आXत्मXहत्येच्या विचारांपासून दूर कसे राहता येईल, वाचा या लेखात

आत्महत्येच्या विचारांपासून दूर कसे राहता येईल

मनाच्या खंबीर असण्याबरोबरच, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन वेळीच यावर उपचार घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी जवाबदार असणारे डोपामाईन, एपिनेफ्रिन, सेरेटोनीन यांसारख्या न्यूरोरिसेप्टर्स चा केमिकल लोचा हेहि यामागचं खूप महत्त्वाचं कारण असतं म्हणून शरीराच्या डॉक्टरकडे जाताना जसा तुम्हाला संकोच वाटत नाही तसंच मनाच्या डॉक्टरकडे जाण्याची भीती बाळगण्याचं सुद्धा काहीही कारण नाही.

‘आXत्मXहत्येचे विचार’ इतके शक्तिशाली असतात की हसत्या खेळत्या आनंदी जीवाची जीवनयात्रा एका क्षणात संपवतात..

त्यांच्याशी लढा देणे फारसे सोप्पे नसते.. सुशांत सिंह राजपूत ह्या ३४ वर्षीय कलाकाराच्या अकाली जाण्याने आXत्मXहत्येचे विचार किती प्रबळ असतात हे पुन्हा अधोरेखित झाले आहे..

आत्महत्या केल्यावर स्वतःला कोणत्यातरी दुःखातून, त्रासातून, एकटेपणातून मुक्ती मिळेल अशी दुर्दैवी पण त्या वेळी सुखद वाटणारी भावना माणसाच्या मनात तरळते.

अशा वेळी आपल्या जाण्याने आपल्या लोकांवर काय परिणाम होईल ह्याचे भान सुद्धा रहात नसावे..

दुःख सहन न होणे आणि त्यातून स्वतःची सुटका करून घेणे ह्याच हेतूने माणूस क्षणार्धात आपले आयुष्य संपवून टाकतो.. आणि मागे ठेवतो परिजनांचा आक्रोश..!! जो त्या मृत देहाला दिसतही नाही आणि कळतही नाही.

आXत्मXहत्या केली आणि जीव गेला की कसलीच मोहमाया नाही आणि कशाचा पस्तावा ही नाही..

पण असा अनैसर्गिक मृत्यू काय कामाचा..?? का आपण स्वतःला ह्या मृत्यूच्या दारी न्यावे..?? का आपल्या प्रेमाच्या माणसांना आयुष्यभर पुरेल असे दुःख देऊन जावे..?

हे आXत्मXहत्येचे विचार खूप घातक असतात. ह्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करता कामा नये. तुम्हीही कधी काळी आशा विचारातून गेला असाल किंवा सध्या जात असाल तर ह्या मुद्यांकडे लक्ष द्या.

कोणी मदतीला येईल किंवा नाही पण स्वतःची मदत स्वतःच करायला हवी. घरात कोणी असे नैराश्यात असेल तर त्याची काळजी घ्यायला हवी..

ह्या आXत्मXहत्येच्या विचारांपासून दूर राहायचंय सगळ्यांनीच. मग त्यासाठी हे करा..

१. सगळ्यात आधी स्वतःला घातक गोष्टींपासून दूर ठेवा

जर आपल्या मनात खूप काळ आXत्मXहत्येचे विचार घोळत असतील तर ते काही विशिष्ट वेळी उफाळून येतात. आपण कधी गॅलरीत उभे असू किंवा आपल्या हातात ब्लेड, चाकू अशा पोटेन्शिअली घातक ठरणाऱ्या गोष्टींच्या सानिध्यात मन आपल्याला पुन्हा नैराश्येकडे खेचते..

अचानक त्या वाईट भावना उफाळून येतात.

अशा वेळी आपण एकटेच असू तर आपल्याला सावरायला कोण येणार..? त्यामुळे नकारात्मक भावनांच्या आहारी न जाता स्वतःला सावध करा..

ज्या गोष्टीतून आपला जीवाला हानी आहे अशा गोष्टींपासून दूरच राहा..

जास्तीच्या औषधांच्याअ गोळ्या, हत्यारं कोणाला तरी व्यवस्थित ठेवून द्यायला सांगा.. किंवा तुमच्या घरात कोणी सुXसाXयडल टेंडेन्सी असणारे असेल तर त्याच्या पासून सगळे दूर ठेवा..

शरीराला व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा होऊ द्या. थोडा प्राणायाम करा..

अर्थात प्राणायामाची सवय रोजच्या रोजच करा.. ह्याने तुमची मनःशांती वाढेल.. आणि नकारात्मक विचार दूर व्हायला मदत होईल.. हवे तर स्वतःला थोडे रिलॅक्स करा.. हाताचा, खांद्याचा, तोंडाचा व्यायाम करा..

शक्य झाल्यास रिलॅक्सिंग मसाज घ्या..!!

३. स्वतःचे ध्येय काय आहे ह्याचा पुनर्विचार करा

कोणतेही ध्येय साध्य करायचे म्हणजे अडचणींचा पहाड येणारच.. पण त्यातून खचून थांबलो तर आपल्याला नैराश्य जखडून टाकणार..

जो थांबला तो संपला.. त्यामुळे आपल्याला थांबायचे नाही.. छोटा ब्रेक घ्या हवं तर.. पण डोन्ट गिव्ह अप..!!

आपल्या ध्येयाकडे स्वतःचे मन रीफोकस करा. त्यामुळे आपल्याला पुढे काय काय करायचे आहे ह्या विचारात मन गुंतत जाते आणि नकारात्मक विचारांना बाहेरचा रस्ता धरावा लागतो..

स्वतःला शांत करणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा.. डोळे मिटून आपला संघर्ष आठवा.. आज पर्यंत हट्टाने किती गोष्टींवर पाणी सोडून आपण इथवर पोहोचलो आहोत..??

मग ते सगळे कष्ट एका क्षणात धुळीस मिळवायचे का..? नाहीच मुळी.. आपण ज्या जिद्दीने सारे मिळवले आहे त्याची मजा घ्यायला सुद्धा पुढचे आयुष्य जगता आले पाहिजे..

४. मनातली उद्विग्नता बाहेर येऊ द्या

दुःख सगळ्यांनाच असते. आपले दुसऱ्याला सांगून त्यांचे दुःख कशाला वाढवायचे असे समजून आपण गप्प बसून राहतो..

किंवा बरेचदा आपले दुःख किंवा अडचण इतरांना सांगायला माणूस धजावत नाही. आपली अडचण इतरांना सांगितली तर ती जगजाहीर होईल याचीहि भीती वाटते. नाहीतर इतकं विश्वासार्ह माणूसच जवळ नसतं.

आपल्या मनातली उद्विग्नता, सल, एकटेपणा आपल्याला आतच पोखरत राहतो. आणि शेवटी खाऊनही टाकतो.

यासाठी नेहमीच डायरी लिहिण्याची म्हणजेच स्वतःशी संवाद करण्याची सवय आपल्याला असू द्या. कोणाशी तरी बोलून मन हलके करण्याचा पर्याय जेव्हा समोर दिसत नसेल तेव्हा उद्विग्न करणारे विचार डायरीत लिहून काढा.

किंवा डायरीत लिहून त्या जतन केल्या जाऊ शकणाऱ्या डायरीवर सुद्धा विश्वास ठेवायची हिम्मत होत नसेल तर होणारा त्रास एका कागदावर लिहून काढा आणि त्या कागदाचे हातानेच फाडून तुकडे तुकडे करून टाका.

बरेचदा अशा काही कृती करताना घातक विचारांना ब्रेक लावणं जमू शकतं. कोणीच नसेल तर हेल्पलाईन वर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोला..

आपली भीती, आपल्या नकारात्मक भावना ह्या बाहेर आल्या पाहिजेत. त्यावर तोडगा काढला पाहिजे. म्हणजे आपले मन पुन्हा नवीन आनंद भरून घ्यायला साफ होते, शुद्ध होते.

५. आपण नैराश्येतून लवकर बरे होऊ हा विश्वास ठेवा आणि वाढवा

डिप्रेशन हा फक्त मानसिक आजार आहे.. आणि कोणताही आजार हा ट्रीटमेंटनंतर बरा होतोच.. मग ह्याला जीवघेण्या पातळीवर का घेऊन जावं..?? आपल्या सुंदर आयुष्याची का अवहेलना करावी..??

नक्कीच नाही.. हे नैराश्य, डिप्रेशन ह्यावर भरपूर उपाय आहेत.. एकटेपणावर तोडगा निघू शकतो.. फक्त तुमचा विश्वास असला पाहिजे..

अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन वेळीच यावर उपचार घेणं गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी जवाबदार असणारे डोपामाईन, एपिनेफ्रिन, सेरेटोनीन यांसारख्या न्यूरोरिसेप्टर्स चा केमिकल लोचा हेहि यामागचं खूप महत्त्वाचं कारण असतं म्हणून शरीराच्या डॉक्टरकडे जाताना जसा तुम्हाला संकोच वाटत नाही तशीच मनाच्या डॉक्टरकडे जाण्याची भीती बाळगण्याचं सुद्धा काहीही कारण नाही.

आपण आपल्या आयुष्यात जे काही करायचे ठरवले आहे त्यासाठी आपण जगणे महत्वाचे आहे ह्यावर विश्वास ठेवा.

हे नैराश्य जीवनाचा एक भाग आहेत.. संपूर्ण जीवन नव्हे.. ह्यावर उपाय योजना केल्यावर हा भाग आयुष्यातून लवकर निघून जातो. आणि आयुष्याच्या सुंदर रस्त्याला आपण पुनश्च लागतो.. हा विश्वास वाढवा..

जे आXत्मXहत्येसारख्या विचारातून तरुन गेले त्यांनी त्यांच्या आयुष्याचे सोने केले. अशांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवा.. स्वतःच्या आयुष्याला खंबीरपणे धरून ठेवा.. अगतिक न होता स्वतःला सांभाळा..

दुःख, नैराश्य आणि त्यानंतर येणारा आनंद हे ऊन पावसा प्रमाणे येत असते आणि जातही असते.. त्यासाठी आपले अनमोल जीवन संपवण्यात काहीही हाशील नाही दोस्तांनो..!!

आपल्याला नियती नैसर्गिकपणे नेई पर्यंत, हा आपल्या जिंदगानीचा सुहाना सफर जगता आला पाहिजे..

मित्रांनो, मृत्यू झटक्यात येतो.. क्षणाचाही वेळ लागत नाही.. मात्र आयुष्य खूप मोठे असते.. ते जगण्यात मजा आहे..!!

प्रत्येकाच्याच आयुष्यात काहीतरी कमी काही जास्त असतंच ना!!

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता|
कभी जमीं तो कभी आसमाँ नहीं मिलता….

https://www.manachetalks.com/11560/9-ways-to-live-life-in-life-cresis-marathi/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!