कठीण काळात आशावादी राहण्याचे तीन नियम

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये बरेचदा असं काही होतं कि आशेचा धूसरसा किरण सुद्धा नजरेच्या टप्प्यात येत नाही.

सगळं काही तुमच्या मनाच्या विरुद्ध घडतं, काहीच चांगलं होत नाही… एक अडथळा पार केला की दुसरा अडचणींचा डोंगर आ वासून समोर उभा असतो.

ही अडथळ्यांची शर्यत पार पाडता पाडता निराशा मनात पक्कं घर करून राहायला लागते…

वैयक्तिक आयुष्यात सर्वांनाच आशा-निराशेच्या चक्रातून जावे लागते… आणि वाईटच घटनांचा रतीब जर सुरू असेल तर आशावाद टिकवून ठेवणं अशक्य कोटीतली गोष्ट होऊन जाते.

गेल्या तीन चार महिन्यांपासून पूर्ण जगभरच निराशेचं मळभ चढलेलं आहे.

मार्च महिन्यात वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोविड १९ ला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं.

तेव्हापासून कधीही न पाहिलेला न ऐकलेला आणि विचारही न केलेला लॉकडाऊन तुमच्या आमच्या जगण्याचा भाग बनला.

कामं, उद्योग धंदे बंद झाले, कित्येक जणांना नोकरी राहील की नाही याची सुद्धा शाश्वती राहिली नाही.

कधी नाही ते वर्क फ्रॉम होम सुरू झाले, शाळा म्हणजे ऑनलाइन शाळा हा पर्याय समोर आला…

कित्येक मोठेच्या मोठे लोंढे पायी चालून घरी पोहोचणे गरजेचे समजून जीवन-मरणाची लढाई लढायला तयार झाले.

तर काही कलाकारांच्या आजारपणातील मृत्यूने निराशेचे ढग दाट केले…

आणि आता सुशांतसिंग राजपूत च्या आत्महत्येने, निराशा टोकाला गेली तर कोणते भीषण रूप घेऊ शकते. या विचाराने सर्वांनाच हादरवले…

सुशांतसिंग राजपूत च्या मृत्यू नंतर बाहेर आलेल्या काही गोष्टींमुळे समाजातल्या एका प्रस्थापित गटाने ‘ऑड’ म्हणून बाहेर काढलेल्या ठराविक लोकांवर पद्धतशीर पणे लादली गेलेली निराशा सुद्धा पुढे आली.

हे बॉलिवूडच नाही तर प्रत्येक क्षेत्र, इतकंच काय समाजातले वेगवेगळे घटक सगळ्याच बाबतीत लागू होते.

आता अशा परिस्थितीत कस लागतो तो आशावाद टिकवून ठेवण्याचा…

या लेखात कठीण परिस्थितीत आशावादी राहण्यासाठी काय करावे त्याबद्दल बोलू…

१) हे लक्षात घ्या कि प्रत्येक घटना काहीतरी शिकवण देण्यासाठी घडते.

हे लक्षात असू द्या कि कठीण काळाचे घाव जर तुमच्यावर पडत असतील तर गरज असते ती थोडं फिलॉसॉफिकल होण्याची.

निराशाजनक काळाला सामोरं जाण्याची वेळ आली तर त्याचा अर्थ असा अजिबात नाही की आता यापुढे काहीही चांगले होणार नाही.

निराशाजनक काळात आलेली प्रत्येक अडचण ही तुम्हाला काहीतरी शिकवून जाते.

बघा आजारातून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा स्वतःच्या शरीराची जास्त काळजी घ्यायला तुम्ही शिकता….

मागे मी एका मोटिवेशनल स्पीकरचा इंटरव्ह्यू ऐकला होता.

ती व्यक्ती विक्रीव्यवसायात काम करायची. पण आपल्या या कामात आपल्याला मजा येत नाही हे समजल्यावर त्यांनी निराश न होता स्वतःवर अभ्यास करून स्वतःला ओळखले आणि आपले करियर विक्रीत नसून वेगळेच काही असू शकते याचा अचूक शोध घेतला.

आणि आज ती व्यक्ती एक यशस्वी ट्रेनर म्हणून मनासारखे काम करते.

म्हणून निराशाजनक काळ आला तरी त्यातून धडा घेऊन तावून सुलाखून निघण्याचं पहिलं कसब अंगी बणाल तर निराशा स्वतःच तुमच्या पासून चार हात लांब राहील…

२) तुमच्याच जुन्या काळातल्या अडचणी आठवून बघा

कधीही जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तर असं कधी होत नाही ना, की या आधी कधी अडचण तुमच्यावर आलीच नाही…

हो, लहानपणी पाहिलं पाऊल टाकताना जी अडचण आली असेल, तुम्ही जे अडखळला असाल, ती फक्त तुमच्या आयुष्यातली पहिली अडचण असेल… बरोबर ना!!!

मग ही अडचण आली तेव्हा पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवला का?

नाही ना!!

पडलं, अडखळलं तरी उत्साहाने परत पुढचं पाऊल टाकलंच… मग आता ते का नाही जमू शकणार…

तो उत्साह जरी आता टिकून राहिला नसला तरी जुन्या अडचणी, त्यावर तुम्ही केलेली मात हे सगळं आठवून बघा….

निराशाजनक काळात स्वतः ची कीव करत बसू नका… उलट पेटून उठा…

निराशाजनक परिस्थितीवर मार्ग काढा… निराशाजनक परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी काही वेळा तुम्हाला अग्रेसिव्ह सुद्धा व्हावे लागेल.

गरज पडलीच तर आक्रमक होऊन मार्ग काढा पण स्वतःची कीव करू नका…

तुम्ही स्वतःची कीव केली तर, जग तुमची कीवही करणार नाही आणि मदतही करणार नाही.

३) जर तुम्ही काही गोष्टी बदलू शकत नसाल तर त्या स्वीकारा

कधी कधी बदल हे अशक्य आणि जास्त घातक किंवा परिस्थिती जास्त चिघळवणारे असतात.

बदल करण्यात तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती पणाला लागण्याचीच शक्यता जास्त असते. बदल तुम्हाला झेपणार असतील तरच ते करा..

आणि जर ते झेपणारे नसतील अशा वेळी सर्व शक्यतांची पडताळणी करून प्रवाहा बरोबर चालण्याची स्वतःची तयारी ठेवणं हे कधीही चांगलं…

पण असं करताना प्रवाहाबरोबर चालण्यासाठी शरणागती पत्करावि का? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर अशा वेळी बदल स्वीकारला तरी त्यामध्ये स्वतःचा कम्फर्ट झोन मात्र कधीही गमवायचा नाही हे लक्षात ठेवा…

या तीन महत्त्वाच्या सूत्रांशिवाय सकारात्मकता, आत्मविश्वास यांची जोड असेल तर निराशा तुमच्या आसपास भटकणार सुद्धा नाही.

थोडक्यातच लेख संपवते… लेख कसा वाटला ते कंमेंट्स मध्ये सांगा…

हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “कठीण काळात आशावादी राहण्याचे तीन नियम”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय