पालकांनी मुलं लहान असताना त्यांच्या बरोबर झोपण्याचे फायदे आणि तोटे

आपल्या लहानग्यांसोबत झोपणे किंवा न झोपणे ह्याचे आपले-आपले फायदे आणि तोटेही असतात. मुलाच्या उत्तम वाढीस असणारे फायदे, त्याच्या मानसिकतेत होणारे बदल, किंवा पालकांच्या नात्यामध्ये होणारे तोटे अशा बऱ्याच गोष्टींना भारतातील कुटुंबांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल जाणून घेऊ आजच्या लेखात.

मूल झाल्यावर आई वडील त्या मुलाला आपल्याच खोलीत झोपवतात. अगदी एकाच बेडवर दोघांच्या मध्ये. अर्थातच बाळाची काळजी घेणे त्यामुळे सोप्पे जाते.

भारतात सगळीकडे सर्रास मुले दहा बारा वर्षांची होई पर्यंत आई वडिलांसोबत झोपतात. आणि ह्यात कोणाला काहीही वावगे वाटत नाही.

मात्र पाश्चात्य देशात अशी पद्धत फारच कमी ठिकाणी असते. त्यांच्या कडे जन्मापासून बाळासाठी स्वतंत्र खोली असते.

बाळाला संभाळायला नॅनी म्हणजेच ‘आया’ असते. त्यामुळे रात्रीचे उठणे, बाळासाठी जागरणे असे फारसे प्रकार त्यांच्याकडे होत नाहीत..

क्वचितच लेकराला आपल्या खोलीत झोपवून घेणारे पालक असतील तिकडे. असले तरी, एक तर ते आई-वडील भारतीयच असतील किंवा दुसरी खोली देण्या इतके मोठे घर नसेल तेव्हाच परदेशात लहान लेकरांना पालक आपल्या बरोबर आपल्याच खोलीत झोपवतात असे आढळते.

असो, पण आपल्या लहानग्यांसोबत झोपणे किंवा न झोपणे ह्याचे आपले-आपले फायदे आणि तोटेही असतात. मुलाच्या उत्तम वाढीस असणारे फायदे, त्याच्या मानसिकतेत होणारे बदल, किंवा पालकांच्या नात्यामध्ये होणारे तोटे अशा बऱ्याच गोष्टींना भारतातील कुटुंबांना सामोरे जावे लागते.

संशोधकांनी ह्यावर भरपूर संशोधन करून काही निष्कर्ष काढलेले आहेत. परदेशातसुद्धा ते खूप प्रचलित होऊ लागले आहेत. ह्याचे फायदे आज जाणून घेऊ…

१. झोपण्याच्या चांगल्या सवयी लागणे:

मुलांमध्ये दिवसभर कार्यरत राहायची पुष्कळ एनर्जी असते.. मात्र रात्री वेळेत झोपून ती एनर्जी कशी जपायची हे त्यांना माहीत नसते. तसेच लहान मुलांना लवकर झोपही लागत नाही.

अशात जर त्यांना एकटे झोपवले तर ते नुसते पडून राहतात. आणि जेव्हा झोप लागेल तेव्हा झोपतात. मग त्यांची झोप होत नसल्याकारणाने दिवसभर शरीराची निघालेली ऊर्जा पुन्हा भरून येत नाही.. योग्य विश्रांती झाली नाही तर मग शाळेत पेंग येणे, लक्ष न लागणे असे घडते.

मात्र आई वडिलांसोबत झोपणारे बालक निश्चिंत झोपू शकतात.. आई-वडील त्याला थोपटून शांत निद्रा लागावी ह्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे वेळेत झोपणे आणि वेळेवर उठणे ह्याची सवय मुलांना आपसूकच लागते.

२. सोबत झोपणारी मुले शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतात:

आई वडिलांसोबत झोपणारी मुले शांत चित्ताने झोपतात त्यामुळे त्यांच्या हृदयाची गती आणि शरीराचे तापमान योग्य राहाते. त्यांच्या मनातील ताण तणाव निवळतो. त्यांची झोप पूर्ण होते. त्यांना दिवसभर थकवा जाणवत नाही. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ उत्तम होते आणि ते सुदृढ होतात.

ह्या उलट एकटी झोपणारी मुले कोणत्या ना कोणत्या विचारात गढून जातात आणि त्यामुळे त्यांची झोप होत नाही. कधी कोणत्या ताण तणावामुळे त्यांना शांत झोप लागतच नाही. ह्याचा मुलांच्या शरीरस्वास्थ्यावर खोलवर परिणाम होतो. हृदयाची गती, रक्तदाब, पचनशक्ती सगळे बिघडते.

३. मानसिक स्वथ्यावर सकारात्मक परिणाम घडणे:

पालकांसामवेत झोपणे हे मुलांना सुरक्षितपणाची भावना देण्यात यशस्वी ठरते. अशा मुलांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास, संयम आणि अत्यंत कमी चंचलता दिसून येते.

आई वडिलांसोबत गप्पा मारत, गोष्टी ऐकत झोपल्याने मुलांचे चित्त शांत, मन एकाग्र होते. त्यांना आपल्यावर आपले पालक खूप प्रेम करतात ह्याची सतत जाणीव राहाते. त्यामुळे अशी मुले खूप आनंदी दिसतात. भविष्यातही आई वडिलांशी संवाद साधता येणे त्यांना सोपे जाते. अशा मुलांचे मोठेपाणी संतुलित व्यक्तिमत्व घडते.

४. आई वडिलांची चिंता कमी होते:

आपले लेकरू आपल्यासोबत झोपत असेल तर आईवडील देखील निवांत झोपू शकतात.. नाहीतर सतत एकटे झोपलेले मूल काय करत असेल ह्या चिंतेने आई वडिलांची देखील झोप चाळवते.

हल्लीची पिढी ही खूप प्रगत असल्याने त्यांच्या डोक्यात चालणाऱ्या विचारांचा पत्ता लागत नाही. एकटं मूल कोणत्या मानसिक स्थितीतून जाईल ह्याचा नेम नाही. त्यामुळे एकत्र झोपल्याने आपल्या लहानग्याला समजून घेणे नवीन पालकांसाठीही सोपे जाते. सगळेच एकत्र झोपत असल्याने त्यांच्या झोपेचे वेळापत्रकही सुसंगत राहते.. ह्याचा सगळ्या कुटुंबावर चांगला परिणाम होतो.

एकत्र झोपण्याचे काही तोटेही असू शकतात.

जसे काही वर्षे पालकांची, एक नवरा बायको म्हणून प्रायव्हसी कमी होणे. त्यांच्यातील संवाद कमी होणे. मुलांचे आई वडिलांवर अति विसंबून राहणे वाढीस लागते. किंवा कधीकधी झोपायला जागा कमी पडत असल्याने झोप न होणे.. हे काही वर्षे पालकांना सहन करावे लागू शकते. कालांतराने मुलाला वेगळे झोपवणे सगळ्यांसाठीच उत्तम ठरते.

आपले मूल कायमच आपल्या सोबत झोपू शकत नाही हे सगळ्या पालकांनी समजून घेतले पाहिजे. वयात यायला लागल्यावर त्या मुलाची/मुलीची स्वतंत्र खोली असायला हवी. ह्यातून ते स्वावलंबी होण्याकडे एकेक पाऊल टाकायला सज्ज होते.

आपापल्या खोलीत झोपणे, उठल्यावर सगळे स्वतःचे स्वतः आवरणे. आपल्या वस्तू आपल्या जबदारीवर व्यवस्थित ठेवणे. अशा प्रकारे स्वतंत्र होण्याकडे मुलांची वाटचाल सुरू होते.

आई वडिलांच्या अति काळजी घेण्याची गरज कालांतराने कमी व्हायला लागते. स्वतःची स्वतः काळजी घेणे हे मुलांना शिकणे महत्वाचे असते.

ह्यातून पुढील आयुष्यात कधी ना कधी त्यांना शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने एकटे राहावे लागू शकते आणि ह्याची सवय त्यांना लागू शकते. आयुष्यातील हा बदल मुलांसाठी फारच गरजेचा असो. येणाऱ्या आयुष्यात होणाऱ्या ‘बदलांना’ सकारात्मकतेने सामोरे कसे जायचे ह्याची शिकवण घरापासूनच करायला हवी…!

मुलांसोबत झोपणे किंवा न झोपणे हा पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्याचे होणारे फायदे बघता ही जीवन पद्धती काही वर्षांसाठी अंगीकारण्यास हरकत नसावी..!!

https://www.manachetalks.com/12830/mulanna-khr-bolnyachi-svy-lavnyasathi-pach-parenting-tips/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय