डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात या सात गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे

हे नोट केलंय का कधी, की आपण कुठल्या कामात बिझी असो व नसो पण आपले डोळे मात्र सारखे कामात व्यस्त असतात…
तुम्ही झोप घेणार, तेवढाच काय तो तुमच्या डोळ्यांना आराम…
आपले स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटर यावरचे बारीक फॉन्टस, असो नाहीतर इमेज असो, ते सतत बघण्याची आपली सवय झालेली असते.
इतका ताण ज्या डोळ्यांवर पडतो त्यांच्यासाठी सकस आहार असणं तितकंच महत्त्वाचं
म्हणून आज या लेखात डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात कोणकोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असावा याबद्दल बोलू…
त्याशिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी यापूर्वी लिहिल्या काही लेखांच्या लिंक्स सुद्धा येथे दिलेल्या आहेत.
अधिक माहितीसाठी ते लेख सुद्धा तुम्हाला वाचता येतील…
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात काय समाविष्ट असावे..
१) शेंगदाणे:
शेंगदाणे, काजू यांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ‘इ’ चे प्रमाण उत्तम असते…
ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ‘इ’ हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
म्हणून काजू, शेंगदाणे यांचा आहारात समावेश असावा.
२) सब्जा, जवस (Flax Seeds) ही बियाणे:
ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ‘इ’ असलेले सब्जा आणि आळशीची बियाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. किराणा दुकानात किंवा काही ऑनलाइन स्टोअरमध्ये सुध्दा ती मिळू शकतात.
Raw Calcium Rich Chia Seeds (सब्जा) For Weight Loss
हा सब्जा कसा खावा असा प्रश्न बऱ्याच जणांना असतो..
याशिवाय Flax Seed म्हणजेच जवसाची चटणी केली जाते. जवसाचे तेल सुद्धा काढले जाते.
३) लिंबूवर्गीय फळे:
लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ हे मोठ्या प्रमाणात असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ चे शरीरातले प्रमाण संतुलित असणे खूप गरजेचे आहे.
यामध्ये लिंबू, संत्री यांचा समावेश असतो.
४) पपई:
डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीराला ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक असते.
पपई, गाजर या फळांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
५) हिरव्या पालेभाज्या:
पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असणारे ल्युटीन, हे मोतीबिंदू तसेच रातांधळेपणा पासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरते.
७) रताळी:
गाजराप्रमाणेच बिट, रताळे यांसारखी कंदमुळं डोळ्यांच्या आरोग्यासाठी साठी परिणाम कारक असतात.
यांशिवाय दूध, अंडी, मासे याचा आहारात समावेश असणे हे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे…
खालील काही लेखांमध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी इतर काही मुद्दे दिलेले आहेत.
https://www.manachetalks.com/11703/how-to-take-care-of-eyes-while-learning-online-marathi/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा