तिची ही होळी

sas banhu naughty

खरे तर कोणताही सण जवळ आला की तिची चिडचिड सुरू व्हायची. मुले स्वतःचे पहायची त्यांचे मित्रमैत्रिणी यातच रमून जायची. तर नवरा कामावर असायचा. चुकून घरी राहिला तर घराबाहेर पडायचा नाही. त्यात सासूची कटकट आहेच. सासू बिछान्यावर झोपूनच होती. सारखी बेल मारून बोलवायची आणि खुणा करून कामे सांगायची. तशीही तीच तिची मैत्रीण होती. मनातल्या सर्व गोष्टी तिला सांगून टाकायची.

काल होळी झाली आणि आज रंगपंचमी. मुले सकाळीच बाहेर पडली होती आणि नवरा अजून उठला नव्हता. हिची धुसफूस सुरू झाली. “हे आवरण्यातच आयुष्य जाणार ….. कसलेच सण साजरे करता येत नाहीत”. अशी पुटपुटतच सासूच्या खोलीत शिरली. सासूचा पडलेला चेहरा पाहुन तिला काल रात्रीच्या घटनेची आठवण झाली.

रात्री पुरणपोळ्या केल्या होत्या. सवयीने ती सासूला भरवायला गेली.तितक्यात नवरा ओरडला “कसल्या पुरणपोळ्या भरवतेस तिला… ?? चालत नाही माहितेय ना …?? उगाच काय झाले म्हणजे.. ?? पथ्य पाळा जरा..”एक क्षणात सासूचा चेहरा पडला. मुकाट्याने बाकीचे घास गिळून ती झोपी गेली होती.

तिला सासूबाईंचा चेहरा पाहून कसेतरीच झाले. तिरमिरीत ती मागे फिरली आणि एक ताटात दूध आणि पुरणपोळी घेऊन आली. “अरे म्हातारी काही एका पुरणपोळीने मरणार नाही. आणि अशी जगुन तरी काय करणार आहे. त्यापेक्षा मनासारखे खाऊन पिऊन जगू दे तिलाआणि काही झाले तरी मलाच करावे लागणार तिचे….तसेही मीच करतेय ना ..? हौसेने पोळी खाईल आणि खुश होईल”. असे मनात बोलत तिने तिला उठवले. तिच्या हातातली पुरणपोळी आणि दुधाची वाटी पाहून सासूबाईचे डोळे चकाकले. एका लहान मुलासारखे निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरले. हातानेच छान अशी खूण करीत तोंडाचा आ वासाला. तिचे हावभाव पाहून हिला खुदकन हसू आले. मनातला संताप कुठच्या कुठे पळाला.
पुरणपोळी खातखात थरथरत्या हातानी सासूबाईंनी बाजूच्या टेबलातील ड्रॉवरमधून गुलालाची पुडी काढली. चार बोटे गुलालात बुडवून तिने हिच्या गालावर ओढले आणि बोटे ओठाजवळ नेऊन मुका घेतला. क्षणभर हिच्या लक्षात काही आलेच नाही. काहीवेळाने दोन अश्रू हिच्या डोळ्यातून ओघळले. सासूबाईंनी थम्सअपची खूण करीत हॅपी होळी केले. मग हिनेही अश्रू पुसत गुलालाची चार बोटे सासूबाईंच्या गालाला लावली आणि डोळे पुसतच खोलीबाहेत पडली.

स्वयंपाकघरात भांडी धुताना अचानक मागून हिच्या कमरेभोवती हाताचा विळखा पडला आणि कानाशी चिरपरिचित आवाज आला “हॅपी होळी”. नवऱ्याचा आवाज ऐकून ती मोहरून उठली. हळुवारपणे त्याने तिच्या चेहऱ्यावर गुलाल फासला. खरेच यावर्षीची होळी तिच्यासाठी अविस्मरणीय होती.

वाचण्यासारखे आणखी काही…..

धीरुभाई, धीरुभाई आव्या छे!….
पुस्तकं, लायब्ररी आणि मेनु कार्ड
बहीरे व्हा, यशस्वी व्हा!…

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!