डोकेदुखी घालवणारे चौदा घरगुती उपाय

डोके दुखत असताना पॅरासिटामोल किंवा कुठलीही पेन किलर न घेता घरगुती असे काही उपाय केले आणि काळजी घेतली तर डोकेदुखीचा त्रास थोपवता येऊ शकतो.

यासाठीचे काही घरगुती उपाय वाचा या लेखात.

डोकेदुखीच्या त्रासाने आयुष्यात कधी ना कधी आपल्याला सगळ्यांनाच छळलेले आहे.

उन्हाने, थंड पाण्याने, आवाजाने, टेन्शनने अशा अनेक कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

यावर उपाय म्हणून आपण कधीतरी गरम चहा, कॉफी पितो आणि अगदीच असह्य झाले तर एखादे ओव्हर द कॉउंटर औषध सुद्धा घेतो.

यात एक धोका मात्र असतो अशा गोळ्यांची आपल्याला सवय लागण्याची शक्यता असते.

कोणत्याही गोळ्यांचा अतिरेक वाईट असतो हे आपल्याला माहीत आहेच त्यामुळे आपण जास्तीत जास्त भर घरगुती उपायांवर दिला पाहिजे.

आजच्या या लेखात आपण डोकेदुखी घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊया.

१. भरपूर पाणी प्या

पाणी न पिण्याने डिहायड्रेशन होते व ते डोकेदुखीचे महत्वाचे कारण आहे.

डोके दुखायला लागल्यावर पाण्याचे प्रमाण वाढवल्याने सुद्धा डोकेदुखी कमी होऊ शकते आणि दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पीत राहिल्याने आपण डोकेदुखीला आपल्यापासून दूर ठेऊ शकतो.

सतत पाणी प्यायची सवय लागण्यासाठी आपण आपल्याबरोबर नेहमी पाण्याची बाटली ठेवू शकतो

त्यामुळे आपल्याला नेहमी पाणी प्यायची आठवण राहील. याशिवाय आपल्या आहारात आपण फळे, ज्युस, सूप अशा गोष्टींचा समावेश करू शकतो.

https://www.manachetalks.com/9335/chirtarun-disnyasathi-pani-pinyachya-svyi/

२. बर्फाचा शेक घ्या

हा एक अतिशय सोपा घरगुती उपाय आहे. डोके दुखायला लागल्यावर डोक्याला व मानेला बर्फाने शेक दिल्यास आराम मिळतो.

डोके दुखायला लागल्यावर चटकन गोळी घेण्याअगोदर हा सोपा उपाय करून बघायला हवा.

३. गरम पाण्याने शेक घ्या

जेव्हा एखाद्या टेन्शनमुळे किंवा स्ट्रेसमुळे डोके दुखत असेल तेव्हा गरम पाण्याने शेक दिल्यास लवकर आराम मिळतो.

टेन्शनमुळे होत असलेल्या डोकेदुखीत डोक्यातले मसल्स आणि रक्तवाहिन्या आकसलेल्या असतात, गरम शेक दिल्याने त्या सैल व्हायला मदत होते.

गरम पाण्याची अंघोळ सुद्धा अशाप्रकारच्या डोकेदुखीत आराम देतो.

४. डोके मोकळे ठेवा

कधीकधी डोकेदुखीचे कारण फिजिकल असू शकते. खूप घट्ट वेणी किंवा अंबाडा, डोक्यावर घातलेला हेयरबँड या गोष्टींमुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते.

त्यामुळे डोके दुखायला लागल्यावर शक्यतो डोके व केस मोकळे सोडले तर फायदा होतो.

५. अंधार करून मंद प्रकाशात बसा

डोके दुखत असताना बऱ्याच लोकांना तीव्र उजेडाचा प्रचंड त्रास होतो.

रस्त्यावरचे लाईट, कॉम्पुटर स्किनचा उजेड किंवा मोबाईल फोनचा ब्राईटनेस हे सुद्धा डोकेदुखी वाढवण्यासाठी कारणीभूत असतात.

त्यामुळे डोके दुखत असताना तीव्र उजेड टाळणे हे फायदेशीर असते.

अंधाऱ्या खोलीत मंद प्रकाशाचा दिवा लावून शांत बसणे हा डोकेदुखीवरचा साधा, सरळ आणि सोपा उपाय आहे.

६. हर्बल चहा प्या

हर्बल चहाचा दुहेरी फायदा आहे. एकतर यामुळे आपोआप जास्त पाणी प्यायले जाईल शिवाय हर्बल चहात असलेल्या घटकांचा सुद्धा फायदा होईल.

गरम पाण्यात आल्याची पावडर घालून प्यायल्यास मायग्रेनची डोकेदुखी सुद्धा कमी होते.

याचबरोबर ग्रीन टी, कॅमोमाईल टी हे सुद्धा डोकेदुखी घालवण्यासाठी फायदेशीर असतात.

७. नियमितपणे व्यायाम करा

व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते हे तर सर्वश्रुत आहे पण याचबरोबर व्यायामामुळे शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होतो.

रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्याने डोके दुखायची शक्यता आपोआपच कमी होते.

रोज तीस मिनिटे जोरात चालणे किंवा सायकलिंग करणे अशा व्यायामांमुळे शरीरातील रक्तपुरवठा नीट होतो. अशाप्रकारे नियमितपणे व्यायाम केल्याने आपण डोकेदुखीची समस्या निर्माण होण्याअगोदरच थोपवू शकतो.

८. पित्तकारक पदार्थ टाळा

पित्तामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे पित्त होऊ न देणे हा डोकेदुखी टाळण्याचा एक महत्वाचा उपाय आहे.

आपल्या खाण्यातून नकळतपणे पित्तकारक पदार्थ जात असतील तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.

उदाहरणार्थ. काही लोकांना खूप शेंगदाणे किंवा दाण्याचे कूट घालून केलेले पदार्थ खाल्ले तर पित्ताचा त्रास होतो

ज्यामुळे डोके दुखते. अशा लोकांनी शेंगदाणे टाळलेलेच बरे असतात.

प्रत्येकासाठी शेंगदाणे हाच प्रॉब्लेम असेल असे नाही त्यामुळे असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्याला पित्त होते ते ओळखले पाहिजेत व ते कटाक्षाने टाळले पाहिजेत.

ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

९. झोप व्यवस्थित घ्या

सलग नीट झोप न होणे, झोपच न लागणे, पुरेशी झोप न होणे किंवा अति प्रमाणात झोपणे या सगळ्यामुळे डोकेदुखी होऊ शकते त्यामुळे झोपेचे गणित नीट जमणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्याला सात ते नऊ तास झोप गरजेची असते त्यामुळे आपण आपल्या दिवसाचे रुटीन व्यवस्थित बसवले पाहिजे व कामाची आखणी आपल्या झोपेच्या वेळेत येणार नाहीत अशी केली पाहिजे.

झोप न येण्याचे अजून एक कारण म्हणजे अतिरिक्त टेन्शन किंवा स्ट्रेस, त्यामुळे व्यवस्थित झोप होण्यासाठी या गोष्टींवर सुद्धा काम केले पाहिजे.

https://www.manachetalks.com/11983/healty-sleep-changli-zop-yenyasathi-vyayam-aahar-gharguti-upchar-marathi/

१०. मालिश करा

डोकेदुखी मध्ये बऱ्याच वेळा आपल्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडलेला असतो ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते.

त्यामुळे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये किंवा नाकाच्या मुळाच्या दोन्ही बाजूने हलका मसाज केला तर तिथले स्नायू सैल होतात आणि डोकेदुखी कमी होते.

त्याचबरोबर मानेच्या मागच्या बाजूने स्नायू सुद्धा कधीकधी आक्रसतात आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होते. अशावेळी तिथे मालिश केल्याने आपली डोकेदुखी कमी होते.

११. शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा

आपल्या शरीरावर आणि मनावर विविध प्रकारचा ताण असतो.

अशावेळी ह्या ताणामुळे आपल्याला कधीकधी डोकेदुखी होते.

अशावेळी ताण घालवण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो जसे की योगासने, ध्यान, संगीत ऐकणे, काही व्यायाम, खेळ.

अशा गोष्टींमुळे आपला ताण कमी होतो आणि डोकेदुखी थांबते.

https://www.manachetalks.com/11334/accupressure-points-for-stress-anxity-marathi-health-blog-manachetalks/

१२. दारूचे अतिरिक्त सेवन टाळा

दारू प्यायल्यानंतर दुसऱ्यादिवशी हँग ओव्हर मुळे डोके दुखणे ही एक सामान्य समस्या आहे.

जर रात्री जास्त दारू प्यायली तर पुढचा पूर्ण दिवस आपल्याला डोकेदुखी सहन करावी लागते. त्यामुळे हे टाळण्यासाठी दारूचे अतिरिक्त सेवन टाळावे.

https://www.manachetalks.com/11829/home-remidies-to-prevent-h-a-n-g-o-v-e-r-marathi-health-blog/

१३. कॉफीनचे सेवन करा

काही प्रयोगात असे सिद्ध झाले आहे की कॉफीनच्या प्रमाणात केलेल्या सेवनामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

त्यामुळे आपण कॉफी, शीतपेय ह्या गोष्टींचे सेवन करून आपली डोकेदुखी कमी करू शकतो.

मात्र कॉफीनचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्याने आपली झोप कमी होते आणि त्यामुळे पुन्हा डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे कॉफीनचे सेवन करताना ते ठराविक प्रमाणात करणे गरजेचे आहे.

१४. तीव्र वासापासून लांब राहा

काही केमिकल किंवा उग्र वासाची अत्तरे ह्यामुळे सुद्धा डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.

असा तीव्र वास जर जास्त वेळ आपल्याला येत राहिला तर त्यामुळे आपल्याला डोकेदुखी सुरू होते आणि जोपर्यंत आपण त्या वासापासून दूर जात नाही तोपर्यंत आपली डोकेदुखी कमी होत नाही.

त्यामुळे जर कधी अशा ठिकाणी जाणे अनिवार्य असेल तर मास्कचा वापर करणे सर्वात चांगले असते.

डोकेदुखी ही नेहमी होणारी एक अत्यंत साधी व्याधी आहे आणि ती डॉक्टरकडे न जाता कशी दूर करता येईल ह्यावर आज आपण विचार केला.

मात्र हे सगळे उपाय कधीतरी होणाऱ्या आणि फार काळ न टाकणाऱ्या डोकेदुखीवर आहेत मात्र जर आपल्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा आपल्या डोकेदुखीची तीव्रता खुप जास्त असेल तर मात्र अजिबात वेळ न घालवता डॉक्टरकडे जाणेच योग्य आहे.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय