आयुष्यात यशाबरोबरच समाधान सुद्धा मिळवण्याचे पाच जादुई मार्ग

आयुष्यात यशाबरोबरच समाधान सुद्धा मिळवण्याचे पाच जादुई मार्ग

आपल्याला एवढंच माहित असतं कि, काही विषयांमध्ये त्याची मॅनेजमेंट शिकणं गरजेचं असतं, जसं कि… कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट!!

अहो, पण आपल्या जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची असणारी ‘लाईफ मॅनेजमेंट’ आपण शिकतो का? आणि म्हणूनच हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा.

अगदी लहानपणापासून आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टींची हाव असतेच. अगदी लहान मुलाला विचारलं तर कुणी सांगेल त्याला बाहुली हवी, तर कुणी सांगेल त्याला खेळण्यातली गाडी हवी.

लहान असताना अगदी किरकोळ असणाऱ्या ह्या अपेक्षा हळूहळू वाढत जातात. आपल्याला चांगल घर हव होतं, गाडी हवी नंतर फॉरेन ट्रिप्सला जायचं असतं असं करत करत आपल्या अपेक्षांची यादी वाढतच जाते.

आपल्याला वाटतं की आपलं अगदी लहानसं 1 BHK घर असलं तरी चालेल पण स्वतःच असावं, ते झालं की मग थोड मोठं 2 BHK असावं वाटतं. ते मिळालं की मग अजून मोठं, अजून छान अशी आपली अपेक्षा वाढतच जाते.

आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या परिवारात, आपल्या मित्रमंडळीत आपण सगळ्यात हुशार, सगळ्यात यशस्वी असावं असं आपल्याला वाटायला लागतं.

ह्या सगळ्या अपेक्षांचं, इच्छांच हळूहळू आपल्यावर ओझं व्हायला लागतं आणि त्याखाली आपण दबले जाऊ लागतो.

ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यामागे आपले उद्दिष्ट काय होता हेच आपण विसरून जातो आणि फक्त यांत्रिकपणे एक एक गोष्ट मिळवत जातो. आता यशाची भूक असणं यात काही वावगं नाही… पण जगण्याचा आनंद लुटत यश मिळवता येणं हे जमलं पाहिजे

आयुष्याचा खराखुरा आनंद लुटत यश मिळवायचे असेल, तर हे पाच जादुई मार्ग समजून घ्या…

या आहेत अगदी सध्या गोष्टी पण त्या कराव्यात आणि जर कराव्या तर का कराव्यात याचा कधी आपण विचारच करत नाही. म्हणून आज हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा आणि कमेंट्स मध्ये याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा..

१. आयुष्याचे उद्दिष्ट ठरवा

एकदा शांतपणे बसून आपण हा विचार करायला हवा की आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट काय आहे? मोठी गाडी घेणे हे आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे का? बंगला बांधणे हे आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे का? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर नाही असचं येईल.

आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट काय आहे हेच आपण बऱ्याचवेळा विसरून जातो आणि ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जी साधने आपल्याला लागतात त्या साधनांना मिळवणे हेच आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे असं समजू लागतो.

हा मुद्दा व्यवस्थित समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपल्याला पुण्यातून मुंबईला जायचे आहे म्हणजे आपल्या प्रवासाचे उद्दिष्ट हे मुंबईला पोहचणे आहे.

आपण आपल्या प्रवासाची सुरवात करतो तेव्हा आपण ट्रेनने जायचा विचार करतो, ट्रेनने जाण्यासाठी सगळी तयारी केल्यावर आपल्याला वाटायला लागतं ह्यापेक्षा बसने गेलो तर जास्त आरामात आपल्याला जाता येईल.

आपण बसचे तिकीट मिळवण्यासाठी खटपट करायला लागतो. बसचे तिकीट मिळणार असते तेव्हा आपल्याला वाटायला लागते ह्यापेक्षा आपण कारने गेलो तर आपला प्रवास खूपच आरामात होईल मग आपण कार मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लागतो.

जेव्हा आपल्याकडे कार आलेली असते तेव्हा आपला प्रवासाचा दिवस निघून गेलेला असतो. आता ह्या उदाहरणात आपले उद्दिष्ट ट्रेनचे तिकीट मिळवणे हे होते का? बसचे तिकीट मिळवणे ह होते का? कार मिळवणे हे होते का? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर नाही असंच येईल.

आपले उद्दिष्ट होते मुंबईला पोहोचणे ज्यासाठी आपल्याला ट्रेन, बस, कार ही फक्त साधने होती, पण ह्या साधनांत आपण एवढे रमून गेलो की आपले साध्य काय होते हेच आपल्या लक्षात आले नाही.

आयुष्यात सुद्धा आपलं असचं होतं. गाडी, बंगला, ट्रिप्स ही सगळी आयुष्याचे उद्दिष्ट मिळवण्याची फक्त साधनं आहेत पण ह्या साधनांत आपण एवढे अडकून जातो की जगण्याचे उद्दिष्टच विसरून जातो. त्यामुळे जर आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट काय आहे हे नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

उद्दीष्ठांवर लक्ष केंद्रित कराल तर साधने आपोआप तयार होत जातील एवढा मात्र दृढ विश्वास ठेवा.

आपल्या बुद्धीचा परिपूर्ण वापर करून ठरवलेले उद्दिष्ठ कसे पूर्ण करावे? (प्रेरणादायी लेख)

२. कामाचे वर्गीकरण करा

आपण ठरवलेल्या गोष्टीत, आपण जेव्हा अपयशी होतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या अंगात यशस्वी होण्यासाठी लागणारी क्षमता असते फक्त आपला दृष्टीकोन चुकत असतो.

आता हा मुद्दा सुद्धा आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ. जर आपल्याला नविन पदार्थ शिकायचा असेल तर आपण सर्वात आधी बाजारात जाऊन समान आणायचा विचार करतो, नंतर जे पदार्थ बनवायचे आहेत त्याची रेसिपी शोधतो आणि जेवण बनवून झाल्यावर होणारा पसारा कसा आवरायचा ह्याचा सुद्धा विचार करतो.

ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरून जातो ती म्हणजे तो पदार्थ बनवणे. बाकी सगळ्या क्रिया ह्या त्या एका गोष्टी भोवती फिरणाऱ्या असतात.

अशावेळी आपण ह्या सगळ्या क्रियांच वर्गीकरण करणे फार गरजेचे असते.

आपण जेव्हा सुरवातीला गाडी शिकायला सुरु करतो तेव्हा आपण क्लच दाबणे, गियर बदलाने, ब्रेक लावणे, रस्त्याचा अंदाज, मागच्या आरशात बघणे ह्या सगळ्या क्रिया वेगवेगळ्या करत असतो, त्या सगळ्याचा विचार आपण वेगवेगळा करत असतो त्यामुळे आपल्याला सुरवातीला हे सगळ खूप कठीण जातं, पण एकदा का आपल्याला सवय झाली की ह्या सगळ्या क्रिया आपोआप आपण एकाचवेळी विचार न करता करू शकतो त्यामुळे गाडी चालवणं फार सोपं होऊन जातं.

अशाच प्रकारे आपल्या आयुष्यात कोणकोणत्या कामांचा विचार आपण एकत्रित करू शकतो हे लक्षात घेण फार गरजेचे असते. ह्यामुळे आपण आपली उर्जा वेगवेगळ्या कामांचा वेगवेगळा विचार करण्यात न घालवता सगळ्याचा एकत्र विचार करू शकतो आणि ती सगळी काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो.

३. वेळ नसणे ही फक्त एक सबब

आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्यात जर आपल्याला बेस्ट व्हायचे असेल तर त्यासाठी आपण त्या गोष्टीचा जास्तीतजास्त अभ्यास करणे, त्याबद्दल जास्तीतजास्त वाचणे, ऐकणे, शिकणे हे फार गरजेचे असते.

पण अशा गोष्टींसाठी आपण नेहमी आपल्याला वेळ नाही मिळाला असं अगदी सहज म्हणून जातो. पण एखाद्या कामासाठी वेळ नसणे ही फक्त एक सबब आहे.

प्रत्येकाजवळ दिवसभरात काही ना काही वेळ नक्कीच असतो. अशावेळी आपण आपल्या दिवसाच्या वेळेचा नीट विचार करणे गरजेचे असते.

दिवसाच्या एकूण २४ तासात आपण कोणकोणते काम किती वेळ करतो ह्याचा एकदा आपल्याकडे हिशोब आला की मग आपल्याला हवं त्या गोष्टीसाठी वेळ काढणे शक्य होते.

ह्यातून आपण दिवसभरात किती वेळ निरर्थक कामात घालवतो हे आपल्या लक्षात येईल आणि तो वेळ आपण आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टावर काम करण्यासाठी वापरू शकू.

ह्याचबरोबर कोणकोणती कामे आपण एकत्र करू शकतो ह्याचा सुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकतो. जसं की विमानतळावर वाट बघत बसलेले असताना आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल नवीन माहिती देणारे पुस्तक आपण वाचू शकतो किंवा घरकाम करताना आपण ऑडीओ बुक ऐकू शकतो.

अशाप्रकारे आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या कामांसाठी आरामात वेळ काढू शकतो.

वेळेच्या नियोजनाबद्दल महत्त्वाच्या सात टिप्स

४. नातेसंबंध जपणे सुद्धा महत्वाचे आहे

मागच्याच मुद्यात आपण बघितले होते की, आपण अनावश्यक कामे टाळून आपला वेळ वाचवू शकतो. अशावेळी काहीजण आपल्या कुटुंबासोबत किंवा जवळच्या मित्रमंडळी सोबत वेळ घालवणे हे सुद्धा अनावश्यक काम समजण्याची चूक करू शकतात.

पण असं नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. माणूस हा तसा समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे आपण आपल्या कामासाठी एकट्याने प्रयत्न करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच गरजेचे आहे की आपण आपला काही वेळ आपल्या जवळच्या लोकांसोबत घालवावा.

आपल्या कुटुंबासोबत प्लान केलेल्या सहली, बाहेर जेवणं अशा गोष्टी आपल्याला एक वेगळीच मानसिक उर्जा देऊन जातात जी पुढे जाऊन आपल्या कामासाठी फार उपयोगी असते. त्यामुळे हा वेळ फुकट गेला असं न समजता हा वेळ म्हणजे आपली गुंतवणूक आहे असं समजायला हवं.

५. संवाद साधण्याचे कौशल्य सगळ्यात आवश्यक

आपल्याला कुठल्याही कामात यश मिळवण्यासाठी जेवढं महत्व आपलं ज्ञान किंवा आपली मेहेनत ह्यांना आहे तेवढंच महत्व आपल्या संवाद साधण्याच्या कौशल्याला आहे.

आपण आपल्या साथीदारांशी किंवा पार्टनरशी, क्लायंटशी कशाप्रकारे संवाद साधतो ह्यावर आपले यश अपयश बऱ्याचवेळा अवलंबून असते. आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसाची काम करण्याची क्षमता, इच्छा ह्या सगळ्यावर त्यांच्याशी आपला संवाद कशाप्रकारचा आहे ह्याचा फार प्रभाव पडतो.

https://www.manachetalks.com/11871/sambhashn-kaushaly-how-to-get-attention-marathi/

बोलणाऱ्याचे कोळसे सुद्धा विकतात आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकत नाही असं म्हणतात ते ह्याचसाठी!! आपले संवाद कौशल्य विकसीत करत राहणे आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी सगळ्यात गरजेचे आहे.

ह्यासाठी आपण व्यावसायिक तज्ञांची मदत घेऊ शकतो, ह्याबाबतचे ज्ञान मिळवू शकतो आणि सतत सुधारणा करत राहून प्रगती करू शकतो.

ह्या पाच जादुई उपायांचा वापर करून आपण आपल्या आयुष्याचा अगदी पुरेपूर आनंद घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्या आयुष्याचे जे काही उद्दिष्ट आहे ते सुद्धा पूर्ण करू शकतो आणि आयुष्यात यश मिळवू शकतो.

Image Credit: pexels

मनाचे श्लोक

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

1 Response

  1. Gaurav raut says:

    खुप झांन धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!