अपयशाचा सामना करूनही यशाचं शिखर गाठणारे ७ भारतीय दिग्गज

आयुष्यात कितीही मोठे अपयश आले, तरी खचुन न जाता, निराश न होता पुढे चालत राहा, जगण्याचा उत्सव करा!

कित्येक अपयशांचा सामना करून सुद्धा ज्यांनी संकटांसमोर हात टेकले नाहीत, तर शेवटी संकटच ज्यांना शरण आले अशा सात दिग्गजांच्या प्रेरणादायी कहाण्या वाचा या लेखात.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात. यशाच्या मार्गावर चालताना अनेक अपयशाच्या पायऱ्या ओलांडाव्या लागतात. मार्गात येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून, न थकता, न कंटाळता चालत राहावं लागतं.

यशस्वी माणूस आणि अयशस्वी माणूस यांच्यामध्ये फरक एवढाच आहे, की यशस्वी माणूस हा कधीच अपयशाचं भांडवल करत नाही.

लढाई हरला तरी लढण्याची हिम्मत कधीच सोडत नाही!!

यशस्वी माणसांकडे बघताना, त्यांच्या यशाची किंवा यशामुळे प्राप्त झालेल्या जीवनशैलीची उदाहरणं देताना आपण एका गोष्टीकडे मात्र कानाडोळा करतो, आणि ती म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी ओलांडलेल्या अनंत अडचणी आणि वेळोवेळी पचवलेले अपयश….

संकटं प्रत्येका समोरच उभे ठाकतात, पण जो संकटांसमोर शरण जात नाही त्याला शेवटी ती संकटच शरण जातात..

कोणत्याही क्षेत्रात, अगदी सगळ्यात यशस्वी माणसे सुद्धा आधी त्याच क्षेत्रात अपयश पचवून मगच मोठी झालेली असतात. आज आपण अशाच काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.

धीरूभाई अंबानी

रिलायन्स फाऊंडेशन हे नाव न ऐकलेला माणूस विरळाच असेल. पण धीरूभाई अंबानी, म्हणजेच रिलायन्सचे फाऊंडर हे अतिशय साध्या कुटुंबातले आहेत आणि जन्मतः श्रीमंतीचा गंध सुद्धा नसलेल्या कुटुंबात जन्म होऊन ते लहानाचे मोठे झाले हे ऐकले तर नवल वाटेल.

धीरूभाई अंबानी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी येमेन या देशात नशिबाची परीक्षा बघायला गेले होते. तिथे साधा कारकून म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांना आत्मविश्वास होता की ते यापेक्षा ही पुढे जाऊ शकतात, इथे थांबणं हे त्यांना मान्यच नव्हते.

ते भारतात परत आले आणि आपल्या एका जवळच्या मित्राबरोबर,, चंपकलाल दमनी यांच्याबरोबर त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला.

नंतर काही मतभेदांमुळे हा व्यवसाय पुढे आला नाही पण धीरूभाई हिंमत हरवून बसले नाहीत. त्यांनी ट्रेडिंग सुरू ठेऊन स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा प्रयत्न सुरू केले.

त्यांच्या स्टॉक मार्केटमधल्या यशाबद्दल बऱ्याचदा शंका घेतल्या जातात पण हिंमत ठेऊन, सातत्याने प्रयत्न करून, न थकता त्यांनी प्रगतीपथावर आपली वाटचाल चालूच ठेवली.

हळूहळू त्यांनी अनेक क्षेत्रात आपले रोवले. आज देशातल्या जवळपास सगळ्याच क्षेत्रात रिलायन्सही सर्वोत्कृष्ट कंपनी आहे. आज देशातल्याच नव्हे तर जगातल्या प्रत्येक तरुणासाठी धीरूभाई हे आदर्श आहेत.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो ते खणखणीत आवाज असलेला, उंच पुरा, भाषेवर प्रभुत्व असलेला, देखणा नट, वक्ता आणि एकूण आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेला माणूस. पण ही सगळी विशेषणं अभिताभ बच्चन यांच्या नावामागे लागली ती अशी सहजासहजी नाही.

अमिताभ बच्चन अगदी सुरवातीला एका रेडीओ केंद्रावर निवेदक म्हणून मुलाखत द्यायला गेले होते. तिथे मुलाखत घेणाऱ्या माणसाने त्यांचा आवाज हा चांगला नाही आणि रेडीओसाठी त्याचा उपयोग होऊ शकत नाही असे सांगून त्यांना परत पाठवले होते.

त्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने आपला आवाज हीच आपली ओळख बनवली. पण इथेच त्यांचा संघर्ष संपला नाही.

अनेक सुपरहिट चित्रपट देऊन झाल्यावर त्यांनी स्वतःची एक ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ नावाची निर्मिती संस्था स्थापन केली. शिवाय मधल्या काळात राजकारणातही अपयश चाखून त्यांनी राजकारणाला राम-राम ठोकला तो, कायमचाच!!

पण त्यांचा हा निर्णय फारसा फायदेशीर ठरला नाही आणि लवकरच ते पूर्णपणे कर्जबाजारी झाले.

पण त्यांनी अजिबात धीर न सोडता कौन बनेगा करोडपती ह्या गेम शो मध्ये सूत्रसंचालन सुरु केले आणि लवकरच त्यांची सेकंड इनिंग सुरू झाली आणि ते पुन्हा एकदा यशाची शिडी चढून आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम म्हणून ओळखले जाऊ लागले.

सौरव गांगुली

भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा कर्णधार म्हणून ज्याला ओळखले जाते तो म्हणजे, सौरव गांगुली. आपल्या बेधडक फलंदाजीने आणि आक्रमक नेतृत्वाने जागतिक क्रिकेटमध्ये सौरवने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

पण ह्या सगळ्याची सुरवात मात्र एवढी चांगली नव्हती. गांगुलीला पहिली संधी १९९१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिली गेली. चार महिन्याच्या ह्या दौऱ्यात सौरव गांगुलीला एकाही सामन्यात संधी मिळाली.

नंतर तर त्याच्या वागणुकीबद्दल सुद्धा वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. राजेशाही कुटुंबात वाढलेला सौरव मैदानावर राखीव खेळाडू म्हणून पाणी घेऊन जाण्यास तयार नसायचा अशा तक्रारी येऊ लागल्या.

ह्या सगळ्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. सगळ्यांना वाटले की त्याला पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. त्यानंतर पुढची तीन वर्षे निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र आपल्या प्रतिभेच्या जोरवर त्याने देशांतर्गत स्पर्धात धावांचा रतीब लावला. शेवटी नाईलाजाने त्याला १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यात संघात घ्यावेच लागले आणि आपल्या पहिल्याच कसोटीत त्याने दमदार शतक ठोकत आपले स्थान पक्के केले.

त्यांनतर तो कर्णधार म्हणून यशस्वी ठरला, निवृत्ती नंतर सुद्धा सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा प्रमुख म्हणून काम करत आहे.

नवाजुद्दिन सिद्दिकी

नवाजुद्दिन सिद्दिकी हा आताच्या काळातला एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्याने आपल्या अभिनय कौशल्याने खूप चांगल्या प्रकारे सादर करून सगळ्या प्रेक्षकांची वाहवाह मिळवली आहे.

पण त्याचा प्रवास हा साधा नव्हता. उत्तर प्रदेश मधल्या एका छोट्याशा गरीब कुटुंबात जन्माला आलेला नवाजुद्दिन सिद्दिकी केमिस्ट म्हणून एका कंपनीत कामाला लागला.

पण काहीतरी वेगळे करण्यासाठी तो दिल्लीत आला पण तिथे त्याला कसलीच संधी मिळाली नाही म्हणून तो वॉचमनचे काम करायला लागला.

इथेच त्याला नाटकाचे वेध लागले आणि तो नाटकांत लहानमोठी कामे करायला लागला. ह्याच वेडाने तो मुंबईत शिफ्ट झाला आणि तिकडे सुद्धा अशाच लहान सहान भूमिका करत राहिला.

शेवटी एकदा पिपली लाईव्ह चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या आणि निर्मात्यांच्या नजरेत भरली आणि त्याला चांगल्या संधी मिळायला सुरुवात झाली.

नंतर मात्र त्याने अजिबात मागे वळून बघितले नाही आणि आज एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून नवाजुद्दिन सिद्दिकी ओळखला जातो.

रतन टाटा

१९९१ साली जेव्हा रतन टाटा, टाटा ग्रुपचे चेयरमन झाले तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांची, काळाच्या पुढचा विचार करून कामाची आखणी करण्याची पद्धत, डायरेक्टर बोर्डच्या इतर मेम्बर्स ना पटली नव्हती.

त्यांच्या करिअरच्या अगदी सुरुवातीलाच त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या दोन कंपन्या कर्जबाजारी झाल्या होत्या आणि याशिवाय त्यांनी पॉलिसीमध्ये केलेल्या बदलांमुळे निवृत्तीचे वय कमी करून, ७०च्या ऐवजी ६५ केल्यामुळे कंपनीतील सिनिअर कर्मचाऱ्यांची नाराजी सुद्धा त्यांनी ओढावून घेतली होती.

करिअरच्या सुरुवातीपासून ते अगदी आत्ता टाटा नॅनोच्या अपयशापर्यंत अनेक अडचणींचा सामना करून सुद्धा टाटा ग्रुप नेहमीच देशातील एक अग्रगण्य कंपनी म्हणूनच ओळखली जाते. एवढेच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

शिव खेरा

अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिणारे लेखक म्हणून ‘शिव खेरा’ प्रसिद्ध आहेत हे आपल्याला माहीत आहेच पण याच लेखकावर, त्यांच्या ‘फ्रीडम इज नॉट फ्री’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर वाङ्मय चोरीचा आळ घेतला गेला होता आणि हे प्रकरण इतकं पुढे गेलं होतं की त्यांना पार कोर्टात जावं लागलं होतं.

पण या सगळ्याचा आपल्या लिखाणावर काडीमात्र ही परिणाम न होऊ देता खेरा यांनी लिखाण सुरूच ठेवलं व आपण लिखाणाच्या अगोदर बराच अभ्यास करतो, वाचन करतो आणि त्याचे पडसाद कधीकधी लिखाणात येतात असा प्रतिवाद सुद्धा केला.

पुढे त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड केली आणि हे प्रकरण मिटवलं पण लिखाण सुरू ठेऊन ते नवनवीन पुस्तकं घेऊन येत राहिले आणि आजही त्यांची जवळजवळ सगळीच पुस्तके बेस्ट सेलर मानली जातात.

अक्षय कुमार

अक्षय कुमार हा आज जवळपास सगळ्यात यशस्वी अभिनेता समजला जातो. अक्षय कुमारचे दर वर्षी दोन-तीन तरी सुपरहिट चित्रपट आपल्याला पाहायला मिळतातच.

पण अक्षय कुमारचा आतापर्यंतचा प्रवास मात्र एवढा सहज झालेला नाही. मार्शल आर्ट्स चा शिक्षक असलेला अक्षय कुमार जेव्हा सुरवातीला चित्रपटात काम करायला आला तेव्हा त्याला फक्त मारधाड असलेल्या चित्रपटात काम मिळायचे.

असल्या चित्रपटांची कथा सुद्धा फार चांगली नसायची. ह्याचे नुकसान अक्षय कुमारला झाले. त्याचे ओळीने सुरवातीचे सोळा चित्रपट फ्लॉप झाले.

पण अक्षय कुमारने धीर सोडला नाही आणि आपल्या अभिनयावर काम करणे सुरूच ठेवले.

हळूहळू त्याला विनोदी, रोमांटिक, नकारात्मक अशा वेगवेगळ्या भूमिका मिळत गेल्या आणि आपल्या अभिनय क्षमतेने तो यशस्वी होत गेला. बॉलीवूडमध्ये तीन खानांसोबत अक्षयचे नाव घेतले जाऊ लागले एवढा तो आता आपल्या क्षेत्रात यशस्वी झाला आहे.

मित्रांनो, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन, सौरभ गांगुली हि सगळी आपापल्या क्षेत्रात उच्च शिखर गाठलेली दिग्गज माणसं!! तरी त्यांनीही अपयशाचा सामना करत करतच मार्गक्रमण केले.

यशाचा, प्रसिद्धीचा, समृद्धीचा आणि एकूणच सुखाचा मार्ग हा सोपा कधीच नसतो.

म्हणूनच आयुष्यात कितीही मोठे अपयश आले, तरी खचुन न जाता, निराश न होता पुढे चालत राहा, जगण्याचा उत्सव करा.

पाहिलंत ना, अपयशाचा सामना करून सुद्धा या दिग्गजांनी संकटांसमोर हात टेकले नाहीत, तर शेवटी संकटांनीच त्यांच्या समोर हात टेकले…

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “अपयशाचा सामना करूनही यशाचं शिखर गाठणारे ७ भारतीय दिग्गज”

  1. खुप छान,
    कित्येक अपयशांचा सामना करून सुद्धा ज्यांनी संकटांसमोर हात टेकले नाहीत, तर शेवटी संकटच ज्यांना शरण आले अशा सात दिग्गजांच्या प्रेरणादायी कहाण्या मनापासून आवडल्या.
    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय