पुस्तकं म्हणजे सकस आहार! त्याचं मेनु कार्ड वाचा या लेखात

पुस्तकं

जे लोक हे नियमित घेतात, तेच ‘मेंटली फिट’ राहतात, ते कधीही चिंतेने, दुःखाने आणि काळजीने आजारी पडत नाहीत. पॉझीटीव्ह विचारांचं टॉनिक घेऊन सदा हसत, खेळत टुणटुणीत राहतात.

सुखी आणि आनंदी, यशस्वी माणसाच्या आयुष्यात ह्या चार गोष्टी असायलाच हव्यात म्हणे,…

1) सकस आहार
2) शुद्ध हवा
3) नियमित व्यायाम
4) शांत झोप.

पोट भरण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तर आपण रोजच जेवतो. पण अजुन एक खाद्य असतं, मेंदुला आणि आत्म्याला…. विचारांचं खाद्य…

जे लोक हे नियमित घेतात, तेच ‘मेंटली फिट’ राहतात, ते कधीही चिंतेने, दुःखाने आणि काळजीने आजारी पडत नाहीत. पॉझीटीव्ह विचारांचं टॉनिक घेऊन सदा हसत, खेळत टुणटुणीत राहतात.

आणि हे खाद्य पुरवणारा एक महत्वाचा स्त्रोत – पुस्तकं….

आपल्या घरातला सर्वात श्रीमंत आणि वजनदार कोपरा असतो, आपली लायब्ररी….जणु काही हे असतं आपलं रोजचं मेनु कार्ड…… समोर गेलं की विचारतं, बोला आज काय चाखणार?

मग सुरु होतो मजेशीर खेळ….

‘द सिक्रेट’ (👈 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा) समजवणाऱ्या जगप्रसिद्ध रॉन्डा बर्नची पुस्तकं, गरम गरम, वाफाळलेल्या, चवदार आणि पौष्टिक सुपसारखी असतात, आणि यात असतात ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ ची टेस्टी ब्रेड-क्रम्स, यांची चव दिर्घकाळ जीभेवर रेंगाळते…….एकदम एव्हरग्रीन…..

त्यानंतर मोर्चा वळतो, सलाडकडे, कांदा, काकडी आणि मोड आलेली धान्ये, आवडो न आवडो, रोज खायलाच हवी, अशी असतात,…..

अगदी अशाच कॅटॅगिरीत मोडतात, पैशाचं व्यवस्थापन आणि गुंतवणुक हाताळायला शिकवणारी पुस्तके… (👈 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा)

आणि ह्यांचा बेताज बादशाह असतो, रॅट रेस मधुन, बोट धरुन, अलगद बाहेर काढणारा, रॉबर्ट कियोसोकी… ह्याचं ‘रिच डॅड-पुअर डॅड’ (👈 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा) तत्वज्ञान आपल्या आर्थिक आयुष्याला सुदृढ बनवतं…. , उत्पन्नाचे पॅसिव्ह सोअर्स उभा करण्यासाठी आपल्याला एक्टीव्ह बनवतो…..

वरण-भात, चपाती हे पदार्थ तर रोजच खावे लागतात, कारण हे खाल्याशिवाय पोट भरत नाही, टि. हार्व एकर, रॉबर्ट शुलर आणि नेपोलियन हील यांची पुस्तकंही अशाच श्रेणीत मोडतात,……. मराठी प्रेरणादायी पुस्तके  (👈 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा)

यशस्वी कसं व्हायचं? असा प्रश्ण जगात सर्वात प्रथम ज्याने विचारला, त्या माणसाचं नाव नेपोलियन हील. आपलं संपुर्ण आयुष्य खर्चुन, त्याने एखाद्या सामान्य कुवतीच्या माणसाला, प्रचंड यशस्वी बनवणारी, यशाची साधी, सोपी सतरा तत्वं त्याने शोधुन काढली आणि शब्दबद्ध केली,

यशाचं तत्वज्ञान मागे ठेवुन तो गेला पण जाताना ह्या जगावर, त्याने मोठे उपकार केलेत.

जेवणामध्ये एखादी स्वीट डिश असते, जसं गाजराचा हलवा नाहीतर गुलाबजामुन,

हे खाल्लं, की समाधानाचा, तृप्तीचा ढेकर लगेच येतो, बरं का!….. म्हणुनच की काय यांच्याशिवाय जेवण पुर्ण मानलं जात नाही…. आध्यात्मिक विचारांची काही मराठी पुस्तके (👈 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा)

आजकाल युटुयुबवर अनेक मोटीव्हेशनल स्पीकर उपलब्ध झालेत, जसं की संदीप महेश्वरी, हि-मेश, विवेक बिंद्रा, साजन शाह, डॉ. स्नेह देसाई, सीकन चॅनेल आणि अशेच खुप सारे…. हे सगळे कडक कॉफीसारखं काम करतात.

 

मरगळलेल्या माणसाच्या मेंदुला जीवनात रोज नवी तरतरी देतात….नियमितपणे यांचं सेवन केलचं पाहीजे…पण यांचं व्यसन लागलं नाही म्हणजे झालं!….

न्युज पेपर, मासिकं, टिव्हीवरच्या ब्रेकिंग न्युज आणि ऑनलाईन बातम्या ही सगळी मंडळी जेवण झाल्यावर लागणाऱ्या बडीसोप सारखी चगळायची असतात आणि सोडुन द्यायची असतात, असली तरी आनंद आहे, आणि नाही भेटली तरी फार काही बिघडु नये अशी…..

जेवताना जे स्थान, ठेचा, लोणची आणि चटण्यांना असतं तेच स्थान आयुष्यात द्यावं, फेसबुक आणि व्हॉट्सएपला.

हे फक्त प्लेट सजवण्यासाठी आणि तोंडी लावण्यासाठी असतात. प्रमाणाबाहेर सेवन केलं की तोंडाची आग होते, आणि मग उगीच जास्त खाल्ल्याचा, पश्चातापही होत राहतो.

तर ह्या पुस्तकांनी आणि लेखकांनी मला खुप काही शिकवलं, आयुष्य सुखकर, रुचकर बनवलं, आत्मविश्वासानं जगायला आणि आयुष्यावर प्रेम करायला मदत केली,

असे पदार्थ आणि असंच रुचकर जेवण तुम्हालाही रोज मिळो, ह्या शुभेच्छांसह… Keep Reading… वाचत रहा !!

वाचनकट्टा...
वाचनकट्टा- नानाविध पुस्तकांचा…

 

 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. March 3, 2018

    […] धीरुभाई आव्या छे!…. पुस्तकं, लायब्ररी आणि मेनु कार्ड बहीरे व्हा, यशस्वी […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!