पँडॅमिक मध्ये होमस्कूलिंग आनंदी आणि संस्कारी कसे बनवता येईल

होमस्कूलिंग आनंदी आणि संस्कारी कसे बनवता येईल

कोरोंना विषाणूच्या जगभर पसरणाऱ्या प्रादुर्भावमुळे सध्या जगातील सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. जणू आपण फक्त यंत्रामानवासारखे घरातच फिरतोय अशी अवस्था झाली आहे.

सर्व जीवनावश्यक व्यवहार थांबले आहेत. त्यातही शाळा बंद आहेत. मोठ्या औद्योगिक क्षेत्रासारखा माणसलाही ब्लॉक क्लोजर निसर्गाने दिला हे, असे मला वाटते.

असो, याची गरज होतीच पण ती माणसाला जाणवली नाही, निसर्गाने ती माणसाला दिली. शाळा बंद आणि मुले घरात म्हंटल्यावर बऱ्याच पालकांच्या कपाळावर आठ्या पडल्याच, पण मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असणार की आता या मुलांना कसे सांभाळायचे?

त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा? बाहेरच्या शिकवण्या बंद आहेत, मग घरी काय आणि कसं शिकवायच?

आजाराच्या भीतीने सुट्टीत बाहेर गर्दीत जाता येत नाही, बाहेरचे काही खायला देता येत नाही, अश्या अनंत प्रश्नांनी पालकवर्ग चिंतेत आहे.

मी ही एक आई आहेच, मलाही हेच प्रश्न पडले आहेत पण मी त्यातून मार्ग काढलाय. तो मार्ग काय आहे ते मी या लेखातून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. कदाचित वेगळ्या अर्थाने घर हीच शाळा बनवून या…

लॉकडाऊनच्या दिवसात आपल्या सारख्या पालकांना शिक्षकाची भूमिका पार पडायची आहे.

माझ्या मुलाला सुट्टी लागल्यानंतर मी विचार करून काही कामांची यादी केली. त्यामध्ये अभ्यासाबरोबर घरातील काही कामांचाही समावेश आहे.

यामध्ये चार भाग पडले, अभ्यास-संस्कार- सवयी- आरोग्य.

या चार विषयांची शाळेत असते तशी तासिका मात्र नाही केली, पण अभ्यासाची वेळ मात्र तीच ठेवली.

माझा मुलगा मोठ्या गटात म्हणजे सीनियर केजीत आहे. त्यामुळे त्याच्या मूड्नुसार या गोष्टी मी त्याला करायला सांगते. त्यामध्ये काय काय आहे बघा.

घरकाम

 • दुकानातून दूध आणि इतर आवश्यक वस्तु आणणे.
 • धुतलेले कपड्यांच्या घड्या घालणे.
 • झाडांना पाणी घालणे.
 • खेळण्यांशी खेळून झाल्यावर ती पिशवीत भरणे.
 • घरातील खुर्च्या पुसणे
 • घासून ठेवलेली भांडी मांडायला मदत करणे
 • सरबत तयार करणे.
 • वर्तमानपत्र घडी घालून ठेवणे.
 • भाजी धुवून फ्रीज मध्ये ठेवणे, वस्तु जगाच्या जागी ठेवणे,
 • छाप घेवून रांगोळी काढणे.
 • घराच्या आसपासचा कचरा गोळा करणे.

अशी काही कामे मी त्याला रोज सांगते एका दिवशी दोन किंवा एकाच काम सांगते म्हणजे त्याला कंटाळा येत नाही आणि ते काम करताना आनंद होतो.

संस्कार आणि सामान्य ज्ञान

एरवी मुले शाळेत जातात आणि संध्याकाळी काहींची शिकवणी असते त्यामुळे आवर्जून त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी पालकांना वेळ मिळत नाही.

पण आता मोठा वेळ पालकांना आणि मुलांनाही मिळाला असून यामध्ये अनेक संस्कारिक गोष्टी मुलांना शिकवू शकता.

 • सकाळची प्रार्थना- कराग्रे वसते लक्ष्मी, सायंप्रार्थना-शुभमकरोति
 • मनाचे श्लोक
 • गणेश स्तोत्र.
 • स्वतःचा पूर्ण पत्ता, आई वडिलांचे दूरध्वनी क्रमांक.
 • नद्यांची नावे, शहरांची नावे, गाणी, पोवाडा
 • रंजक गोष्टी सांगणे आणि त्या पाठ करून घेणे
 • पेपरपसून काही वस्तु तयार करणे अश्या अनेक गोष्टी मुलांना पालक शिकवू शकतात.

चांगल्या सवयी आणि आरोग्य.

मुलांना एरवी सकाळी उठल्यावर दात घासणे, पोट साफ करणे आणि आंघोळ करून, कपडे घालून शाळेत शाळेत जाणे एवढीच सवय लागलेली असते. कारण ती अनिवार्य असते.

पण याशिवायही अनेक चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे त्या पाहुयात.

 • योगासने करणे, व्यायाम करणे.
 • खेळून आल्यावर साबणणे हातपाय, तोंड स्वच्छ धुणे.
 • जेवण झाल्यावर ताट घासायला देणे, उचलून ठेवणे, जेवताना सगळ्यांसाठी पाणी घेणे.
 • घरात येणाऱ्या माणसांना नमस्कार करणे.
 • वाचन करणे
 • चांगल्या गोष्टी ऐकणे.
 • निसर्गात रमणे.

आता महत्वाचा मुद्दा अभ्यास. अभ्यास तर घेतलाच पाहिजे पण तो काहीशी युक्ति वापरुन घेतला तर त्याचा कंटाळा येणारच नाही.

त्यासाठी अभ्यास लेखी आणि तोंडी या दोन प्रकारात घ्यायला हवा.

जसे की मराठी मुळाक्षरांपासून तयार होणार्‍या घरातील वस्तु. जसे की ‘आ’ पासून आरसा, ‘क’ पासून कपाट,काठी. असे काही खेळ खेळा, अंक मुलांना सांगा.

वस्तूचे चित्र काढून त्यांची स्पेलिंग त्यांना लिहायला सांगा, तसेच फळे, अवयव नावे, इंग्रजी आणि मराठी मुळाक्षरे, पाढे म्हणणे या गोष्टी करता येतील. तसेच लेखनाच्या बाबतीतही करता येईल.

दररोज दहा ओळी शुद्धलेखन, पाढे, गणिते लिहायला सांगितली पाहिजेत. शाळेतील पुस्तकातील अभ्यास, वाचन याचाही अभ्यास मनोरंजक पद्धतीने पालकांनी घ्यावा.

हे सर्व करताना शाळेचा मोबाईलवर येणारा अभ्यास आणि त्याचा ‘स्क्रीन टाइम’ याचीही मर्यादा मुलांना घालून द्या.

या सगळ्या गोष्टी पालकांनी पाल्यांना दमदाटी किंवा मारहाण ना करता कराव्यात.

काही अडचण आल्यास शाळेतील शिक्षकांना जरूर विचारणा करावी. कारण बाहेरच्या परिस्थितीमुळे त्यांना घरात बसावे लागते यात त्यांची चूक नाही तर सुरक्षितता आहे.

याचा चांगला उपयोग पाल्यांना आणि पालकांना व्हावा हीच अपेक्षा. सर्वांनी काळजी घ्या आणि निरोगी रहा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.