डायबिटीस म्हणजेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीचे ऍक्युप्रेशर पॉईंट्स

डायबिटीस मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीचे ऍक्युप्रेशर पॉईंट्स

स्वस्थ, आरोग्यपूर्ण शरीर हि माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी असते. आणि याची जाणीव आपल्याला या कोरोना काळात प्रकर्षाने झालेलीच आहे.

आजार, त्यात वेगवेळी ट्रीटमेन्ट, गोळ्या औषधांच्या सहऱ्याने जगणं ही वेळ कधीही न यावी अशीच आपली इच्छा असते.

मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का, कि आपलं शरीर हा ऊर्जेचा एक प्रचंड मोठा स्रोत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत डायबिटीस बद्दल.

डायबिटीस शी दोन हात करायची ज्यांच्यावर वेळ आलेली आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे माहित असतं कि डायबिटिसचे दोन प्रकार असतात.

टाईप-१ आणि टाईप-२ डायबिटीस.

टाईप-१ मध्ये रुग्णाच्या शरीरातील पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड हे साखर पचण्यासाठी आवश्यक असणारे इंश्युलीन निर्माण करू शकत नाहीत. तर टाईप-२ डायबिटीस मध्ये स्वादुपिंडात इंश्युलीनचं उत्पादन सुरु असतं पण ते पुरेसं नसतं.

साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर टाईप-२ मधुमेह होण्याचे प्रमाण जास्त असते. अलीकडे हि वयोमर्यादा ३५-३६ वयाच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपली आहे.

टाईप-२ मधुमेहाला कारणीभूत हि बऱ्याच प्रमाणात आपली जीवनशैली असल्याचे अभ्यासातून पुढे आलेले आहे. वजन जास्त असणं, शारीरिक हालचाली जास्त नसणं, समतोल आहाराचा आभाव यामुळे टाईप-२ मधुमेहाला आपण आमंत्रण देत असतो हे लक्षात असू द्या.

१. तळहात:

ऍक्युप्रेशर पॉईंट

चित्रात दाखवलेला ऍक्युप्रेशर पॉईंट ५ ते सहा मिनिटे दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने हलकेच मसाज करावा. याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होऊन मोठ्या आतड्यांच्या व्याधी नियंत्रणात ठेवता येतात.

२. हाताचे मनगट:

ऍक्युप्रेशर पॉईंट्स

चित्रात दाखवल्या प्रमाणे मनगटाच्या शेवटी, हाताच्या करंगळीच्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या या ऍक्युप्रेशर पॉईंट वर ५ मिनिट मसाज केल्यास हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते. आणि तणावपूर्ण जीवनशैली हे टाईप -२ डायबिटीस चे कारण असल्याने या ऍक्युप्रेशर पॉईंट ला मसाज करणे हे फायदेशीर ठरू शकते.

३. गुढघ्याच्या खाली:

ऍक्युप्रेशर पॉईंट्स

मधुमेह आणि पचनक्रियेचा जवळचा संबंध असतो. आणि चित्रात दाखवलेले ऍक्युप्रेशर पॉईंट्स हे पाचनक्रियेशी निगडित असतात. या पॉईंट्स वर रोज ५ मिनिट क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज मसाज करावा.

४. पाय:

ऍक्युप्रेशर पॉईंट्स

चित्रात दाखवलेले हे पॉईंट्स हायपरटेन्शन आणि अनिद्रा या त्रासांना नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. यावर ५ मिनिटे रोज क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज मसाज करावा.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

आरोग्यासंबंधित इतर लेख:

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

1 Response

  1. Sonawane Chandrakant bhau says:

    Pl.give treatment on backpain and spondalasis.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!