झटकन खोकला घालवायचा असेल तर हे ६ जालीम उपाय तुमच्याच साठी..

खोकल्यावर घरगुती उपचार

खोकल्याचे तंत्र सांभाळायचे म्हणजे नाकी नऊ येतात. अनेक जणांकडून आपण ऐकतो की एकदा का खोकला सुरू झाला की तो खूप दिवस मुक्कामी असतो.

कोणाचा सर्दी चा खोकला, कोणाला कोरडा खोकला तर कोणाला एलर्जीचा खोकला..

रात्रभर खोकून खोकून जीव अर्धमेला होतो.. झोपही होत नाही..

शेवटी डॉक्टर कडे जाऊन अँटिबायोटिक औषधे घेतली आणि भरपूर पैसे दिले की खोकला हळू हळू गायब होतो..

हल्ली तर शिंकणे, खोकणे जणू अपराध झाला आहे..

घरातल्याच लोकांच्या नजरा आपल्याला संशयाने पाहू लागतात..

कोरोना रोगाच्या लक्षणात खोकला ही आहे.. त्यामुळे साधासा खोकला ही हल्ली मनात भीती निर्माण करतोय..

त्यामुळे त्यावर रामबाण उपाय करणे फार गरजेचे आहे..

आपल्या आयुर्वेदा प्रमाणे अनेक उपाय आपल्या घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला सांगतच असतात..

त्यातीलच काही इन्स्टंट उपाय तुम्हाला एक रिमाईंडर म्हणून आम्ही सांगणार आहोत..

असे उपाय जे खोकल्याला पटकन बरे करतील.. पहिला तर तुमच्या आवडीचाच.. बघूया तर कोणता..!!

१. मसाला चहा:

चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय म्हणता येईल इतके प्रचलित आहे..

वेगवेगळ्या प्रकारचे चहा आपण घेतच असतो.. आल्याचा चहा, वेलचीचा चहा, दुधातील चहा, कोरा चहा आणि कितीतरी प्रकार..

त्यातच काही जिन्नस मिसळले तर तुमच्या खोकल्याला ही पळवून लावता येईल.

आल्याचा चहा आपण करतोच मग त्यातच थोडी दालचिनी पूड आणि २ लवंगा घालून उकळा..

हे मसाले उष्ण प्रकृतीचे असल्याने घट्ट कफ पातळ करतात.. छातीतला कफ दूर करतात..

सर्दीमुळे वाहणारे नाकही थांबते.. त्यामुळे हा मसाला चहा चहाची तलफही भागवतो आणि औषधी असल्याने त्याचा दुहेरी फायदा आपल्या शरीरास मिळतो..

२. डाळिंबाचा रस:

मोठ्यांसाठी चहा तर लहानग्यांसाठी रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस म्हणजेच ज्यूस..

ह्या डाळिंबात व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘ए’ दोन्हीचा समावेश असतो..

त्यामुळे सर्दी खोकला ना होण्यास आणि शरीराच्या इतर गरजांसाठीसुद्धा ही व्हिटॅमिन्स उपयुक्त ठरतात.

ह्या ज्यूस मध्ये थोडेसे आले घालता आले तर उत्तम.. आले नसल्यास सुंठ पावडर किंवा मिरे पूडही चालते..

आले हे कफ नाशक आहे हे आपल्याला माहीतच आहे.. मिरे गरम असल्याने कफ वितळण्यास मदत होते..

त्यामुळे डाळिंबाच्या ज्यूस मध्ये ह्याचा वापर गुणवर्धकच ठरतो..

डाळिंबाच्या सालींचा काढा ही खोकल्यावर गुण करी असतो..

साली वाळवून त्या पाण्यात उकळून तो काढा बनवायचा, (त्यात आयुर्वेदिक घटक जसे मिरे, आले, लवंगा घालू शकतो. हे घटक उष्ण असल्याने त्याचे प्रमाण हे अल्प ठेवावे.) आणि चमचा चमचा औषध म्हणून घ्यायचा..

३. काळ्या मिरीचे चाटण:

काळ्या मिरीची पूड आपल्या घरात असतेच.. बऱ्याच पदार्थात आपण मिरे वापरतो..

मिरे प्रकृतीने उष्ण असल्याने कफ पातळ करायला उत्तम.. पण हे औषध म्हणून कसे घ्यायचे..??

थोडी मिरे पूड साजुक तुपात कालवायची आणि ते चाटण रात्री झोपताना घ्यायचे..

किंवा गूळ आणि मिऱ्याच्या गोळ्या बनवायच्या छोट्या छोट्या आणि रात्री झोपताना त्या चघळून खाऊन टाकायच्या.. मात्र ह्यावर पाणी प्यायचे नाही की काहीही खायचे नाही..

सकाळी बघा कसा कफ पडून जाईल सगळा..!! आणि खोकला समाप्त..

४. दूध हळद:

अर्थातच.. ह्याला विसरून कसे चालेल..?

घसा खराब होणे, सर्दी पडसे होणे किंवा अंगाला मुकामार लागणे ह्या सगळ्यासाठी आयुर्वेदात कोमट दूध आणि त्यासोबत हळदीचे कॉम्बिनेशन घेण्यास सांगितले आहे..

जर खोकला फार असेल किंवा कफ पिकला असेल तर दूध हळदीच्या मिश्रणात आले किंवा उकळून ठेचून घेतलेली लसूणही घालतात.

हळदीच्या पाण्याने (कोमट) गुळण्या करणे हे देखील घश्यातली खवखव दूर करते..

ह्या हळदीत कर्क्युमीन नावाचा घटक असतो जो औषधी मनाला जातो.

जो अँटी बॅक्टेरिअल किंवा अँटी व्हायरल म्हणून ओळखला जातो.. वेगवेगळ्या इन्फेक्शन्स वर हळद हे जालीम औषध आहे.

आले, लसूण, गरम दूध आणि हळद हे सगळेच कफाला शरीरातून हद्दपार करायला मदत करतात..

५. दालचिनी आणि मधाचे चाटण:

आयुर्वेदात वेगवेगळ्या घटकांच्या चाटणाने वेगवेगळ्या व्याधींमध्ये खूप बरे वाटते..

नुसता मध देखील खोकल्यावर गुणकारी असतो. गरम मसल्यातली दालचिनी ही खोकल्यावर गुणकारी असते..

त्यामुळे मधात दालचिनीची पावडर घातल्यास ते चाटण सुद्धा खोकल्यावर उत्तम..

ह्या दोन्हीच्या मिश्रणात जेष्ठमध पावडर देखील घालू शकतो..

जेष्टमधाची काडी देखील चघळल्यास खोकला कमी होण्यास मदत होते..

मधासोबत दालचिनी पावडर आणि जेष्ठमध पावडर दोन्हीही एकत्र घेतले तरी चांगले..

मधामध्ये डेक्सथ्रोमेथोरफन (dextromethorphan) नावाचे जे द्रव्य असते ते खोकल्यावर गुणकारी असते असे तज्ञ सांगतात.. त्या द्रव्यामुळे खोकल्याची उबळ लवकर थांबते..

६. गुळवेलीच्या पानांचा रस:

तुमच्याकडे गुळवेलीची पाने उपलब्ध असल्यास खोकल्याला छु मंतर म्हणणे अगदीच सोप्पे..

गुळवेल ही एक वेली रोप आहे.. त्याच्या पांनाचा रस हा अलर्जीच्या खोकल्यावर अत्यंत उपयोगी आहे.

कफ, वात आणि पित्त अशा तिन्ही शारीरिक दोषांवर अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक घटक म्हणजे गुळवेल.

हे तिन्ही दोष जर कोंट्रोल मध्ये राहिले तर आपण व्याधीमुक्त आयुष्य जगू शकतो.

त्यामुळे ह्यांचा समतोल राखण्यासाठी गुळवेल खूप उपयोगी पडते.

अर्थात ही वेल सगळ्यांकडे असणे दुर्मिळच आहे.. पण मंडळी चिंता करू नका..

ह्याची पूड किंवा गोळ्या देखील बाजारात, आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध असते.. तुम्ही ती पावडर मधा बरोबर चाटण म्हणूनही घेऊ शकता..

हे आणि अजूनही भरपूर उपाय खोकल्यावर आहेत.. वेळोवेळी त्याबद्दल आम्ही तुम्हाला उपयुक्त माहिती देतच असतो..

सध्या खोकला आणि सर्दी न होऊ देणे हेच आपले महत्वाचे कामही आहे..

ह्या औषधांबरोबर अजूनही एक महत्वाची गोष्ट म्हणजे खोकला सहसा रात्रीचा खूप उफाळून येतो..

ह्याचे कारण म्हणजे रात्री आडवे झोपल्यावर नाकातील कफ घशात उतरतो.. आणि आपल्याला खोकला येऊ शकतो..

त्यासाठी आपण मानेला उशी ठेवून जरा उंचावर झोपू शकतो.. लहान बाळांचे डॉक्टर देखील अशी सूचना देताना आपण ऐकलेच असेल..

डोके उंचावर ठेवले तर खोकला कमी होतो असे खूप जाणकारांचे म्हणणे आहे..

तुम्हाला हे उपाय कसे वाटले ते आम्हाला जरूर कळवा.. आणि तुमच्या कडील आयुर्वेदिक बटव्यातले उपाय आमच्याबरोबर शेअर करायला विसरू नका..

स्वतःची काळजी घ्या आणि मनाचेtalks वाचत रहा..

Image Credit: wallsdesk.com

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. vidhi gulab patil says:

    Preganant women bhi ye upay kr skte h kya khasi k liye

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!