गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचे १० साधे सोपे उपाय

आपल्या आजूबाजूला सुद्धा असे काही लोक असतात ज्यांच्याकडे बघून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो, असे वाटते की आपल्यामध्ये सुद्धा त्याच्या एवढा आत्मविश्वास असायला हवा.

किंवा बरेचदा असंही होतं की तुमच्यात, मुळातच आत्मविश्वास असतोही पण घडलेल्या काही नकारात्मक घटनांमुळे तो आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागतो.

अपयशाची पर्वा न करता एखाद्याचा फक्त आणि फक्त यशस्वी होण्यावर विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास…

आणि हाच आत्मविश्वास आपल्या जगण्याचा सर्वात मजबूत असा पाय असतो.

आणि हा पाया जर तुम्ही ढासळू दिला नाही तर जग जिंकण्याची सुद्धा क्षमता तुमच्यात असते.

आपल्या आजूबाजूला सुद्धा असे काही लोक असतात ज्यांच्याकडे बघून आपल्याला त्यांचा हेवा वाटतो, असे वाटते की आपल्यामध्ये सुद्धा त्याच्या एवढा आत्मविश्वास असायला हवा.

किंवा बरेचदा असंही होतं की तुमच्यात, मुळातच आत्मविश्वास असतोही पण घडलेल्या काही नकारात्मक घटनांमुळे तो आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागतो.

अशावेळी अगदी साधी साधी कामे सुद्धा पूर्ण करणे खूप कठीण होऊन जाते.

पण मित्रांनो, अशा वेळी घाबरून न जाता स्वतः ला समजून घेणं, आत्मविश्वास डळमळीत होण्या मागच्या घटनांना एनलाईझ करणं हे जमतंय का इथून आधी सुरुवात करा..

आम्हाला इनबॉक्स मध्ये बरेचदा वाचकांचे असे मेसेजेस येतात की गेलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी काय करावे याबद्दल काहीतरी लिहा…

आज आपण आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या सवयींमध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये काय बदल केला पाहिजे, यावर बोलू.

१. आवडणाऱ्या गोष्टींपासून सुरवात करा

जेव्हा आपला आत्मविश्वास कमी झालेला असतो अशा वेळी, आपल्या मनाची अवस्था फार वाईट झालेली असते त्याला एका रिचार्जची गरज असते.

सर्वात आधी नकारात्मक गोष्टींच्या, विचारांच्या जोखडातून स्वतः ला सोडवणं इथून सुरुवात करायची गरज असते.

अशावेळी आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या गोष्टी केल्याने आपले मन ताजेतवाने होते.

प्रत्येक माणसाच्या ह्या गोष्टी वेगवेगळ्या असतात, काही जणांना गाणी ऐकणे आवडते, काही जणांना पुस्तक वाचणे, काही जणांना व्यायाम करणे तर काही जणांना चालणे….

आपली आवडती गोष्ट करताना आपले मन बाकी सगळ्या गोष्टी विसरून जाते आणि फक्त त्याच गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित होते.

अशाप्रकारे काहीवेळानंतर आपले मन पूर्णपणे रिफ्रेश होते आणि आपला आत्मविश्वास परत येतो…

२. विचार बदला – भविष्य बदलेल

आपला आत्मविश्वास जेव्हा कमी झालेला असतो तेव्हा आपल्या मनात सतत नकरात्मक विचार येत असतात.

कोणतेही लहानात लहान काम करताना सुद्धा आपल्याला वाटते की हे काम आपल्याला जमणार नाही, आपल्याला ह्या कामात अपयश येणार आहे, आपले लोकात हसे होणार….

त्यामुळे आपण अगदी लहान काम सुद्धा करणे टाळतो. अशावेळी आपण प्रयत्नपूर्वक आपल्या मनात येणारे विचार बदलाने गरजेचे असते.

आपले विचार जेवढे सकारात्मक असतील तेवढ्या लवकर आपला आत्मविश्वास परत येण्यास सुरुवात होईल.

ह्यासाठी आपण जास्तीतजास्त सकारात्मक लोकांच्या सहवासात राहावे किंवा सकारात्मक लेख वाचावेत, सकारात्मक व्याख्याने ऐकावीत.

सध्याच्या काळात नकारात्मकता दूर ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. रोज बातम्यांमध्ये इतके रुग्ण दगावले, तितके हॉस्पिटलमध्ये दाखल हे ऐकून दिवसाची सुरुवात करणं प्रकर्षाने टाळा.

३. हसण्याने हसणे पसरवा

हसणे हे पसरणारे असते. आपण जर एखाद्या माणसाकडे बघून स्मितहास्य केले तर तो माणूस सुद्धा आपोआप आपल्याकडे बघून हसतो.

आपण जर तोंड पाडून शांत बसलो तर आपल्या आजूबाजूची माणसे सुद्धा तशीच होतात आणि आपल्या आजूबाजूला नकारात्मकता वाढत जाते.

त्यामुळे जाणीवपूर्वक चेहऱ्यावर हास्य टिकवून ठेवा. ह्यामुळे आजूबाजूला सकारात्मकता वाढू लागेल आणि ह्याचा परिणाम आपल्या मनाच्या स्थितीवर सुद्धा होईल.

ह्यातून आपल्याला आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत होईल.

४. देहबोलीत सकारात्मकता ठेवा

आपल्या समोर एखादा माणूस आला ज्याचे खांदे पडलेले आहेत, चेहरा चिंतीत आहे, चालणे अगदी हळूहळू आहे तर अशा माणसाकडे बघून आपल्याला चांगले वाटत नाही.

त्याच्या देहबोलीतून दिसणारी नकारात्मकता आपल्या सुद्धा मनाचा ताबा घेते आणि आपल्याला उदास वाटायला लागते.

त्यामुळे आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आपल्या देहबोलीवर सुद्धा काम करणे महत्वाचे असते.

आपले खांदे, मान ताठ असायला हवी. त्याचबरोबर आपल्या चालण्यातून सुद्धा उर्जा दिसली पाहिजे.

५. लहान लहान उद्दिष्टे समोर ठेवा

जेव्हा आपण एखादी नवीन सुरवात करत असतो, तेव्हा अगदी सुरवातीलाच आपण मोठा टप्पा ओलांडण्याचा विचार करू नये.

आपण असे करायला गेलो आणि त्यात जर आपल्याला अपयश आले तर आपला आत्मविश्वास अजूनच रसातळाला जाऊ शकतो.

त्यामुळे आपल्याला जे काम करायचे आहे त्याचे अगदी लहान लहान भाग करून त्याचे उद्दिष्ट आपल्या समोर ठेवणे गरजेचे आहे.

बघा, जर आपण पेंटरला २०-२५ हजार देऊन घर पेंट न करता स्वतः च पेंट करायचं ठरवलं तर काय करतो, आधी एक खोली रिकामी करून तिलाच रंग देतो, मग नंतर दुसऱ्या खोली चे काम सुरू करतो… अगदी तसंच

जेव्हा आपण पहिले उद्दिष्ट पूर्ण करतो तेव्हा हे काम आपल्याला जमते आहे असा आत्मविश्वास मनात यायला लागतो.

त्यामुळे कामाच्या पुढच्या भागाला सुरवात करताना आपला आत्मविश्वास वाढलेला असतो आणि त्यामुळे आपले काम चांगल्याप्रकारे पूर्ण होते.

६. स्वतःला साफ आणि फ्रेश ठेवा

आपले शारीरिक आरोग्य सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असते.

आपली शारीरिक स्वच्छता ही आपल्या मानसिक अवस्थेसाठी खूप महत्वाची असते. रोज छान अंघोळ करा, साफ कपडे घाला वेळोवेळी आपले तोंड धुवा.

ह्यामुळे आपल्याला फ्रेश वाटेल आणि आपली कामे चांगल्या प्रकारे होतील.

७. आपल्या भीतीचा सामना करा

प्रत्येकाच्या मनात कसली ना कसली तरी भीती असतेच. आपण आयुष्यभर ती भीती मनात ठेवूनच प्रवास करत असतो.

ते काम करायची कधी वेळ आली तर मनात असलेल्या भीतीमुळे आपल्याला ते करणे शक्य होत नाही.

जरी नाईलाजाने आपण ते काम केले तरी त्यात आपण आपली पूर्ण क्षमता लावू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला यश मिळण्याची शक्यता फार कमी असते.

त्यामुळे आपल्या मनात ज्या काही भीती असतील त्यांचा वेळीच सामना करणे फार गरजेचे असते. पूर्ण साफ मनाने आपण जर आपल्या मनात असलेल्या भीतीला सामोरे गेलो तर नक्कीच आपण त्याचा पराभव करू शकतो आणि एकदा का त्या भीतीचा आपण पराभव केला की ती भीती आपल्या मनातून कायमची नष्ट होते.

८. चुकांना घाबरू नका तर त्यातून शिका

प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही चुका करतोच. कधीच न चुकणार माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही.

पण जी माणसे आयुष्यात यशस्वी होतात ती आपल्या चुकांना घाबरत नाहीत किंवा आपल्या चुका लपवून ठेवत नाहीत तर आपण केलेल्या चुकांपासून शिकतात.

आपण केलेली प्रत्येक चूक आपल्याला एक धडा शिकवते ज्यामुळे भविष्यात आपण सेम चूक करण्यापासून दूर राहू शकतो.

९. वर्तमानकाळात जगायला शिका

आपल्या भूतकाळात केलेल्या चुकांपासून धडा शिकून त्या तिथेच सोडून देणे महत्वाचे असते.

भूतकाळात आपल्याला मिळालेले यश किंवा अपयश ह्याचा आपल्याला वर्तमान काळात फारसा फायदा किंवा तोटा नसतो.

त्यामुळे आपण आपल्या वर्तमान काळाचा जास्तीतजास्त विचार करणे गरजेचे असते.

आपण जेवढा वेळ भूतकाळाचा विचार करण्यात फुकट घालवू तेवढा वेळ आपण वर्तमानकाळात काम करण्यापासून लांब राहतो आणि आपले वर्तमान यशस्वी होण्याच्या शक्यता कमी होतात.

१०. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा

आपल्याला कुठल्याही गोष्टीत जर अपयश आले तर आपण उदास होतो, त्या गोष्टीचा नाद सोडून देतो. पण जो अपयशानंतर सुद्धा खचून जात नाही तो हमखास यशाच्या पायऱ्या चढत जातो.

जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल अपयश पचवायची सुद्धा तयारी असावी लागते.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे आलेले अपयश हे कशामुळे आले आहे त्याचा विचार करून त्यावर काम करून आपण परत प्रयत्न करणे महत्वाचे आहे. जर असे प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळू शकते.

आपल्या आयुष्यात अपयश येणे, आत्मविश्वास कमी होणे अशा गोष्टी होतातच. पण जर आपण वर दिलेल्या दहा गोष्टी मनापासून केल्या तर लवकरात लवकर आपण आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवू शकतो आणि अधिक जोमाने काम करून आपल्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त यश मिळवू शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचे १० साधे सोपे उपाय”

  1. Farch chan likhan kelele ahe. Ya srv gostinch aplya jivnat apla gelela atmvishvas milvnys nakkich madt hoil ya srv niyamanche palen kelyavr. 👍🙏

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय