कॅल्शियम युक्त डाएटच्या ५ महत्वाच्या टिप्स वाचा या लेखात

कॅल्शियमच्या गोळ्यांवर आयुष्य काढायचे नसल्यास वेळीच हे कॅल्शियम रीच पदार्थ खाण्यावर भर द्या. कॅल्शियम युक्त डाएटच्या ५ महत्वाच्या टिप्स वाचा या लेखात.

काही वयोवृद्ध मंडळी हल्ली उशाशी गोळ्यांचा डबा बाळगताना आपण पहातो..

म्हणजे तब्येत चांगली असली डायबिटीस, बीपी नसले तरीही गोळ्यांचा डबा असतोच..!! इतकेच नाही जरा प्रौढत्त्वाकडे झुकू लागले तरी बरेच जण सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करतात.

खास करून आयुष्यभर खाण्यापिण्याचे नखरे करणारी माणसे आयुष्याच्या संध्याकाळी गोळ्यांवर अवलंबून राहतात..

आणि ह्या गोळ्या कसल्या..?? तर व्हिटॅमिन, मिनरल आणि कॅल्शियमच्या.. ह्या गोळ्यांतून शरीराला लागणारी सगळी जीवनसत्व मिळवावी लागतात.. पण असे का करावे लागत असेल..??

कारण आपल्या शरीराला ह्या जीवनसत्वांची खूप गरज असते..

लहानपणापासून ही जीवनसत्त्वे नियमित घेतल्यास आपल्याला म्हातारपणी अगदीच गोळ्यांवर विसंबून राहायची गरज भासत नसावी..

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सगळी जीवनसत्त्वे आणि त्यातून खास कॅल्शियमची आपल्या शरीराला खूपच गरज असते..

लहान असतांना मानवी शरीरातील हाडे जोमाने वाढतात, दातांची वाढ होत असते.

त्यांना मजबूत करणारा मुख्य घटक म्हणजे कॅल्शियम..

बरं हे कॅल्शियम फक्त मुलांनाच लागते असे नाही..

कुमार वयातील व्यक्तींना कॅल्शियम घेणे महत्वाचे आहे. स्त्रियांच्या शरीराला ह्याची अत्यंत गरज आहे..

बाळंतपणात बाळाच्या डेलिव्हरीनंतर कॅल्शियमच्या कमतरतेतून सगळ्या स्त्रियांना जावे लागते..

जर कॅल्शियमचा समतोल राखला नाही तर म्हातारपणी नाही तर तरुणपणीच आपल्याला हाडांचा दातांचा त्रास होऊ लागतो..

कॅल्शियमची डेफिशिएन्सी असल्यास हाडे ठिसूळ होतात आणि दातांच्या समस्याही उद्भवतात..

जर अगदी बालवयापासून कॅल्शियमची मात्रा सुयोग्य असेल तर आपली हाडे, दात कायम मजबूत राहतात..

वय झाल्यावर बऱ्याच वयोवृद्धांना दात काढून कवळी बसवावी लागते.. तर कित्येक माणसांची हाडे विनाकारण मोडून त्यांच्यावर दुसऱ्यांच्या सहाऱ्याने जगण्याची वेळ येते..

अर्थरायटीस, ऑस्टिओपोरोसिस अशा असाध्य व्याधी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जडण्याची शक्यता असते.. त्यामुळे सगळ्या जीवांसत्वांबरोबर कॅल्शियमचे योग्य प्रमाण शरीरात असणे अत्यंत गरजेचे आहे..

तुम्ही जर फिटनेस प्रोग्रॅम फॉलो करत असाल, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ‘कॅल्शियम इज अ मस्ट इन्ग्रेडीएन्ट..!!’

तर सांगायचा मुद्दा असा आहे की दिवसभरातून एका जेवणातून तरी, दिवसभर आपल्या शरीराला लागणारे कॅल्शियम कसे मिळवता येईल हे पाहणे उत्तम..

आम्ही काही नाष्ट्याचे पदार्थ तुमच्यासाठी ह्या लेखातून देत आहोत ह्या मध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असते..

ह्यातील काही पदार्थ तुम्हाला माहीत असतील, तुम्ही घेतही असाल. असे असेल तर उत्तमच आहे. पण ते रेग्युलरली घ्या. त्यात खंड नको..

चला तर बघुयात आपल्याला कोणता नाष्टा करणे गरजेचे आहे..

१. मोठ्ठा ग्लास भरून दूध:

चुकिच्या डायटच्या मागे लागून तरुणपणीच हल्ली मुले दूध नको म्हणतात..

काही लहान मुलांना तर दूधच आवडत नाही.. कपभर दूध प्यायला मोठी माणसेही नाकं मुरडतात.. आणि त्यांचे अनुकरण लहानगे लगेच करतात.

पण दूध कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे.. दिवसभरातून एकदा तरी दुधाचा एक पेला रिचवलाच पाहिजे.

पंजाबी लस्सीचा ग्लास असतोना..?? अगदी तसा मोठ्ठा ग्लास भरून दूध प्या.. कारण दूध हे पूर्णान्न आहे..

दुधाने फक्त कॅल्शियमच नाही तर इतर जीवनसत्त्वे जसे की पोटॅशियम, आयोडीन, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी सुद्धा मिळते.

जे वेगन (Vegan) आहेत त्यांनी कॅल्शियम रीच सोया दूध घ्यावं..

खरे तर दूध, काहीही त्यात मिक्स न करता प्यावे. निरसं दुध म्हणजे अमृतच जणू.. सुरेख गोड चव त्याला असते..

पण ज्यांना दुधाची चव आवडत नसेल त्यांनी चवीला साखर किंवा बाजारात मिळणारी प्रोटीन पावडर (चमचाभर) घालून पिण्यास हरकत नाही..

चहा, कॉफी आणि इतर कार्बोनेटेड ड्रिंक पिण्यापेक्षा दूध पिणे उत्तम.. आज पासूनच दिवसभरात कधीही “एक ग्लास दुधाचा”..!!

२. वाडगंभर दही:

जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना दह्याचे महत्व नक्कीच माहीत असणार..

दही आणि ताक त्यांच्या डाएटचा रोजचा भाग असतो.. आणि थोडे थोडके नाही तर चांगले वाडगंभर दही त्यांना खावे लागते..

जसे फिटनेस साठी दही खूप चांगले.. तसेच कॅल्शियमची कमतरता भरून काढायला दही हवेच..

नाष्ट्यात फळे घालून केलेले मस्त दही फ्रुट सलाड घ्या.. किंवा जेवताना बाउल भर दही खा.. दह्याच्या भरपूर हेल्दी रेसिपीज सुद्धा तुम्हाला इंटरनेटवर मिळतील..!!

३. फ्रुट मंचिंग:

फळे आवडत नसलेला माणूस विरळाच.. त्यामुळे सकाळी सकाळी ऍसिडिटी वाढवणारा चहा किंवा कॉफी घेण्यापेक्षा फळे प्रेफर करा..

संत्री, जरदाळू, किवी बेरीज, पपई आणि केळी ह्यातून तुम्हाला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळते..

मात्र अंजीर ह्या सगळ्यात उजवे ठरते.. केवळ १०० ग्राम अंजीर तुम्हाला ३५ ग्राम कॅल्शियम देते..

म्हणून सिझनला अंजीराचा समावेश तुमच्या डायट मध्ये जरूर करा.. ड्राय फ्रुटस मधील अंजीर सिझन नसताना खाऊ शकता..

४. एक क्यूब चीझचा:

चीझ म्हटल्यावर सगळ्या कॅलरी काँशिअस लोकांचे कान टवकारतात.. चीझ खाण्यामध्ये अपराधीपणा वाटतो..

वजनाच्या काट्यावरील मोठे आकडे दिसू लागतात.. एकूण काय तर चीझ कितीही आवडत असले तरी वजन वाढू नये म्हणून चीझ पासून लांब राहणेच लोक पसंत करतात..

पण चीझचे योग्य प्रमाण ठरवले तर चीझ रोज खाणे सुद्धा हानिकारक नाही..

नाष्ट्याच्या पदार्थावर वरून किसलेले चीझ, छोटा क्यूब चीझ किंवा जेवताना अर्धा पातळ स्लाईस चीझ खाणे हा चीझचा गिल्ट फ्री इंटेक आहे.. कारण चीझ हा कॅल्शियम रीच पदार्थ आहे.

मॉझरेला, चेडार चीझ , फेटा चीझ, पारमेसन चीझ हे कॅल्शियमचे सोर्स आहेत.. रोज थोडे थोडे चीझ खाल्ल्याने काहीही वाईट परिणाम होणार नाहीत.. उलटपक्षी शरीराची कॅल्शियमची कमी पूर्ण होईल..!!

५. हिरव्यागार कॅल्शियम संपन्न पालेभाज्या:

जे आवडत नाही तेच कसं सांगतो आम्ही..?? जगातल्या निम्म्या माणसांना दूध, दुधाचे पदार्थ आणि हिरव्या पालेभाज्यांचे नाव घेतले तरी राग येतो..

पण एखाद्या डॉक्टरांना विचाराल तर ह्या पदार्थांना ऑप्शनच नाहीये असे ते सांगतील.. सोप्पे आहे..

जर लहानपणापासून सगळे पदार्थ खाण्याची सवय केली असेल तर मोठेपणी आवडीनिवडीचे नखरे राहणारच नाहीत.. त्यामुळे सगळ्या आयांनी आपापल्या मुलांना सगळ्या भाज्या खाण्याची सवय करावीच..!!

आणि हिरव्या पालेभाज्या या थालीपीठाच्या रूपात दह्याबरोबर खाल्ल्या तर चवीला मस्तच लागतात. शिवाय दही आणि पालेभाजी दोन्हींचा त्या नाश्त्यात समावेश होतो.

तर मंडळी ह्या हिरव्या भाज्या मिनरल्स आणि कॅल्शियमचा महत्वाचा स्रोत आहेत..

भेंडी, घेवडा, सरसो, पालक, कोबी आणि ब्रोकोली तर खाल्लीच पाहिजे.. सूप, सलाड, पराठा असे कित्येक चमचमीत पदार्थ करून ह्या नावडत्या पालेभाज्या तुम्ही आवडीने खाऊ शकता..

ह्या पदार्थातून तुम्ही रोजचे कॅल्शियम आणि इतर जीवनसत्वे देखील मिळवू शकता..

तुम्ही मांसाहराचे शौकीन असाल तर चिकन, मासे ह्यातूनही कॅल्शियम मिळते..

थोडा सुका मेवा सुद्धा रोजच्या आहारात ठेवा.. पनीर, सोयाबीन आणि त्यापासून बनलेले पदार्थ देखील कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे..

डाएट काँशिअस लोकांनी टोफू खाणे उत्तम.. असे कॅल्शियम रीच डाएट तुम्ही देखील आजपासूनच सुरू करा..!!

लेख कसा वाटला आणि याविषयी असे आणखी काय वाचायला आवडेल तेही कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

द ग्रेट इंडियन डाएट (सर्वोत्तम भारतीय आहार) हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “कॅल्शियम युक्त डाएटच्या ५ महत्वाच्या टिप्स वाचा या लेखात”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय