घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी दहा उत्तम Android Apps!

घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी दहा उत्तम Android Apps!

निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी सुदृढ शरीर असणे फार महत्वाचे आहे.

प्रमाणाबाहेर सुटलेले पोट हे अनेक आजारांना आपल्या सोबत घेऊन येतेच, पण याचबरोबर या गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्वावर सुद्धा विपरीत परिणाम होत असतो.

व्यायाम करून कमावलेले शरीर असले किंवा व्यायाम करून वजन आटोक्यात ठेवलेले असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो याउलट प्रचंड प्रमाणात वाढलेले वजन असेल तर न्युनगंड येण्याची शक्यता असते.

व्यायाम करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम शाळा म्हणजेच जिम.

आपल्याला व्यायामासाठी लागणारी वेगवेगळी साधने जिममध्ये उपलब्ध असतात पण आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच जिममध्ये जायला वेळ मिळेल असे नाही.

सध्या तर कोविड-19 या जागतिक संकटाच्या सावटामुळे जगभरातील सर्व जिम बंद आहेत.

अशावेळेस घरच्याघरी व्यायाम करून स्वतःची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून निरोगी राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. पण हे कसे करायचे?

या कठीण काळात आपला लॅपटॉप किंवा मोबाईल फोन यांनी आपल्या गुरुची भूमिका अगदी चपखल बजावली याबाबत कोणाचंही दुमत असणार नाही. आपली मुलं सुद्धा आता मोबाईल फोन वरून शाळेला हजेरी लावू लागले.

अगदी तस्सच, नियमित व्यायामासाठी आपल्या फोनमध्ये वेगवेगळे फिटनेस एप्लिकेशन आपण सहज प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घेऊ शकतो.

असे केल्याने घरच्याघरी आपल्या फोनवर किंवा स्मार्ट टीव्हीवर अगदी घरच्याघरी आपण आपला व्यायाम करू शकतो.

या लेखात आपण अशा काही फिटनेस एप्लिकेशनस् बद्दल जाणून घेणार आहोत…

1) Sweat

जिम मध्ये असतो तसा पर्सनल ट्रेनर जर तुम्हाला घरच्या घरी हवा असेल तर हे एप्लिकेशन एकदम चांगलं आहे.

डंबेल्स आणि इतर वजने किंवा मशीन वापरून वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे.

‘कायला ईत्साईन्स’ नावाच्या फिटनेस इंफ्लूइन्सरने हे एप्लिकेशन डीझाईन केले आहे.

याची आणखी एक खासियत म्हणजे हे आय वॉचवर सुद्धा घेता येते.

आठवड्याभराचे मील प्लॅन्स, योगा प्रोग्रॅम्स सुद्धा यामध्ये आहेत.

2) Beach body on Demand

बऱ्याच जणांना व्यायाम करायची हौस तर असते पण घरच्याघरी एकट्याला व्यायाम करायला मात्र कंटाळा येतो.

या एप्लिकेशनचा उपयोग असा घरी व्यायाम करण्यासाठी होऊ शकतो. यात योगासनांपासून ते पार हिपहॉपपर्यंत वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या इच्छेनुसार आपण निवडू शकतो.

वेगवेगळ्या व्यायाम प्रकारासाठी वेगवेगळे ट्रेनर्स सुद्धा आहेत. या एप्लिकेशनची अजून एक खासियत म्हणजे यात आपले जुने वर्कआऊट सुद्धा रेकॉर्ड होतात. त्यामुळे आपण आपली प्रगती कशी होत आहे ते बघू शकतो.

3) Peloton Digital

Peloton आपल्या इनडोअर सायकलिंगसाठी प्रसिद्ध आहे पण या एप्लिकेशनमध्ये फक्त सायकलिंग नाहीये.

यातल्या क्लासमध्ये योगा, धावणे, चालणे असे व्यायामप्रकार आहेत.

यात आपण व्यायाम करता करता आपल्या आवडीची गाणी सुद्धा लावू शकतो.

यातले वर्कआऊट व्हिडीओच्या स्वरूपात आहेत त्यामुळे आपण समोर स्क्रीनवर आपल्या ट्रेनरला व्यायाम करताना बघू शकतो.

काही वर्कआऊटमध्ये डम्बेल्सचा वापर सुद्धा शिकवला आहे.

आपले जर अमुक एक ध्येय असेल जसे मॅरेथॉन पळायची आहे तर त्यासाठी तुम्हाला ट्रेन करण्यासाठी सुद्धा प्रोग्रॅम्स यात आहेत.

आपल्याला जे हवे आहे ते बघून आपण त्याप्रमाणे आपले रुटीन सेट करू शकतो आणि तसा व्यायाम करू शकतो.

4) GIo

योगा व मेडिटेशनसाठी हे एकदम उपयुक्त एप्लिकेशन आहे.

यात एकूण 3700 वर्कआऊट 50 पेक्षा सुद्धा जास्त ट्रेनर्सने शिकवलेले आहेत.

यात जर आपण आपल्याजवळ असलेला वेळ घातला तर एप्लिकेशन आपल्याला त्यानुसार योग्य ते व्यायाम प्रकार सुचवते.

व्यायाम व अध्यात्म याची उत्तम सांगड या एप्लिकेशनमध्ये आहे.

5) Nike Training Club

तुम्हाला कार्डिओ हा व्यायाम प्रकार आवडत असेल तर हे एप्लिकेशन तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे.

ट्रेडमिल न वापरता सुद्धा यावर तुम्ही कार्डिओ करू शकता.

यात एकूण 160 वेगवेगळे वर्कआऊट आहेत ज्यात सर्किट ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, बॉडी वेट ट्रेनिंग इतके पर्याय आहेत.

यात सेरेना विलियम्स व रोनाल्डो यांसारख्या प्रोफेशनल्सने डिझाईन केलेले वर्कआऊट सुद्धा आहेत. आपण आपल्या वेळेनुसार, आपल्याला सूट होतील असे व्यायामप्रकार निवडू शकतो.

यात खूप प्रकारचे व्यायाम तर आहेतच शिवाय प्लेस्टोरवर हे एप्लिकेशन मोफत उपलब्ध आहे हा याचा अजून एक फायदा आहे.

6) Grokker

यात फिटनेस हा एकच मुद्दा नसून वजन आटोक्यात ठेवणे, दुखापत झाली असेल तर त्यासाठी उपाय आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा पर्याय आहेत.

योगासने, जेवणाबद्दलचे सल्ले, फिटनेसबद्दल सल्ले हे सगळे या एप्लिकेशन मध्ये आहे त्यामुळे आपल्या एकूण हेल्दी लिव्हिंगसाठी हे उपयुक्त आहे.

याशिवाय आपल्याला ट्रेन करणारे वेगवेगळे ट्रेनर्स आहेत, आपल्याला आवडेल त्या ट्रेनरला आपण फॉलो करू शकतो.

यात अगदी सोप्या पद्धतीने समजावलेले स्टेप-बायस्टेप व्हिडीओ आहेत शिवाय आरोग्यपूर्ण खाण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा आहेत.

7) Physique 57 onDemand

ह्या ऍप्लिकेशन मध्ये वेगवेगळे क्लास असतात. हे सगळ्यात जास्त सतत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. ह्यामध्ये कोणतीही साधने न वापरता जास्तीतजास्त चांगला व्यायाम कसा करावा ह्याचे मार्गदर्शन असते.

ह्यामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागावर वेगवेगळे व्यायाम असतात त्यामुळे आपले जे उद्दिष्ट असते त्याप्रमाणे आपण ठरवू शकतो आणि फक्त त्याच भागावर काम करू शकतो.

ह्या एप्लिकेशन मध्ये दर आठवड्याला एक वेगळा व्हिडीओ टाकला जातो त्यामुळे सतत नवीन व्यायाम शिकायला मिळतात.

यात क्लासेसचं ऑन लाईन स्ट्रीमिंग होतं. त्यामुळे कुठेही व कधीही आपल्या वेळेनुसार आपण बघून व्यायाम करू शकतो.

व्हिडीओजना पॉज, फास्ट फॉरवर्ड किंवा रिवाईंड करायची सोय सुद्धा यात आहे. विकत घेतल्यानंतर ४८ तासांसाठी आपल्याला हा व्हिडीओ उपलब्ध असतो.

8) Tone It Up

या एप्लिकेशनमध्ये एक नवीन वर्कआउट रोज ऍड केला जातो त्यामुळे अगदी क्लासमध्ये जाऊन शिकल्यासारखे वाटते.

आपण रोजचा वर्कआऊट करू शकतो किंवा जुनाच एखादा वर्कआऊट लायब्ररीमधून निवडून करू शकतो. यात योगापासून ते किकबॉक्सिंगपर्यंत क्लासेस आहेत.

गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा यात व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत.

यात दिलेल्या व्यायामासाठी कुठल्याच साधनांची गरज नाही त्यामुळे आपण घरातल्या घरात सुद्धा ते करू शकतो.

व्यायामाच्या खूप प्रकारांबरोबरच या एप्लिकेशनमध्ये आरोग्यपूर्ण रेसिपीबद्दल सुद्धा माहिती आहे.

9) Pure Barre on Demand

Barre हा एक उत्तम स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआऊट आहे. हे वर्कआऊट ५ मिनिटं ते एक तास या लांबीचे असतात

त्यामुळे रोजच्या कामात सुद्धा आपण त्यासाठी वेळ काढून सहज करू शकतो.

ह्या एप्लिकेशनचे वेगळेपण म्हणजे ह्यात बाकी लोकांनी आधी केलेल्या व्यायामाचे व्हिडीओ सुद्धा समाविष्ट आहेत.

दुसऱ्या लोकांनी केलेलं व्यायाम बघणे हे सुद्धा आपल्याला प्रेरणा देणारे असते आणि त्यामुळे आपण व्यायाम करायला प्रेरित होतो.

ह्या एप्लिकेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत, वेगवेगळ्या लांबीचे व्हिडिओ आहेत आणि ह्यासाठी कोणतेही साधन लागत नाही.

10)  Daily Burn

ज्या लोकांना एक ठरलेला व्यायामाचा आराखडा हवा असेल अशा लोकांसाठी हे एप्लिकेशन खूप उपयोगी ठरते.

ह्या एप्लिकेशन मध्ये एक ठरलेला प्लॅन असतोच आणि जर आपल्याला हवे असेल तर आपल्या गरजेप्रमाणे , आपले जे काही उद्दिष्ट असते त्याप्रमाणे आपण आपल्या व्यायामाचा आराखडा बनवू शकतो.

ह्या मध्ये आपण लाईव्ह बाकी लोकांसोबत व्यायाम करू शकतो ज्यामुळे आपल्याला एकटे वाटत नाही .

त्याचबरोबर जर आपल्याला लाईव्ह जमले नाही तर आपण हे रेकॉर्ड करून नंतर सुद्धा बघून त्याप्रमाणे व्यायाम करू शकतो.

इच्छा असली की मार्ग सापडतो असे म्हणतात तसे इथे जर आपल्याला खरेच व्यायाम करण्याची इच्छा असेल तर तो आपण कुठेही, कसाही करू शकतो.

अशी एप्लिकेशन आपल्याला व्यायाम करायला मदत करतात आणि त्याप्रमाणे व्यायाम केला असता आपले आरोग्य चांगले राहते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!