जाणून घ्या, रोजच्या आहारातला घटक असलेल्या आल्याचे फायदे आणि तोटे ही

जाणून घ्या, रोजच्या आहारातला घटक असलेल्या आल्याचे फायदे आणि तोटे ही..!!

आल्याचा फक्कड चहा प्यायल्या शिवाय आपला दिवस सुरू होत नाही. चहा आणि इतर पेयात वापरले जाणारे आले भारतीय जेवणाचा सुद्धा अविभाज्य भाग आहेत. शाकाहार आणि मांसाहारातील सगळे चमचमीत पदार्थ आल्याशिवाय बनतच नाहीत.

भारतामध्ये आयुर्वेदात आल्याला खूप महत्व आहे.. वाळवलेल्या आल्यापासून बनणारी सुंठ पूड खुपश्या आयुर्वेदिक चूर्ण आणि काढ्यात वापरली जाते. लहान मुलांना सुद्धा मळमळीवर आले, लिंबू, साखर ह्याचे चाटण दिले जाते.

ह्या गुणकारी आल्याचे अजून काय काय फायदे आहेत ते आज पाहू.

१. आले हे नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे:

आल्याचा रस किंवा वाळवलेल्या आल्याची सुंठ पूड शरीरासाठी एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. आपल्या शरीरात बरेच विषारी पदार्थ तयार होतात ते आपल्या पांढऱ्या पेशींना जी क्षति पोचवतात ती भरून काढण्याचे काम आले करते.

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यास आल्याची मदत होते. ह्यासाठी सकाळी ‘जिंगर ग्रीन टी’ घेतल्यास उत्तम.

२. ऍलर्जी होऊ नये म्हणून आल्याचा उपयोग होतो:

बऱ्याचश्या ऍलर्जीवर आले हे औषध आहे. अँटी एलर्जीक औषधात मोठ्या प्रमाणावर आल्याचा उपयोग केलेला आढळतो.

तसेच सूज येणे, अर्थरायटीसची औषधे ह्यातही आल्याचा अँटी इनफ्लेमेटरी म्हणून समावेश असतो.

३. वेदना हारक आले (म्हणजेच पेन किलर):

आल्याच्या सेवनाने शरीरातील अंतर्गत दुखणी कमी होतात. गुढगेदुखी, व्यायामाने, खेळाने झालेली स्नायूंमधील दुखणी ह्यावर आल्याचे सेवन रामबाण उपाय आहे.

४. हृदयाच्या स्वास्थ्यास उत्तम आले:

हृदयावर कोलेस्टेरॉल मुळे अतिरिक्त ताण येतो. धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचते आणि रक्तदाब वाढतो. ह्याचे प्रेशर हृदयावर येते.

हे हानिकारक कोलेस्टेरॉल शरीरातून कमी करण्यास आल्याचा उपयोग होतो. कोलेस्ट्रॉल कमी तर रक्तदाब नॉर्मल आणि पर्यायाने हृदय सुद्धा एकदम मजबुत..!!

५. डायबेटीसवर गुणकारी आले:

२० दिवस सातत्याने आल्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित व्हायला मदत होते. डायबेटीसच्या रुग्णांनी हे जरूर करून पाहावे. (संदर्भ: Bhandari et al, 2005)

६. कॅन्सरसारख्या रोगावर प्रभावी:

कॅन्सर तसा जिवघेणाच रोग आहे. पण पहिल्या स्टेज मधल्या कॅन्सरवर आयुर्वेदिक औषध म्हणून आले वापरले जाते.

त्यांच्यातले बायोऍक्टिव्ह घटक आणि उग्र दर्प आणि चव कॅन्सरचा शरीरात होणारा प्रसार रोखतात.

७. जठर, यकृत आणि मूत्राशयाच्या व्याधींवर प्रभावी:

पोटाच्या तक्रारी, यकृतातील (लिव्हर) त्रास आणि मूत्राशया (किडनी) संदर्भातील व्याधींवर आले अत्यंत गुणकारी आहे. मळमळ, उलटी ह्यातून आल्याचे चाटण सुटकारा देते.

गॅस धरणे, अपचन, हेवी औषधांमुळे यकृतामध्ये झालेल्या जखमा किंवा किडण्यांवरील सूज ह्यासाठी घरगुती उपाय म्हणून आल्याचे सेवन करावे.

‘व्हिटॅमिन इ’ सोबत आले असे मिश्रण घेतल्यास किडनीची दुखणी लवकर बरी होतात.

अतिदाXरू सेवनाने मेंदूवर आणि यकृतावर होणाऱ्या दुष्पपरिणामांवर आल्याची मात्रा उपयोगी ठरते.

https://www.manachetalks.com/11829/home-remidies-to-prevent-h-a-n-g-o-v-e-r-marathi-health-blog/

आले आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते जेणे करून आपण पटकन आजारी पडत नाही..

८. वजन घटवण्यास उपयोगी:

वेट आणि फिटनेस कॉन्शीअस लोकांना शरीरातील मेटाबॉलिझम सुयोग्य ठेवावे लागते नाहीतर वजन झपाझप वाढते.

वजन वाढल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशा इतर व्याधी आपसूकच येऊन आपल्याला चिकटतात.

आले वजन कमी करण्यास मदत करते. आणि इतरही तक्रारी दूर करते.

ह्या सगळ्या व्याधी सहन करण्याच्या पलीकडे गेल्या तर मात्र डॉक्टरकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जसे आल्याचे उत्तमोत्तम फायदे आहेत तसेच आल्याचे दुष्परिणामही आहेत.. काही जणांना आल्याच्या सेवनाने खालील साईड इफेक्टस होऊ शकतात.

१. छातीत जळजळ
२. जुलाब, पोटफुगी
३. आल्याचीच ऍलर्जी असल्यास पोटात आणि ओटीपोटात अस्वस्थता किंवा तोंडाची आग होऊ शकते.
४. स्किनला लागल्यास स्किनवर पुरळ येऊ शकते.
५. मासिक पाळी मध्ये स्त्रियांना अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.
६. अति प्रमाणात आले खाल्ल्यास हृदयाच्या गतीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙋‍♀️ आले ‘खाऊ’ म्हणून नाही तर औषध म्हणून तितक्याच प्रमाणात सेवन केले तर शरीराला अमृत ठरते. अन्यथा त्यानेही त्रास होऊ शकतो..!!

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय