मेडिटेशन – स्वतःची स्वतःशी अपॉइंटमेंट

बुद्धी, मन, शरीर यात सतत चालु असलेले conflict सोडवणं म्हणजे मेडिटेशन, कसं ते समजून घ्या या लेखात…

बहुतेकदा मेडिटेशन या शब्दाची किँवा क्रियेशी आपण गल्लत करून बसतो… उपनिषद आणि पातंजल योग वाचले आणि समजुन घेतले तर मेडिटेशन चा अर्थ समजायला नक्कीच मदत होते.

मेडिटेशन या शब्दाचा अर्थ आहे चिंतन ?

चिंतन का आणि काय करायचं हे एकदा कळलं की मेडिटेशन करणे सोपे होऊ शकते.

सतत आपण म्हणत असतो, मला हे आवडते, मला ते आवडत नाही, मी असं केलं, माझं डोकं दुखतं… मला त्रास होतो… अशी अनेक उदाहरणं देता येतील…

तर या सगळ्या मध्ये “मी” म्हणजे कोण ?

स्वतः मधला “मी” शोधणे हे सगळ्यात महत्वाचे मेडिटेशन …

बहुतेकदा मी म्हणजे हे ‘शरीर’ असं आपण समजुन बसतो… पण लक्षात घ्यायला हवे की, मी म्हणजे शरीर नक्की नाही, कारण एखादी व्यक्ती गेल्या नंतर अंत्यसंस्कार होई पर्यन्तचा जो काळ असतो (काही तासा पासुन कधी एक दोन दिवसा पर्यंत) त्या व्यक्तीचे शरीर आपल्यात असते, तरी आपण म्हणत असतो “क्ष” व्यक्ती गेली .. याचा सरळ अर्थ आहे “मी” म्हणजे शरीर नाही

मग मी म्हणजे ‘जीव’ का ?

हे पण खरं नाही, बरेचदा मृत्यु नंतर अवयदान करतात… जीव गेला म्हणायचे तर, त्या अवयवात जीव असल्या मुळेच दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपण होते ना?

मग मी म्हणजे ‘मन’ का?

नाही हे पण खरं नाही.. कारण मन म्हणजे विचार… आपण जर का आपले विचार व्यवस्थित पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल, आपले बहुतेक (सगळे नाही) विचार पंचेंद्रियांशी निगडित असतात…

म्हणजे काय तर विचारात पण सतत काही तरी पाहात असतो, ऐकत असतो, अनुभवत असतो…. इंद्रिय म्हणजे शरीर, मग शरीर नसेल तर, इंद्रिय नाहीत आणि इंद्रिय नसतील तर मन कुठून आले? म्हणुन “मी” म्हणजे मन पण नाही..

म्हणुनच मी म्हणजे फक्त आत्मा..

आत्मा – जीव – मन – इंद्रिय – देह (शरीर)…. अशी ती रचना असते पण आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण “मी” म्हणजे शरीर या गैरसमजुतीत अडकुन बसतो… आणि स्वतः मधले “मी” पण हरवुन जातो..

म्हणुनच स्वतःची स्वतः शी असलेली अपॉइंटमेंट म्हणजेच मेडिटेशन….

कुठल्याही नात्यात जेंव्हा आपण वेळ देतो तेंव्हा ते नाते एका वेगळ्या उंचीवर पोहचते आणि मग छोटे मोठे conflicts सहज सोडवले जातात…

हेच लॉजिक स्वतः मध्ये पण लावायला हवे… बुद्धी, मन, शरीर यात सतत conflict चालु असतात…

याना एकत्र आणणे आणि conflict management करणे म्हणजेच मेडिटेशन…

आपण एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला भेटण्या पुर्वी जशी तयारी करतो ना तशीच या अँपॉईंट्मेंटची तयारी करायची असते….

बिझिनेस डील जेव्हढ मोठं तेव्हढी तयारी जास्त आणि तितकाच जास्त वेळ ते डिल ब्रेक व्हायला लागणार, हा नियम इथे पण लागु होतो…

हे एकदा लक्षात आले की सगळं थोडं सोपं होतं…

लेखन: बिपीन कुलकर्णी

बिपीन कुलकर्णींच्या ब्लॉग मधील इतर लेख:

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मेडिटेशन – स्वतःची स्वतःशी अपॉइंटमेंट”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय