तुमच्या आहारात साखर, मीठ हे जास्त प्रमाणात घेता का तुम्ही? मग हे नक्की वाचा

आपल्या मेंदुत एक रिवॉर्ड सिस्टीम असते, जी आपल्याला संवेदना पाठवते, आपल्याला काय आवडतं, काय नाही, हे कळवते, कोकेन आणि ड्रग्ज घेतल्यावर ते मेंदुत ‘डोपामिन’ नावाचं द्रव्य संप्रेरीत करतात, ज्यामुळे तात्काळ खुप छान वाटतं, हवेत उडाल्यासारखी फिलींग येते. हेच खुप छान फिलींग पुढे त्या व्यसनाचं कारण बनतं. दुर्दैवाने हा सेम प्रकार साखरेच्या सेवनानेही होतो.

नमस्कार मित्रांनो, मी लिहलेले लेख तुम्हाला आवडतात, याबद्दल मनापासुन आभार!..

असं समजा, तुम्ही सगळे माझ्या लेखणीचे भरभरुन कौतुक करता, म्हणुन आनंदी होवुन मी तुम्हा सर्वांना गिफ्ट पाठवायचे ठरवले आहे. तुम्ही तुमचा एड्रेस मला दिला आणि तुम्हाला एक सुंदर पॅक केलेला डबा मिळाला.

त्यात सुंदर-सुंदर रंगबेरंगी, गोड गोड, टेस्टी चॉकलेट्स आहेत, ते पाहुन काय होईल? तुम्ही खुप आनंदी व्हाल!.. तुम्ही खाऊन मुलांना द्याल!.. मला थॅंक्यु म्हणाल!..

आपल्या मेंदुत एक रिवॉर्ड सिस्टीम असते, जी आपल्याला संवेदना पाठवते, आपल्याला काय आवडतं, काय नाही, हे कळवते, कोकेन आणि ड्रग्ज घेतल्यावर ते मेंदुत ‘डोपामिन’ नावाचं द्रव्य संप्रेरीत करतात, ज्यामुळे तात्काळ खुप छान वाटतं, हवेत उडाल्यासारखी फिलींग येते. हेच खुप छान फिलींग पुढे त्या व्यसनाचं कारण बनतं. दुर्दैवाने हा सेम प्रकार साखरेच्या सेवनानेही होतो.

आणि समजा, त्या पाकीटात ड्रग्ज किंवा हेरॉईनसारखे पदार्थ असतील तर? तुम्ही शॉक व्हाल!.. तुम्ही टेस्ट करणार नाही आणि मुलांना तर बघुही देणार नाही.

त्याउलट ते गिफ्ट पाठवणार्‍याच्या सात पिढ्यांचा उद्धार कराल!… तो मिळाला तर पकडुन माराल, काही नाही तर पोलींसाकडे तक्रार करालच!.. हो ना!…

पण मी जर सांगीतलं की, ड्रग्ज आणि गोड वस्तु ह्या सारख्याच जीवघेण्या आहेत, तर तुम्हाला अजुन एक धक्का बसेल!..

माणसाच्या आरोग्यासाठी घातक असणार्‍या आणि तरीही भरपुर प्रमाणात खाल्ल्या जाणार्‍या अशाच पदार्थांविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे.

अमेरीकेत नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असं सिद्ध झालयं की ड्रग्ज घेतल्या मेंदुचा जो भाग एक्टीव्ह झाला, जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानेही मेंदुचा तोच पार्ट एक्टीव्ह झाला.

थोडक्यात साखर सुद्धा आपल्या मेंदुवर एखाद्या ड्रगसारखाच परिणाम करते.

आपल्या मेंदुत एक रिवॉर्ड सिस्टीम असते, जी आपल्याला संवेदना पाठवते, आपल्याला काय आवडतं, काय नाही, हे कळवते, कोकेन आणि ड्रग्ज घेतल्यावर ते मेंदुत ‘डोपामिन’ नावाचं द्रव्य संप्रेरीत करतात.

ज्यामुळे तात्काळ खुप छान वाटतं, हवेत उडाल्यासारखी फिलींग येते. हेच खुप छान फिलींग पुढे त्या व्यसनाचं कारण बनतं. दुर्दैवाने हा सेम प्रकार साखरेच्या सेवनानेही होतो.

साखरही डोपामिनला गरजेपेक्षा जास्त रिलीज करतं, ज्यामुळे तो गोड पदार्थ खाताना आपल्याला खुप मजा येते, त्यामुळे गच्च पोट भरल्यावरही, लालचुटुक गुलाबजामुन किंवा गुलाबी आईस्क्रीमकडे बघुन जीभल्या चाटत आपण म्हणतो.

गोड खाण्यासाठी माझ्या पोटात नेहमीच जागा असते. परिणाम आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खातो.

सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की ड्रग्जच्या, इतर व्यसनांच्या बाबतीत एवढे अलर्ट असलेले आपण चॉकलेट, बिस्कीट आणि असल्या आकर्षक पदार्थांना चवीने खातो.

टि.व्ही वरच्या जाहीराती बघुन, त्यांना पौष्टीक समजतो आणि मुलांनाही आनंदाने भरपुर खाऊ घालतो. आपल्याला हे समजतच नाही की जास्त साखर खाणं, आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी जीवघेणं आहे,…. अगदी त्या ड्रग्जसारखं वाईट.

फरक एवढाच ते घातक ड्रग्ज जलदगतीने परिणाम दाखवतात आणि जीव घेतात तर साखर हळुहळु माणसाला आजारी पाडून शरीर पोखरते.

एक रिसर्चनुसार, अमेरीकेतली आजची तरुण पिढी, त्यांच्या आईवडीलांएवढं आयुष्य जगणार नाही, कारण एकच लठ्ठपणा!…

अजुन एक ताजा रिसर्च असंही सांगतोय, की जगात योग्य आहार न मिळुन कुपोषणाने मरणार्‍या लोकांपेक्षा कितीतरी जास्त लोक लठ्ठपणामुळे मरत आहेत, आणि ह्याला कारण आहेत माणसाच्या आरोग्याचे तीन शत्रु, साखर, मीठ आणि फॅट.

दुष्मन क्रमांक एक – साखर

शास्त्रज्ञ सांगतात की जेवण झाल्यावर आपलं पोट भरलं का नाही ते आपल्या मेंदुला कळवणारं, लॅप्टीन नावाचं, एक हार्मोन असतं.

साखर जास्त खाल्ल्यानं, हे हार्मोन आपलं काम नीट करु शकत नाही, त्यामुळे आपण आपल्या क्षमतेपेक्षा आणि आवश्यकतेपेक्षा जास्त जेवतो.

ह्या अतिखाण्यामुळे शरीरातले पॅन्क्रीयाज त्यांचं काम नीट करु शकत नाहीत, ज्यामुळे शरीरात नको असलेले आगंतुक पाहुणे येतात, जसं की लठ्ठपणा, मधुमेह, ह्रद्यरोग, ब्लड प्रेशर आणि दातदुखी…

अजुन एक धक्का देतो. ह्या सगळ्यामागे एक षडयंत्रसुद्धा आहे. १९६० मध्ये जगभरातल्या मोठमोठ्या फुड कंपन्यानी पैसे खाऊ घालुन त्यांच्या मनाप्रमाणे एक रिसर्च पेपर प्रकशित केला ज्यात साखरेचे सारे घातक दोष सॅच्युरेटेड फॅट्स वर ढकलण्यात आले.

म्हणजे त्यांचे गोड गोड आणि महागडे प्रॉडक्टस भरपुर प्रमाणात आणि बिनबोभाट विकत राहावेत.

आणि एक सत्य हे पण आहे की ह्या तीन पदार्थांना वापरुन, लाखो लोकांच्या जीवाशी खेळुन, जीभेला सवय लावुन, अनेक कंपन्या अरबपती झाल्या आहेत.

दुष्मन क्रमांक दोन – मीठ

तुम्ही चिप्सचं पॅकेट फोडा आणि एक-दोन चिप्स खाऊन थांबा, पैज लावुन सांगतो, असं होवुच शकत नाही. तुम्ही सगळा पॅकेट चाटूनपुसुन संपवता, शेवटचा चिप्स खाताना हळहळता.

दुःख व्यक्त करत कव्हर फेकुन देता, इतकी ती जादुई चव असते, कारण एकच, मीठ!..

मीठाचे पदार्थ खाताना आपली जीभ नियंत्रण हरवुन बसते, नुसते शेंगदाणे थोडेसेच खाल्ले जातात, खारावलेले शेंगदाणे खुप खावेसे वाटतात, That’s why kharimure is so famous!..

मीठ हे माणसाला सिगरेटसारखंच व्यसनी बनवतं.

कुठल्याही साधारण चवीच्या पदार्थाला मीठ अत्यंत रुचकर चव प्रदान करतं, त्यामुळे खाण्याची मजा कित्येक पटीने वाढते.

प्रमाणाबाहेर मीठ म्हणजे ह्रद्यरोग, किडणीचे विकार, मेंदुच्या नसा खराब आणि हाडांचं दुखणं!..

दुष्मन क्रमांक तीन – फॅट

यासारखंच, फॅट असलेले पदार्थ जसं की बटर, चीज. साधा पिझ्झा तितका चांगला नाही लागत पण त्यावर मेल्टेड चीज टाकल्यास वॉव फिलींग येते.

(शप्पथ! मलाबी लई आवडतयं, चीज..) ते आपल्या जीभेला इतकं चांगलं लागतयं की ते पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा खातो.

आवश्यकतेपेक्षा जास्त फॅट्स म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण! आपल्या अवतीभवती, अनेक धडधाकट लोक रोज आजारी पडतायत, रोज मरत आहेत.

टॉपची दोनचं कारणं आहेत, एक ह्रद्यरोग, दुसरा मधुमेह!..

खरंतर, एवढं डिटेल नसलं तरी हे सगळं थोड्याफार प्रमाणात आपल्या सगळ्यांनाच माहीत असतं, तरीही आम्ही आमच्या सवयी बदलु शकत नाही……

का????

जीभेचे गुलाम – एखादा ढोला माणुस अति खाऊन खाऊन मोटा झालाय, त्याला स्वतःलाही समजतयं, की आपलं चुकायलयं, पण स्वतःवरचं नियंत्रण हरवुन बसलाय, याला म्हणतात, कळतंय पण वळत नाही, ही अवस्था असणारे लोक!..

कंपन्याची पैशाची भुक – मोठमोठ्या कंपन्या आपला माल खपवण्यासाठी, करोडो रुपये मोजुन, मनाला चटकन भुरळ पाडणार्‍या, रंगबेरंगी, चटकदार, अत्यंत आकर्षक जाहीराती तयार करतात.

जीभेला चाळवतात, इतकचं नाही, तर त्यांचे फुड इंजिनीअर, खुप परिश्रम करुन अतिशय चविष्ट पदार्थ, तयार करुन बाजारात आणतात.

आपसुकच एकदा खावुन आपले समाधान होत नाही, चवीपुढे आपण आगतिक आणि लाचार होतो. स्वतःला रोखणं जवळपास अशक्य होवुन बसतं. त्या बिचार्‍यांचा तरी काय दोष म्हणा, जे विकतं तेच पिकवणार!, मागणी तसा पुरवठा!..

समुह मनाची मानसिकता – सगळेच खातेत की!. मग मला काय होणार आहे ही मानसिकता!.सिगरेटने कॅंसर होतो, लोकं मरतात, सगळ्यांना माहीत असतं तरीही लाखो लोकं सिगरेट ओढतात.

कारण आपण अवतीभवती बघतो आणि म्हणतो, सगळे करतात, म्हणजे बरोबरचं असेल, तसंच गोड खाणे इतकं कॉमन आहे की आपल्याला त्यात वावगं काहीच वाटत नाही.

कंपन्याच्या चॉकलेट, बिस्कीट, कोल्ड्रंकच्या जाहीरातींचा सतत मारा सुरु आहे, की आपल्याला ते खाणं पिंणं एकदम नॉर्मल वाटु लागतं. जीव गेला तरी आपल्याला त्यात दोष दिसुन येतचं नाही.

उपाय

ज्याप्रमाणे कोकेन सारख्या ड्र्ग्जला दुर ठेवता तसे साखर, मीठ आणि फॅट्सच्या पदार्थांशी फटकुन वागा. जीभेचे लाड करु नका.

असे पदार्थ आहारात जास्त येऊ नयेत म्हणुन सदैव दक्ष असा, फास्ट फुड ऐवजी फळांकडे वळा.

लक्षात घ्या, खर्‍या पौष्टीक आहारांची मागणी वाढली की कंपन्याही तसलेच प्रॉडक्ट बनवतील.

तुम्हाला पटलं असेल तर हे ज्ञान परीवार, मित्र आणि इतरांसोबत शेअर करा, म्हणजे पुन्हा चांगलं समुहमन तयार होईल आणि आपण समर्थपणे ह्या शत्रुंचा सामना करु शकु. सर्वांचा आहार चांगला होईल, आणि आरोग्यही!..

(हा लेख सॉल्ट, शुगर एंड फॅट ह्या मायकेल मॉस ह्यांच्या पुस्तकाचा अभ्यास करुन सारांश रुपात लिहला आहे.)

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “तुमच्या आहारात साखर, मीठ हे जास्त प्रमाणात घेता का तुम्ही? मग हे नक्की वाचा”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय