इंटरनेटचा वापर करून पैसा कमावणे कसे शक्य आहे, वाचा ‘हे’ सांगणाऱ्या १० टिप्स

मित्रांनो, काही वर्षांपासून भारतात जो १ ते दीड GB डेटा मोफत किंवा अल्पदरात मिळायला लागला त्याचा अचंभित करणारा सदुपयोग खूप जणांनी करून घेतलेला आहे. म्हणूनच आज तुमच्यासाठी खास हा लेख लिहावा असं आम्हाला वाटलं….

इंटरनेट आणि सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येऊ शकतो ते वाचा या लेखात.

नवीन शोध लागला की त्याची खूप उत्सुकता असते.. मग त्याचे दुर्गुण समजायला लागतात..

दुर्गुणांच्या मागोमाग येतो तो दुरुपयोग..!! टेलिव्हिजन नावाचा कृष्णधवल डबा भारतात आला तेव्हा काय रुबाब असायचा त्याच्या मालकाचा..

नंतर घरोघरी रंगीत टीव्ही लागले. आणि त्याच्या बरोबर आला तो धोका..!!

टीव्ही बघण्याचे दुष्परिणाम लहानमुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत पोचले.. सरतेशेवटी त्याचे नामकरण इडियट बॉक्स म्हणून झाले..

आता इंटरनेटची कथाही काही वेगळी नाही.. सुरुवातीला १०० रुपये देऊन एक तास वापरायला मिळणारे इंटरनेट आता अगदीच फ्री झालेय..

आणि त्यावरील सोशल मिडियामुळे तर ‘पडीक’ असणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय.. सोशल मीडियामुळे होणाऱ्या दुष्पपरिणामांमुळे जो तो फक्त सोशल मीडियाला दोष देतो..

त्याने झालेले नुकसान दिसतेय मात्र त्याचे फायदे समजून घेतले तर..??

सोशल मीडियामुळे माणसाचे खूप नुकसान होते हे खरे आहे.. त्याने तुमच्या मेंदूचे काम संथ होते, तुमची anxiety वाढते, इतकेच काय तर तुमचा अमूल्य वेळी वाया जातो..

माणूस तासंतास सोशल मीडियावर ऑनलाइन राहतो आणि घरची, ऑफिसची कामे विसरतो..

पण सोशल मीडियाचे आपण गुलाम न होता त्याला आपले गुलाम करण्याची ट्रिक आपण का शिकून घेत नाही..??

मित्रांनो हा सोशल मीडिया आपला, आपल्या बिझनेसचा खूप फायदा करून देऊ शकतो..

आपल्याला माहीत नसणारे भरपूर ज्ञान आपल्याला देऊ शकतो.. आपल्या कामात वृद्धी करण्यास आणि आपल्या टार्गेटेड मार्केटला जवळ करण्यास हा सोशल मीडिया आपली पुरेपूर मदत करू शकतो..

नाण्याची एक बाजू निराश जनक असली तरी दुसरी बाजू सकारात्मक असू शकते..

फक्त आपण दुसरी बाजू सुद्धा पालटून पहिली पाहिजे.. ह्या सोशल मीडियाची दुसरी बाजू काय सांगतेय ते पाहू.

सोशल मीडियाचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स / उपयोग काय असतात:

उदाहरणार्थ घेऊया इन्स्टाग्राम. आता हे इन्स्टाग्राम बद्दल कोणाला विचारले तर लोकं सर्वसाधारणपणे म्हणतील की काय फक्त फोटो टाकायचे आणि टाईमपास करायचा.. ते फेसबुक, व्हाट्सएप सगळं सेमच.. आपला वेळ खाणारं..

पण ह्या नकारात्मक मुद्यांपासून जरा दूर जाऊन ह्याचा सकारात्मक फायदा काय असू शकेल ह्याचा विचार करूया का..??

ह्या इन्स्टाग्राम वर तुमच्या केकचे फोटो टाकले. ते लोकांना आवडले तर तुम्हाला ऑर्डर मिळू शकतात..

घर बसल्या तुम्ही तुमचा एखादा लहानसा बिझनेस सुरू करू शकता ह्याचा विचार केलाय का कधी..??

एखाद्या मुलीने स्वतःचे डिझाइन केलेल्या ड्रेस चे फोटो टाकले आणि ते कोणत्या डिझायनर ला आवडले तर तिला नोकरीची ऑफर देखील मिळू शकते..??

सोशल मीडिया म्हणजे टाईम पास इतकेच त्याचे कार्यक्षेत्र मर्यादित नाहीये मित्रांनो..

ह्याचे काही सकारात्मक फायदे बघा…

१) तुम्ही जगाच्या पाठीवर कोणत्याही व्यक्तीशी स्वतःला जोडू शकता.. कुठल्याही मार्केट पर्यंत पोहचू शकता..
२) कोणाशीही कामासाठी झटकन संवाद साधता येईल असे हे प्रभावी माध्यम आहे.
३) तुमच्या कार्यक्षेत्रात कमालीचे बदल घडत असतात त्याबद्दल तुम्हाला हवी ती माहिती हा सोशल मीडिया देऊ शकतो
४) तुमच्या बिझनेसच्या वृद्धीसाठी आणि मार्केटिंग साठी हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे
५) आणि हो इतकेच काय तर हा अतिशय स्वस्त आणि सोपा मार्गही आहे बऱ्याच कामांसाठी..

म्हणजे हा सोशल मीडिया, हे इंटरनेट फक्त वाईट कामासाठी वापरले जाते असे नाही..

आपण कसे वापरतो ह्यावर देखील ते अवलंबून असते.. मग का नको करायला ह्याचा योग्य वापर..??

मग बघुयात तर ह्याला प्रभावी पणे कशा कशासाठी वापरता येईल..?? ह्याला आपल्या कामांना कसे जुंपता येईल..??

१. आधी एक यादी बनवा:

सोशल मीडिया वर काय काय शोधायचे आहे त्याची क्रमवार यादी बनवा..

नाही काय आहे ना..!! की, जसे ह्या मीडियाचे दार उघडले, तसे आपण त्यात चालत राहतो वेळेचे भान हरपून.. त्यामुळे आपली यादी हातात असली की तेवढ्याच वेबसाईट किंवा तेवढीच माहिती आपण शोधून घेऊ.. बाकी फुकट वेळ घालवणार नाही…

२. फेसबुक, इंस्टा वरील ग्रुप जॉईन करा:

आपल्या कामाच्या रिलेटेड भरपूर ग्रुप फेसबुक वर असतात.. आपल्याला मदत होऊ शकेल अश्या काही ग्रुप्स ना जॉईन व्हा..

आपल्याच क्षेत्रातील असंख्य एक्सपर्टसचे मार्गदर्शन आपल्याला उपयोगी पडते. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन सुधारणा ह्याबाबत आपल्याला सतत माहिती मिळत जाते..

ह्याच ग्रुप मार्फत तुम्हाला कोणी फायनान्सर, पार्टनर किंवा संभाव्य कस्टमर वर्ग देखील मिळू शकतो.. भरपूर शिकण्याची संधीही मिळते..

इतकेच काय तर वधू-वर सूचक वेबसाईट आणि ग्रुप देखील आपल्याला सोशल मीडियावर सापडतील..

आपल्याच क्षेत्रातील, आपल्या अवडीनिवडीशी मिळताजुळता जोडीदार शोधणेही ह्याच सोशल मीडियामुळे शक्य आहे..

३. नोकरी मिळवण्यास किंवा मार्केटिंगसाठी उपयुक्त:

लिंक्ड इन, नौकरी डॉट कॉम सारखे प्लॅटफॉर्म नोकरी विषयक सगळ्या कामांसाठी उपयोगाला येतात..

आपण स्वतःसाठी नोकरी शोधणे किंवा आपल्या बिझनेस साठी चांगले कामगार शोधणे ह्या दोन्ही साठी असल्या वेबसाईट्सचा वापर सर्रास करता येतो..

एमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे प्लॅटफॉर्म आपल्याला आपल्या वस्तूंच्या मार्केटिंग आणि सेल्स साठी उपयोगास येतात.

४. तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर देखील नजर ठेऊ शकता:

तुमच्या क्षेत्रातील सगळ्याच स्पर्धकांबद्दल तुम्हाला सोशल मिडियाद्वारे माहिती मिळू शकते. त्यांच्या व्ययसायिक हालचालींवर तुम्ही लक्ष ठेवू शकता..

५. नवीन संधींचा फायदा:

सरकारने कोणते टेंडर आणले आहे, कोणत्या कंपनीला व्हेंडर हवे आहेत अशा नवीन संधी आपल्याकडे इंटरनेट, सोशल मिडियाद्वारे चालून येतात.

फक्त काम धंदाच नाही तर इतरही क्षेत्रातील संधींबद्दल तुम्हाला जाणून घेता येते. जसे परीक्षांचे नियम, टाईमटेबल, नोकरीचे अर्ज, घरासाठी असणारी सोडत… वगैरे वगैरे..

तुम्ही अभिनेते, गीतकार, संगीतकार असाल तर ऑडिशन, नवीन सिनेमा-नाटकातील संधी, बँड ची गरज कुठे असेल तर सोशल मीडिया द्वारे आपल्या पर्यंत भरपूर माहिती पोहोचते.

६. ऑनलाइन बिझनेस करण्याच्या संधी:

सोशल मीडिया तुम्हाला भरपूर पैसाही मिळवून देऊ शकतो. यु ट्यूब, फेसबुक द्वारे तुम्ही पैसे कमवू शकता..

ऑनलाइन क्लासेस घेणे, ट्रेनिंग देणे, ऑनलाइन कन्सलटेशन असे बरेच मार्ग तुम्हाला घरबसल्या लक्ष्मी मिळवून देतात..

७. वेगवेगळे फ़ंडरेझर प्लॅटफॉर्म:

आपल्याला माहित असणारे फेसबुक, इन्स्टा यांशिवाय इंटरनेटवर काही नेटवर्क असेहि आहेत जिथे गरजेसाठी निधी उभा केला जातो.

बरेचदा ऑर्गन ट्रान्सप्लांट, कॅन्सर असे मोठमोठे आजार असतात ज्या साठी रुग्णाच्या कुटुंबियांना तितका पैसे उभा करणे शक्य नसते.

तेव्हा असे फ़ंड रेझर नेटवर्क तुमच्या मदतीला उभे राहू शकतात.

या निधी उभे करू शकणाऱ्या नेटवर्कवर क्रिएटिव्ह कामांसाठी सुद्धा तुम्हाला निधी मिळवता येऊ शकतो. फक्त गरज आहे ती थोडं क्रिएटिव्ह असण्याची.

८. तुमचे घर रिकामे असेल तर त्याचा हॉटेल सारखा वापर करून पैसे कमावणे सुद्धा शक्य आहे.

आपले एखादे घर, फ्लॅट किंवा बांगला रिकामा असेल तर तो भाड्याने देण्याचा पर्याय आपल्या ओळखीचा असतो. पण हॉटेलसारखे प्रति दिवस, प्रति रात्र असे भाडे आकारून आपले घर जिथे रजिस्टर करता येईल अशी वेबसाईट म्हणजे ‘एअर बी एन बी’ इंटरनेटवर तुमच्या दिमतीला आहे.

येथे तुम्ही तुमचे रिकामे घर रजिस्टर केले तरी तुमचा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.

एवढेच नाही तर आपले घर मोठे असेल आणि राहणारी माणसं कमी असतील, एखादा रूम रिकामा असेल तर नुसता एक रूम सुद्धा तुम्ही https://www.airbnb.co.in/ या वेबसाईटवर शेअरिंग ऑप्शनमध्ये नोंदवू शकता.

मुंबई, पुणे अशी मोठी शहरे किंवा पर्यटन स्थळी जर तुम्ही राहत असाल किंवा तुमचे घर असेल तर हे करून बघायला काहीही हरकत नाही.

९. फ्रिलान्स कामं मिळवायची असतील तर तेही शक्य आहे:

आपल्याकडे आजही खूप मोठा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा. चांगली-चांगली शिक्षणं घेऊन अगदी इंजिनियर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं सुद्धा चांगली नोकरी मिळत नाही म्हणून पालकांच्या जवाबदारीवर कित्येक वर्षे काही करत नाहीत किंवा फक्त स्पर्धा परीक्षा देत जातात.

पण हे करताना तुम्ही तुम्हाला जमणारे कुठलेही कामं फ्रिलान्सर म्हणून करू शकाल असे काही नेटवर्क किंवा वेबसाईट आहेत. ‘फायवर’ हे त्यातलंच एक…

वरती लिहिल्या प्रमाणे नोकरी न मिळू शकणारी मुलं, मुली याचबरोबर शिक्षणं घेऊन घरच्या, मुलांच्या जवाबदारीमुळे काही मुली नोकरी करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा पर्याय चांगला आहे.

१०. तुम्ही स्कॉलर असाल तर आपले कोर्सेस बनवून ते विकण्याची संधी

कोर्सेस बनवून ते विकण्याच्या तशा तर बऱ्याच वेबसाईट इंटरनेट वर आहेत पण त्यातील Udemy हि विशेष उल्लेखण्या सारखी वेबसाईट आहे, ज्यावर पर्सनल डेव्हलपमेंट, मार्केटिंग, फोटोग्राफी इथपासून ते भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर इथपर्यंत वेगवेगळ्या विषयांचे कोर्स लिस्ट करून त्यातून डॉलरच्या चलनात कमाई करता येते.

इतकंच काय इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा चोख वापर जर करता आला तर तुमच्यावर कुरघोडी करणाऱ्या माणसांची इत्थंभूत माहिती काढणं सुद्धा तुम्हाला शक्य आहे, चांगल्या समाजोपयोगी कामांसाठी निधी जमा करणं हेही इंटरनेट सोशल मीडियामुळे शक्य झाले आहे.

काही वर्षांपासून भारतात जो १ ते दीड GB डेटा मोफत किंवा अल्पदरात मिळायला लागला त्याचा अचंभित करणारा सदुपयोग खूप जणांनी करून घेतलेला आहे. म्हणूनच आज तुमच्यासाठी खास हा लेख लिहावा असं आम्हाला वाटलं….

ही सगळी जीवन उपयोगी कामे करत असताना अर्थातच आपल्याला सोशल मीडियावर टाईम पास करायचा मोह देखील होणारच..

मग तो टाळण्यासाठी एक नामी युक्ती आहे.. ती म्हणजे ऍप ब्लॉकर वापरण्याची..!

सेल्फ कंट्रोल, स्टे फोकस्ड, अँटी सोशल असे बरेच अँप आपल्या कामी येतील..

किंवा काही मोबाईल मध्ये तर आपला स्क्रिनिंग टाईम वर लगाम घालण्याची सुविधाही उपलब्ध असते..

त्याचाही वापर सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी होऊ शकतो..

तर, अशा कामाच्या सोशल मीडियाला तुम्ही वेळ वाया घालवण्याचे साधन बनू देवू नका.. त्याचा पुरेपूर उपयोग करायला लागा..

आता पुढे काही वेबसाईटची नावं बघा ज्यावर भरीव कामं केली जाऊ शकतात. उदाहर्णार्थ: airbnb.co.in, fiverr.com, freelancer.in, sellercentral.amazon.in इत्यादी….

आणि हो या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जे वेगळं सांगण्याची गरज नाही ते म्हणजे मनाचेTalks!! इथे तुम्हाला तुमच्या घराचे आर्थिक गणित संभाळण्यापासून ते मनाचं व्यस्थापन, पालकत्व अशा कित्येक गोष्टी सोप्या भाषेत समजून घ्यायला मिळतील.

इंटरनेटद्वारे पैसे कमवा (Marathi Edition) हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

डिजिटल मार्केटिंग चे मराठी पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “इंटरनेटचा वापर करून पैसा कमावणे कसे शक्य आहे, वाचा ‘हे’ सांगणाऱ्या १० टिप्स”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय