठेवायला मदत करतो… शरीराला आराम नसेल तर तुमची सहनशीलता कमी झाल्याचं तुम्ही अनुभवलच असेल..

३) भावनिक असण्याचं कारण हार्मोनल बदलांमुळेही असू शकतं

एका पातळीपर्यंत भावनिक असणं हे तसं स्वाभाविक आहे. पण तुमचे मित्र- मैत्रिणी जर तुम्हाला तुम्ही जास्त इमोशनल असल्याचं सांगत असतील किंवा तसं तुम्हालाहि जाणवत असेल तर यामागे हार्मोनल चेंजेस हेही कारण असू शकतं.

हार्मोन्स चा आपल्या वागण्यावर खूप मोठा प्रभाव पडतो.

४) आहारातील असमतोल

तुम्हाला जर तुम्ही जास्त भावनिक असल्याचं जाणवत असेल तर तुमचा आहार तपासून बघण्याची सुद्धा तितकीच गरज आहे.

जंक फूड खाण्यापेक्षा आरोग्यदायी असे फळं, पालेभाज्या हे जसे सुदृढ शरीरासाठी गरजेचे असतात तसेच मानसिक संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा योग्य आहार असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

तुमचा आहार आणि मुड स्विन्ग्ज यांचा सुद्धा खूप जवळचा संबंध आहे बरंका.

५) तुमच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत का?

आयुष्यात नेहमी बदल होत असतात. कधी ते सुखद असतात तर कधी दुःखद आणि कधी धक्कादायक सुद्धा….

झालेल्या गोष्टी सहजपणे व्यक्त केल्या गेल्या तर इमोशन्सचा समतोल राखला जातो.

पण काही मोठे बदल, एखाद्याच्या पायाखालची जमीन हलवणारे असू शकतात.

अशा वेळी होणारे बदल आणि असुरक्षिततेची भावना हेही कारण असू शकते जास्त भावनाप्रधान असण्यामागे…

तुम्ही खूप भावनाप्रधान, इमोशनल असल्याचं तुम्हाला स्वतःलाच समजून येत असेल तर आपले इमोशन्स बॅलन्स करण्याची लढाई तुम्ही आर्धी जिंकलीच समजा.

‘इमोशन्स बॅलन्स’ म्हणजे आपल्याला अगदीच साधू-संतांसारखं स्थितप्रज्ञ असण्याची सुद्धा गरज नाही.

फक्त इतकेच कि संतुलित मनस्थितीत तुम्ही निर्णय चांगले घेऊ शकता.

इमोशनल असणं तोपर्यंत काहीच चूकीचं नाही जोपर्यंत भावनिक होऊन, पुढे जाऊन पश्चात्ताप करण्याची वेळ येईल अशा गोष्टी तुमच्याकडून नकळतपणे घडणार नाही…

कारण शेवटी ‘भावनाप्रधान असणं’ हेच तर माणूस असल्याचं लक्षण आहे… बरोबर ना!!!

वाचण्यासारखे आणखी काही

भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवून प्रभावशाली व्यक्ती बनण्यासाठी हे करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय