मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)

business-expansion-how-to-go-about-planning-

ता.क.-  हि राजकारणाने प्रेरित होऊन केलेली पोस्ट नाही. वाचक माहितीसाठी हे वाचू शकता. 

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan) देशभरातील छोट्या व्यावसायिक युनिट्सच्या आर्थिक  गरजा भागविण्यासाठी एक उत्तम विकल्प ठरत आहे. या योजने अंतर्गत व्यवसायाचा आकार आणि टप्पे यानुसार तीन विकल्प उपलब्ध करून दिले आहेत ज्याअंतर्गत व्यावसायिक आपल्या व्यवसायाची गरज बघून अर्ज दाखल करू शकतात.

मुद्रा कर्जाचे तीन प्रकार

व्यवसायाच्या आकारानुसार खाली दिलेल्या तीन प्रकारात अर्ज दाखल करता येऊ शकतो.

१) शिशू कर्जा अंतर्गत रु.५०,००० पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
२) किशोर कर्जा अंतर्गत रु. ५०,००० ते ५,००,००० रु. दरम्यानच्या रकमेचे आर्थिक साहाय्य दिले जाते .
३ ) तरुण कर्जा अंतर्गत रु.५,००,०००  ते १०,००,००० रुपये दरम्यानच्या रकमेची आर्थिक मदत दिली जाते

शिशु कर्ज प्रामुख्याने व्यवसायाच्याची सुरुवात करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे तर किशोर कर्ज ज्या व्यावसायिकांनी व्यवसाय सुरु केलेला आहे पण तो प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम करण्याच्या विचारात आहेत त्या व्यावसायिकांसाठी उत्तम आहे. तरुण कर्ज हे प्रस्थापित व्यवसायाच्या वृद्धी साठी घेतले जाऊ शकते.

अर्जदार/संस्थांसाठी मुद्राकर्जाचे पात्रता मापदंड

शेती व्यवसायाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही व्यवसायासाठी १० लाखांपर्यंतचे कर्ज प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत घेतले जाऊ शकते.

मुद्रा कर्जासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका, राज्य सहकारी बँका (Co-Operative Bank), मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स (Micro Finance Institutions), नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांमध्ये अर्ज केला जाऊ शकतो. कर्ज देणाऱ्या संस्था खालील बाबींची पूर्तता करू शकल्या पाहिजेत जेणेकरून सदर संस्थेत मुद्रा योजना कार्यान्वित केली जाऊ शकते.

१) सादर व्यवसायातून ३ वर्ष नफा झाला आहे का?
२) ३% पेक्षा जास्त अनुत्पादक मालमत्ता नसावी.
३) भांडवल व जोखिमेचे प्रभावी मालमत्ता प्रमाण किमान ९% असावे.
४) एकूण मालमत्ता किमान रुपये १०० करोड इतकी असावी.

मुद्रा कर्जाची प्रोसिजर आपण पुढील लेखात समजावून घेणार आहोत. तसेच त्यासाठी लागणाऱ्या अर्जाची PDF सुद्धा त्या लेखात देत आहोत.

वाचकांना काही शंका असल्यास लेखाखाली अभिप्राय स्वागतार्ह आहेत.  तसेच मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर सुद्धा आपले शंकासमाधान केले जाईल.

4 thoughts on “मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)”

  1. Fantastic site. A lot of useful information here. I am sending it to a few friends ans also sharing in delicious. And obviously, thanks for your effort!

  2. नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्या संदर्भात बोलन्या साठी कुणाचा कॉन्टेक्ट नम्बर मिळेल का??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.