ऍक्युप्रेशरचे हे सहा पॉईंट्स तुमची चिंता आणि काळजी कायम दूर ठेवतील..

मित्रांनो, थोडीफार काळजी असणे वेगळे आणि काळजीचे पर्यावसान सवयीत होणे वेगळे.. चिंतेची सवयच चिंताजनक आहे.. त्यामुळे आपण ह्या चिंतेची सवय होऊ द्यायची नाही..

मित्रांनो, ह्यावर औषधोपचार, समुपदेशन याबरोबरच ऍक्युप्रेशरसारखा सोपा उपाय शक्य आहे. त्याचबद्दल बोलू या लेखात.

ऑफिसातून थकून आल्यावर बायकोने कधी खांदा चेपून दिला तर किती बरे वाटते नाही का..??

कधी बायको क्लीइंट्स कॉन-कॉल करून वैतागली असेल आणि नवरोबाने छान कपाळ आणि हेड मसाज करून दिला तर पुन्हा ऑफिसच्या नवीन कॉन-कॉल ला सामोरे जायची सुद्धा तिची तयारी होते…

घरातील लहान लेकरे कधी पाठीवरून, पायांवरून छोटी छोटी पाऊले देत चालली तरी क्षीण नाहीसा होतो..

घरोघरी किंवा फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन थकवा, अंगदुखी, डोकेदुखी घालवायला मसाज घेतला जातो..

त्याने खूप फरकही पडतो..

कित्येक रोगांवर आपण असे घरगुती उपाय करतच असतो.. आयुर्वेदिक उपाय तर सगळ्या घरोघरी केले जातात..

पण अशा काही व्याधी आहेत ज्यांचे उपाय करणे महा अवघड वाटते..

बघा ना कोणाला सतत चिंता करण्याची सवय असेल तर त्याने काय औषध घ्यावे बुवा..??

कोणाच्या जीवाला सतत घोर, काळजी लागून राहिली असेल तर त्यावरही काही औषध मिळाले तर किती बरे होईल..??!!

पण कोण म्हणतो चिंता आणि काळजी ह्या व्याधींवर औषध नाही.? ह्यावरही औषधे उपलब्ध आहे.. तेही फुकट..!!

आणि अगदी स्वतःचे स्वतः करता येईल असे.. ऍक्युप्रेशर हेच औषध..

तुम्हाला ऍक्युप्रेशर बद्दल माहीतच असेल.. पण आधी चिंता आणि काळजी ह्याचे रोगात रूपांतर कसे होते ते पाहू..

मुख्य म्हणजे चिंता आणि काळजी ही व्याधी आहे असे आपल्याला वाटतच नाही..

आईला घरादाराची काळजी असते.. बाबांना मुलांच्या करिअरची.

कोणाला कॉलेजच्या सबमिशनची तर कोणाला बॉसच्या टोमण्यांची..

विद्यार्थ्यांसाठी शाळेतला/कॉलेजचा अभ्यास ताण वाढवतो तर कोणाला ऑफिसातील कामाचा स्ट्रेस असतो..

वर्किंग वूमनना घर आणि ऑफिस सांभाळताना चिंता वाटते तर गृहिणींना कुटुंबाची, कुटुंबाच्या स्वास्थ्याची काळजी..!!

ह्या सगळ्या तणावाखाली आपण सगळेच असतो.. पण हा स्ट्रेस आपल्या शरीरस्वास्थ्यावर घातक परिमाण करत असतो, हे मात्र आपल्याला जाणवतही नाही..

स्ट्रेस म्हणजेच चिंता जी आपल्याला आतून पोखरत जाते.. बीपी, शुगर, हृदयरोग वाढवण्यासाठी, चिंता आपल्या नकळत हातभार लावत असते..

इतकेच नाही तर चिंता/anxiety मुळे डोकेदुखी, नॉशिया, आळस, सारखी झोप येणे किंवा पूर्णतः झोप उडणे, मनात सतत भीती वाढणे असेही आजार वाढतात..

कधी कधी तर ह्या anxiety मुळे आपल्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायची किंवा खूप मोठी मानसिक ट्रीटमेंट घेण्याची सुद्धा वेळ येते..

पण तरीही ‘चिंता’ ह्या विषयाला आपण फारसे गांभीर्याने घेत नाही..

मित्रांनो, थोडीफार काळजी असणे वेगळे आणि काळजीचे पर्यावसान सवयीत होणे वेगळे..

चिंतेची सवयच चिंताजनक आहे.. त्यामुळे आपण ह्या चिंतेची सवय होऊ द्यायची नाही..

ह्यावर ऍक्युप्रेशरसारखा सोपा उपाय आपण करायला आजपासूनच सुरुवात करू.. ऍक्युप्रेशर म्हणजे सोप्या भाषेत शरीरावर असणाऱ्या काही पॉईंट्सवर (बिंदूंवर) योग्य दाब देणे.. त्यामुळे बऱ्याच व्याधींपासून खूप आराम मिळतो..

आता आपण काही प्रेशर पॉईंट्स बघू. यावर योग्य प्रकारे दाब दिला, मसाज केली तर चिंता, मानसिक तणाव, डोकेदुखी, मानदुखी या सारख्या वेगवेगळ्या त्रासांपासून आराम मिळवणे सोपे होते.

१. कानाच्या पाळीवरील बिंदू: (Heavenly Gate Point)

पूर्वी शाळांमध्ये अभ्यास न केल्यास, शिक्षकवृंदाकडून आपले चांगलेच कान उपटले जायचे..

रोजच शाळेत हे ऍक्युप्रेशर मिळत असल्याने आपल्याला कसल्याही प्रकारच्या चिंता नसायच्या, नाही का..??

मजेशीर असले तरी कानाच्या पाळीवरचा हा बिंदू ऍक्युप्रेशर पद्धतीने दाबल्यास आपल्याला चिंता, निद्रानाश अशा व्याधींपासून मुक्त करतो.

हा चित्रात दिसणारा बिंदू (दोन्ही कानांवरचा) एकाच वेळी दाबून धरा. बोट आणि अंगठ्याने थोडा दाब देऊन, अंगठा त्यावर गोलगोल फिरवा.. साधारण २ मिनिटे हे ऍक्युप्रेशर केल्यास उत्तम रिझल्ट मिळतो..

२. अंगठ्यांच्या मुळावरील बिंदू ( Union Valley Point):

चित्रात दाखवलेल्या ह्या बिंदू वर दुसऱ्या हाताच्या बोटाने आणि अंगठ्याने प्रेशर द्या.. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून इथे चार पाच सेकंद मसाज करावा.. असे दोन तीन वेळा करावे.. श्वासही जरा दीर्घ घ्यावेत..

ह्या बिंदूवरच्या ऍक्युप्रेशरमुळे तुमची चिंता कमी होईल. डोकेदुखी आणि मान दुःखी असल्यास तीही कमी होईल.

ह्या बिंदूवरच्या दाबामुळे प्रसुतीकळा देखील येतात.. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी मात्र ह्या बिंदूवर ऍक्युप्रेशर करू नये..

ऍक्युप्रेशर पॉईंट

३. मनगटाखालील बिंदू (Inner frontier gate point):

मनगटापासून साधारण तीन बोटे खाली हा बिंदू आहे. नॉशिया आणि अंगदुखी घालवायला ह्याचे ऍक्युप्रेशर कामी येते.. अर्थात चिंतानाश हे पहिले कार्य..!!

मनगटापासून खाली तीन बोटे मोजून चित्रात दाखवलेला पॉईंट शोधा.. त्यावर अंगठ्याने दाब देऊन साधारण पाच सेकंद मसाज द्या..

ऍक्युप्रेशर पॉईंट

४. पावलावरील बिंदू (Great surge point):

चित्रातला बिंदू नीट पहा.. तुमच्या पावलांच्या वरच्या भागावर हा बिंदू आहे.. ह्याच्या ऍक्युप्रेशरसाठी तुम्हाला नीट मांडी घालून बसावे लागेल किंवा पाय जवळ घेऊन बसावे लागेल..

दोन्ही पायाच्या अंगठ्यांच्या आणि त्याच्या बाजूच्या बोटाच्या बरोबर मध्ये २ बोटे वरच्या दिशेने तुम्हाला दाब द्यायचा आहे.. दोन्ही बोटांच्या हाडाच्या मध्ये हा बिंदू आहे.. हाताच्या अंगठ्याने जोरात दाब देऊन इथे पाच सेकंद मसाज करावा..

ह्या ऍक्युप्रेशरमुळे, anxiety किंवा चिंता तर दूर होणारच पण इतरत्र शरीरात असणाऱ्या वेदना, निद्रानाश ह्यावर देखील हे प्रेशर रामबाण उपाय आहे..

स्त्रियांना पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदांनावर देखील हे ऍक्युप्रेशर गुणकारी ठरते.. हे सगळ्या स्त्रियांनी नक्किच करून पाहिले पाहिजे. Its a saviour you see..!!

Great surge point

चला आता चेहऱ्याकडे येऊया

५. भुवयांमधला बिंदू: (Hall of impression point):

चिंता करताना कपाळाला हात लावून बसलात की अगोदर हा बिंदू दाबायला घ्या.. कारण डोक्यावर हात मारून बसायला लावणारी ही चिंताच तर नकोय आपल्याला..

दोन्ही भुवयांच्या मध्ये आपण गंध किंवा स्त्रिया टिकली लावतात तोच हा बिंदू.. चित्रात दाखवलाच आहे पण हा शोधायलाही तितकाच सोपा..!!

ह्या बिंदूवर मधले बोट किंवा अंगठ्यांच्या साहाय्याने दाब द्या.. आणि ते बोट गोलाकार फिरवत राहा. किमान ५ मिनिटे ते १० मिनिटे ह्याला मसाज देणे गरजेचे आहे..

चिंतेला पळवून लावण्यासाठी ह्या बिंदूवरील ऍक्युप्रेशर अत्यंत लाभदायक आहे..

ऍक्युप्रेशर पॉईंट

आता शेवटचा बिंदू.. सगळ्यांच्या आवडीचा..

६. खांद्यावरील बिंदू (Shoulder well point):

दमलेल्या व्यक्तीचे खांदे आणि मान दाबून दिली तर खूप रिलीफ मिळतो.. ह्याचा अनुभव आपण घेतलाच आहे..

चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेच्या सुरुवातीला खांद्यावर असणारे हे बिंदू अंगठा आणि बोटांच्या साहाय्याने दाबावेत. चिमटी काढल्याप्रमाणे देखील दाब देऊ शकतो.. पण दाब अगदीच हलका नसावा..

ह्या प्रेशर पॉइंटवर दाब दिल्याने आखडलेले स्नायू मोकळे होतात.. स्नायू मोकळे झाल्याने मिळणारा आनंद स्वर्गीयच..!!

ह्या ऍक्युप्रेशरने चिंतानाश तर होतोच, जर डोकेदुखीही होत असेल तर तीही नाहीशी होते..

मात्र गर्भार स्त्रियांनी ह्यापासून दूर असावे. जश्या अंगठ्यांच्या मुळावरील बिंदूच्या ऍक्युप्रेशरने प्रसुतीकळा येतात तश्या ह्या खांद्यावरील ऍक्युप्रेशरमुळे देखील येतात..

ऍक्युप्रेशर पॉईंट

थोडक्यात काय तर, चिंता वाटणे ह्या व्याधीची सुरुवात होतीये असे वाटत असले तर हे ऍक्युप्रेशर करणे तुम्हाला नक्कीच गुणकारी वाटेल..

ऍक्युप्रेशरच्या विज्ञानात अजूनही अभ्यास आणि शोध चालू आहेतच.. ह्या सहा बिंदूच्या दबावानंतर मिळणारे रिझल्ट जाणकारांनी मान्य केलेले आहेत..

अजूनही कित्येक शारीरिक व्याधींवर ऍक्युप्रेशर आणि ऍक्युपंक्चर ह्या दोन्ही पद्धतींचा जगभर अवलंब केला जातो..

मात्र तुमची चिंता डिप्रेशनच्या मार्गाने जात असेल तर घरगुती किंवा साधेसुधे उपाय करत बसणे योग्य नाही.. बाकी वैकल्पिक चिकित्सा म्हणजेच अल्टर्नेटीव्ह थेरपी म्हणून आपण ऍक्युप्रेशरचा आधार नक्कीच घेऊ शकतो..

महत्वाची टीप: जर तुम्हाला anxiety चा खूपच जास्ती त्रास असेल, शारीरिक व्यंग, डिप्रेशन, आत्महत्येचे विचार, संपूर्ण निद्रानाश अश्या वळणावर तुम्ही पोहोचला असाल तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरची ट्रीटमेंट घेणे जरुरीचे आहे.. त्याबाबतीत हयगय होता कामा नये..

एकूणच आमच्या सर्व वाचकांचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहावे ह्याच आमच्या शुभेच्छा.

Acupressure Massager ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.manachetalks.com/11572/acupressure-points-diabetes-hypertention-marathi-health-blog-manachetalks/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “ऍक्युप्रेशरचे हे सहा पॉईंट्स तुमची चिंता आणि काळजी कायम दूर ठेवतील..”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय