बद्धकोष्ठतेच्या त्रासावर हे अत्यंत गुणकारी घरगुती उपाय करून पहा!!

बद्धकोष्ठतेच्या त्रासावर हे अत्यंत गुणकारी घरगुती उपाय

बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन हे कोणालाही होऊ शकते.. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत कोणालाही..

आपल्या नेहमीच्या आरोग्य निगडित अडचणींमध्ये बद्धकोष्ठ ह्याचा समावेश होतो..

जसे काही जणांना गॅस, अर्धशिशी दुखणे, अपचन होते तसेच काहींना रोजच्या रोज कॉन्स्टिपेशन होते..

ह्यावर एक सर्व्हे सांगतो की भारतातील २० ते २२% लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो.. हा आकडा बऱ्यापैकी चिंताजनक आहे..

बद्धकोष्ठता जरी जीवघेणी नसली तरी अस्वस्थ करणारी आहे.. शरीराचे तंत्र बिघडवणारी आहे..

कधी पोटदुखी तर कधी गुदद्वार भागात असह्य वेदना होतात.. अतिशय अवघड जागेचे दुखणे म्हणू शकतो ते हेच..

आपल्याला हा त्रास आपल्याच अनियमित जीवनशैली मुळे होतो.

रात्री अपरात्री जेवणे, जागरण करणे, झोपेच्या वेळा अयोग्य असणे किंवा जंक फूड खाणे, अति अन्न सेवन, सिगरेट – दारू ची सवय असे अनेक घटक आपल्या शरीरावर दुष्परिणाम दाखवतात..

बद्धकोष्ठता हा देखील ह्यातीलच एक दुष्परिणाम.. कित्येक लोकांना ह्या कॉन्स्टिपेशनमुळे शरीर जड जाणवणे, किंवा मलविसर्जन करण्यास भयंकर त्रास होणे अशा प्रोब्लेमला सामोरे जावे लागते..

आयुर्वेद सांगते, जर शरीराची ‘वात’ प्रकृती झाली तर बद्धकोष्ठतेचा त्रास हमखास जाणवतो..

मात्र ह्यात आयुर्वेदाचेच जालीम उपाय देखील आहेत.. उत्तम आहार आणि व्यायाम हे देखील प्रत्येकालाच फार गरजेचे आहे..

आधी, बद्धकोष्ठता म्हणजे काय? ते पाहू:

जेव्हा शरीरात वात वाढतो तेव्हा त्याच्या ‘कडक आणि वातट’ (hardness and dryness) ह्या स्वभावांमुळे कॉन्स्टिपेशन होते..

तसेच आपल्या शरीरास योग्य व्यायामाची सवय नसेल, अन्न पचवणारे पोषक तत्व जसे की फायबर आणि पाणी शरीरास योग्य प्रमाणात मिळत नसतील किंवा अति प्रमाणात मांसाहार केला जात असेल तर बद्धकोष्ठ होण्याचा दाट संभव असतो..

तशी अजूनही भरपूर कारणे आहेत बद्धकोष्ठतेची…

बद्धकोष्ठते मुळे मलविसर्जनास त्रास तर होतोच त्याच बरोबर डोकेदुखी, तोंडाला दुर्गंधी येणे, गॅस धरणे असे अनेक त्रास होतात..

चेहऱ्यावरील पुटकुळ्या, फोड, तोंडाचा अल्सर, ऍसिडिटी हे देखील कॉन्स्टिपेशन मुळे होऊ शकते..

शांत झोप न लागणे, छातीत जळजळ होणे आणि काही लोकांना तर डिप्रेशन चा त्रास देखील झाल्याची उदाहरणे आहेत…

खाण्यापिण्याच्या आणि जीवनशैलीतील कित्येक चुकीच्या सवयींमुळे आपण हे कॉन्स्टिपेशन ओढवून घेतो.. आता आयुर्वेदातून त्याच्यापासून सुटका कशी करून घ्यायची ते पाहू..

१. शरीरात वात वाढणार नाही असे अन्न खावे:

बटाटे, वांगी अशा वातूळ भाज्या काही काळासाठी टाळाव्यात. शीतपेये, कच्च्या कोशिंबिरी, थंड पदार्थ वात होऊ नये म्हणून खाणे थांबवावे..

त्यापेक्षा गरम गरम जेवण, गरम पेये जसे की सूप, सार किंवा ग्रीन टी ह्याचे सेवन वाढवावे.. संपूर्ण शिजवलेले पदार्थच खावेत..

२. त्रिफळाचे सेवन:

त्रिफळा बद्धकोष्ठ हारक आहे.. ह्याची पावडर किंवा चूर्ण बाजारात मिळते. ते कोमट पाण्यात मिसळून रोज रात्री झोपताना जरूर प्यावे. अमलकी, विभीतक आणि हरितकी यापासून बनलेले त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठाच्या त्रासात गुणकारी आहे.

पाव चमचा त्रिफळा पूड, पाव चमचा धणे पूड आणि पाव चमचा वेलची पूड (इलायची पूड) हे दिवसातून दोन वेळा पाण्यातून घ्यावे.. किंवा ग्रीन टी मध्ये मिसळून घ्यावे..

त्रिफळा बद्धकोष्ठता कमी करते तर वेलची आणि धणे पोटाचे जडत्व आणि अपचन घालवते..

३. दूध आणि तूप:

गरमागरम दुधात घरचे चमचाभर तूप घालून रोज रात्री ह्याचे सेवन केल्यास सकाळी मलविसर्जनास अजिबात त्रास होत नाही. आणि हा उपाय करणे देखील खूपच सोप्पे आहे..

लहान मुलांना देखील हे देऊ शकतो.. ह्या उपायामुळे ‘वात’ आणि ‘पित्त’ ह्या दोन्ही दोषांचे निराकरण होते..

४. कवठ आणि गूळ:

कावठाचे फळ आपल्याला माहीतच असेल.. त्याचा गर काढून घ्यायचा त्यात थोडा गूळ मिसळायला आणि एकेक चमचा हे मिश्रण रोज खायचे..

चिंच, कावठाचे गर आणि गूळ मिसळून छान सरबतही बनवता येते.. ते तुम्ही रोज थोडे घेऊ शकता. ह्याने देखील बद्धकोष्ठतेच्या त्रासामध्ये शरीराला आराम पडतो..

५. बडीशोपचे सेवन:

आपल्याकडे जेवण झाल्यावर विडा खायची पद्धत आहे.. विड्यामध्ये असे पदार्थ असतात जे पोटाला जड झालेले जेवण पचवायला मदत करतात..

त्यातलीच बडीशोप / बडीशेप आपण रोज खाऊ शकतो.. बडीशोप लहान मुले देखील आनंदाने खातात.. ती औषधी असून चवीला छान लागते आणि तोंडाला सुवासही येतो..

बडीशोप खाल्ल्याने अन्नपचनास लगेच सुरुवात होते.. गॅस चा त्रासही कमी होतो.. बडीशोप खाल्ल्यावर थोडे कोमट पाणी प्यायल्यास उत्तम परिणाम बघायला मिळतात..

बडीशोप रोज खाल्ल्यास मलविसर्जनास त्रास होत नाही.. मात्र ती भाजूनच खावी.. कच्ची नाही.. हे ध्यानात ठेवा..

६. ज्येष्ठमध:

कोमट पाण्याबरोबर थोडी ज्येष्ठमध पूड आणि थोडा गूळ घेतले तर कॉन्स्टिपेशनच्या त्रासमध्ये शरीरास आराम पडतो.. मात्र ह्याचे सेवन आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याने केल्यास उत्तम..

७. सुके अंजीर मुलांसाठी उत्तम:

सुके अंजीर काही तास पाण्यात भिजवून ठेवावे.. ते भिजलेले अंजीर खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.. लहान मुलांसाठी हे योग्य आयुर्वेदिक औषध आहे..

मुले आवडीने खतातही.. त्यांना रोज एक भिजलेले अंजीर ह्याप्रमाणे ह्याचा डोस द्यावा.. ह्यामुळे त्यांची पाचनक्षमता देखील सुधारेल..

८. आगर आगर पूड:

ही चायना ग्रास नी बनलेली पावडर बाजारात उपलब्ध असते. शाकाहारी जिलेटीन म्हणून हे शाकाहारी पदार्थात वापरले जाते.. हे तुम्हाला मिळाल्यास दुधात घालून पिऊ शकता.. ह्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते..

हे आठ आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्की करून पाहा…ह्याच बरोबर अजूनही काही बाबींकडे रोजच लक्ष असुद्या.. जसे की,

  • रोज भरपूर पाणी प्या. किमान १० ग्लास
  • तुळस, लिंबू असे घटक असलेला ग्रीन टी घ्या. ज्याने तुमच्या पचनसंस्थेला मदत होईल..
  • फायबरयुक्त फळे, भाज्या आणि आहार घ्यावा
  • रोजच्यारोज काही व्यायाम केला जावा.. व्यायाम शक्य नसल्यास ३० मिनिटे चालणे ठेवावे..

हे मुद्दे सुद्धा खूप महत्वाचे आहेत.. आणि फक्त कॉन्स्टिपेशन असेल तरच हे करावे असे नाही.. हे पॉईंट्स तर सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली आहेत..

हे रुटीनमधले छोटेसे बदल आपल्या आयुष्यात मोठे बदल घडविण्यास कारणीभूत ठरतात.. म्हणूनच कॉन्स्टिपेशनला बाय करून एक हेल्दी लाईफ स्टाईल निवडूया..!!

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!