सवयी कशा लागतात? आणि चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या?

सवयी कशा लागतात? आणि चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या?

प्रत्येकालाच काही तरी चांगली-वाईट सवय असतेच. असं म्हणतात की, माणूस हा सवयीचा गुलाम असतो. आपण सवयीचा गुलाम कसं बनतो? त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे? हे वाचा या लेखात.

आपल्यापैकी प्रत्येकालाच कोणती न कोणती सवय असतेच, काही चांगल्या असतात तर काही वाईट.

अनेकजण त्यांच्या विचित्र सवयींमुळे चार चौघात चेष्टेचा विषय होतात.

तुम्हाला माहिती आहे का की त्या सवयी आपल्याला कशा लागतात?

आपण लहान असतो तेव्हा आपल्याया बर्‍याच सवयी जडतात. जसे की अंगठा चोखणे, दुपारी शाळेतून घरी आल्यावर झोपणे, टीव्ही पाहत जेवणे, काहीतरी हातात घेवून झोपणे अश्या अनेक सवयी.

आता आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्याबरोबर ब्रश केल्यावर चहा किंवा कॉफी लागतेच, ते पिल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही.

आपल्याला कंटाळा आला किंवा कामात काही सुचत नसल्यावर आपण चहा मागावतो आणि तो प्यायल्यावर एकदम आपल्याला तरतरी येते आणि भन्नाट काहीतरी सुचते. असे अनेकांचे रुटीन आहे.

पाहिलीत सवयीची शक्ति?

अश्या अनेक सवयी आपल्याला काहीवेळा त्रासदायक वाटतात. माझ्या एका मित्राला सतत पाय हलवायची सवय होती.

मिटिंगमध्ये, घरात पाहुण्यांसमोर, मित्रांमध्ये बसल्यावर तो त्याचे दोन्ही पाय हलवत बोलायचा. समोरच्याला, पहाणार्‍याला ते विचित्र वाटायचे.

अश्या विचित्र सवयी तुम्हाला तर नाहीत ना? असतील तर थोडा विचार करा आणि कोणत्या सवयी तुम्हाला आहेत त्याची यादी बनवा.

त्यातील चांगल्या कोणत्या आणि वाईट कोणत्या याचे वर्गीकरण करा? गोंधळात पडलात ना?

खरे तर आपल्याला सर्वच सवयी चांगल्या वाटतात. वर्षानुवर्षे लागलेली सवय एका दिवसात बदलणे अशक्यच आहे.

पण या सवयी लागण्याची प्रक्रिया, त्यांचे प्रकार आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काही मार्ग आपल्याला माहीत आहेत का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊयात याविषयी.

सवय कशी लागते?

कोणत्याही विचाराची आणि कामाची प्रतिक्रिया आपण लगेच देतो.

जसे की आपण गाडी चालवत असू किंवा चालत असू तेंव्हा ठरवलेल्या ठिकाणी जलदपणे कसे पोचता येईल, यासाठी कोणताही इतर विचार न करता, कोणतीही मदत न घेता चालत राहतो.

हे नैसर्गिकरीत्या घडते. याउलट कॉन्शियस माइंडमध्ये आपण याचा शांतपणे सारासार विचार करून कृती करतो.

त्यासाठी वेळ आणि ऊर्जा खर्च होते. सावकाशपाणे आपण निर्णय घेतो आणि त्यातून मार्ग काढतो. आता या दोन्ही मध्ये फरक असा आहे की पहिल्यांदा आपला मेंदू आळशी पर्याय शोधतो.

ज्यात फार श्रम ना करता काम होईल आणि तसा पर्याय नाही मिळाला तर सबकॉन्शियस माइंडची मदत घेतो.

अश्या प्रकारे दोन्ही प्रकारचे विचार आपल्याया करावे लागतात आणि त्यातूनच सवयीचा जन्म होतो.

नवीन सवयी कशा लागतात?

यासाठी आपण एक उदाहरण पाहुयात. समजा की तुम्हाला नवीन संगीत वाद्य वाजवायला शिकायचे आहे.

तर तुम्ही हळूहळू तुमचे शिक्षक जसे शिकवतील तसे शिकता.

सतत ते वाजवण्याचा सराव करता. हळूहळू तुम्हाला ते वाद्य वाजवण्याची कला आत्मसात होते आणि तुम्ही नंतर ते आपोआपच कोणाचीही मदत न घेता, जास्त प्रयत्न न करता वाजवू लागता.

म्हणजे पहिल्या कोन्शियस माइंडने तुम्हाला ते वाद्य शिकण्यासाठी हळूहळू विचार करायला लावले आणि त्याचे सातत्य टिकवून ठेवले पण नंतर तुम्ही कोणताही विचार न करता, मदत न घेता ते वाजवता तेंव्हा सबकॉन्शियस माइंडने तुमचा ताबा घेतलेला असतो.

आता तुमहला समजले असेलच की हळूहळू सवय काशी लागते.

सवयी कोणत्या प्रकारच्या असतात?

सवयी या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे वास्तववादी सवय.

काही सवयी या खूप लवकर ओळखता येतात. इतरांना या दिसून येतात. जसे की सिगरेट ओढणे, तंबाखू खाणे, जेवल्यावर पान खाणे, बडीशेप खाणे, उठल्यानंतर चहा घेणे.

मॉर्निंग वॉक करणे, व्यायाम करणे. दूसरा प्रकार आहे

याउलट काही सवयी या लोकांना दिसत नाहीत. या सवयी बहुतांशी आपल्या वर्तनाशी निगडीत असतात.

ज्याची जाणीव बर्‍याचदा आपल्याला नसते. जसे की आपण अनेकदा एकाच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, किंवा एकाचवेळी दोन्ही गोष्टी पाहतो….

एकटक छताकडे पाहणे, स्वमग्न असणे, उगाचच संशय घेणे इत्यादिचा समावेश त्यात होऊ शकतो.

अश्या सवयी शोधणे कठीण असते. कित्येकदा आपल्याला त्या सवयी वाटत नाहीत आणि स्वभावाचा भाग म्हणून आपण सोडून देतो.

पण त्याचा मानसिकतेवर अधिक प्रभाव पडत असतो. अनेकांना बोलताना डोळे मिचवायची सवय असते, तर काहींना मधूनच टाळ्या द्यायची सवय असते.

या गुप्त सवयी कशा ओळखायच्या?

या सवयींच संबंध थेट तुमच्या व्यक्तिमत्वाशी जोडला जात असल्याने त्या वेळीच ओळखल्या पाहिजेत.

अनेकदा अश्या सवयीमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंना मर्यादा येते, लोक तुमची चेष्टा करतात.

याचेही तीन प्रकार आहेत. या अशा गुप्त सवयी ओळखण्यासाठी काही प्रश्न मी तुम्हाला देत आहे ते स्वतःला विचारा आणि त्याची उत्तरे शोधा.

1)शरीरीक सवयी

1) तुम्ही कसे चालता? 2) बसताना तुम्ही पाठीचा बाक काढता का? 3) दररोज किती पाणी पिता? 4)तुम्हाला पाय हलवण्याची सवय आहे का? 5) विचार करताना नखे कुरतडता का?

2) सामाजिक सवयी

1) तुम्ही लोकांशी बोलताना त्यांच्याशी डोळे भिडवून बोलता की नजरेला नजर न देता बोलता? 2) खूप विचित्रपणे हातवारे करता का? 3)असा एखादा शब्द किंवा वाक्य तुम्ही सतत बोलता का? 4) लोकांमध्ये मिसळताना तुम्ही सतत मागे राहता का? 5) लोकांमध्ये भांडणे लावता का?

3) खाण्या-पिण्याच्या सवयी

1) रात्री झोपण्यापूर्वी कोणती कामे तुम्ही नेहमी करता? 2) सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने काय- काय करता? 3) दिवसातून किती जास्त वेळा तुम्ही चहा, नाश्ता खाता? 4) एखादा पदार्थ तुम्हाला रोज लागतो का?

4) स्वाभाविक सवयी?

1) जेंव्हा तुमच्यावर टीका होते तेंव्हा तुमची जलद प्रतिक्रिया काय असते? 2) जेंव्हा तुमचा एखादा मित्र/मैत्रीण महागड्या गाड्या, ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर टाकतात तेंव्हा तुम्हाला कसे वाटते? 3) नकारात्मक गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता? त्यावर कसा प्रतिसाद देता?

5) कार्यक्षमतेच्यामातेच्या  सवयी

1) तुम्हाला जर एखादे काम संगितले तर ते तुम्ही कोणतेही पूर्वनियोजन न करता, करता का? 2) एखादे काम खूप महत्वाचे असेल तर त्याचा विचार तुम्ही इतर गोष्टीपेक्षा कस करता? 3) तुम्ही सतत तुमचा फोन ईमेल आणि इतर नोटिफिकेशन पहाण्यासाठी उतावीळ असता का? 4) तुम्ही कितिवेळ कामाव्यतिरिक्त फोंनवर बोलता? 5) उगाचच वायफळ गप्पा करता का? 6) कामाची टाळाटाळ करता का?

हे प्रश्न विचारल्यावर जर काही उत्तरे तुम्हाला अधिक मिळत असतील तर तुम्ही त्या सवयींना नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

आता तर तुमच्या सवयीचे प्रकार, त्याची पद्धत, त्याचा जन्म आणि त्याचा होणारा परिणाम तुम्हाला समाजाला असेलच.

तुमचे व्यक्तिमत्व या सवयी बदलून सुधारा. आता त्यावर जलदगतीने नियंत्रण कसे ठेवायचे, याविषयी आपण जाणून घेवूयात.

सवयी बदलायला थोडा वेळद्या, हळूहळू त्या कमी करा-आपल्याला हळूहळू लागलेल्या सवयी हळुहळूच बदलल्या पाहिजेत.

त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. त्यासाठी प्रयत्न करायला हवा.

आपल्या सवयींना आपल्यावर हवी होऊ देवू नका. चांगल्या सवयींना जपा आणि त्यातही सकारात्मक बदल करा, त्या वाढवा.

ज्या वाईट सवयी आहे त्यांना कमी करा. ज्यांचा अडसर तुमच्या व्यक्तिमत्वात येतो अश्या सवयी बदला.

त्यासाठी सकारात्मकतेने बदल करा. अश्या प्रकारे तुमच्या वाईट सवयी नियंत्रणात आणा, त्यांना बदला आणि सवयींचे गुलाम होऊ नका.

चांगल्या सवयी लावून घेणं खूप अवघड असतं पण वाईट सवयी लावून घेणं खूप सोपं असतं पण त्या बदलणं खूप अवघड असतं. म्हणून चांगल्या सवयींचे पाईक व्हा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!