दातदुखीवर १० सोपे घरगुती उपाय वाचा ह्या लेखात

दातदुखी हा आपला छुपा शत्रू आहे.. हे म्हणायचे कारण असे की एकदा का दात दुखायला लागला की धष्ट पुष्ट पहिलवान सुद्धा अगदी लहान मुलासारखा रडू लागतो.

दातदुखीची व्यथाच इतकी असह्य असते..

दातदुखीची व्यथा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू होते.. कारणं बरीच असतात.

कोणाच्या हिरड्या मजबूत नसतात, त्यावर सूज असते किंवा हिरड्यात पू होतो, कोणाचे दात किडलेले असतात तर कोणाचे दात हायपर ऍसिडिटी मुळे अशक्त झालेले असतात..

पण ते एकदा दुखायला लागले की डोळ्यापुढे तारे चमकायला लागतात.. दात दुःखी वाढत गेली तर गालाच्या नसांपर्यंत पोहोचते, पुढे डोकेही दुखायला लागते, जबडा देखील हलवता येत नाही अशी अवस्था होते.

दातदुखीसाठी आपण ढीगभर पेनकिलरच्या गोळ्या आणून ठेवतो.. आणि दुखला दात की खा पेनकिलर असा सपाटा लावतो..

मात्र कधी डॉक्टरांकडे चौकशी करून पहा. हे अतिप्रमाणात खाल्लेले पेनकिलर्स अतिशय घातक ठरतात आपल्या शरीरासाठी.

मात्र कधी कधी दाताचे दुखणे इतके पराकोटीला पोहोचते की त्याशिवाय काही पर्यायदेखील उपलब्ध नसतो…

अर्थात दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे, ट्रीटमेंट घेणे, औषधे घेणे हे ओघाने आलेच.

मात्र दातांची ट्रीटमेंट हे खूप वेळखाऊ काम आहे.. त्यात पैसाही खूप घालावा लागतो..

ज्यांना दातांच्या खूप तक्रारी आहेत त्यांच्या तर दातांच्या दवाखान्यात वाऱ्या असतात.. दातदुखीला औषधा शिवाय पर्यायच नसतो.. म्हणून वेळीच औषध घेऊन वेदनादायक दातदुखी थांबवली पाहिजे..

टोकाची दात दुःखी असल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. पण कधीतरी क्वचित दातांचा त्रास होत असेल, किंवा रात्री अपरात्री अचानक दातात कळ येत असल्यास खालील घरगुती उपाय करून पहा:

१. मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे:

हलकीशी दातदुखी असेल तर किंवा दातांमध्ये काही अन्नपदार्थ अडकून दात दुखत असेल तर मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणे हा उत्तम उपाय आहे.

मिठाचे पाणी दातात अडकलेले अन्नकण सोडवते.. मीठ हे डिसइनफेक्टन्ट असल्यामुळे ते दातातील किटाणू मारते.. दातांच्या भोवताली जर सूज किंवा जखमा असतील तर त्या बऱ्या होण्यास देखील मिठाच्या पाण्याच्या चुळा भरल्यास मदत होते..

ग्लासभर कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घाला आणि दात घासून झाल्यावर ह्या पाण्याने खळखळून चुळा भरा.. दातदुखीतून लवकर आराम मिळेल..

२. हायड्रोजन पेरॉक्साईडने चुळा भरणे:

दातांवर प्लाक (किटण चढणे) असेल किंवा हिरड्यातून रक्त येत असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड च्या चुळा भरून घ्या. त्यामुळे हे बरे होईलच परंतु तोंडातील किटाणू, दातदुखी आणि सूज सुद्धा ह्याच्यामुळे बरी होईल..

हायड्रोजन पेरॉक्साईड वापरताना ते आधी पाण्यात मिसळून घ्यावे लागेल.. चमचाभर पेरोक्साईड तितक्याच पाण्यात मिसळायचे आणि चुळा भरायच्या..

किंवा ग्लासभर पाण्यात थोडेसे मिसळून चुळा भरायच्या. नंतर साध्या पाण्याने पुन्हा तोंड धुवून घ्या.. हे मिश्रण चुकूनही गिळायचे नाही…

३. बर्फाचा शेक:

खेळाडू दुखऱ्या मुकामारावर ज्याप्रमाणे बर्फाची बॅग ठेवून शेकतात त्याचप्रमाणे दुखऱ्या दातांचा इलाज शक्य आहे.

आईसबॅग किंवा एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दुखत असलेल्या दातांच्या बाहेरून शेक द्या..

बर्फाच्या थंडाव्याने तिथले रक्त गोठते आणि वेदना शांत होतात.. एक वेळेला २० मिनिटे तुम्ही हा शेक घेऊ शकता.. दुखणे कमी न झाल्यास पुन्हा काही तासांनी हा शेक घ्यायचा..

४. पेपरमिंट टी बॅग्स चा उपयोग:

हल्ली ग्रीन टीचे प्रस्थ वाढल्यामुळे ह्या टी बॅग्स घरात सहज उपलब्ध असतात. दातातील वेदना कमी करण्यासाठी आणि हिरड्यातील सेन्सिटीव्हीटी कमी करण्यासाठी पेपरमिंट फ्लेवरच्या टी बॅग्सचा उपयोग करता येतो.

वापरलेल्या, कोमट टी बॅगने दुखऱ्या भागावर शेक देणे किंवा वापरलेली ‘टी बॅग’ फ्रीज मध्ये ठेवून थंड करून त्याचा शेक देणे अशा प्रकारे ह्या बॅगचा वापर करून वेदना कमी करता येतात..

५. लसणीच्या कळ्या चावणे:

लसूण, जखम बरी करण्यासाठी वापरण्यात येणारा आयुर्वेदिक पदार्थ..!!

पूर्वापार बऱ्याच दुखण्यांवर गुणकारी म्हणून लसूण फेमस आहे.. लसूण बॅक्टेरिया मारायला जहाल औषध आहेच पण दातदुखीवर सुद्धा गुणकारी आहे…

लसणीची पेस्ट करून (त्यात थोडे मीठ मिसळून) ती दुखणाऱ्या दातावर लावावी किंवा कच्ची लसूण चावून त्याचा रस दुखणाऱ्या दातापाशी नेऊन ठेवावा.. दातदुखीवर लवकर आराम पडेल..

६. लवंगा किंवा त्याचे तेल:

लवंगेत युजेनॉल नावाचे अँटिसेप्टिक नैसर्गिक रित्या उपलब्ध असते. ह्यामुळे वेदनाशामक म्हणून हे वापरले जाते.. तसेच दातांच्या भवती आग होत असल्यास ती आग / जळजळ सुद्धा लवंग कमी करते..

लवंग तेलात कापसाचा बोळा बुडवून दुखणाऱ्या दातावर ठेवून द्यावा. हे दिवसातुन २-३ वेळेस करण्यास हरकत नाही.. किंवा एखादी लवंगसुद्धा चावून त्याचा रस दुखऱ्या दातापाशी नेऊन ठेवावा.. ह्याने निश्चितच दुखणे कमी होते.

वरील सगळे उपाय घरात बसल्या बसल्या करता येणे शक्य आहे.. अजूनही काही उपाय तुम्ही दात दुखीवर करू शकता मात्र हे पदार्थ घरात नसल्यास बाहेरून विकत आणून ठेवावे लागतील.

७. व्हॅनिलाचा रस:

व्हॅनिला आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.. केक, शेक ह्या साठी फ्लेव्हरिंग एजंट म्हणून वापरला जातो..

ह्याच व्हॅनिलाचा थोडासा रस (एक्सट्रॅक्ट) एक कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणाऱ्या दातावर काही काळ ठेवून द्यावा. व्हॅनिलाच्या रसात मद्याचे प्रमाण असल्याने दुखणारा भाग सुन्न होऊन, दुखणे कमी होते.. हे एक अँटीऑक्सिडंट म्हणूनही वापरले जाते..

८. पेरूच्या झाडाची पाने:

दातातील आगआग कमी करण्यास पेरूच्या झाडाची पाने उपयोगाला येतात. ह्यामध्ये अँटीमायक्रोबायल ऍक्टिव्हिटी घडत असल्याने तोंडातील बॅक्टेरिया घालवणे, दुर्गंधी घालवणे, दातदुखी कमी करणे अशा ओव्हरऑल सगळ्या कारणांवर हे उपयुक्त ठरते.

ताजी पाने चावून चावून रसाने चुळा भरणे किंवा उकळत्या पाण्यात पाने टाकून त्याचा काढा माऊथवॉश म्हणून वापरणे, अशा पद्धतीने पेरूची पाने तुम्ही तोंडाची काळजी घेण्यासाठी वापरू शकता..

९. व्हीटग्रास:

व्हीटग्रास चा ज्यूस खूप माणसे बारीक होण्यासाठी सकाळी सकाळी घेतात.. ह्यात अँटीऑक्सिडन्ट प्रॉपर्टीज आहेत.. तसेच हे व्हीटग्रास दातातील इन्फेकशन्स कमी करते आणि जळजळ कमी करते.

व्हीटग्रास मध्ये असलेले क्लोरोफिल तोंडातील बॅक्टेरियाना पळवून लावते. जो जुस आपण अँटीऑक्सिडन्ट म्हणून पितो तोच ज्यूस चुळा भरण्यासाठी वापरावा.. दातांच्या वेदना कमी होतात..

१०. थाईम चा वापर:

थाईम वनस्पती बऱ्याच कॉंटिनेंटल पदार्थात वापरली जाते. आपल्याकडे हो वनस्पती जास्त प्रमाणात आणि सहजा सहजी उपलब्ध होणार नाही हेही तितकेच खरे.

ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरिअल प्रॉपर्टीज असतात.

ह्या थाईमचे तेल जर तुम्हाला मिळू शकले तर ह्याचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन, त्यावर काही थेंब पाण्याचे मिक्स करून तो दुखणाऱ्या दातांवर ठेवावा. दातदुखीमध्ये लवकर आराम पडेल.

तसेच ह्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून माऊथवॉश बनवा. त्याने चुळा भरल्यास दातदुखी कमी होते.

हे सगळे उपाय अतिशय सोपे आहेत.. साध्या दातदुखी मध्ये आपण घरच्याघरी हे आजमावून पाहू शकतो..

मात्र अतिवेदना, हिरड्यात पू किंवा सूज असेल, दातदुखीमुळे ताप येत असेल, चावताच येत नसेल तर मात्र दातांच्या डॉक्टरकडे जाणेच योग्य ठरेल..

दातांचे दुखणे दुर्लक्षिल्यास त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात.. दात गमावण्याचीही पाळी येऊ शकते. मात्र गोड खाल्ल्यावर, जेवल्यावर चुळा भरणे.

दिवसातून दोन वेळा दात घासणे. माऊथवॉश ने चुळा भरून दात मजबूत ठेवण्यास मदत करणे. ह्या सगळ्या उपायांद्वारे तुम्ही दातांचे आयुष्य नकीच वाढवू शकता. दात हा देखील शरीराचा दागिनाच आहे.. ह्याला काळजीपूर्वक जपा..!!

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis ortreatment.

आरोग्यासंबंधित इतर लेख:

https://www.manachetalks.com/11572/acupressure-points-diabetes-hypertention-marathi-health-blog-manachetalks/

आपण आणि कोरोनाची भीती

Manachetalks
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “दातदुखीवर १० सोपे घरगुती उपाय वाचा ह्या लेखात”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय